मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|नक्षत्र जनन शांती|
पीठ दान

पीठ दान

मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.
Performing yagna to the birth star will help the people to safeguard the life from worries and bad days.


पीठ दान

देवता विसर्जनानंतर पूजेवरील तांब्याचे तांबे वगैरे स्थापन केलेले देवतांचे पीठ आचार्यास दान द्यावे.

अनेन इदं आवाहित पीठानि आदेय विवर्जितानि कलशादितानि कर्मकर्त्रे आचार्याय तुभ्यमहं संप्रददे ।

उदक सोडावे.

यजमानाने म्हणावे - प्रतिगृह्यताम्‍ ।

आचार्याने म्हणावे - प्रतिगृण्हामि ।

अग्नीचे विसर्जन - गच्छ गच्छ सुरश्रेष्थ स्वस्थाने परमेश्वर । यत्र ब्रह्मा दयोदेवस्तत्र गच्छ हुताशन । अग्निं विसर्जयामि ।

वायव्य कोनातील विड्यावर उदक सोडावे.

श्रेयः संपादनम्‍

आचार्याने वरणक्रमाने यजमानाकडून श्रेय संपादन करवावे.

यजमान - आचार्यादिभ्यः सग्रहमख व मूल (आश्‍लेषा/ज्येष्ठा) जननशांति कर्मणः श्रेयोग्रहणं करिष्ये ।

उदक सोडावे.

आचार्यः शिवाआपः संतु इति यजमान हस्ते जलं क्षिपेत्‍ । आचार्याने शिवा आपः संतु

म्हणत यजमानाच्या हातावर पाणी घालावे.

सौमनस्यमस्तु पुष्पं० । अक्षतंचारिष्टंचास्तु । अक्षतान्‍ ० । दीर्घमायुः श्रेयः शांतिः पुष्टिश्चास्तु । पुनर्जल । भवन्नियोगेन मया मूळ (आश्‍लेषा/ज्येष्ठा) जननशांति कर्मणि यत्कृतं जप होमादि तदुत्पन्नं यच्छेयस्तत्तुभ्यमहंसंप्रददे । तेनत्वं श्रयस्वी भव । सचतथास्तु इति यजमान वदेत्‍ । एवं ब्रह्मादयः ।

आचार्यांनी यजमानास द्यावयाचा आशीर्वाद

दिवा वा यदिवा रात्री विघ्नशांतिर्भविष्यति । नरनारी नृपाणां च भवेद्‍ दुःस्वप्न नाशनं । ऐश्वर्यं अतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनं । ग्रहनक्षत्रजाः पीडा तस्कराग्नि समुद्भवं । ताः सर्वाः प्रशमं यांति व्यासो ब्रूते न संशयः । फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं । तस्मात्‍ फल प्रदानेन सफलास्यु मनोरथाः । सकल मनोरथाः सफलाः संतु ।

आशीर्वादाचे आणखी काही मंत्र

१) श्रीर्वर्चस्व मायुष्य मारोग्यमाविधात श्रेयमानं महीयते ।

धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शत संवत्सरं दीर्घ मायुः ।

२) अवनीकृत जानुमंडलः कमल मुकुल सदृशं अंजलिं शिरस्याधाय दक्षिणेन पाणिना सुवर्ण पूर्ण कलशं धारयित्वा आशिषः प्रार्थयते एताः सत्या आशिषः संतु । दीर्घा नागा नद्यो गिरयस्रीणि विष्णुपदानि च तेन आयुः प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु ।

३) अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमतेत्‍ पठति परम भक्त्या शुद्धचित्तः पुमान्‍ यः ॥ सभवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र प्रचुरतरधनायुः पुत्रवान्‍ कीर्तिमांश्च ॥

शांतीकर्म विधी पूर्ण झाल्यानंतर स्थापित देवतांच्या कलशांतील पाणी गाळून ते आंघोळीच्या पाण्यास मिसळून बालकास स्नान घालण्यास सांगितले आहे. तसेच बालकाच्या ओंजळीत गहु व गूळ घालून ( किंवा बालक लहान असल्यास आई/वडिलांनी ) गाईस खायला घालण्यास सांगितले आहे.

। शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP