मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
कोणे एके दिवशीं । विठो गे...

संत जनाबाई - कोणे एके दिवशीं । विठो गे...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


कोणे एके दिवशीं । विठो गेला जनीपाशीं ॥१॥

हळूच मागतो खायासी । काय देऊं बा मी तुसी ॥२॥

हातीं धरुन नेला आंत । वाढी पंचामृत भात ॥३॥

प्रेमसुखाचा ढेंकर दिला । जनी म्हणे विठो धाला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP