मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार| ८७१ ते ८७४ आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार ७४८ ते ७६० ७६१ ते ७७० ७७१ ते ७८० ७८१ ते ७९० ७९१ ते ८०० ८०१ ते ८१० ८११ ते ८२० ८२१ ते ८३० ८३१ ते ८४० ८४१ ते ८५० ८५१ ते ८६० ८६१ ते ८७० ८७१ ते ८७४ उद्गार - ८७१ ते ८७४ निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत ८७१ ते ८७४ Translation - भाषांतर ८७१संतीं सांगितलें मज । आपुलिये गुज अंतरींचे ॥१॥म्हणती आठवीं पंढरीनाथा । सांडीं वार्ता इतरांची ॥२॥नको विसबों तूं यासी । अगाध सुखासि पावशील ॥३॥निळा म्हणे सेवा आतां । हेचि प्रसन्नता आमुची ॥४॥८७२संती ठेविलें निश्चळ ठायीं । चित्त हें पायीं आपुलीये ॥१॥तेणें समाधन वृत्ती । नव्हेचि स्थिति पालट ॥२॥अखंडिता राहिले ध्यान । होउनी उन्मन मनाचें ॥३॥निळा म्हणे कृपा केली । जाणों आली या अर्थ ॥४॥८७३संतांचिया समागमें । गाऊं नामें आवडी ॥१॥काय आमचें करील काळ । कळीचे मळ नातळतां ॥२॥हरीच्या नामें शुचिर्भूत । वाचा पुनीत करचरण ॥३॥निळा म्हणे घडीं घडीं । करुं हे जोडी नीच नवी ॥४॥८७४श्रोते वक्ते होती सुखी । अध्यात्मविखीं भाविक ॥१॥ऐसा केला प्रसंग हरी । आरुष वैखरी वदवूनी ॥२॥साबडेंचि परी रुचे ऐसें । केलें सौरसें आपुलिया ॥३॥निळा म्हणे आपुला भक्त गुणीं । केली वोवणी अक्षरां ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 23, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP