मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
सर्व शाखोपयोगी अंत्येष्टि निर्णय

धर्मसिंधु - सर्व शाखोपयोगी अंत्येष्टि निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


विघ्नरुप शुष्क तृणास केवल अग्नि असा जो श्रीविठ्ठल त्यास नमस्कार करुन सर्व शाखोपयोगी अंत्येष्टि निर्णय सांगतों:--

अंत्यकर्माचे अधिकारी श्राद्धाचे आरंमींच सांगितले आहेत. सर्वाचा अभाव असल्यास धर्मपुत्र करावा. पिता इत्यादिकांचें मरण समीप आलें असें पाहून पुत्नादिक अधिकार्‍यांनीं पित्याकडून सार्धाब्द प्रायश्चित्त व मोक्षधेनु इत्यादि दानें करवावी. किंवा त्याच्या उद्देशानें स्वतः करावीं. प्रायश्चित्तप्रयोग प्रायश्चित्तप्रकरणीं पहावा. सामर्थ्य असल्यास प्रायश्चित्त केल्यावर दशदानें करावीं. त्याविषयी मंत्र - ' गवामंगेषुतिष्ठन्ति ' हा गोदानाचा मंत्र, ' सर्वभूताश्रयाभूमिर्वराहेण समुधृता । अनंत सस्य फलदा ह्यतः शांतिं प्रयच्छमे, ' हा भूमिदानाचा मंत्र, ' महर्षेर्गोत्नसंभूता कास्यपस्य तिलास्मृताः । तस्मादेषां प्रदानेन ममपापं व्यपोहतु' हा तिलांचा, ' हिरण्यगर्भगर्भस्थं०' हा सुवर्णाचा; कामधेनुषु संभूतं सर्व ऋतुषु संस्थितं । देवानामाज्यमाहार मतः शांर्ति प्रयच्छमे ०' हा घृताचा; ' शरणं सर्व लोकानां लज्जाया लक्षणं परं । सुवेषधारि वस्त्रत्वं मतः०' या मंत्रानें वस्त्र द्यावे; ' सर्व देवमयं धान्यं सर्वोत्पत्तिकरं महत् । प्राणिनां जीवनोपाथ मतः शांति प्रयच्छमे ' या मंत्रानें धान्याचें दान करावें. ' प्रीतियतः पितृणांच विष्णुशंकर योःसदा । शिवनेत्रोद्भवं रुप्य मतः ०' या मंत्रानें रौप्य दान करावें; ' यस्मादन्नरसाःसर्वेनोत्कृष्टालवणं विना । शंभो प्रीति करं नित्यमतः' या मंत्नानें लवणदान करावें. भूमि इत्यादिकांची प्रमाणें जननशांतिप्रकर्णांत सांगितलीं आहेत. प्रायश्चित्तादि कर्मीत विष्णु इत्यादिकांचे नामसंकीर्तनानें कर्माची सांगता होते. प्रायश्चित्तादिक करणें अशक्य असलें तरी मरणकालीं विष्णु व शिव यांचे नामसंकीर्तन मात्रानें सर्व पापांचा क्षय होऊन मुक्ति प्राप्त होते. असा सर्व पुराणादिकांचा सिद्धांत आहे. तसेंच श्रीभागवतांत अवतार, गुण व कर्म यांचे विडंबन म्हणजे अनुकरण ज्यांचे ठायी आहे अशी ज्या परमेश्वराची नामें प्राणोत्क्रमणकालीं पराधीन असतांही जे उच्चारितात ते अनेकजन्मार्जित पातकें एकाएकीं टाकून अज, निरुपाधी व सत्य अशा ब्रह्माप्रत पावतात. त्या परमेश्वरास मी शरण जातों. इत्यादि. ज्याचें मरण जवळ आलें आहे अशा पित्याकडून जर पुत्र दान देववील तर तें दान गयाश्राद्ध व १०० अश्वमेध यांहून अधिक होतें. ती दानें हीः-- तिलपात्रदान, ऋणधेनु, मोक्षधेनु, पापधेनु, वैतरणीं धेनु, उत्क्रांतिधेनु, इत्यादि दानें करावींत, मृत्यु प्राप्त होतो त्या कालीम व्यतिपात, सूर्यसंक्रांती, तसेंच सूर्यग्रहण व दुसरे इतर पुण्यकाल असतात. ज्याचा मृत्यु जवळ आला त्यानें पूर्वी सांगितल्याप्रमाणें सवत्स गाय द्यावी. सवत्सगाय नसेल तर नरकोद्धार होण्यासाठीं केवल गायच द्यावी. शुक्लपक्ष, दिवसा, भूमि, गंगा, उत्तरायण यांचे ठायीं व हदयस्थ जनार्दन असतां जे मरतील ते धन्य होत, इत्यादि वचन आहे. मुमुक्षूम दानादिक करण्यास सामर्थ्य नसल्यास पुत्रादिकानें द्यावी.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP