मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
एके रात्रींचे समयीं । देव...

संत जनाबाई - एके रात्रींचे समयीं । देव...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


एके रात्रींचे समयीं । देव आले लवलाहीं ॥१॥

सुखशेजे पहुडले । जनीसवें गुज बोले ॥२॥

गुज बोलतां बोलतां । निद्रा आली अवचिता ॥३॥

उठा उठा चक्रपाणी । उजाडलें म्हणे जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP