मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
वैधृति योग

द्वितीय परिच्छेद - वैधृति योग

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


प्रतिपदिचवैधृत्यादियोगनिषेधोभार्गवार्चनदीपिकायांदेवीपुराणे त्वाष्ट्रवैधृतियुक्ताचेत्प्रतिपच्चंडिकार्चने तयोरंतेविधातव्यंकलशारोपणंगुहेति चित्रावैधृतियुक्तापिद्वितीयायुताचेत्सैवग्राह्येत्युक्तंदुर्गोत्सवेभद्रान्विताचेत्प्रतिपत्तुलभ्यतेविरुद्धयोगैरपिसंगतासती सैवापराह्णेविबुधैर्विधेयाश्रीपुत्रराज्यादिविवृद्धिहेतुरिति यदातुवैधृत्यादिपरिहारेणप्रतिपन्नलभ्यते तदोक्तंतत्रैवकात्यायनेन प्रतिपद्याश्विनेमासिभवेद्वैधृतिचित्रयोः आद्यपादौपरित्यज्यप्रारभेन्नवरात्रकमिति भविष्येपि चित्रावैधृतिसंपूर्णाप्रतिपच्चेद्भवेन्नृप त्याज्याह्यंशास्त्रयस्त्वाद्यास्तुरीयांशेतुपूजनमिति रुद्रयामलेपि वैधृतौपुत्रनाशः स्याच्चित्रायांधननाशनम् तस्मान्नस्थापयेत्कुंभंचित्रायांवैधृतौतथा संपूर्णाप्रतिपद्देवचित्रायुक्तायदाभवेत् वैधृत्यावापियुक्तास्यात्तदामध्यंदिनेरवौ अभिजित्तुमुहूर्तंयत्तत्रस्थापनमिष्यत इति चित्रादिनिषेधेमूलंचिंत्यम् ।

प्रतिपदेस वैधृति इत्यादि योगाचा निषेध सांगतो - भार्गवार्चनदीपिकेंत देवीपुराणांत - “ चित्रानक्षत्र, वैधृतियोग यांनीं युक्त जर प्रतिपदा चंडिकापूजनदिवशीं असेल तर चित्रा, वैधृति संपल्यावर कलशस्थापन करावें, ” चित्रा व वैधृति यांहीं युक्त असली तरी द्वितीयायुक्त असेल तर तीच घ्यावी असें सांगितलें आहे, दुर्गोत्सवांत “ द्वितीयायुक्त प्रतिपदा जर मिळत असेल, मग ती विरुद्ध ( निषिद्ध ) योगांनीं युक्त असली तरी तीच अपराह्णीं करावी. कारण, ती लक्ष्मी, पुत्र, राज्य इत्यादिकांच्या वृद्धीला कारण आहे. ” जेव्हां तर, वैधृत्यादि योग वर्ज्य करुन प्रतिपदा मिळत नसेल तेव्हां सांगतो कात्यायन - “ आश्विनमासांतील प्रतिपदा वैधृति व चित्रा यांवर असेल तेव्हां वैधृति व चित्रा यांचे पहिले दोन पाद सोडून नवरात्राचा प्रारंभ करावा. भविष्यांतही - “ संपूर्ण प्रतिपदा चित्रा, वैधृति यांनीं युक्त होईल तर पहिले तीन भाग सोडून चातुर्थभागांत पूजन करावें. ” रुद्रयामलांतही - “ वैधृतीचे ठायीं पुत्रनाश, व चित्रानक्षत्रावर धननाश होतो, यास्तव चित्रा व वैधृति यांचे ठायीं कुंभस्थापन करुं नये. जेव्हां संपूर्ण प्रतिपदा चित्रायुक्त होईल अथवा वैधृतियुक्त होईल तेव्हां मध्याह्नीं सूर्य असतां अभिजिन्मुहूर्तावर कलशस्थापन इष्ट आहे. ” ह्या चित्रादिनिषेधाविषयीं मूल प्रमाण चिंत्य आहे.

इदंकलशस्थापनंरात्रौनकार्यम्‍ नरात्रौस्थापनंकार्यंनचकुंभाभिषेचनमितिमात्स्योक्तेः भास्करोदयमारभ्ययावत्तुदशनाडिकाः प्रातः काल इतिप्रोक्तः स्थापनारोपणादिष्वितिविष्णुधर्मोक्तेश्च रुद्रयामले स्नानंमांगलिकंकृत्वाततोदेवींप्रपूजयेत् शुभाभिर्मृत्तिकाभिश्चपूर्वंकृत्वातुवेदिकाम् यवान्वैवापयेत्तत्रगोधूमैश्चापिसंयुतान् तत्रसंस्थापयेत्कुंभंविधिनामंत्रपूर्वकम्‍ सौवर्णंराजतंवापिताम्रंमृन्मयजंतुवेति ।

हें कलशस्थापन रात्रीं करुं नये, कारण, “ रात्रीस ( कलश ) स्थापन करुं नये, व कुंभाभिषेचनही करुं नये. ” असें मात्स्यवचन आहे. “ सूर्योदयापासून आरंभ करुन ज्या दहा घटिका तो प्रातःकाळ स्थापना आरोपण इत्यादिकर्माविषयीं सांगितला आहे. ” असें विष्णुधर्मवचनही आहे. रुद्रयामलांत - “ मांगलिक स्नान करुन नंतर देवीचें पूजन करावें. पूर्वी शुद्धमृत्तिकेची वेदिका करुन तिजवर गोधूम व यव पेरावे आणि त्या वेदीवर समंत्रक यथाविधि कुंभस्थापन करावें. तो कुंभ सोन्याचा, रुप्याचा, तांब्याचा, अथवा मातीचा करावा. ”

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP