अंत्येष्टिसंस्कार - पाथेयश्राध्द

हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार.


दक्षिणेकडे तोंड करुन बसावे. आचमन करुन, एक दर्भाचे पवित्रक करांगुलीजवळच्या बोटात घालावे व आमंत्रक प्राणायाम करावा.) तिथिर्विष्णुस्तथावारोनक्षत्रं विष्णुरेव च । योगश्च करणं चैव सर्वंविष्णुमयं जगत् ।  अद्यपूर्वोचरित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं (अपसव्य करावे.) ......... गोत्रस्य ..........प्रेतस्य मनुष्य लोकात्प्रेतलोक गमनार्थं पाथेय श्राध्दं करिष्ये (उदक सोडावे. एका भांड्यात पाणी घेऊन, त्यात गंध, फूल, तुलसीपत्र, तीळ व दर्भ घालून तिलोदक करावे. आपणासमोर एक पान मांडून त्यावर आपणाकडे अग्र करुन एक दर्भ ठेवावा. याला चट म्हणतात.) (टिंबाच्या ठिकाणी त्या त्या गोत्राचा उच्चार करावा.) ..... गोत्र ........... प्रेत पाथेयश्राध्दे अयंते क्षण उपतिष्ठतां (चटावर एक दर्भ द्यावा.) ...... गोत्र ..........प्रेत पाथेयश्राध्दे पाद्यमुपतिष्ठतां (दर्भाने तिलोदक द्यावे.) ..........गोत्रस्य ....... प्रेतस्य पाथेय श्राध्दे आसनमुपतिष्ठतां (चटावर एक दर्भ व तीळ द्यावे. चटासमोर दक्षिणाग्र एक दर्भ ठेवून त्यावर एक पात्र ठेवावे. त्यावर एक दर्भ ठेवावा. त्यात पाणी, गंध, फूल, तीळ घालावे व ते अर्घ्य चटावर द्यावे.) टिंबाच्या ठिकाणी त्या त्या गोत्राचा उच्चार करावा.) ...... गोत्र .........प्रेत पाथेय श्राध्दे अर्घ्यमुपतिष्ठतां ......... गोत्र ........ प्रेत आच्छादनमुपतिष्ठतां (एक दर्भ द्यावा.) ...... गोत्राय ..........प्रेताय पाथेयश्राध्दे दास्यमानं आमं तन्निष्कयंवा यथाशक्ति सोपस्करं सघृतं दक्षिणोपेतं उपतिष्ठतां (तिलोदक द्यावे चटापुढे पिंडाकरता दक्षिणेकडे अग्र करुन एक दर्भ ठेवावा.) शुंधंतांप्रेता: (तिलोदक द्यावे) ....... गोत्राय .......... प्रेताय पाथेयश्राध्देअयं सक्तुपिंड उपतिष्ठतां (दर्भावर पिंड द्यावा.) तदुपरि तिलोदकमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.) (शक्तीप्रमाणे प्राणाचा निरोध करावा. थोडे पीठ हुंगून, पिंडाजवळ ठेवावे.) ........गोत्र ............. प्रेत अभ्यंजनांजने उपतिष्ठतां (काजळ व तूप लावावे.) गोत्र ...... प्रेत तुलसिदल भृंगिराजंच उपतिष्ठतां (तीळ घालावे.) गोत्रायदशासूत्रमुपतिष्ठतां (उत्तरीचे सूत पिंडावर घालावे.) .......... गोत्र .......... प्रेत दशासूत्रमुपतिष्ठतां उपस्थानार्थे तिला: उपतिष्ठंतां (तीळ घालावे.) ........ गोत्राय .............प्रेताय ........... पाथेय श्राध्दे दास्यमान दक्षिणामुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.)  
अनादिनिधनोदेव: शंखचक्रगदाधर: । अक्षय्य: पुंडरिकाक्ष: प्रेतमुक्तिप्रदो भव ॥
इदं सकुशतिलोदकं प्रेताप्यायनमस्तु (सर्वतिलोदक आंगठ्यावरुन पिंडाजवळ ओतावे.)
अभिरम्यतां अभिरतास्म: ।

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP