मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|पौराणिक कथा|कहाणी| कहाणी शनिवारची कहाणी कहाणी वसुबारसेची कहाणी सोमवतीची कहाणी शनिवारची कहाणी ऋषिपंचमीची कहाणी पिठोरीची कहाणी महालक्ष्मीची कहाणी ललितापंचमीची कहाणी ज्येष्ठागौरीची कहाणी बुध-बृहस्पतीची कहाणी बोडणाची कहाणी सोमवारची कहाणी वर्णसठीची कहाणी शिळासप्तमीची कहाणी गणपतीची कहाणी दिव्याच्या अंवसेची कहाणी धरित्रीची कहाणी आदित्यराणूबाईची कहाणी मंगळागौरीची कहाणी शनिवारची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. Tags : kahanimarutipuran kathashaniwarकहाणीपुराण कथामारुतीशनिवार कहाणी शनिवारची (मारुतीची) Translation - भाषांतर आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासूसासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरांत बसून सैंपाक करून ठेवीत असे. सासूसासर्यांना वाढीत असे, उरलंसुरलं आपण खात असे. असं होतां होतां श्रावणमास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारीं आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल. बाबा, घरामध्यें तेल नाहीं. तुला न्हाऊं कशानं घालूं ? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. घागरींत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊं घालून जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळीं घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झालीं. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासीबटकींनी घर भरलं ! सासूसासरे देवाहून आलीं, तों घर कांहीं ओळखेना. हा वाडा कोणाचा ? सून दारांत आरती घेऊन पुढं आली. मामंजी, सासूबाई, इकडे या ! अग, तूं कोणाच्या घरांत राहिली आहेस ? तिनं सर्व हकीगत सांगितली. शनिवारीं एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल. बाबा, घरामध्यें तेल नाही. तुला न्हाऊं कशानं घालूं ? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. जेवूं घाल. घागरींत हात घालून तेल काढलं. त्याला न्हाऊं घालून जेवूं घातलं. उरलंसुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चवथे शनिवारीं त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळीं घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारांत उभी राहिलें. असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरांत गेलीं. त्याना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण. N/A References : N/A Last Updated : September 19, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP