मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
पिंडाचे अंती विकिर

धर्मसिंधु - पिंडाचे अंती विकिर

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


उपविती होऊन देवाकडील ब्राह्मणाजवळील भूमीवर दर्भ देउन त्या दर्भावर 'असोमपाश्चयेदेवाः' या मंत्राने युक्त उदक व यव यांनी युक्त असलेले अन्न टाकावे. प्राचीनावीती होऊन पितरांकडचे ब्राह्मणाजवळ भूमीवर दर्भ देऊन त्या दर्भावर 'ये अनग्निदग्धा' या मंत्राने तिलांसहित अन्न टाकून '

अग्निदग्धाश्च येजीवाः याप्यदग्धः कुलेमम भूमोदत्तेन तृप्यन्तु'

या कात्यायन सूत्रोक्त मंताने सतिलजलाने ते अन्न भिजवावे. पिंडाप्रमाणे विकिरही सर्व अन्नाचाच द्यावा. 'असोमपा' या मंत्राने देवांकडे विकिर देऊन 'असंस्कृत प्रमीताये' या पौराण मंत्राने पितराकडे देऊन 'ये अग्निदग्धा' या ऋचेने निराळा उच्छिष्ट पिंड दर्भावर द्यावा, असे काही ग्रंथकार म्हणतात.

नंतर हस्त प्रक्षालन करून दोनदा आचमन करावे, व दुसरे पवित्रके धारण करून हरीचे स्मरण करावे. विकिराचे अन्न निराळेच काढून कावळ्यास द्यावे असे काशिका ग्रंथात आहे. देवाकडच्या ब्राह्मणांचे हातावर 'शिवाआपःसन्तु' इत्यादि वाक्यांनी उदक, गंध, पुष्प व यव देऊन ब्राह्मणांनी ते भूमीवर टाकल्याअर आशीर्वादाकरिता अक्षता द्याव्या. याप्रमाणे पितराकडचे ब्राह्मणाचे हातावर अपसव्याने उदक, गंध, पुष्प, तिल इत्यादिक देऊन सव्याने

'अमुक गोत्रशर्माहमभिवादयामि अस्मत् गोत्रवर्धता'

इत्यादि म्हणावे. पितराकडचे ब्राह्मणाचे हातावर गंध, तिल, इत्यादि देणे ते सव्याने द्यावे, असे काही ग्रंथकार म्हणतात. हातावर अक्षता दिल्यावर अक्षय्योदक घेऊन 'अघोराः पितरःसंतु' असे म्हणून अभिवादन केल्यावर 'दातारोनोभिवर्धता' इत्यादि म्हणावे, असे कात्यायन शाखी म्हणतात.

याप्रमाणे आशीर्वाद घेऊन अक्षता मस्तकावर धारण करून भोजनपात्रे आपण स्वतः काढून किंवा शिष्यादिकांकडून काढवून आचमन करावे. उपनयन न झालेल्याने, स्त्रिया व विजातीयाने भोजन पात्रेकाढू नयेत. नंतर सव्याने देवांकडे व पितरांकडे 'देवेभ्यः स्वस्तीतिब्रूत' 'पितृभ्योमुकनाम गोत्रादिभ्यः स्वस्तीति ब्रूत' असे स्वस्तिवाचन करावे. नंतर सव्याने व अपसव्याने तो तो उच्चार पूर्वी करून अक्षय्य उदक द्यावे. यानंतर उपडे ठेवलेले पात्र उताणे करावे; व यापुढील सर्व कर्म उपवीतीनेच करावे. ब्राह्मणांस कर्पूरयुक्त तांबूल इत्यादि देऊन पितृपूर्वक नामगोत्र इत्यादिकांचा उच्चार करून दक्षिणा द्यावा.

'अमुक शर्माहममुकं नाम गोत्र पित्रादि स्थानोपविष्टाय विप्राय रजत दक्षिणां प्रतिपादयामि'

इत्यादि वाक्य दक्षिणा देताना म्हणावे. देवाकडील ब्राह्मणास सुवर्ण दक्षिणा द्यावी. शक्ति नसेल तर दोहींकडे यज्ञोपवीत दक्षिणा द्यावी. 'दक्षिणाः पांतु' असे म्हणून 'स्वधा वाचयिष्ये' असा प्रश्न करून 'वाच्यता' असे प्रतिवचन मिळाल्यावर 'पितृपितामह' इत्यादिक उच्चार करावा, 'स्वधोच्यतां' असे म्हणून 'अस्तु स्वधा' असे ब्राह्मणांनी प्रतिवचन दिल्यावर पिंडासमीप उदक सिंचन करून 'स्वधासंपद्यंता' असे संपत्तिवाचन ब्राह्मणांकडुन वदवावे. 'दातारो नोभिवर्धता' या मंत्राने आशीर्वाद मागणे. नंतर स्वधावाचन, उपडे पात्र उताणे करणे व दक्षिणा देणे असा क्रम कात्यायन सूत्रात सांगितला आहे.

नंतर देवादिकांचे प्रितिवचन देऊन पिंडस्थानी अक्षता इत्यादि टाकून सव्यानेच 'वाजे वाजे०' या मंत्राने 'उत्तिष्ठंतु पितरो विश्वेदेवैसह' असे म्हणुन एकदम दर्भाने पितृपूर्वक ब्राह्मणास स्पर्श करून विसर्जन करावे, व 'आमावाजस्य०' या मंत्राने ब्राह्मणास प्रदक्षिणा करून 'दातारोनीभिवर्धता' इत्यादि मंत्र म्हणुन वराची याचना करावी. विसर्जनानंतर पिंडदान करण्यास ज्यास सांगितले त्यांचा क्रम, ब्राह्मणांणी आचमन केल्यावर सौमनस्य दक्षिणादिक अक्षय्य स्वधावाचन इतके कर्म झाल्यावर 'दातारो नोभिवर्धता' असे म्हणून पिंडदानादिक कर्म करावे, असा क्रम जाणावा. हिरण्यकेशीयांचा पिंडदानादिक प्रयोग विस्तृत असल्यामुळे तो येथे सांगितला नाही. ब्राह्मणांनी वर दिल्यावर 'स्वादुषं स० ब्राम्हणःसः पितरः०' मंत्र पठण करावे. ब्राह्मणांनी 'इहैवस्तं० आयुः० प्रजा०' हे मंत्र म्हणावे. आशिर्वादांनी आनंदित होऊन ब्राह्मणाचे पायास अभ्यंगादिक लावून ब्राह्मणास संतुष्ट करावे व नमस्कार करून 'अद्यमे सफलं जन्म० मंत्रहीनं यस्यस्मृत्या०' इत्यादि मंत्र म्हणून विष्णूचे स्मरण करून सर्व कर्म ईश्वरास अर्पण करून ब्राह्मणाचि क्षमा मागावी. ब्राह्मणाच्या पाठीमागून त्यांना उजवे घालून स्वस्थानी यावे; व पवित्रे टाकून हाताने दीप मालवून पादप्रक्षालन करावे; व दोनदा आचमन करून उष्टी काढावीत. यानंतर ऋग्वेदी याने यथाविधी वैश्वदेव करावा; व वैश्वदेव झाल्यावर सेवक, पुत्र, बांधव व अतिथि यांसह पितरांनी सेविलेल्या अन्नाचे भोजन करावे. श्राद्धशेष अन्न ज्ञाति व शिष्य यासच द्यावे. शूद्रास देऊ नये. ब्राह्मणांनी भोजन करून शेष राहिलेले अन्न शुद्ध भूमीत पुरावे.

श्राद्धदिवशी, पर्वादि दिवशी निषिद्ध असे माषादिक अन्नही सेवन करावे. जे विधीने प्राप्त झाले त्यास निषेधाची प्रवृत्ति नाही, असे काही ग्रंथकार म्हणतात. अनिषिद्ध भोजनाने श्राद्धशेषभोजनाचे विधीची सिद्धी होते; असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. श्राद्धशेषाचे भोजन न केल्यास दोष प्राप्त होतो. श्राद्ध दिवशी उपोषणाचा निषेध असल्याने श्राद्धशेषाचा अभाव असेल तर दुसरा पाक करुन भोजन करावे. एकादशी, इत्यादि दिवशी अवघ्राण करावे. ज्या दिवशी उपोषण आवश्यक नाही त्या दिवशी एकभुक्त करावे. ज्या दिवशी उपोषण आवश्यक नाही त्या दिवशी एकभुक्त करावे. श्राद्धशेष दिवसासच भक्षण करावा. रात्री भक्षण करू नये. यावरून नक्त व्रत असता अवघ्राणच करावे. श्राद्धशेषाचे भोजन न करणारे नरकास जातात. पण सगोत्र, सकुल्य न ज्ञाति यांस श्राद्धशेष भोजनाचा दोष नाही; ब्रह्मचारी, संन्यासी व विधवा यास नित्य निषेध आहे. ज्ञाति, सगोत्र व संबंधी याहून इतरांच्या घरी श्राद्धशेषाचे भोजन केल्यास प्राजापत्य प्रायश्चित्त करावे. संन्याशाने वपन व एक लक्ष प्रणवाचा जप करावा. गुरु किंवा योगी यांचा श्राद्धशेष गृहस्थाश्रमी पुरुषास दोषकारक नाही. श्राद्ध दिवशी श्राद्धघरी शूद्रास भोजन देऊ नये. कोणत्याही श्राद्धात शूद्रास श्राद्धशेष देऊ नये.

इतिश्री मदनंतोपाध्यायसूनु काशीनाथोपाध्याय विरचिते धर्मसिंधुसारे पार्वणश्राद्ध प्रक्रिया समाप्तः

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP