मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
कर्मकाल

द्वितीय परिच्छेद - कर्मकाल

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


कर्मकालमाह कालादर्शेनिगमः श्रावण्याप्रौष्ठपद्यावाप्रतिपत्षण्मुहूर्तकैः विद्धास्याच्छंदसांतत्रोपाकर्मोत्सर्जनंभवेत् अत्रपौर्णमासीश्रवणहस्तयोरुपलक्षणं तेनतावपिसंगवस्पृशौ उदयेसंगवस्पर्शेश्रुतौपर्वणिचार्कभे कुर्युर्नभस्युपाकर्मऋग्यजुः सामगाः क्रमादितिपृथ्वीचंद्रः तेनोदयसंगवोभयव्यापिनीमुख्या परेद्युः संगवाभावेपूर्वेद्युरुदयाभावेचैकैकसत्त्वेपूर्वेद्युश्चतुर्दशीवेधनिषेधात्सामान्यवाक्यादौदयिकीकर्मपर्याप्ताग्राह्यानपूर्वा संगवनिमित्तपूर्वविद्धापवादाभावात्‍ नान्यदौदयिकीत्यस्यपूर्वविद्धापरत्वाभावात् तेनभाद्रादौकालांतरेस्यान्नतुनिषिद्धे नहिव्रीह्यलाभेनिषिद्धमाषग्रहणंयुक्तं अतएवपरेद्युः संगवव्याप्तौपूर्वविद्धानिषेधः तदभावेतुनेतिमूर्खव्यवस्थाप्ययुक्ता विधिवैषम्यात् माषनिषेधेपितथापत्तेश्च पूर्वविद्धावचनसत्त्वेहिसायुज्यते एवंश्रवणेपिज्ञेयं तन्न विष्ण्वर्क्षेघटिकाद्वयमितिपूर्वोक्तविरोधात् तेनप्राशस्त्यमात्रपरमिदं तत्त्वंतु एतच्छुद्धाधिकपरं तेनयथाग्निहोत्रादौसायंप्रातः कालबाधेसामान्येजीवनावच्छिन्नकालेदर्शादौवानुष्ठानं यथावाव्रीह्यश्वशफाद्यभावेयागाक्षिप्तनिषिद्धवर्जद्रव्येण तथात्रसंगवाभावेनिषिद्धवर्जकर्मपर्याप्तौदयिकेकालांतरेवानुष्ठानंनतुकदाचिन्निषिद्धे अपवादाभावेउत्सर्गस्यैवप्राप्तेः कात्यायनादीनांतुदिनद्वयेपूर्वाह्णव्याप्तौएकदेशस्पर्शेवापूर्वैवेतिहेमाद्रिः यदपि श्रावणीदुर्गनवमीदूर्वाचैवहुताशनी पूर्वविद्धाप्रकर्तव्याशिवरात्रिर्बलेर्दिनमितिब्रह्मवैवर्तं तद्ब्रह्मपवित्रश्रवणाकर्मादिदैवकर्मविषयमितिहेमाद्रिः अतएववचनात् कुलधर्मव्रतादावपिपूर्वैव मदनरत्नेप्येवं मदनपारिजातेपि पूर्वविद्धायांश्रावण्यांवाजसनेयिनामुपाकर्मेत्युक्तम् ।

कर्मकाल सांगतो कालादर्शांत निगम - “ श्रावणी किंवा प्रौष्ठपदी पौर्णमासीनें सहा मुहूर्तांनीं ( १२ घटिकांनीं ) विद्ध प्रतिपदा असेल त्या ठिकाणीं वेदांचें उपाकर्मं व उत्सर्जन होतें. ” वरील गार्ग्यवचनांत पौर्णमासी सांगितली ती श्रवण व हस्त यांचें उपलक्षण ( बोधक ) आहे. तेणेंकरुन ते श्रवणहस्तही संगवकालस्पर्शी घ्यावे. कारण, “ सूर्योदयकालीं व संगवकालीं श्रवणनक्षत्र, पर्व आणि हस्तनक्षत्र यांवर अनुक्रमानें ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी यांनीं उपाकर्म करावें ” असें पृथ्वीचंद्र सांगतो. तेणेंकरुन उदयकाल व संगवकाल या दोन कालीं व्यापणारी पौर्णिमा मुख्य आहे. दुसर्‍या दिवशीं संगवकालीं नाहीं, व पूर्व दिवशीं उदयकालीं नाहीं, दोन्ही दिवशीं एक एक कालीं असेल त्या वेळीं पूर्वदिवशीं चतुर्दशींवेधाचा निषेध असल्यामुळें सामान्यवचनावरुन उदयव्यापिनी कर्मकालास पुरण्याइतकी असेल ती घ्यावी. पूर्वदिवसाची घेऊं नये. कारण, संगवकालीं असल्यामुळें पूर्वविद्धा घेण्याविषयीं अपवादवचन नाहीं. वर सांगितलेलें ‘ संगवाच्या पुढें असेल तरच औदायिकी घ्यावी, दुसरी औदायिकी घेऊं नये ’ हें गार्ग्यवचन पूर्वविद्धा घेण्याविषयीं सांगत नाहीं. तेणेंकरुन अशा स्थलीं भाद्रपदादि इतर कालीं श्रावणी होईल. पण निषिद्ध अशा चतुर्दशीयुक्त पौर्णिमेस होत नाहीं. व्रीहि न मिळतील तर निषिद्ध अशा माषांचें होमाविषयीं ग्रहण युक्त आहे काय ? युक्त नाहीं. निषिद्ध पूर्वदिवसाचें ग्रहण नाहीं म्हणूनच ‘ दुसर्‍या दिवशीं संगवकालव्यापिनी पूर्णिमा असली म्हणजे पूर्वविद्धेचा निषेध, दुसर्‍या दिवशीं संगवव्यापिनी नसेल तर पूर्वविद्धेचा निषेध नाहीं ही मूर्खानें केलेली व्यवस्थाही अयुक्त आहे. कारण, पूर्वोक्त विधि विषम होईल. आणि निषिद्धपूर्वा ग्रहण केली तर माषांना निषेध असला तरी ब्रीहि अश्वशफपरिमित असले तर माषांचा निषेध, नसले तर माषांचा निषेध नाहीं, अशी व्यवस्था प्राप्त होईल. पूर्वविद्धा ग्रहण करण्याविषयीं वचन असेल तर ती वरील व्यवस्था युक्त झाली असती. याप्रमाणें ऋग्वेद्यांना श्रवणाविषयींही समजावें. म्हणजे वरील मूर्खानें केलेल्या व्यवस्थेप्रमाणें दुसर्‍या दिवशीं संगवव्यापि श्रवण असेल तर उत्तराषाढायुक्त श्रवणाचा निषेध. अन्यथा नाहीं. ही व्यवस्था उत्तराषाढायुक्त घेण्याविषयीं वचन असतें तर युक्त झाली असती तें बरोबर नाहीं. कारण, ‘ उदयव्यापि दोन घटिका श्रवण असतां तें कर्म सफल होतें ’ ह्या पूर्वोक्त गार्ग्यवचनाशीं विरोध येतो. यावरुन ‘ नान्यदौदयिकी भवेत्‍ ’ हें वरील गार्ग्यवचन संगवकालाला प्राशस्त्यमात्रबोधक आहे. खरें म्हटलें तर - हें वचन, पूर्वदिवशीं शुद्ध पौर्णिमा असून दुसर्‍या दिवशीं उर्वरित जी पौर्णिमा तीविषयीं आहे. तेणेंकरुन अग्निहोत्रहोमाचा सायंकाल व प्रातःकाल यांचा बाध झाला म्हणजे कोणत्याही अडचणीमुळें होम राहिले असतां जिवंत आहे तोंपर्यंत कधींही किंवा दर्शादिकालीं त्या होमांचें अनुष्ठान करावें. अथवा अश्वशफपरिमिति व्रीहींच्या अभावीं यागाला कोणतें तरी द्रव्य पाहिजे म्हणून निषिद्धवर्ज्यद्रव्यानें होम करावा. तसा एथें संगवकालीं पौर्णिमा नसेल तर निषिद्ध वर्ज्य व कर्माला पुरे इतक्या उदयव्यापि पौर्णिमेस किंवा इतर कालीं उपाकर्म करावें. पण कधींही निषिद्ध दिवशीं करुं नये. कारण, अपवादवाक्य नसल्यामुळें उत्सर्ग ( सामान्य ) ‘ अतो भूतदिने० ’ हें निषेधक वचनच प्राप्त होतें. कात्यायनादिकांना तर दोन दिवशीं सकलपूर्वाह्नव्यापिनी पूर्णिमा असतां किंवा एकदेशव्यापिनी असतां पूर्वाच समजावी, असें हेमाद्रि सांगतो. आतां जें “ श्रावणीपूर्णिमा, दुर्गानवमी, दूर्वाष्टमी, हुताशनीपूर्णिमा, शिवरात्रि आणि बलिप्रतिपदा ह्या पूर्वविद्धा कराव्या ” असें ब्रह्मवैवर्तवचन तें ब्रह्मपवित्र, श्रवणाकर्म इत्यादि दैवकर्मविषयक आहे, असें हेमाद्रि सांगतो. याच वचनावरुन कुलधर्म, व्रत इत्यादिकांविषयीं देखील पूर्वाच घ्यावी. मदनरत्नांतही असेंच आहे. मदनपारिजातांतही - पूर्वविद्ध अशा श्रावणीपूर्णिमेस वाजसनेयींचें उपाकर्म होतें, असें सांगितलें आहे.  

मदनरत्नेतु पर्वण्यौदयिकेकुर्युः श्रावणंतैत्तिरीयकाइतिबह्वृचपरिशिष्टेबह्वृचान्प्रतिकर्मविधानार्थंप्रवृत्ते तत्रतैत्तिरीयककर्मविध्ययोगात्पूर्वोक्तकालिकापुराणादौसामान्यत औदयिकपर्वप्राप्तेस्तन्निषेधेनबह्वृचानांश्रवणविधानात्तैत्तिरीयकपदमनुवादत्वात्तस्यचप्राप्त्यधीनत्वात् प्राप्तेश्चयजुर्वेदिमात्रपरत्वात्सर्वयजुर्वेद्युपलक्षणार्थं अवयुत्यानुवादोवा नतुविधायकं येनविशेषविधिनोपसंहारः स्यात् अनुवादत्वाल्लक्षणानदोषः अन्यथात्वौदयिकपर्वविशिष्टोपाकर्मोद्देशेनकर्तृविधौ कर्तृविशिष्टेवाऔदयिकपर्वविधौवाक्यभेदापत्तेः तस्मात्तैत्तिरीयकपदाविवक्षयासर्वयजुर्वेदिनामौदयिकमेवपर्वेत्युक्तं तन्न नतावत्परिशिष्टेबह्वृचान्प्रत्येवविधिः धनिष्ठाप्रतिपद्युक्तत्वाष्ट्रऋक्षसमन्वितमित्यादितदुदाह्रते एवपरिशिष्ठेवेदांतरधर्मविधीनांदर्शनात् नाप्यनुवादोयं कालिकापुराणाद्बह्वृचादीनामपितदापत्तेः कुर्युरित्यस्यविधित्वेनतस्यैवार्थवादत्वेनैतत्प्राप्तानुवादित्वाच्च नचतैत्तिरीयकाणांगृह्येतद्विधिरस्ति येनानुवादःस्यात्‍ नचवाक्यभेदः तैत्तिरीयकमात्रस्यकर्ममात्रस्यवाउद्देश्यत्वायोगेनहविरार्तिवत् अष्टवर्षंब्राह्मणमुपनयीत इतिवच्चागत्याविशिष्टस्योद्देश्यत्वात् अन्यथोत्तरार्धेबह्वृचपदस्याप्यविवक्षापत्त्याश्रवणस्यसर्वसाधारण्यापत्तेः तस्मात् हेमाद्रिमतमेवयुक्तमितिदिक्‍ ।

मदनरत्नांत तर - ‘ उदयव्यापि पर्वाचे ठायीं तैत्तिरीय शाख्यांनीं श्रावणी करावी ’ हें बह्वृचपरिशिष्ट बह्वृचांना कर्मं सांगण्याकरितां प्रवृत्त आहे. त्यांत तैत्तिरीय शाख्यांचा कर्मविधि होत नसल्यामुळें पूर्वी सांगितलेल्या ‘ संप्राप्तवान्‍ श्रुतीर्ब्रह्मा० ’ ह्या कालिकापुराणादिवाक्यांत सामान्येंकरुन उदयव्यापि पर्व सर्वांना प्राप्त असल्यामुळें त्याचा ह्या परिशिष्टानें बह्वृचांना निषेध करुन श्रवणाचें विधान केल्यामुळें; त्या परिशिष्टांत तैत्तिरीयकपद हें अनुवाद आहे. तो अनुवाद पूर्वीं उदयव्यापि पर्वाची प्राप्ति असेल तर होतो. ती प्राप्ति कालिकापुराणवचनावरुन सामान्य यजुर्वेद्यांना असल्यामुळें हें परिशिष्टांतील ‘ तैत्तिरीयक ’ पद सर्व यजुर्वेद्यांचें उपलक्षण आहे. अथवा यजुर्वेद्यांतून तैत्तिरीयकांना पृथक्‍ करुन अनुवाद केला आहे. ज्या विशेष विधीनें उपसंहार ( एक विषयावर पर्यवसान ) होईल अशाचें हें तैत्तिरीयक पद विधायक नाहीं. अनुवादक झाल्यामुळें, तैत्तिरीयक पदाची यजुर्वेद्यांवर लक्षणा, अशी लक्षणा केली असतां दोष नाहीं. विधायक मानिलें तर उदयव्यापि पर्वयुक्त उपाकर्माचा उद्देश करुन तैत्तिरीयक कर्त्यांचें विधान केलें किंवा तैत्तिरीयक कर्तृयुक्त उपाकर्माचा उद्देश करुन उदयव्यापि पर्वाचें विधान केलें असतां वाक्यभेद दोष येईल तो असा - ‘ उदयव्यापिपर्वणि उपाकर्म, तच्च तैत्तिरीयकाणां ’ किंवा तैत्तिरीयका उपाकर्म कुर्युः, तच्च उदयव्यापिपर्वणि ’ अशीं भिन्नवाक्यें होतील. तस्मात्‍ तैत्तिरीयक पद विवक्षित ( सार्थक ) न मानितां सर्व यजुर्वेद्यांना उदयव्यापीच पर्व समजावें, असें ( मदनरत्नांत ) सांगितलें आहे, तें बरोबर नाहीं. कारण, वर सांगितलें कीं, परिशिष्ट हें बह्वृचांनाच कर्मविधायक आहे असें नाहीं. कारण, “ धनिष्ठा, प्रतिपदा, चित्रा यांनीं युक्त श्रावणी कर्म अनुक्रमें ऋगयजुः सामवेद्यांनीं करावें ” इत्यादि इतर वेदांच्या कर्माचे विधि ह्याच परिशिष्टांत सांगितलेले दिसतात. हें वरील तैत्तिरीयक पद अनुवादही नाहीं. कालिकापुराणवचनावरुन अनुवाद म्हटला तर ‘ संप्राप्तवान्‍ श्रुतीर्ब्रह्मा० ’ ह्या कालिकापुराणवचनांत सामान्यश्रुतींचा उदयव्यापि पर्वकाल सांगितल्यामुळें बह्वृचादिकांना देखील तोच काल प्राप्त होईल. आणि त्या परिशिष्टांतील ‘ कुर्युः ’ हें विधि असल्यामुळें त्यानें युक्त जें वाक्य तेंच अर्थवाद ( अनुवाद ) झाल्यानें या परिशिष्टवचनानें प्राप्त जी गोष्ट तिचें अनुवादक तें वचन होईल, हाही दोष येतो. कारण, ज्या योगानें हा परिशिष्टांतील विधि अनुवाद होईल अशा रीतीचा तैत्तिरीयकांच्या गृह्यांत ‘ उदयव्यापि पर्वावर श्रावणी करावी ’ असा विधि आहे काय ? नाहीं. आतां वर वाक्यभेद दोष सांगितला तो येत नाहीं. कारण, केवळ तैत्तिरीयकरुप कर्त्याचा किंवा सामान्यकर्माचा उद्देश करुन कशाचेंही विधान करीत नाहीं. तर ‘ तैत्तिरीयकांचें उपाकर्म ’ इतकें विशिष्ट उद्देश करुन उदयव्यापि पर्वाचें विधान, किंवा ‘ उदयव्यापिपर्वविशिष्ट उपाकर्म ’ इतकें विशिष्ट उद्देश करुन तैत्तिरीयक कर्त्याचें विधान करितों, जसें - हविर्विशिष्ट आतींचा उद्देश करुन पंचशराव ओदनाचा विधि सांगितला आहे, तसें अथवा आठ वर्षांच्या ब्राह्मणाचें उपनयन करावें, या
ठिकाणीं जशी दुसरी गति नसल्यामुळें अष्टवर्षविशिष्ट ब्राह्मणाला उद्देश करुन उपनयनाचें विधान, - तसें विशिष्टाला उद्देश्यत्व समजावें. असें केल्यानें वाक्यभेद नाहीं. असें न करितां तैत्तिरीयक पद वर सांगितल्याप्रमाणें अविवक्षित मानिलें तर त्याच परिशिष्टवचनाच्या उत्तरार्धांत ‘ बह्वृचाः श्रवणे कुर्युः ’ या ठिकाणीं बह्वृच पदही अविवक्षित झाल्यानें श्रवणकाल सर्वसाधारण ( इतरवेद्यांनाही ) होईल. तस्मात्‍ हेमाद्रीचें मतच ( कात्यायनादिकांना पूर्वा इत्यादि ) युक्त आहे. ही दिशा समजावी.

इदंचशिष्यानध्यापयत आवसथ्येग्नौ अनध्यापयतोनाधिकार इतिकर्कः श्रावण्यामपिग्रहणादिदुष्टायांकातीयभिन्नैः प्रौष्ठपद्यांकार्यं तैस्तुश्रावणपंचम्यां संक्रांतिर्ग्रहणंवापिपौर्णमास्यांयदाभवेत् उपाकृतिस्तुपंचम्यांकार्यावाजसनेयिभिरितिस्मृतिमहार्णवेवाजसनेयिग्रहणादितिहेमाद्रिः इदंचसूत्रोक्तकालपरत्वाद्बह्वृचपरमपि सांख्यायनैस्तुहस्तेकार्यं आपस्तंबैराथर्वणैश्चप्रौष्ठपद्यां यत्तुबौधायनः श्रावण्यांपौर्णमास्यामाषाढ्यांवोपाकृत्येत्यूचे तत्प्रौष्ठपद्यामपिदोषेआषाढ्यांकार्यमित्येवमर्थं तच्छाखीयविषयंवा ।

हें उपाकर्म शिष्यांना अध्ययन पढविणाराचें आवसथ्य अग्नीवर होतें. अध्यापन न करणाराला त्या अग्नीवर अधिकार नाहीं, असें कर्क सांगतो. श्रावणी पौर्णमासी देखील ग्रहण, संक्रांति यांनी दूषित असतां कात्यायनभिन्नांनीं प्रौष्ठपदीस करावें. कात्यायनांनीं तर श्रावणपंचमीस करावें. कारण, “ पौर्णमासीला ज्या वेळीं संक्रांति किंवा ग्रहण असेल त्या वेळीं वाजसनेयींनीं उपाकर्म पंचमीस करावें ” असें स्मृतिमहार्णवांत ‘ वाजसनेयी ’ पदाचें ग्रहण केलें आहे, असें हेमाद्रि सांगतो. हें वचन सूत्रोक्त कालबोधक असल्यामुळें बह्वृचांविषयीं देखील आहे. सांख्यायनांनीं तर हस्तावर करावें. आपस्तंबांनीं व आथर्वणांनीं प्रौष्ठपदीस करावें. आतां जें बौधायन - “ श्रावणी पौर्णमासीस किंवा आषाढीस उपाकरण करुन ” असें सांगता झाला, तें प्रौष्ठपदीसही दोष असतां आषाढीस करावें, अशाच अर्थाकरितां आहे. अथवा त्या बौधायनशाखीयांविषयीं आहे.  

सामगास्तुश्रावणेहस्तेकुर्युः बह्वृचाः श्रवणेचैवहस्तर्क्षेसामवेदिन इतिनिर्णयामृतेगोभिलोक्तेः सोप्युत्तरः धनिष्ठाप्रतिपद्युक्तंत्वाष्ट्रऋक्षसमन्वितं श्रावणंकर्मकुर्वीरन्नृग्यजुः सामपाठकाः इति मदनरत्नेपरिशिष्टोक्तेः गार्ग्योऽपि सिंहेरवौतुपुष्पर्क्षेपूर्वाह्नेविवरेबहिः छंदोगामिलिताः कुर्युरुत्सर्गंस्वस्वछंदसां शुक्लपक्षेतुहस्तेन उपाकर्मापराह्णिकमिति अविवरेग्रहादिदोषहीने विचरेदितिपाठोऽज्ञानकृतः पुष्यर्क्षेपूर्वाह्णेउत्सर्गः अपराह्णिकमुपाकर्मेत्यन्वयः अन्यस्तुविशेषः पूर्वमेवोक्तः ।

सामवेद्यांनीं तर श्रावणांतील हस्तावर करावें. कारण, “ बह्वृचांनीं श्रवणावर आणि सामवेद्यांनीं हस्तावर करावें ” असें निर्णयामृतांत गोभिलवचन आहे. तो हस्तही दुसर्‍या दिवशींचा घ्यावा. कारण, “ ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी यांनीं अनुक्रमानें धनिष्ठा, प्रतिपदा, चित्रा यांनी युक्त अशी श्रावणी करावी ” असें मदनरत्नांत परिशिष्टवचन आहे. गार्ग्यही - “ सिंहास सूर्य असतां अदूषित पुष्य नक्षत्रावर घराच्या बाहेर पूर्वाह्णीं छंदोगांनीं एकत्र मिळून आपापल्या वेदाचें उत्सर्जन करावें. आणि शुक्लपक्षांतील हस्तनक्षत्रावर अपराह्णकालीं उपाकर्म करावें. ” या वचनांत ‘ अविवरे ’ असें पद आहे त्याचा अर्थ - ग्रहणादिदोषरहित, असा समजावा. ‘ विचरेत्‍ ’ असा पाठ अज्ञानानें केलेला आहे. पुष्यावर पूर्वाह्णीं उत्सर्जन व हस्तावर अपराह्णीं उपाकर्म, असा अन्वय ( संबंध ) समजावा. इतर विशेष पूर्वीच सांगितला आहे.

प्रयोगपारिजातेगोभिलः उपाकर्मोत्सर्जनंचवनस्थानामपीष्यते धारणाध्ययनांगत्वाद्गृहिणांब्रह्मचारिणां उत्सर्जनंचवेदानामुपाकरणकर्मच अकृत्वावेदजप्येनफलंनाप्नोतिमानवः सर्वथालोपेतुकृच्छ्रउपवासश्च वेदोदितानांनित्यानामितिमनुनाऽभोजनोक्तेः एवमुत्सर्गेऽपि ।

प्रयोगपारिजातांत गोभिल - “ उपाकर्म व उत्सर्जन हें वेदांचें धारण व अध्ययन यांचें अंग असल्यामुळें वानप्रस्थांनाही इष्ट आहे. गृहस्थांना व ब्रह्मचार्‍यांना आहेच. वेदांचें उत्सर्जन व उपाकर्म केल्यावांचून वेदाच्या जपाचें फल मनुष्याला प्राप्त होत नाहीं. ” उपाकर्माचा सर्वथा लोप झाला असतां कृच्छ्र आणि उपवास करावा. कारण, वेदविहित नित्यकर्मै झालीं नसतां मनूनें उपवास सांगितला आहे. याप्रमाणें उत्सर्जनाविषयींही समजावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP