मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
देवीत्रिरात्र

द्वितीय परिच्छेद - देवीत्रिरात्र

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अस्यामेवसप्तम्यांदेवीत्रिरात्रमुक्तंहेमाद्रौ प्रतिपदादिनवतिथिषुउपवासकरणासामर्थ्येसप्तम्यादिदिनत्रयेवाकुर्यात् ‍ तदाहधौम्यः आश्विनेमासिशुक्लेतुकर्तव्यंनवरात्रकम् ‍ प्रतिपदादिक्रमेणैवयावच्चनवमीभवेत् ‍ त्रिरात्रंवापिकर्तव्यंसप्तम्यादियथाक्रमम् ‍ अतएवहेमाद्रौदेवीपुराणेमंगलाव्रते आश्विनेवाथवामाघेचैत्रेवाश्रावणेपिवा कृष्णाष्टम्यादिकर्तव्यंव्रतंशुक्लावधिंहरेः यावच्छुक्लाष्टमीशक्रउपोष्यातुविधानतः दानंहोमोजपः पूजाकन्याभोज्यास्तथान्वहम् ‍ महाभैरवरुपेणअस्थिमालाधराश्चये पूजनीयाविशेषेणवस्त्रैर्ग्रामपुरादिषु इतिमासचतुष्टयेभिधाय अन्यत्रापि अथवानवरात्रंचसप्तपंचत्रिकंदिवा एकभक्तेननक्तेनायाचितोपोषितैः क्रमादिति पूजयेताश्विनेशक्रयावच्छुक्लाष्टमीभवेत् ‍ सर्वकार्याणिसिद्ध्यंतिशक्रनास्त्यत्रसंशय इत्युक्तम् ‍ दिवेत्येकरात्रमुक्तम् ‍ गोविंदार्णवेदेवीपुराणे नवरात्रव्रतेऽशक्तस्त्रिरात्रंचैकरात्रकं व्रतंचरतियोभक्तस्तस्मैदास्यामिवांछितमिति तत्रापिसप्तम्याः पूजनेपूर्वोक्तोनिर्णयः अत्रतिथियौगपद्येतंत्रेणोपवासः तिथिद्वयनिमित्तंपूजादिकंतुभेदेन ।

याच सप्तमीपासून तीन दिवस देवीत्रिरात्र सांगतो हेमाद्रींत - प्रतिपदादिक नऊ तिथींस उपवास करण्यास सामर्थ्य नसेल तर सप्तम्यादि तीन दिवस उपोषण करुन त्रिरात्र करावें . तें धौम्य सांगतो - " आश्विनमासांत शुक्लपक्षीं नवरात्र करावें . तें प्रतिपदेपासून क्रमानें नवमीपर्यंत करावें . अथवा अशक्तानें सप्तमीपासून त्रिरात्रही क्रमानें करावें . " म्हणूनच हेमाद्रींत - देवीपुराणांत मंगलाव्रतांत - " आश्विनांत अथवा माघांत अथवा चैत्रांत किंवा श्रावणांत कृष्णाष्टमीपासून शुक्लाष्टमीपर्यंत यथाविधि व्रत करावें . म्हणजे शुक्लाष्टमीपर्यंत यथाविधि उपोषण करावें . व प्रतिदिवशीं दान , होम , जप , पूजा , आणि कन्याभोजन करावें . ग्राम , नगर इत्यादिकांचे ठायीं महाभैरवरुपानें जे अस्थिमाला धारण करणारे त्यांची वस्त्रादिकांनीं विशेषेंकरुन पूजा करावी . " असें चार मासांत व्रत सांगून अन्यत्रही सांगतो " अथवा नऊ , सात , पांच , तीन , किंवा एक दिवस एकभक्त , नक्त , अयाचित , किंवा उपोषण करुन क्रमानें व्रत करावें . आश्विनशुक्लाष्टमी होईल तोंपर्यंत पूजन करावें . तेणेंकरुन सर्वकार्यै सिद्ध होतात यांत संशय नाहीं . " असेम सांगितलें आहे . गोविंदार्णवांत - देवीपुराणांत - " जो भक्त नवरात्रव्रताविषयीं अशक्त असल्यामुळें त्रिरात्र किंवा एकरात्र व्रत आचरण करितो , त्यास मी इच्छित फल देतें . " त्यांतहीं सप्तमीचे पूजेविषयीं पूर्वोक्त निर्णय जाणावा . एथें दोन तिथि एकदिवशीं प्राप्त असतां तंत्रानें उपवास करावा . दोन तिथींच्या निमित्तानें पूजादिक करणें तें तर वेगवेगळें करावें .

अत्रविशेषोनिर्णयामृतेभविष्ये सप्तम्यांनवगेहानिदारुजानिनवानिच एकंवावित्तभावेनकारयेत्सुसमाहितः दुर्गागृहंप्रकर्तव्यंचतुरस्रंसुशोभनम् ‍ तन्मध्येवेदिकांकुर्याच्चतुर्हस्तांसमांशुभाम् ‍ तस्यांसिंहासनंक्षौमंकंबलाजिनसंयुतम् ‍ तत्रदुर्गांप्रतिष्ठाप्यसर्वलक्षणसंयुताम् ‍ भुजैश्चतुर्भीरुचिरैर्दशभिर्वाविभूषिताम् ‍ तप्तहाटकवर्णाभांत्रिनेत्रांशशिशेखराम् ‍ अनेककुसुमाकीर्णांकपर्देनसुशोभिताम् ‍ नितंबबिंबसन्नद्धकिंकिणीक्काणनादिनीम् ‍ शूलचक्रदंडशक्तिवज्रचापासिधारिणीम् ‍ घंटाक्षमालाकरकपानपात्रलसत्कराम् ‍ तदग्रेछिन्नशिरसंमाहिषंरुधिराप्लुतम् ‍ निःसृतार्धतनुंकंठनालेचर्मासिधारिणम् ‍ देवीधृतकरग्रीवंशूलेनोरसिताडितम् ‍ नागपाशेनविक्षिप्तंहर्यक्षेणापिविद्रुतम् ‍ वमद्रुधिरवक्रेणधुन्वतोर्ध्वंसटान्नुषा सर्वतोमातृचक्रेणसेव्यमानांसुरैस्तथेति तत्रदेवीप्रकर्तव्याहैमीवाराजतीतथा मृद्वार्क्षीलक्षणोपेताखड्गशूलेचपूजयेत् ‍ वार्क्षीदारुमयी ।

एथें विशेष सांगतो निर्णयामृतांत भविष्यांत - " सप्तमीचे दिवशीं समाहित होऊन काष्ठांचीं नऊ गृहें नवीं अशीं करावीं . अथवा एक करावें . अत्यंत सुंदर व चार कोनाचें असें दुर्गागृह करावें . त्यामध्यें सुंदर सारखी चार हात वेदिका करावी . तिचे ठायीं क्षौम ( पट्टवस्त्र ), कंबल व अजिन यांनीं युक्त सिंहासन करावें . त्या सिंहासनावर सर्वलक्षणयुक्त दुर्गेची प्रतिष्ठा करावी . ती दुर्गामूर्ति चार किंवा दहा सुंदर भुजांनीं भूषित ; तप्तसुवर्णासारखी कांति ; तीन नेत्रांची ; चंद्रशेखरा ; बहुतपुष्पांनीं व्याप्तः जटाजूटानें सुशोभित ; कमरेस बांधलेल्या बारीकघंटांच्या शब्दानें युक्त ; शूल , चक्र , दंड , शक्ति , वज्र , धनुष्य , तरवार यांतें धारण करणारी ; घंटा , रुद्राक्षमाला , करक ( कमंडलु ), पानपात्र यांनीं सुशोभित आहेत हस्त जीचे अशी दुर्गामूर्ति करावी . तिच्या पुढें मस्तक तुटलेला , रक्तानें भरलेला , अर्धै शरीर बाहेर आलेला , कंठनालावर ढाल तरवार धरणारा , देवीनें घरली आहे हस्ताचे ठायीं ग्रीवा ज्याची असा , शूलानें उरावर ताडित , नागपाशानें बद्ध , सिंहानें पराभूत , मुखानें रक्त ओकणारा , क्रोधानें सटा ( मानेवरील केश ) वर उडवणारा असा महिषासुर करावा . आणि चहूंकडे देवींच्या समूहांनीं व देवांनींही सेवा केलेली अशी दुर्गादेवी करावी . दुर्गादेवीची मूर्ति करावयाची ती सोन्याची , रुप्याची , मातीची किंवा लांकडाची करावी आणि तरवार व शूल हीं आयुधें करुन त्यांची पूजा करावी . "

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP