मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
दूर्वाष्टमी

द्वितीय परिच्छेद - दूर्वाष्टमी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


भाद्रपदशुक्लाष्टमीदूर्वाष्टमी सापूर्वाग्राह्या श्रावणीदुर्गनवमीदूर्वाचैवहुताशनी पूर्वविद्धातुकर्तव्याशिवरात्रिर्बलेर्दिनमितिहेमाद्रौवृद्धयमोक्तेः शुक्लाष्टमीतिथिर्यातुमासिभाद्रपदेभवेत् ‍ दूर्वाष्टमीतुसाज्ञेयानोत्तरासाविधीयत इतिपुराणसमुच्चयाच्च यत्तु मुहूर्तेरौहिणेष्टम्यांपूर्वावायदिवापरा दूर्वाष्टमीतुसाकार्याज्येष्ठामूलंचवर्जयेदितितत्रैवपराकार्येत्युक्तं तत्पूर्वदिनेज्येष्ठादियोगेद्रष्टव्यं दूर्वाष्टमीसदात्याज्याज्येष्ठामूलर्क्षसंयुता तथा ऐंद्रर्क्षेपूजितादूर्वाहंत्यपत्यानिनान्यथा भर्तुरायुर्हरामूलेतस्मात्तांपरिवर्जयेदितितत्रैवतन्निषेधात् ‍ इदमगस्त्योदयेकन्यार्केचनकार्यं शुक्लेभाद्रपदेमासिदूर्वासंज्ञातथाष्टमी सिंहार्कएवकर्तव्यानकन्यार्केकदाचन सिंहस्थेसोत्तमासूर्येनुदितेमुनिसत्तम इतिमदनरत्नेस्कांदोक्तेः अगस्त्येउदितेतातपूजयेदमृतोद्भवं वैधव्यंपुत्रशोकंचदशवर्षाणिपंचचेतितत्रैवदोषोक्तेश्च भाद्रपदशुक्लाष्टम्यामगस्त्योदयेभाविनिसतिपूर्वकृष्णाष्टम्यामेवकुर्यादितिहेमाद्रिः दीपिकाप्येवं इदंचव्रतंस्त्रीणांनित्यं यानपूजयतेदूर्वांमोहादिहयथाविधि त्रीणिजन्मानिवैधव्यंलभतेनात्रसंशयः तस्मात्संपूजनीयासाप्रतिवर्षंवधूजनैरितिपुराणसमुच्चयात् ‍ यदाज्येष्ठादिकंविनाष्टमीनलभ्यतेतदातत्रैवोक्तं कर्तव्याचैकभक्तेनज्येष्ठामूलंयदाभवेत् ‍ दूर्वामभ्यर्चयेद्भक्त्यानवंध्यंदिवसंनयेदिति ।

भाद्रपद शुक्लाष्टमी ही दूर्वाष्टमी होय . ती पूर्व दिवसाचीच घ्यावी . कारण , " श्रावणी पौर्णिमा , दुर्गानवमी , दूर्वाष्टमी , हुताशनी , शिवरात्रि , व बलिप्रतिपदा , ह्या पूर्वविद्धा कराव्या " असें हेमाद्रींत वृद्धयमाचें वचन आहे ; आणि " भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं जी अष्टमी तिथि ती दूर्वाष्टमी जाणावी , ती दुसरे दिवशींची घेऊं नये " असें पुराणसमुच्चयांतही वचन आहे . आतां जें रौहिण ( नवव्या ) मुहूर्तीं पूर्व दिवशीं किंवा पर दिवशीं जी अष्टमी असेल ती दूर्वाष्टमी करावी , परंतु ज्येष्ठा व मूल हीं नक्षत्रें सोडावी " असें हेमाद्रींतच परा करावी म्हणून सांगितलें तें पूर्व दिवशीं ज्येष्ठादि योग असतां जाणावें . कारण , " दूर्वाष्टमी , सर्वथा ज्येष्ठा व मूलनक्षत्रयुक्त टाकावी " तसेंच " ज्येष्ठा नक्षत्रावर दूर्वेचें पूजन अपत्यांचा नाश करितें . अन्यथा अपत्यनाश करीत नाहीं . मूलनक्षत्रावर दूर्वेचें पूजन पतीचें आयुष्य हरण करितें , यास्तव ज्येष्ठमूलनक्षत्रांनीं युक्त दूर्वाष्टमी टाकावी " असा हेमाद्रींतच ज्येष्ठादियोगांचा निषेध केला आहे . हें दूर्वापूजन व्रत अगस्त्योदय व कन्येचा सूर्य असतां करुं नये . कारण , ‘ भाद्रपदमासीं शुक्लपक्षीं अष्टमी दूर्वासंज्ञक होय . ती सिंहाचा सूर्य असतांच करावी , कन्येचा सूर्य असतां कधींही करुं नये . सिंहाचा सूर्य व अगस्त्याचा अनुदय असतां ती अष्टमी उत्तम होय " असें मदनरत्नांत स्कांदवचन आहे . आणि " अगस्त्योदय असतां दूर्वेचें पूजन केलें तर पंधरा वर्षै वैधव्य व पुत्रशोक प्राप्त होतो . " असा तेथेंच दोष उक्त आहे . भाद्रपदशुक्ल अष्टमीस अगस्त्योदय होणार असेल तर पूर्व कृष्णाष्टमीसच हें दूर्वाष्टमीव्रत करावें , असें हेमाद्रि सांगतो . दीपिकेंतही असेंच आहे . हें व्रत स्त्रियांस नित्य आहे . कारण , " जी स्त्री इहलोकीं यथाविधि दूर्वाष्टमीव्रत करीत नाहीं ती तीन जन्म वैधव्य पावते , यांत संशय नाहीं . यास्तव स्त्रियांनीं प्रतिवर्षीं दूर्वापूजन करावें " असें पुराणसमुच्चयांत वचन आहे . जेव्हां ज्येष्ठा व मूळ यांवांचून अष्टमी न मिळेल तर तेथेंच सांगतो - " ज्येष्ठा किंवा मूळ नक्षत्र जेव्हां अष्टमीस असेल तेव्हां एकभुक्तव्रत करुन भक्तीनें दूर्वापूजन करावें , परंतु वंध्य ( पूजारहित ) दिवस करुं नये .

अत्रविधिर्मदनरत्नेभविष्ये शुचौदेशेप्रजातायांदूर्वायांब्राह्मणोत्तम स्थाप्यलिंगंततोगंधैः पुष्पैर्धूपैः समर्चयेत् ‍ दध्यक्षतैर्द्विजश्रेष्ठ अर्घ्यंदद्यात्रिलोचने दूर्वाशमीभ्यांविधिवत्पूजयेच्छ्रद्धयान्वितः मंत्रस्तु त्वंदूर्वेमृतजन्मासिवंदितासिसुरासुरैः सौभाग्यंसंततिंदेहिसर्वकार्यकरीभव यथाशाखाप्रशाखाभिर्विस्तृतासिमहीतले तथाममापिसंतानंदेहित्वमजरामरमिति अत्रानग्निपक्कंभक्षयेत् ‍ अनग्निपक्कमश्नीयादन्नंदधिफलंतथा अक्षारलवणंब्रह्मन्नश्नीयान्मधुनान्वितमितितत्रैवभविष्योक्तेः भाद्रपदेऽधिमासेसतिनिर्णयदीपेस्कांदे अधिमासेतुसंप्राप्तेनभस्य उदयेमुनेः अर्वाग्दूर्वाव्रतंकार्यंपरतोनैवकुत्रचित् ‍ ।

या व्रताचा विधि मदनरत्नांत भविष्यांत - " हे ब्राह्मणश्रेष्ठा ! शुद्ध प्रदेशीं उत्पन्न झालेल्या दूर्वेचे ठायीं लिंग स्थापून गंध , पुष्प , धूप इत्यादिकांनीं पूजन करावें , आणि शिवास दधि व अक्षतांनीं अर्घ्य द्यावें . श्रद्धायुक्त होऊन दूर्वा व शमी यांहींकरुन यथाविधि पूजन करावें . " प्रार्थनामंत्र - " त्वं दूर्वेऽमृतजन्मासि वंदितासि सुरासुरैः ॥ सौभाग्यं संततिं देहि सर्वकार्यकरी भव ॥ यथा शाखाप्रशाखाभिर्विस्तृतासि महीतले ॥ तथा ममापि संतानं देहि त्वमजरामरं ॥ " ह्या व्रताचे ठायीं अग्निपक्क ( शिजविलेलें ) नसेल तें भक्षण करावें . कारण , " अग्नीवर न शिजविलेलें असें अन्न व दहीं , फलें हीं भक्षण करावीं ; हे ब्रह्मन् ‍ ! मधानें युक्त , व क्षार लवणरहित भक्षण करावें " असें तेथेंच भविष्यवचन आहे . भाद्रपदमास अधिक असतां सांगतो - निर्णयदीपांत स्कांदांत - " भाद्रपद अधिकमास असतां शुद्धमासाच्या अष्टमीस अगस्तीचा उदय असल्यामुळें अधिकमासांत दूर्वाव्रत करावें , शुद्धांत कधींही करुं नये . "

अत्रैवज्येष्ठापूजोक्तामाधवीयेस्कांदे मासिभाद्रपदेशुक्लपक्षेज्येष्ठर्क्षसंयुता रात्रिर्यस्मिन्दिनेकुर्याज्जेष्ठायाः परिपूजनमिति इयंज्येष्ठायोगवशेनपूर्वापरावाग्राह्या दिनद्वययोगेपरा पूर्वेह्निरात्रियोगेपूर्वैव नवम्यासहकार्यास्यादष्टमीनात्रसंशयः मासिभाद्रपदेशुक्लपक्षेज्येष्ठर्क्षसंयुता रात्रिर्यस्मिन्दिनेकुर्याज्जेष्ठायाः परिपूजनमितितत्रैवोक्तेः अस्यापवादः यस्मिन्दिनेभवेज्ज्येष्ठामध्याह्नादूर्ध्वमप्यणुः तस्मिन्हविष्यंपूजाचन्यूनाचेत्पूर्ववासर इति इदंकेवलतिथौनक्षत्रेचोक्तं तत्राद्यंकेवलतिथौकार्यं अंत्यंकेवलर्क्षे तदुक्तंमात्स्ये प्रत्याब्दिकंतिथावुक्तंयज्ज्येष्ठादैवतव्रतम् ‍ प्रतिज्येष्ठाव्रतंयच्चविहितंकेवलोडुनि तिथावेवाचरेदाद्यंद्वितीयंकेवलर्क्षत इति अतएवमदनरत्नेभविष्येनक्षत्रमात्रेउक्तम् ‍ मासिभाद्रपदेपक्षेशुक्लेज्येष्ठायदाभवेत् ‍ रात्रौजागरणंकृत्वाएभिर्मंत्रैश्चपूजयेदिति दाक्षिणात्यास्त्वृक्षएवकुर्वंति हेमाद्रौस्कांदेपि मासिभाद्रपदेशुक्लपक्षेज्येष्ठर्क्षसंयुते यस्मिन्कस्मिन्दिनेकुर्याज्ज्येष्ठायाः परिपूजनमिति तथा मैत्रेणावाहयेद्देवींज्येष्ठायांतुप्रपूजयेत् ‍ मूलेविसर्जयेद्देवींत्रिदिनंव्रतमुत्तममिति मंत्रस्तु एह्येहित्वंमहाभागेसुरासुरनमस्कृते ज्येष्ठेत्वंसर्वदेवानांमत्समीपगताभवेत्यावाह्य तामग्निवर्णामितिसंपूज्य ज्येष्ठायैतेनमस्तुभ्यंश्रेष्ठायैतेनमोनमः शर्वायैतेनमस्तुभ्यंशांकर्यैतेनमोनमः ज्येष्ठेश्रेष्ठेतपोनिष्ठेब्रह्मिष्ठेसत्यवादिनि एह्येहित्वंमहाभागेअर्घ्यंगृह्णसरस्वति इत्यर्घ्यः ।

ह्या अष्टमीसच ज्येष्ठादेवीपूजा सांगतो माधवीयांत - स्कंदपुराणांत - " भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्या दिवशीं ज्येष्ठानक्षत्रयुक्त रात्रि असेल त्या दिवशीं ज्येष्ठादेवीचें पूजन करावें . " ही अष्टमी ज्येष्ठानक्षत्रानें युक्त पूर्वा किंवा परा असेल ती घ्यावी . दोन दिवशीं ज्येष्ठानक्षत्रयोग असतां परा घ्यावी . पूर्वदिवशीं रात्रीस योग असतां पूर्वाच करावी . कारण , " नवमीयुक्त अष्टमीच करावी यांत संशय नाहीं . भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्या दिवशीं ज्येष्ठानक्षत्रयुक्त रात्रि असेल त्या दिवशीं ज्येष्ठादेवीचें पूजन करावें " असें तेथेंच सांगितलें आहे . याचा अपवाद - " ज्या दिवशीं मध्याह्नापुढें ज्येष्ठानक्षत्र अल्पही असेल त्या दिवशीं हविष्य व पूजा हीं करावीं . मध्याह्नांत न्यून असेल तर पूर्व दिवशीं करावीं . " हें व्रत केवलतिथीस व केवलनक्षत्रावरही करण्याविषयीं सांगितलें आहे . त्यांत पहिलें केवल तिथीस करावें . दुसरें केवल नक्षत्रावर करावें . तें सांगतो - मत्स्यपुराणांत - " प्रतिवर्षीं करावयाचें जें ज्येष्ठादैवतव्रत तें तिथीस सांगितलें आहे . आणि प्रतिज्येष्ठानक्षत्रावर करावयाचें जें ज्येष्ठाव्रत तें केवल नक्षत्रावर सांगितलें आहे . पहिलें केवल तिथीसच करावें . आणि दुसरें केवल नक्षत्रावरच करावें . " म्हणूनच मदनरत्नांत भविष्यांत नक्षत्रावर करण्याविषयीं सांगितलें आहे , तें असें - " भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्या दिवशीं ज्येष्ठा असेल त्या रात्रीस जागरण करुन ज्येष्ठादेवीचें पुढील मंत्रानें पूजन करावें . " दाक्षिणात्यलोक तर केवल नक्षत्रावरच करतात . हेमाद्रींत स्कांदांतही " भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्येष्ठानक्षत्र कोणात्याही दिवशीं असेल त्या दिवशीं ज्येष्ठादेवीचें पूजन करावें . " तसेंच " अनुराधानक्षत्रावर ज्येष्ठादेवीचें आवाहन , ज्येष्ठानक्षत्रावर पूजन व मूलनक्षत्रावर विसर्जन करावें , असें हें त्रिदिनात्मक व्रत होय . " पूजेचा मंत्र - " एह्येहि त्वं महाभागे सुरासुरनमस्कृते ॥ ज्येष्ठे त्वं सर्वदेवानां मत्समीपगता भव " यानें आवाहन करुन " तामग्निवर्णा० " यानें पूजन करुन " ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः ॥ शर्वायै ते नमस्तुभ्यं शांकर्यै ते नमो नमः ॥ ज्येष्ठे श्रेष्ठे तपोनिष्ठे ब्रह्मिष्ठे सत्यवादिनि ॥ एह्येहि त्वं महाभागे अर्घ्यं गृह्ण सरस्वति ॥ " यानें अर्घ्य द्यावें .

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP