अंत्येष्टिसंस्कार - मंत्राग्नि

हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार.


(दाह देशाच्या वायव्येला अग्नी ठेवावा. चितेची जागा साफ करावी. वायव्येपासून अग्नेयेपर्यंत ऊर्ध्वबाहू पुरुषाइतकी लांब व ईशान्येपासून नैऋत्येपर्यंत पाच अरत्नी रुंद व बारा अंगुळे खोल खड्डा खणावा. आचमन करुन एक दर्भाचे पवित्रक घालावे. अमंत्रक प्राणायम करावा व पूर्वी लिहिल्याप्रमाणे देशकालाचा उच्चार करावा.)

..... फलप्राप्त्यर्थं
...... गोत्रस्य ..........प्रेतस्य गृह्याग्नि विच्छेद दिनादारभ्य एतावंतं कालं गृह्याग्नि विच्छेद जनित प्रत्यवाय परिहार व्दारा श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थ प्रत्यब्दं एकैक कृच्छ्‍प्रायश्चित्तं तत्प्रत्याम्नाय गोनिष्क्रयीभूत यथाशक्ति द्रव्यदानेन सूतकान्ते अहमाचरिष्ये (उदक सोडावे.) तथाच गृह्याग्निविच्छेदेन लुप्तानां सायंप्रातर्होमानां तथा दर्शपूर्णमास स्थालीपाकानांच संपत्तिपर्याप्तं व्रीह्याज्य निष्क्रयद्रव्यं सूतकान्ते ब्राह्मणेभ्यो दातुमहमुत्सज्ये ...... गोत्रस्य .......प्रेतस्य अग्निविच्छेद निमित्तकं दाहायाग्नि सिध्यर्थं प्रेताधानं करिष्ये तदंगं स्थंडिलादि करिष्ये (उदक सोडावे.)
(चौकोनी स्थंडिल करावे. गाईच्या शेणाचे पाणी त्यावर शिंपडावे. दक्षिणेकडे आठ, उत्तरेकडे दोन, पश्चिमेकडे चार व पूर्वेकडे अर्धे इतकी अंगुळे, जागा सोडावी. दक्षिणेकडून उत्तरेकडे टीचभर लांब, समिधेने एक रेषा काढावी. त्याचे दक्षिणेकडे व उत्तरेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे तीन रेषा काढाव्यात. त्यांच्यामध्ये, समांतर पश्चिमेकडून पूर्वेकडे तीन रेषा काढाव्यात. समिधा उत्तरेकडे अग्र करुन स्थंडिलावर ठेवावी. स्थंडिलावर पाणी शिंपडावे. समिधा सोडून अग्नेयेकडे टाकावी व हात धुवावेत. अग्नी, स्थंडिलाचे अग्नेय दिशेला ठेवावा.)
जुष्टोदमूना आत्रेयो वसुश्रुतोऽग्नि स्त्रिष्टुप् एह्यग्रे राहूगणौ गौतमौग्नि स्त्रिष्टुप् अग्न्यावाहने विनियोग: ।
ॐ जुष्टो दमूना अतिथिर्दुरोण इमं र्नो यज्ञमुपयहि विद्वान । विश्वां अग्ने अभिर्युजो विहत्या शत्रूयता माभरा भोजनानि ॥
एह्यग्र इह होता निषीदादब्ध: सुपुर एता भवा न: । अवतां त्वा रोदसी विश्वमिन्वे यजामहे सौ मनसाय देवान् ॥
(अग्नीवर अक्षता घालून आच्छादन दूर करावे.) समस्तव्याहृतीनां परमेष्ठीप्रजापति: प्रजापतिर्बृहती अग्निप्रतिष्ठापने विनियोग: ॐ भूर्भुव: स्व: लौकिकाग्निं प्रतिष्ठापर्यामि ।
(स्थंडिलावर अग्नी ठेवावा. इंधन प्रोक्षण करुन घालावे. अग्नीला ज्वाला काढावी.)
चत्वारिशृंगागौतमोवामदेवोग्निस्त्रिष्टुप् । अग्निमूर्तिध्याने विनियोग: । ॐ चत्वारिशृंगा त्रयो अस्य पादा व्दे शीर्षे सप्त हस्तासो अस्य । त्रिधा बध्दो वृषभो रोरविति महो देवो मर्त्यां आविवेश ॥
सप्तहस्तश्चतु:शृंग: सप्तजिह्वो व्दिशीर्षक: । त्रिपात्प्रसन्न वदन: सुखासीन: शुचिस्मित: ॥
स्वाहांतु दक्षिणे पार्श्वे देवीं वामे स्वधां तथा । बिभ्रद्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं स्त्रुचं स्त्रुचं ॥
तोमरं व्यंजनं वामैर्घृतपात्रंच धारयन् । मेषारुढो जटाबध्दो गौरवर्णो महौजस: ॥
धूम्रध्वजौ लोह्ताक्ष: सप्वार्चि: सर्व कामद: । आत्माभिमुखमासीन एवं रुपो हुताशन: ॥
अग्ने वैश्वानर शांडिल्यगोत्र मेषध्वज प्राड्मुखो मम संमुखो वरदो भव (पुढील मंत्राने, अग्नीसभोवती, तीन वेळा, पाणी फिरवावे.) अग्ने:परिसमूहनं । अग्ने: परिसमूहनं । अग्ने: परिसमूहनं (अग्नीच्या चारी बाजूंना चार चार दर्भ ठेवावेत. व पुन्हा तीन वेळा पाणी फिरवावे.) पर्युक्षणं । पर्युक्षणं । पर्युक्षणं ॥
(अग्नीच्या उत्तरेकडे काही दर्भ ठेवून, त्यावर प्रोक्षणीकरता एक द्रोण, स्त्रुवेकरता एक पान, तुपाकरता एक द्रोण व दर्भाची जुडी ठेवावी. पात्रे उपडी ठेवावी. प्रोक्षणी पात्र उताणे करावे. त्यावर टीचभर लांबीचे साग्र दोन दर्भ ठेवावेत. प्रोक्षणीत पाणी घालावे व त्यात गंध, अक्षता, फूल घालावे. दोन्ही हातांचे अंगठे व करंगळीजवळचे बोट, यांनी उत्तरेकडे अग्रे असलेले दर्भ, सुटे सुटे धरुन प्रोक्षणीतील पाणी, तीन वेळा उचलावे. सर्व पात्रे उताणी करावीत व त्या दर्भानी, प्रोक्षणीतील पाणी घेऊन, ती पात्रे तीन वेळ प्रोक्षण करावीत. ते दर्भ, तुपाच्या पात्रावर ठेवावे व दुसरे दर्भ प्रोक्षणीवर ठेवावे. तुपाचे पात्र आपल्या पुढ्यात घ्यावे. दर्भ पेटवून, त्या ज्योतीने तूप पाहावे. अंगठयाच्या पेराइतके लांबीचे दोन दर्भ घेऊन प्रोक्षणीत बुडवून त्या तुपामध्ये टाकावेत. पुन्हा दर्भ पेटवून ती ज्योत, प्रदक्षणिक तुपाभोवती तीन वेळा फिरवावी. दर्भ विझवावे व हात धुवावेत.)
सवितुष्ट्‍वा हिरण्यस्तूप: सवितापुर उण्णिक् आज्यस्योत्पवने विनियोग: ।
ॐ सवितुष्ट्‍वा प्रसव उत्पुनाम्यच्छिद्रेण पवित्रेण वसो: ।
सूर्यस्य रश्मिभि: ॥
(या मंत्राने एकदा व अमंत्रक दोन वेळा दर्भांनी तूप उचलावे व ते दर्भ, प्रोक्षणीत बुडवून, पुढील मंत्राने अग्नीवर द्यावे.) स्कंदायस्वाहा । स्कंदायेदंनमम (त्यानंतर, आपल्या पुढील भूमी, प्रोक्षणीतील पाण्याने प्रोक्षण करावी. त्यावर दर्भ जुडी पसरावी व त्यावर तुपाचे भांडे ठेवावे. उजव्या हातात स्त्रुवा व डाव्या हातात काही दर्भ घ्यावेत व अग्नीवर धरावे. स्त्रुवा डाव्या हातात घ्यावी, दर्भाने तीन वेळा प्रोक्षण करावी व आज्यपात्राच्या उत्तरेकडे ठेवावी. दर्भ प्रोक्षणीत बुडवून, अग्नीवर द्यावे. पूर्वेपासून अग्नीचे आठ दिशेला, अमंत्रक अक्षता ठेवाव्यात.)
अयाश्चेति विमदोऽया अग्नि: पंक्ति: लौकिकस्याग्नेरौपासनत्वसिध्दये आज्यहोमे विनियोग: । ॐ अयाश्चाग्नेस्यनभिशस्तीश्चसत्यमित्वमया असि ।
अयसा वयसा कृतो यासन्हव्यमू हिषे यार्नो धेहि भेषजं स्वाहां ॥
अयसेग्नय इदंनमम ॥ भू: स्वाहा । अग्नय इदंनमम ॥
भुव: स्वाहा । वायव इदंनमम ॥ स्व: स्वाहा । सूर्यायेदंनमम् ॥
भूर्भुव: स्व: स्वाहा । प्रजापतय इदंनमम ॥
(अशा तुपाच्या पाच आहुत्या द्याव्यात. परिस्तरणे काढून टाकावीत व अग्नीभोवती सहा वेळा पाणी फिरवावे. पुढील मंत्राने-)
अग्ने: परिसमूहनं अग्ने: परिसमूहनं अग्ने: परिसमूहनं पर्युक्षणं पर्युक्षणं पर्युक्षणं (अग्नीच्या आठ दिशेला पूर्वेपासून अक्षता ठेवाव्यात व अग्नीची पूजा करावी.) अग्नये नम: सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पंसमर्पयामि (स्थंडिलाच्या वायव्य कोपर्‍यावर गंधाक्षता फूल घालावे. ) विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम: ॥
(प्रेत जाळण्याचे ईशान्य दिशेला जानुमात्र खड्डा खणावा. त्यात पाणी व शेवाळ घालावे. त्या पाण्याने कर्त्याने हात-पाय धुवावेत व दक्षिणेकडे तोंड करुन बसावे. आचमन करुन एक दर्भाचे पवित्रक घालावे. व अमंत्रक प्राणायाम करावा.)
अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं ....... गोत्रस्य ...... प्रेतस्य प्रेतत्व विमोक्षार्थं और्ध्वंदेहिकं करिष्ये (उदक सोडावे.)
(उपसव्य करावे.)
उपसर्पेति संकुसुक: पितृमेधास्त्रिष्टुप् । भूमिप्रार्थने विनियोग: ॥
ॐ उपसर्प मातरं भूमिमेतामुरुव्यचसं पृथिवीं सुशेवां ।
ऊर्णम्रदा युवतिर्दक्षिणावत एषा त्वा पातु निऋतेरुपस्थात् ॥
अपसर्पतुतेप्रेतायेकेचिदिहपूर्वजा: । स्वस्तिन: कृणुतामाशु आपात: पुनरागमात् ।
(भूमीची प्रार्थना करावी.) दिविजाताअप्सु-जातायाजाताओषधीभ्य: ।
अथोयाअद्रिजाआप स्तान: शुंधतु शुंधनी: (स्थलशुध्दि:) अपेतेतियम: पितरस्त्रिष्टुप् भूमि प्रोक्षणे विनियोग: ।
अपेत वीत वि च सर्पतातोस्माऽएतं पितरो लोकमक्रन् ।
अहोभिरभ्दिरक्तुभिर्व्यक्तं यमो ददात्यवसानमस्मै ॥
(या मंत्राने खड्ड्यातील पाण्याने किंवा दुसर्‍या पाण्याने शमीशाखेने अगर दर्भाने अप्रदक्षणीक तीन वेळा भूमी प्रोक्षण करावी. प्रत्येक वेळी वरील मंत्र म्हणावा. नंतर वायव्येला त्रिकोणी स्थंडिल करावे. त्यावर गाईच्या शेणाचे पाणी प्रोक्षण करावे. त्यावर मागे लिहिल्याप्रमाणे समिधेने सहा रेषा काढाव्यात व त्यावर अग्नि स्थापन करावा.)
ॐ भूर्भुव: स्व: क्रव्याद नामानमग्निं प्रतिष्ठापयामि (प्रोक्षण केलेले इंधन घालून अग्नीला ज्वाला काढावी व ध्यान करावे. ध्यानाचे मंत्र मागे दिले आहेत. चत्वरिशृंगापासून मम संमुखो वरदोभवपर्यंत.) त्यानंतर प्रेत जाळण्याच्या जागेवर पुढील मंत्राने समिधेने तीन रेषा काढाव्यात. यमायदहनपतयचोल्लिखामि (मध्यें) कालायदहनपतयेचोल्लिखामि (उत्तरेकडे) मृत्यवेदहनपतयेचोल्लिखामि (दक्षिणेकडे नंतर पुढील मंत्राने त्या रेषांवर तिलोदक शिंपडावे) यमाय दहनपतये पितृभ्य: स्वधानम: (मधल्यावर) कालाय दहनपतये पितृभ्य: स्वधानम: (उत्तरेवर) मृत्यवेदहनपतये पितृभ्य: स्वधानम: (दक्षिण रेषेवर, त्यानंतर सोन्याचे तुकडे, तीळ, त्या जागेवर टाकून चिता रचावी. नंतर कर्त्याने चितेवर दर्भ पसरावे. कृष्णाजिन घालावे. प्रेत उत्तरेकडे नेऊन दक्षिणेकडे डोके करुन चितेवर ठेवावे. नंतर प्रेताच्या मुखात, नाकात, डोळ्यांत, कानात अशा सात छिद्रांत सोन्याचे कण अगर आज्यबिंदू घालावेत. प्रेतावर तुपात भिजवून तीळ घालावेत.)
(सव्य करावे.) अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवंगुण विशेषण विशिष्टायां पुण्य तिथौ मम आत्मान: श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं प्रेतोपासनं करिष्ये (उदक सोडावे.)
(दोन समिधा हातात घेऊन अन्वाधान करावे.) अग्निं कामं लोकं अनुमतिं एता: प्रधान देवता: अग्नावाज्येन प्रेतं प्रेतोरसि आज्येन यक्ष्ये (उदक सोडावे.) व्याहृतीनां परमेष्ठी प्रजापति: प्रजापतिर्बृहती अन्वाधान समिध्दोमे विनियोग: ।
ॐ भूर्भुव: स्व: स्वाहा प्रजापतय इदं नमम ॥
(पुढील मंत्राने अग्नीसभोवार तीन वेळा पाणी फिरवावे.) अग्ने: परिसमूहनं अग्ने: परिसमूहनं अग्ने: परिसमूहनं ॥
(चितेसहित अग्निभोवती दर्भाची परिस्तरणे घालावी म्हणजे दर्भ ठेवावे. नंतर पुढील मंत्राने अग्नीसभोवार पुन्हा तीन वेळा पाणी फिरवावे.)
पर्युक्षणं पर्युक्षणं पर्युक्षणं ॥
(अग्नीच्या दक्षिणेकडे दर्भ ठेवून त्यावर प्रोक्षणी, स्त्रुवा, चमस, आज्य, पात्र अशी चार पात्रे उताणी ठेवावीत. खड्ड्यातील उदकाने अगर दुसर्‍या पाण्याने चमस पात्र भरावे. त्यावर दर्भाचे आच्छादन घालावे. )
इममग्नइति दमनोग्निस्त्रिष्टुप् चमसानुमंत्रणे विनियोग: ॥
इममग्ने चमसं मा विजिह्वर: प्रियो देवानामुत सोम्यानां ।
एष यश्चमसो देवपानस्तस्मिन्देवा अमृता मादयंते ॥
(प्रोक्षणी पात्रावर, एक दर्भ ठेवावा. त्यात पाणी, गंध, फूल घालावे. ते पाणी दर्भाने तीन वेळ उचलावे. दर्भाने सर्व पात्रे तीन वेळ प्रोक्षण करावी. तो दर्भ आज्यपात्रावर ठेवावा. प्रोक्षणीवर दुसरा दर्भ ठेवावा. आज्यपात्र अग्नी व आपण, यामध्ये घ्यावे. त्यात तूप घालावे व पूर्वीच्या जागेवर ठेवावे. दर्भ पेटवून, त्या ज्योतीने ते तूप पाहावे. अंगठयाच्या पेराइतके लांब, साग्र, दोन दर्भ प्रोक्षणीत बुडवून, त्या तुपात टाकावे. पुन्हा दर्भ पेटवून, ती ज्योत तुपाभोवती, प्रदक्षणिक, तीन वेळा फिरवावी. ज्योत विझवून हात धुवावेत. आज्य पात्रावर असलेल्या दर्भाने, ते तूप, दोन हातांच्या अंगठा व करंगळीजवळच्या बोटांनी, दर्भ धरुन तीन वेळा उचलावे व तो दर्भ प्रोक्षणीत बुडवून अग्नीवर द्यावा.)
स्कंदायस्वाहा स्कंदायेदं नमम ॥
(आपल्या पुढील भूमी प्रोक्षण करावी. काही दर्भ ठेवून त्यावर तुपाचे भांडे ठेवावे. उजव्या हातात, स्त्रुवा घ्यावी. डाव्या हातात दर्भ घ्यावे. दोन्ही अग्नीवर धरावी. दर्भाचे अग्रांनी, स्त्रुवेची मागील व पुढील बाजू प्रोक्षण करावी. तीन वेळ दर्भ मूलाने, स्त्रुवेचे, मूळ प्रोक्षण करावे व अग्नीवर धरावी. आज्य पात्राचे उत्तरेकडे ठेवावी. अमंत्रक अग्नीच्या आठही दिशेला, पूर्वेपासून अक्षता ठेवाव्यात. अपसव्य करावे. स्त्रुवेने तुपाच्या, अग्नीवर आहुती, पुढील मंत्रांनी द्याव्यात.
अग्नयेस्वाहा अग्नय इदंनमम । कामायस्वाहा कामायेदंनमम ।
लोकायस्वाहा लोकायेदं नमम । अनुमतयेस्वाहा अनुमतयइदं नमम
पुढील मंत्राने प्रेताच्या हृदयावर, पाचवी तुपाची आहुती द्यावी.)
ॐ अस्माद्वैत्वमजायथाअयंत्वदभिजायतां । असौ ........... प्रेतस्वर्गाय लोकायस्वाहा .......
प्रेतायेदं नमम (स्विष्टकृतहोम, पात्र संयोजन वगैरे काही नाही.)
(पिठाचे पाच पिंड करावेत. त्यावर दही तूप घालावे व पुढील मंत्रांनी कपाळ व मुख यावर दोन पिंड ठेवावेत.)
अग्नेर्वर्मेति दमनोग्नि स्त्रिष्टुप् ।
प्रेतस्य ललाटे मुखे च सक्तुपिंडदाने विनियोग: ।
अग्नेर्वर्म परि गोभिर्व्यय-स्वसंप्रोर्णुष्व पीवसा मेदसा च ।
ने त्त्वां धृष्णुर्हरसा जर्हृषाणो दधृग्विधक्ष्य न्पर्यखयाते ॥
(पुढील मंत्रांनी, दोन बाहू व हृदयावर, तीन पिंड ठेवावेत.)
अतिद्रवेति मंत्रव्दयस्य यमश्वानौत्रिष्टुप बाहुव्दये हृदयेच सक्तु पिंडदाने विनियोग: ।
अतिद्रव सारमेयौ श्वानौ चतुरक्षौशबलौं साधुना पथा ।
अथापितृन्त्सु विदत्राँउपेहियमेन ये सधमादं मदंति ॥
यौ ते श्वानौ यम रक्षितारौं चतुरक्षौ पथिरक्षीं नृचक्षसौ ।
ताभ्यामेनं परिदेहि राजन्त्स्वस्ति चास्मा अनमीवं च धेहि ।
(पंचकादि विधी काही असल्यास करावे व चिता रचून पुरी करावी. पंचकादि विधी शेवटी दिले आहेत.
क्रव्यादमिति दमनोग्निस्त्रिष्टुप् अग्निप्रज्वालने विनियोग: ।
क्रव्यादमग्निं प्रूहिणोमि दूरं यमराज्ञो गच्छतु रिप्रवाह: ।
इहैवायमि तरोजातर्वेदा देवेभ्यो हव्यं वहतं प्रजानन ॥
त्वंभूतकृज्जगद्योनेत्वंलोकपरिपालक: ।
उक्त: संहारकस्तस्मा देनंस्वर्गंमृतंनय ।
(या मंत्रांनी पुरुषाच्या शिराकडे व स्त्रियांच्या पायाकडे अग्नी लावावा व पुढील मंत्रांनी उत्तरीने वारा घालावा.)
वातार्स्तेवांतुपथिपुण्यगंधामन: सुखागात्र सुखानुलोमा: ।
त्वच: सुखामांससुखाअस्थिसौख्यावहंतुत्वांमरुत: सुकृतांयत्रलोका: ॥
इमाआपोमधुमत्योस्मिंस्तेलोकौपदुह्यंतामक्षींयमाणा: स्वधानम: ।
इमा आपोमधुत्योंतरिक्षेतेलोकउपदुह्यंतामक्षीयमाणा: स्वधानम: ॥
इमाआपोमधुमत्य:स्वर्गेर्तेलोकउपदुह्यंतामक्षीयमाणा: स्वधानम:
(जळणार्‍या प्रेतावर तीळ टाकीत पुढील मंत्र म्हणावे -)
प्रेहिप्रेहीति द्वयोर्यम:पितरस्त्रिष्टुप ॥
दह्यमान प्रेतानुमंत्रणे विनियोग: ।
प्रेहि प्रेहि पथिभि: पूर्व्येभिर्यत्रान: पूर्वे पितर: परेयु: ॥
उभा राजानास्वधया मदंता यमं पश्यासि वरुणं च देवं ॥
संगच्छस्वपितृभि: संयमेनेष्टापूर्तेन परमे व्योमन् ॥
हित्वायावद्यं पुनरस्तमेहिसंगच्छस्व तन्वा सुवर्चा: ॥
अतिद्रवेति द्वयोर्यमश्वानौत्रिष्टुप् ॥
दह्यमान प्रेतानुमंत्रणे विनियोग: ॥
अतिद्रव सारमेयौश्वार्नौ चतुरक्षौशबर्लौ साधुना पथा ॥
अथापितृन्त्सु विदत्राँउपेहि यमेन येसधमादं मदंति ॥
यौ ते श्वानौ यम रक्षितारौं चतुरक्षौ पथिरक्षीं नृचक्षसौ ॥
ताभ्यामेनं परिदेहि राजन् त्स्वस्ति चास्माअनमीवं च धेहि ॥
मैनमितिषण्णां दमनोग्निस्त्रिष्टुप् ॥
दह्यमान प्रेतानुमंत्रणे विनियोग: ॥
मैन मग्ने विदहो माभिशोचो मास्य त्वचं चिक्षिपो मा शरीरं ॥
यदा शृतं कृणवो जातवेदोर्थेमेनं प्रहिणुतात्पितृभ्य: ॥
शृतं यदा करसि जातवेदोर्थेमेनं परिदत्तात्पितृभ्य: ॥
यदा गच्छा त्यसुनीतिमेतामथादेवानां वशनीर्भवाति ॥
सूर्यं चक्षुर्गच्छतु वातमात्मा ध्यां च गच्छ पृथिवीं च धर्मणा ॥
अपो वा गच्छ यदि तत्र ते हितमोषधीषु प्रतितिष्ठाशरीरै: ॥
अजो भागस्तपसा तं तपस्व तं ते शोचिस्तपतु तं ते अर्चि: ॥
यार्स्ते शिवास्तन्वो जातवेद स्ताभिर्वहैनं सुकृतामुलोकं ॥
अव सृज पुनरग्रे पितृभ्योयस्तऽआहुतश्चरति स्वधाभि: ॥
आयुर्वसानऽउपवेतु शेष: संगच्छतांत जातवेद: ॥
यर्त्ते कृष्ण: शकुनऽआतुतोद पिपिल: सर्प उत वाश्वापद ॥
अग्निष्टद्विश्वादगदंकृणोतु सोमश्च योब्राह्मणाँऽआविवेश ॥
पूषात्वेतिचतसृणां देवश्रवा: पूषात्रिष्टुप् दह्यमान प्रेतानुमंत्रणे विनियोग: ॥
पूषा त्वेतशच्यावयतु प्रविद्वाननष्ट-पशुर्भुवनस्य गोपा: ॥
सत्वैतेभ्य: परिदद त्पितृभ्योग्निर्देवेभ्य: सुविदत्रिर्येभ्य: ॥
आयुर्विश्वायु: परि पासति त्वा पूषा त्वा पातु प्रपथे पुरस्तात् ॥
यत्रासते सुकृतो यत्र ते ययुस्तत्र त्वा देव: सविता दधातु ॥
पूषेमा आशाऽअनुवेद सर्वा:सोऽअस्माँअभयतमेन नेषत् ॥
स्वस्तिदाऽ-आघृणि: सर्वविरोप्रयुच्छन्पुर एतु प्रजानन् ॥
प्रपथे पथामजनिष्ट पूषा प्रपथे दिव: प्रपथे पृथिव्या: ॥
उभे अभि प्रियतमे सधस्थ आ च परा च चरति प्रजानन् ॥
उपसर्पेति चतसृणां संकुसुक:पितृमेधास्त्रिष्टप् द्वितीयाप्रस्तारपंक्ति:चतुर्थीजगती ॥
दह्यमान प्रेतानुमंत्रणे विनियोग: ॥
उपसर्प मातरं भूमिमेतामुरुव्यचसं पृथिवीं सुशेवां ॥
उर्णम्रदा युवतिर्दक्षिणा वत एषा त्वा पातु निऋतेरुपस्थात् ॥
उच्छ्‍वंचस्व पृथिवि मा नि बाधथा: सूपायनास्मै भव सूपवंचना ॥
माता पुत्रं यथा सिचाभ्ये नं भूम ऊर्णुहि ॥
उच्छ्‍वंचमाना पृथिवी सु तिष्ठतु सहस्त्रं मित उप हि श्रयंतां ॥
ते गृहासो घृतश्चुतो भवंतु विश्वाहास्मै शरणा: संत्वत्र ॥
उत्ते स्तभ्नामि पृथिवीं त्वत्परीमं लोगं निदधन्मोऽअहंरिषं ॥
एतां स्थूणां पितरो धारयंतु तेत्रायम: सादनाते मिनोतु ॥
सोमएकेभ्यइति पंचानां यमोभाववृत्तोनुष्टुप् ॥
दह्यमान प्रेतानुमंत्रणे विनियोग: ॥
सोमएकेभ्य: पवते घृतमेक उपासते ॥
येभ्यो मधु प्रधावति तांश्चिदेवापिगच्छतात् ॥
तपसा ये अनाधृप्या स्तपसा ये स्वर्य:यु ॥
तपो ये चक्रिरे महस्तांश्चिदेवापि गच्छतात् ॥
ये युध्यंते प्रधनेषु शूरासो ये तनूत्यज: ॥
ये वा सहस्त्रदक्षिणास्तांश्चिदेवापि गच्छतात ॥
येचित्पूर्वऋतसापऽऋतावान ऋतावृध: ॥
पितृन्तपस्वतो यम तांश्चिदेवापि गच्छतात् ॥
सहस्त्रणीथा: कवयो ये गोपायंति सूर्य ॥
ऋषीन्तपस्वतो यम तपोजाँऽअपि गच्छतात् ॥
उरुणसावित्यस्ययमश्वानौत्रिष्टुप् ॥
दह्यमानप्रेतानुमंत्रणेविनियोग: ॥
उरुणसावसुतृपाउदुंबलौ यमस्य दूतौ चरतो जनाँऽअनु ।
तावस्मभ्यं दृशये सूर्याय पुनर्दाता वसुमध्ये ह भद्रं ॥
(कपालमोक्षानंतर कर्त्याने मातीचा कुंभ पाणी भरुन, डाव्या खांद्यावर घ्यावा. स्मशानातील एक फार मोठा नाही व फुटका नाही असा दगड घ्यावा. त्याने कुंभाच्या पाठीमागे छिद्र पाडावे व प्रेताच्या पायापासून अप्रदक्षणिक प्रेताभोवती पुढील मंत्राने फेरे करुन पायापर्यंत यावे-)
वातोस्तेवांतु पथिपुण्यगंधामन: सुखागात्रसुखानुलोमा: ।
त्वच:सुखामांससुखा अस्थिसौख्यावहंतुत्वां मरुत: सुकृतांयत्रलोका: ॥
इमाआपोमधुमत्योस्मिंस्तेलोक उपदुह्यंतामक्षीयमाणा: स्वधानम:
(पायाजवळ आल्यावर दुसरे छिद्र पाडावे व दुसरी फेरी पुढील मंत्राने करावी.)
वातोस्तेवांतुपथिपुण्यगंधामन: सुखागात्रसुखानुलोमा: ॥
त्वच:सुखामांससुखा अस्थिसौख्यावहंतुत्वां मरुत: सुकृतांयत्रलोका: ।
इमा आपोमधुत्योत्नरिक्षेतेलोक उपदुह्यंतामक्षीयमाणा: स्वधानम: ।
(पुन्हा कुंभाला तिसरे छिद्र पाडावे व फेरी करावी.)
वातास्तेवांतु पथिपुण्यगंधामन: सुखागात्रसुखानुलोमा: ।
त्वच:सुखामांससुखा अस्थि सौख्यावहंतुत्वांमरुत: सुकृतांयत्रलोका: ।
इमा आपोमधुमत्य: स्वर्गेते लोक उपदुह्यंतामक्षीयमाणा: स्वधानम: ॥
(याप्रमाणे तीन फेर्‍या केल्यानंतर पुरुषाच्या डोक्याकडे व स्त्रियांच्या पायाकडे प्रेताकडे पाठ करुन कुंभ मागे टाकून फोडावा. यालाच अश्मा म्हणतात. पुढील मंत्र म्हणून प्रेताच्या सव्य बाजूने निघून घरी यावे व स्नान करुन अश्म्यावर तिलांजली द्यावी.)
इमेजीवा: संकुसुको मृत्युस्त्रिष्टुप् सव्यमावृत्य गमने विनियोग: ॥
इमे जीवा विमृतैरावृत्रन्न भूभ्दद्रा देवहूतिर्नो अद्य ।
प्रांचो अगामनृतये हसाय द्राघीय आयु: प्रतरं दधाना: ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP