मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|नक्षत्र जनन शांती|
पात्रासाधनम्

पात्रासाधनम्

मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.
Performing yagna to the birth star will help the people to safeguard the life from worries and bad days.


पात्रासाधनम्

स्थंडिलाच्या उत्तरेस परिस्तरणाच्या बाहेर काही दर्भ पूर्वेकडे अग्र करुन पसरावेत. त्यावर पश्चिमेकडून पूर्वेकडे

( इध्मा म्हणजे दर्भाच्या दोरीने बांधलेल्या १५ समिध व बर्ही म्हणजे दर्भाच्या दोरीने बांधलेले एक वीत लांबीचे दर्भांचे तुकडे- मुष्ठी ३ दर्भाचा १ पेड असे ३ पेड घेऊन दोरी वळावी. या तिपदरी दोरीस पूढे ३ ठिकाणी जोड द्यावेत. त्यासाठी एकूण ३६ दर्भ लागतात . अशा ३ जोड असलेल्या दोरीस त्रिसंधानरुद्र म्हणतात. या दोरीने १५ समीध बांधाव्यात त्याला इध्मा म्हणतात. दर्भाच्या साध्या दोरीला रज्जू म्हणतात. त्याने दर्भ बांधावेत त्याला बर्ही म्हणतात.)

मूळ नक्षत्रासाठी

पहिली ओळ दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल, स्थाली, घृत संमिश्र दुग्धाक्त तंडुल स्थाली, दुग्धाक्त तंडूल स्थाली, तिल मिश्र तंडुल स्थाली व प्रोक्षणी.

दुसरी ओळ- दर्वि, स्त्रुवा. तिसरी ओळ - प्रणिता. आज्यपात्र चौथी ओळ- इध्मा, बर्हि असे ठेवावे. सर्व पात्रे पालथी ठेवावीत. हातात दोन दर्भ घेवून खालीलप्रमाणे

पहिल्या ओळीपासून सुरु करुन सर्वांना दर्भाचा स्पर्श करावा.

उत्तरास्तीर्णेषु दर्भेषु दक्षिणसव्य पाणिभ्यां क्रमेण दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल स्थाली घृत संमिश्र द्ग्धाक्त तंडुल स्थाली, तिल मिश्र तंडुल स्थाली , प्रोक्षणी, दर्वी, स्त्रुवा, प्रणिता, आज्यपात्र, इध्मा, बर्हि इति द्वे द्वे उदगपवर्ग प्राक्संस्थं न्युब्जान्या सादयेत् ।

आश्लेषा नक्षत्रासाठी

पहिली ओळ दधि मध्वाय स्थाली, घृत संमिश्र दुग्धाक्त तंडुल स्थाली, दुग्धाक्त तंडुल स्थाली, तिल मिश्र तंडुल स्थाली व प्रोक्षणी . दुसरी ओळ - दर्वि, स्त्रुवा.

तिसरी ओळ - प्रणिता, आज्यपात्र. चौथी ओळ - इध्मा, बर्हि असे ठेवावे. सर्व पात्रे पालथी ठेवावीत. हातात दोन दर्भ घेवून खालीलप्रमाणे पहिल्या ओळीपासून सुरु करुन सर्वांना दर्भाचा स्पर्श करावा.

उत्तरास्तीर्णेषु दर्भेषु दक्षिणसव्य पाणिभ्यां क्रमेण दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल स्थाली, घृत संमिश्र दुग्धाक्त तंडुल स्थाली, दुग्धाक्त तंडुल स्थाली

तिल मिश्र तंडुल स्थाली, प्रोक्षणी, दर्वी, स्त्रुवा, प्रणिता, आज्यपात्र, इध्मा, बर्हि इति द्वे द्वे उदगपर्व प्राक्संक्स्थं न्युब्जान्या सादयेत् ।

ज्येष्ठा नक्षत्रासाठी

पहिली ओळ दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल स्थाली, तिल स्थाली व प्रोक्षणी, दुसरी ओळ - दर्वि, स्त्रुवा, तिसरी ओळ -प्रणिता, आज्यपात्र. चौथी ओळ-

इध्मा, बर्हि असे ठेवावे. सर्व पात्रे पालथी ठेवावीत. हातात दोन दर्भ घेवून खालीलप्रमाणे पहिल्या ओळीपासून सुरु करुन सर्वांना दर्भाचा स्पर्श करावा.

उत्तरास्तीर्णेषु दर्भेषु दक्षिणसव्य पाणिभ्यां क्रमेण दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल स्थाली, तिल स्थाली, प्रोक्षणी, दर्वी, स्त्रुवा, प्रणिता, आज्यपात्र, इध्मा, बर्हि, इति द्वे द्वे उदगपवर्ग प्राक्संस्थं न्युब्जान्या सादयेत्‌ ।

ततः प्रोक्षणी पात्रं उत्तानं कृत्वा तत्रानंतर्गत साग्रसम स्थूल प्रादेशमात्रे कुशव्दयरुपे पवित्रे निधाय । शुध्दाभिरद्भिस्तत्पात्रं पूरयित्वा गंधाक्षतान् क्षिप्त्वा हस्तयोरंगुष्टोप कानिष्टकाभ्यां उत्तानाभ्यां उदगग्रे पृथक् पवित्रे धृत्वा अपस्त्रिरुत्पूय सर्वाणि पात्राणि उत्तानानि कृत्वा

इध्मंच विस्त्रस्य सर्वाणि पात्राणि त्रिः प्रोक्षेत् । ता आपः किंचित् कमंडलौ क्षिपेत् इति इत्येके।

वरीलप्रमाणे नावे घेऊन दर्भाचा स्पर्श करावा. प्रोक्षणीपात्रावर टीचभर लांबीचे पूर्वेकडे अग्र केलेले दोन दर्भ ठेवावेत. प्रोक्षणी पात्रात शुध्द जल घालावे. त्यात गंध, अक्षता, व फुल घालावे. दोन्ही हातांचे अंगठे व करंगळी यांनी उताण्या हातांनी प्रोक्षणीवरील दर्भ उत्तरेकडे अग्र करुन सुटे सुटे धरुन त्या दर्भाने प्रोक्षणीवरील दर्भ उत्तरेकडील अग्र करुन सुटे सुटे धरुन त्या दर्भाने प्रोक्षणीतील पाणी तीन वेळा वर हलवावे. सर्व पात्रे उताणी करावी. इध्माच्या दोरीची गाठ सोडावी. त्या सर्वांवर प्रोक्षणीतील पाणी दर्भाने तीन वेळा शिंपडावे. थोडे पाणी तांब्यात घालावे असे काहींचे मत आहे.

प्रणीता पात्र अग्नीं प्रत्यङनिधाय । तत्र प्रागग्ने पवित्रे निधाय । उत्पूताभिरद्भिस्तत्पात्रं पूरयित्वा गंधाक्षतान् निक्षिप्य । मुखसमं उद्धत्य । औं प्रणय । अग्ने उत्तरतो दर्भेषु निधाय ।

प्रणीता पात्र अग्नीच्या पश्चिमेस ठेवावे. त्यात प्रोक्षणीवरील दर्भ पूर्वेकडे अग्र करुन ठेवावेत. त्यात शुध्द जल घालावे. त्यात गंध-अक्षता, फूल घालावे. डाव्या हाताने पात्र उचलून धरावे व त्यावर उजवा हात पालथा धरुन आपल्या मुखापर्यंत उचलून औं असे म्हणावे. त्यानंतर ते पात्र अग्नीच्या उत्तरेस दर्भावर ठेवावे.

ते पवित्रे गृहित्वा अन्यैः दर्भैः आच्छादयेत् । ते पवित्रे आज्यपात्रे निधाय । तस्मिन् आज्यपात्रं पुरतः संस्थाप्य तस्मिन् आज्यं आसिच्य । अग्नेः उत्तरतः स्थित अंगारान् भस्मनासह अग्नेः उदग् परिस्तरणात् बहिर्निरुह्य । तेष्व आज्यपात्रं अधिश्रित्य ।

प्रणीतेतील दर्भ हातात घेऊन प्रणीतेवर दुसरे चार दर्भ ठेवावेत प्रोक्षणीवरसुध्दा दुसरे ३ दर्भ ठेवावेत. हातातील दर्भ तुपाच्या पात्रावर ठेवावेत. तुपाचे पात्र आपल्यापुढे ठेऊन त्यात तूप घालावे. त्यानंतर अग्नीच्या उत्तरेस परिस्तरणाच्या बाहेर अग्नीतील राखविरहित अंगार घ्यावा. त्यावर हे तुपाचे पात्र ठेवावे.

ज्वलता दर्भोल्मुकेन आवज्वल्य । अंगुष्टपर्व मात्रं प्रक्षालित दर्भाग्न द्व्यं आज्ये प्रक्षिप्य । अग्ने: उदग् आस्तिर्णेषु दर्भेषु पात्रे दधि मध्वाज्य,

(मूळ नक्षत्रासाठी)

तंडुल, घृत मिश्रित दुग्धाक्त तंडुल, दुग्धाक्त तंडुल, तिल मिश्रित तंडुल

(आश्लेषा नक्षत्रासाठी)

तंडुल, घृत मिश्रित दुग्धाक्त तंडुल, दुग्धाक्त तंडुल, तिल मिश्रित तंडुल

(ज्येष्ठा नक्षत्रासाठी)

तंडुल तिल -पृथक पृथक पुरयित्वा । पुनर्ज्वलता तेनैव दर्भोल्मुकेन त्रि: पर्याग्निं कृत्वा तत: उल्मुक निरस्य अप: स्पृष्टवा आज्यपात्रं भुविकषन्

निवोदगुद्वास्य । अग्नौ प्रास्य तत्रस्थमेव आज्यं पवित्राभ्यां ।

हातामध्ये दोन तीन दर्भ घेऊन त्याचे शेंडे अग्निअवर धरुन पेटवावेत याला उल्मु्क म्हणतात. हे दर्भोल्मुक तुपाच्या पात्रावर तीन वेळा फिरवावे. ते उल्मुक विझवून खाली ठेवावे. दुसर्‍या दोन दर्भाच्या शेंडयांचे आंगठयाच्या पेराएवढे दोन तुकडे तोडून प्रणीतेतील पाण्यात भिजवून तुपाच्या पात्रात घालावे. अग्निच्या उत्तरेस मांडलेल्या पहिल्या ओळीतील पात्रांमध्ये क्रमाने दही मध व तूप एकत्र (मूळ नक्षत्रासाठी ) तांदूळ , तूप व दूध घातलेले तांदूळ , दूध घातलेले तांदूळ, तीळ मिश्रित तांदूळ (आश्लेषा नक्षत्रासाठी ) तंडुल, तिल घालावेत.

पुन्हा ते उल्मक तुपाच्या पात्रासह सर्व पात्रांवर तीन वेळा गोलाकार फिरवावे. ते उल्मुक विझवावेत. हात धुवून टाकावेत. निखार्‍यावरुन तुपाचे पात्र उचलून उत्तरेकडिल दर्भावर पूर्वीच्या जागेवर ठेवावे. निखारे स्थंडिलात ठेवावेत. तुपाच्या पात्रातील दर्भ घेऊन पूर्वीप्रमाणे अंगठा व करंगळीत सुटे सुटे धरुन खालील मंत्र म्हणत एकदा व न म्हणता दोन वेळा असे एकंदर तीन् वेळा तूप हलवावे. त्यानेतर ते दर्भ प्रणितेतील पाण्यात भिजनून अग्निवर द्यावेत व

स्कंदाय नम: । स्कंदाय इदं न ममं

असे म्हणावे.

सर्पिरेतस्त्पवित्राभ्यां यज्ञार्ह मनवस्करम् । करोम्युत्पुयकिरणै: सूर्यस्य सवितुर्वसो: ।

इति प्रागुत्पुनाति सन्मंत्रेण द्विस्तूष्णीम् पवित्रे अद्धि: प्रोक्ष्य अग्न्यावनुहरेत्तुष्णीं । स्कंदाय नम: । स्कंदाय इदं न मम् ।

तत आत्मन: अग्न्तो भूमिं प्रोक्ष्य तत्र बर्हि: सन्नहनीं रज्जुं उदगग्रां प्र्सार्य तस्यां बर्हि: प्रागग्नं उअदग्पवर्ग अविरलं आस्तीर्य तस्मिन्‍ आज्यपात्रं निधाय स्त्रुवादि संमार्जयेत । दक्षिण हस्ते स्त्रुवं दर्वी गृहीत्वा सव्येन कांश्चिद्दर्भानादाय सहैवाग्नौ प्रताप्य दर्वी आज्यपात्रस्य उत्तरतो निधाय स्त्रुवं वाम हस्ते गृहीत्वा दक्षिण हस्तेन स्त्रुवस्य बिलं दर्भाग्रै: प्रागादि प्रागवर्ग त्रि: संमृज्य । ततो दर्भाणां मूलैर्दंडस्य अधस्ताद् बिलं पृष्ठात् आरभ्य यावत् उपरिष्टाद् बिल तावत् त्रि: संमृज्य प्रोक्ष्य प्रताप्य स्त्रुवां आज्यस्थाल्यां उत्तरतो निधाय । दर्वी वामहस्ते गृहीत्वा संमाजयेत् । दर्भान अद्धि: क्षालयित्वा अग्नावनुप्रहरेत् ।

आपल्या समोरील भूमीवर प्रणिततील पाणी शिंपडावे. उत्तरेकडे ठेवलेल्या बर्हिच्या दोरीची गाठ सोडून ती दोरी प्रोक्षण केलेल्या जागेवर उत्तरेकडे दर्भाचे अग्र करुन पसरावी. त्यावर बर्हिचे दर्भ दाट पसरावेत. त्यावर तुपाचे पात्र ठेवावे. स्त्रुवा दर्वी उजव्या हातात व काही दर्भ दाट पसरावेत. त्यावर तुपाचे पात्र ठेवावे

स्त्रुवा दर्वी उजव्या हातात व काही दर्भ डाव्या हातात धरुन दोन्ही अग्निवर थोडे तापवावे. दर्वी आज्यपात्राच्या उत्तरेस ठेवून स्त्रुवा फक्त डाव्या हातात व दर्भ उजव्या धरावे. दर्भाचे अग्र स्त्रुवेच्या पाठीमागील भागापासुन सुरु करुन स्त्रुवेच्या तोंडापर्यत दर्भाच्या मुळांचा स्पर्श करावा. स्त्रुवेस प्रणीततील जलाने प्रोक्षण करावे. स्त्रुवा व दर्भ पुन्हा अग्निवर तापवावेत. स्त्रुवा आज्यपात्राच्या उत्तरेस ठेवावी व दर्वाचे असेच संमार्जन करावे व स्त्रुवेच्या उत्तरेस ठेवावी. त्यानंतर हातातील दर्भ प्रणीतेत बुडवून अग्नीवर द्यावेत.

ततो हविर्द्रव्य़ं अभिघार्य तत् पात्राणि आज्यस्थाली अग्निर्मध्यतो निधाय आज्यद्दक्षिणतो बर्हिअष्यासाद्य अभिघार्य नवाभिघार्य ।

हविर्द्रव्यांच्या पात्रातील हविर्द्रव्यांवर आज्य पात्रातील तूप घालावे. यालाच अभिघार करणे असे म्हणतात. त्यानंतर ती पात्रे आज्य़पात्र व अग्नी यांच्यामधुन नेऊन आज्यपात्राच्या दक्षिणेस त्याच क्रमाने ठेवावीत. त्यावर पुन्हा तुपाचा अभिघार करावा किंवा करु नये

इथपर्यंतच्या कृतीस ( कारिका) पात्रासाधन करणे असे म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP