मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
आशौचांत विशेष

द्वितीय परिच्छेद - आशौचांत विशेष

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां आशौचांत विशेष सांगतो .

अत्राशौचेविशेषोनिर्णयामृतेविश्वरुपनिबंधे आश्विनेशुक्लपक्षेतुप्रारब्धेनवरात्रके शावाशौचेसमुत्पन्नेक्रियाकार्याकथंबुधैः सूतकेवर्तमानेचतत्रोत्पन्नेसदाबुधैः देवीपूजाप्रकर्तव्यापशुयज्ञविधानतः सूतकेपूजनंप्रोक्तंदानंचैवविशेषतः देवीमुद्दिश्यकर्तव्यंतत्रदोषोनविद्यत इति कालादर्शेविष्णुरहस्येपि पूर्वसंकल्पितंयच्चव्रतंसुनियतव्रतैः तत्कर्तव्यंनरैः शुद्धंदानार्चनविवर्जितमिति गौडनिबंधेतिथितत्त्वेप्युक्तम् ‍ आश्विनकृष्णनवम्यादिशुक्लप्रतिपदादिषष्ठ्यादिसप्तम्यादिचैकंकर्म अतश्चमध्येआशौचपातेपिनदोषः संकल्पोव्रतसत्रयोरितिविष्णूक्तेरिति आरब्धंस्वयमेवकार्यं अनारब्धंत्वन्येनकारयेदितिदिवोदासः रजस्वलात्वन्येनकारयेत् ‍ सूतकादिवद्विशेषवचनाभावात् ‍ स्त्रीणांचनवरात्रेतांबूलादिचर्वणंभवति तदुक्तंव्रतहेमाद्रौगारुडे गंधालंकारतांबूलपुष्पमालानुलेपनम् ‍ उपवासेनदुष्यंतिदंतधावनमंजनमिति एतत्सभर्तृकोपवासविषयम् ‍ अन्यश्चात्रविशेषः परिभाषायामुक्तः ।

निर्णयामृतांत विश्वरुपनिबंधांत - " आश्विनशुक्लपक्षांत नवरात्राचा प्रारंभ झाला असतां मृताशौच झालें तर ज्ञात्यांनीं तें नवरात्र कर्म कसें करावें ? पूर्वीं सूतक उत्पन्न असतां किंवा त्या नवरात्रांत सूतक उत्पन्न असतां निरंतर विद्वानांनीं पशुयज्ञविधीनें देवीपूजा करावी . सूतकामध्यें पूजन व विशेषेंकरुन दान देवीच्या उद्देशानें करावें , त्याविषयीं दोष नाहीं . " कालादर्शांत - विष्णुरहस्यांतही - " पूर्वसंकल्पित जें व्रत तें नियमितव्रत करणार्‍या मनुष्यांनीं केवळ दान व पूजन यांवांचून करावें . " गौडनिबंधांत तिथितत्त्वांतही सांगतो - आश्विनकृष्ण नवमीपासून शुक्लनवमीपर्यंत , तसेंच शुक्लप्रतिपदेपासून , षष्ठीपासून , आणि सप्तमीपासून , नवमीपर्यंत जे नवरात्राचे पक्ष सांगितले आहेत त्यांतील कोणताही पक्ष स्वीकारला असतां तें एक कर्म आहे . म्हणून मध्यें आशौच आलें असतांही दोष नाहीं . कारण , " व्रत आणि सत्र यांचा संकल्प झाला म्हणजे आरंभ झाला , आरंभ झाला असतां आशौच नाहीं " असें विष्णुवचन आहे . आरंभलेलें तें स्वतांच करावें . आरंभ न केलेलें इतरांकडून करवावें , असें दिवोदास सांगतो . रजस्वलेनें तर दुसर्‍याकडून करवावें . कारण , सूतकांत करण्याविषयीं वचन आहे , तसें येथें विशेषवचन नाहीं , नवरात्रांत स्त्रियांना तांबूलादि भक्षण होत आहे , तेंच सांगतो - व्रतहेमाद्रींत - गारुडांत - " गंध , अलंकार , तांबूल , पुष्पमाला , अनुलेपन , दंतधावन , व अंजन हीं उपवासांत निषिद्ध नाहींत . " हें वचन सभर्तृक स्त्रीच्या उपवासविषयक होय . एथें अन्यही विशेष आहे तो ( प्रथमपरिच्छेदांत ) परिभाषेत सांगितला आहे .

आश्विनशुक्लपंचम्यामुपांगललिताव्रतं महाराष्ट्रेषुप्रसिद्धं तत्रयद्यपिकथायांकालविशेषोनोक्तस्तथापि रात्रौजागरणंकुर्याद्गीतवादित्रनिः स्वनैरितिरात्रौजागरोक्तेः शक्तिपूजायारात्रौप्राशस्त्याच्च रात्रिव्यापिनीग्राह्येतिकेचित् ‍ वस्तुतस्तुवचनंविनारात्रिपूजायांमानाभावात् ‍ जागरस्यचांगत्वाद्युग्मवाक्यात् ‍ भुक्त्वाजागरणेनक्तेचंद्राद्यर्घ्यव्रतेतथा ताराव्रतेषुसर्वेषुरात्रियोगोविशिष्यत इतिकालहेमाद्रौवचनाच्चपूर्वविद्धाग्राह्या रात्रिशब्दः पूर्वविद्धावचन इतिहेमाद्रिः अस्यचभुक्त्वाजागरणरुपत्वादितिसाधुप्रतीमः भुक्त्वाजागरणंयत्रेत्येकंपदं तस्मिन्व्रतेइत्यर्थः अन्यथाभुक्त्वेत्यसंगतेः दिवोदासीयेप्येवं ।

आश्विनशुक्लपंचमीस उपांगललिताव्रत महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहे . त्याविषयीं जरी कथेमध्यें विशेष काल सांगितला नाहीं तथापि " रात्रीस गायन , वाद्यें यांच्या शब्दांनीं जागरण करावें . " असें रात्रीस जागरण करण्याविषयीं सांगितलें असल्यामुळें व शक्तिपूजेस रात्रीं प्रशस्तपणाही असल्यामुळें पंचमी रात्रिव्यापिनी घ्यावी , असें केचित् ‍ म्हणतात . वास्तविक म्हटलें तर वचनावांचून रात्रिपूजेविषयीं प्रमाण नसल्यामुळें , जागरण सांगितलें तें व्रताचें अंग असल्यामुळें युग्मवाक्यावरुन ; आणि " भोजन करुन जागरण ज्या व्रतांत आहे त्या व्रताविषयीं , नक्त व्रताविषयीं चंद्रादिकांला अर्घ्यव्रताविषयीं , आणि सर्व नक्षत्रव्रतांविषयीं रात्रियोग विशिष्ट आहे " ह्या कालहेमाद्रींतील वचनावरुनही पूर्वविद्धा ( चतुर्थीविद्धा ) घ्यावी . ह्या वचनांत ‘ रात्रि ’ हा शब्द पूर्वविद्धावाचक आहे , असें हेमाद्रि सांगतो . हें व्रत भुक्त्वाजागरणरुप आहे , म्हणून याविषयीं पंचमी , पूर्वविद्धा घ्यावी हें बरें , असें आम्हीं समजतों . कारण , ‘ भुक्त्वाजागरणे ’ हें एक पद आहे . भोजन करुन जागरण ज्या व्रतांत आहे तें व्रत असा अर्थ आहे . असा अर्थ नाहीं केला तर ‘ भुक्त्वा ’ याची संगति लागणार नाहीं . दिवोदासीयांत असेंच आहे .

आश्विनशुक्लपक्षेमूलनक्षत्रेपुस्तकेषुसरस्वतीस्थापनम् ‍ यथोक्तंनिर्णयामृतेदेवीपुराणे मूलेषुस्थापनं देव्याः पूर्वाषाढासुपूजनम् ‍ उत्तरासुबलिंदद्याच्छ्रवणेनविसर्जयेदिति रुद्रयामलेपि मूलऋक्षेसुराधीशपूजनीयासरस्वती पूजयेत्प्रत्यहंदेवयावद्वैष्णवमृक्षकम् ‍ नाध्यापयेन्नचलिखेन्नाधीयीतकदाचन पुस्तकेस्थापितेदेवविद्याकामोद्विजोत्तमः संग्रहे आश्विनस्यस्तितेपक्षेमेधाकामः सरस्वतीम् ‍ मूलेनावाहयेद्देवींश्रवणेनविसर्जयेत् ‍ मूलस्याद्यपादेआवाहनमितिशिष्टाः श्रवणाद्यपादेचविसर्जयेत् ‍ आदिभागोनिशायांतुश्रवणस्ययदाभवेत् ‍ संप्रेषणंतदादेव्यादशम्यांचमहोत्सवइतिचिंतामणौब्रह्मांडपुराणात् ‍ ।

आश्विनशुक्लपक्षांत मूलनक्षत्रावर सरस्वतीस्थापन सांगतो - निर्णयामृतांत देवीपुराणांत - " मूलनक्षत्रावर सरस्वतीदेवीचें स्थापन , पूर्वाषाढांवर पूजन , उत्तराषाढांवर बलिदान आणि श्रवणावर विसर्जन करावें . " रुद्रयामलांतही " मूलनक्षत्रावर सरस्वतीचें पूजन करावें . पूजन तें श्रवणनक्षत्र येईपर्यंत प्रतिदिवशीं करावें . विद्येच्छू ब्राह्मणश्रेष्ठानें पुस्तकांचें स्थापन केलें असतां पढवूं नये , लिहूं नये , व अध्ययनही करुं नये . " संग्रहांत - " धारणाबुद्धि इच्छा करणारानें आश्विनाच्या शुक्लपक्षीं मूलनक्षत्रावर सरस्वतीदेवीचें आवाहन करावें व श्रवणनक्षत्रावर विसर्जन करावें . " मूलाच्या पहिल्या पादावर आवाहन करावें , असें शिष्ट सांगतात . श्रवणाच्या प्रथमपादावर विसर्जन करावें . कारण , " जेव्हां श्रवणाचा पहिला भाग रात्रीं असेल तेव्हां देवीचें संप्रेषण ( विसर्जन ) दशमी महोत्सवांत करावें . " असें चिंतामणींत ब्रह्मांडपुराणवचन आहे . यावरुन श्रवणाच्या प्रथमभागीं विसर्जन मुख्य आहे .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP