मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
कपिला षष्ठीनिर्णय

धर्मसिंधु - कपिला षष्ठीनिर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


भाद्रपदाच्या कृष्णपक्षात मंगळवार, व्यतिपात व रोहिणी यांनी युक्त अशी जी षष्ठी तिला कपिलाषष्ठी असे नाव आहे. या तिथीला जर हस्तनक्षत्रयुक्त सूर्य असेल, तर त्याचे अतिशय फळ आहे. ही सूर्यपर्वणी असल्याने हा योग दिवसासच ग्राह्य असून रात्रींचा अग्राह्य आहे असे मला वाटते. या दिवशी होमदानादि केल्याने कोटिपट फळ मिळते. या दिवशी श्राद्ध करण्याच्या बाबतीत विशेष असे वचन जरी आढळत नाही, तरी अलभ्य योगावर श्राद्ध करावे या सामान्यनियमाने दर्शश्राद्धाप्रमाणे सहा देवतांच्या उद्देशाने श्राद्ध करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP