मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|नक्षत्र जनन शांती|
अन्वाधान

अन्वाधान

मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.
Performing yagna to the birth star will help the people to safeguard the life from worries and bad days.


अन्वाधान-

अन्वाधान म्हणजे स्थापन केलेल्या देवतांना कोणकोणत्या हविर्द्रव्यांच्या किती आहुती द्यायच्या हे सांगणे. त्यासाठी उजव्या हातात उभ्या दोन समिधा धरुन उजव्या मांडीवर डावा हात उफडा ठेवून त्यावर त्या समिधा धरून पूढील संकल्प म्हणावा.

समिव्दयं आदाय क्रियमाणे सनवग्रहमख मूळ ( आश्लेषा / ज्येष्ठा ) जननशांत्याख्यस्य कर्मणे देवता परिग्रहार्थ अन्वाधानं करिष्ये ।

उदक सोडावे

अस्मिन‌ अन्वाहित अग्नौ जातवेद समग्निं इध्मेन प्रजापतिं च आघार देवते आज्येन अग्निषोमौ चक्षुषी आज्येन अत्र प्रधानं गणपतिं वराहुतिं आज्येन ।

गणपतीस तुपाची आहुति

पुनरत्र प्रधानं-

( गोप्रसवाचे अन्वाधान )

अपः - द्वत्रिंशत संख्याकाभिः (३२) संयुक्त दधि मद्वाज्याहुतिभिः ।

(आप देवतेस दही मध व तूप एकत्र केलेले हविर्द्रव्य ३२ आहुत्या )

विष्णुं - अष्टाभिः संख्याकाभिः ( ८ ) पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः

(दही मध व तूप एकत्र केलेले हविर्द्रव्य ८ आहुत्या)

यक्ष्माणं - अष्टचत्वारिंशत संख्याकाभिः ( ४८ ) पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः

(वरील हविर्द्रव्य ४८ आहुत्या )

केवल नवग्रह - आदित्यादि नवग्रहान्‍ १-१ संख्याकाभिः पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः ।

वरील हविर्द्रव्य १-१ आहुत्या

पुनरत्र प्रधान - आदित्यादि नवग्रह देवताः एताः प्रधान देवताः प्रत्येकं प्रतिद्रव्य अष्टाविंशति / अष्ट-अष्ट अन्यतर संख्याहुतिभिः यथालाभं अर्कादि समित्तंडुल आज्याहुतिभिः

सूर्यादि नवग्रहांसाठी समिधा, तांदूळ व तूप या द्रव्यांच्या २८-२८ किंवा ८-८ किंवा अन्य संख्येच्या आहुति

अधिदेवता प्रत्याधिदेवताश्च प्रत्येक प्रतिद्रव्यं अष्टाष्ट ( ८-८ ) चतुश्चतुः (४-४) अन्यतर संखाहुतिभिः यथालाभं पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः।

अधिदेवता प्रत्यधिदेवतांसाठी वरील द्रव्यांच्या ८-८ किंवा ४-४ किंवा अन्य संख्येच्या आहुति

विनायकदि क्रतु सादगुण्यदेवताः इंद्रादि क्रतुसंरक्षक देवताश्च प्रत्येक प्रतिद्रव्यं चतुश्चतुः (४-४) द्वाभ्यां (२-२) अन्यतर संख्याहुतिभिः ।

गणपतिसह क्रतु सादगुण्य्देवता व इंद्रादि क्रतुसंरक्षक देवतांसाठी वरील द्रव्यांच्या ४-४ किंवा २-२ किंवा अन्य संख्येच्या आहुती ( सूर्यादि देवतांना २८ आहुति घेतल्या तर अधिदेवता - प्रत्याधिदेवतांसाठी ८-८ विनायकादि क्रतु सागदुण्यदेवता इंद्रादि क्रतुसंरक्षक देवतांसाठी ४-४ आहुतिचे प्रमाण असते व सूर्यादि देवतांना ८-८ आहुति घेतल्या तर आधिदेवता - प्रत्यधिदेवतांसाठी ४-४ विनायकादि क्रतु सादगुण्यदेवता इंद्रादि क्रतुसंरक्षक देवतांसाठी २-२ आहुति द्याव्यात. )

पहिले प्रमाण १०८-२८-८ / दुसरे एक प्रमाण २८-८-४ / तिसरे प्रमाण ८-४-२ / (चौथे प्रमाण १०-१-१ किंवा ४-२-१ ) राहू व त्याची अधिदेवता - प्रत्याधिदेवता यांना समिधा ऐवजी मुळासह दूर्वांची आहुति द्यावी तसेच केतु व त्याची अधिदेवता- प्रत्यधिदेवता यांना समिधा ऐवजी ३-३ दर्भाची आहुति द्यावी . अन्वाधानाचे प्रमाण कोणते घ्यावे हे आपल्या वेळेप्रमाणे किंवा सामुग्रीप्रमाणे ठरवावे.

मूल नक्षत्रासाठी

पुनरत्र प्रधानं - ( मुलर्क्ष देवता अन्वाधान )

निऋति देवताः एताः प्रधान देवताः प्रत्येकं प्रतिद्रव्यं अष्टोत्तरशत १०८/ अष्टाविंशति २८ संख्याहुतिभिः घृतसंमिश्र दुग्धाक्त तंडुल समिद् आज्य तंडुल द्र्व्याहुतिभिः ।

(निऋति देवतेसाठी दूध व तूप घातलेले तांदूळ, समिधा, साधे तांदूळ व तूप यांच्या १०८ किंवा २८ आहुति द्याव्यात. )

इंद्रं अष्टाविंशति २८ / अष्ट ८ संख्याहुतिभिः पूर्वोक्त द्र्व्याहुतिभिः ।

(इंद्र देवतेसाठी वरील हविर्द्रव्यांच्या २८ किंवा ८ आहुति द्याव्यात.)

अपः अष्टाविंशति २८/ अष्ट ८ संख्याहुतिभिः पूर्वोक्त द्र्व्याहुतिभिः ।

(आप देवतेसाठी वरील हविर्द्र्व्यांच्या २८ किंवा ८ आहुति )

उत्तराषाढादि / विश्वेदेवादि चतुर्विशति देवताः प्रत्येक नाम मंत्रेण अष्ट ८/ चतुरः ४ संख्याहुतिभिः दुग्धाक्त तंडुल द्र्व्याहुतिभिः ।

(२४ नक्षत्र किंवा नक्षत्र देवतांसाठी नाम मंत्राने दूध घातलेल्या तांदुळच्या ८ किंवा ४ आहुति द्याव्यात.)

रक्षोहणं नाम मंत्रेण अष्टोत्तरशत १०८ सतिल मिश्र तंडुलाहुतिभिः ।

(रक्षोहण देवतेसाठी तीळ मिश्रित तांदूळ १०८ आहुति द्याव्यात.)

सवितारं दुर्गा त्रंब्यकं कवीन् दुर्गा वास्तोष्पतिं अग्नि क्षेत्राधिपतिं मित्रावरुणौ अग्निं च नाम्रा प्रत्येकं अष्टाष्ट संख्याहुतिभिः सातिल मिश्र तंडुल द्रव्याहुतिभिः ।

(सवितारं दुर्गा त्र्यबकं कवीन् दुर्गा वास्तोष्पतिं अग्निं क्षेत्राधिपतिं मित्रावरुणौ अग्निं या देवतांसाठी तीळ मिश्रित तांदूळ प्रत्येकी ८ आहुति द्याव्यात.)

श्रियं नाम मंत्रेण विंशत्युत्तरशत १२० संख्याहुतिभिः सातिल मिश्र तंडुल द्र्व्याहुतिभिः ।

(श्रियं या देवतेसाठी समीधा तूप व तांदूळ यांच्या १२० आहुत्या.)

सोमं त्रयोदशवारं नाममंत्रेण दुग्धाक्त तंडुलाहुतिभिः ।

सोम या देवतेस नाम मंत्राने दुग्धाक्त तंडुल १३ आहुति द्याव्यात.

रुद्रं चतुर्गृहीतेन आज्येन ।

रुद्र देवतेस एकाच वेळी चार पळ्या तूप घेवून त्याची एक आहुति द्यावी.

अग्निं वायुं सूर्य प्रजापतिं च एक एक आज्याहुत्या यक्ष्ये ।

अग्नि,वायु, सूर्य व प्रजापति यांना तुपाची एक आहुति द्यावी.

आश्लेषा नक्षत्रासाठी

पुनरत्र प्रधानं - ( आश्लेषा देवता अन्वाधान) सर्पादि देवताः एताः प्रधान देवताः प्रत्येकं प्रतिद्र्व्यं अष्टोत्तरशत १०८ / अष्टाविंशति २८ संख्याहुतिभिः घृतसंमिश्र दुग्धाक्त तंडुल समिद् आज्य तंडुलाहुतिभि ।

(सर्पादि देवतेसाठी दूध व तूप घातलेले तांदूळ , समिधा, तूप व तांदूळ यांच्या १०८ किंवा २८ आहुति द्याव्यात.)

इंद्र अष्टाविशंति २८ / अष्ट ८ संख्याहुतिभिः पूर्वोक्त द्र्व्याहुतिभिः ।

इंद्र देवतेसाठी दूध व तूप घातलेले तांदूळ,समिधा, तूप व साधे तांदूळ यांच्या २८ किंवा ८ आहुति द्याव्यात

अपः अष्टार्विशति २८ / अष्ट ८ संख्याहुतिभिः पूर्वोक्त द्र्व्याहुतिभिः ।

आप देवतेसाठी दूध व तूप घातलेले तांदूळ, समिधा, तूप व साधे तांदूळ यांच्या २८ किंवा ८ आहुति द्याव्यात.

पूर्वादि / भगादि चतुर्विशति देवताः प्रत्येक नाम मंत्रेण अष्टाष्ट ८-८ संख्याहुतिभिः दुग्धाक्त तंडुल द्र्व्याहुतिभिः ।

( २४ नक्षत्र किंवा नक्षत्र देवतांसाठी नाम मंत्राने दुध घातलेल्या तांदळाच्या ८-८ आहुति द्याव्यात, )

रक्षोहणं नाम मंत्रेण विंशत्याधिक शत १२० समिद् तिल तंडुलाहुतिभिः ।

( रक्षोहण देवतेसाठी समिधा, तीळ व तांदूळ १२० आहुति द्याव्यात. )

सवितारं दुर्गा त्र्यबकं सवीन् दुर्गा वास्तोष्पतिं अग्निं क्षेत्राधिपतिं मित्रावरुणौ अग्निं एताः देवताः

प्रत्येक अष्टाष्ट संख्याहुतिभिः दुग्धाक्त तंडूल द्र्व्याहुतिभिः ।

(सवितारं दुर्गा त्र्यंबक कवीन् दुर्गा मिश्रित तांदूळ प्रत्येकी ८ आहुति द्याव्यात.)

रुद्रं चतुर्गहीतेन आज्येन ।

रुद्र देवतेस एकाच वेळी चार पळ्या तूप घेवून त्याची एक आहुति द्यावी.

अग्निं वायुं सूर्य प्रजापतिं च एक एक आज्याहुत्या यक्ष्ये ।

अग्नि, वायु, सूर्य व प्रजापति यांना तुपाची एक एक आहुति द्यावी.

जेष्ठा नक्षत्रासाठी

पुनरत्र प्रधानं- ( ज्येष्ठा देवता अन्वाधान ) इंद्र पलाश समित्तंडुल आज्य द्रव्यैः प्रत्येकं प्रतिद्रव्यं अष्टोत्तरशत (१०८) संख्याहुतिभिः

पळसाच्या समिधा, तांदूळ व तूप यांच्या १०८ आहुति.

पूजामंत्रेण, प्रजापतिं तिल द्रव्येण अष्टोत्तरशत (१०८) संख्याहुतिभिः नाम मंत्रेण यक्षे ।

शेषेण स्विष्टकृतं इध्मसन्नहनेन रुद्रं अयासं अग्निं देवान् विष्णुं अग्निं वायुं सूर्यं प्रजापतिं च एताः प्रायश्चित्त देवता आज्येन ज्ञाताज्ञात दोष निबर्हणार्थ त्रिवारमग्निं मरुतश्चाज्येन विश्वान्‍ देवान् संस्त्रावेण अंगदेवताः प्रधानदेवताः सर्वाः सन्निहितः संतु संगोपांगेन कर्मणा सद्यो यक्षे । प्रजापतये नमो नमः । प्रजापतय इदं न मम ।

असे म्हणून त्या समिधा अग्निवर द्याव्यात.

इध्माबर्हिषोश्च सनाहनं ।

स्थंडिलाच्या उत्तरेस ठेवलेल्या इध्मा व बर्हीस हात लावावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP