अन्नवहस्त्रोतस् - ग्रहणी

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


शारीर
आमाशयाच्या सुशिर स्नायूपासून पक्वाशयाच्या आरंभीं असलेल्या उंडुका पर्यंतचा जो महास्त्रोतसाचा भाग त्यास अवयवदृष्टया लघ्वंत्र व कार्यदृष्टया ग्रहणी, पच्यमानाशय, पित्तधराकला अशा संज्ञा प्राप्त झालेल्या आहेत.

षष्ठी पित्तधरा नाम पक्वामाशयमध्यस्था । सा ह्यन्तरग्नेरधि-
ष्ठानतयामाशयात् पक्वाशयोन्मुखमन्नं बलेन विधार्य पित्त-
तेजसा शोषयति पचति पक्वं च विमुञ्चति । दोषाधिष्ठिता
तु दौर्बल्यादाममेव । ततोऽसावन्नस्य ग्रहणात् पुनर्ग्रहणी
संज्ञा । बलं च तस्या: पित्तमेवाग्न्याभिधानमत: साग्निनो-
पस्तब्धोपबृंहतिकैकयोगक्षेमा शरीरं वर्तयति ।
अ. सं. शा. पान ३१९

षष्ठी पित्तधरा नाम या कला परिकीर्तिता ।
पक्वामाशयमध्यस्था ग्रहणी सा प्रकीर्तिता ॥
सु. उ. ४०-१६९ पान ७०९

षष्ठी पित्तधरा; या चतुर्विधमन्नपानमामाशयात् प्रच्युतं
पक्वाशयोपस्थितं धारयति ।
सु. शा. ४-१८ पान ३५६

षष्ठीत्यादि । पित्तमत्रान्तरग्निसंज्ञकम् । आमाशयात् प्रच्युतं
कफाशयाभ्द्रष्टं; पक्वाशयोपस्थितं, पक्वाशयगमनायोपस्थितं
पित्तस्थानं संप्राप्तं, धारयति `पाकार्थ' इति शेष:
टीका सु. शा. ४-१८ पान ३५७

आमपक्वाशयान्तेषु बस्तौ च शुषिरा: खलु ।
सु. शा. ५-३२ पान ३६७

अग्न्यधिष्ठानमन्नस्य ग्रहणादग्रहणी मता ।
नाभेरुपरि सा ह्यग्निबलोपस्तंभबृंहिता ॥
अपक्वं धारयत्यन्नं पक्वं सृजति पार्श्वत: ।
दुर्बलाग्निबला दुष्टा त्याममेव विमुञ्चति ॥
च.चि. १५-५६, ५७ पान ११९५

समानोऽग्निसमीपस्थ: कोष्ठे चरति सर्वत: ।
अन्नं गृह्णाति पचति विवेचयति मुञ्जति ॥

समानो वायुरग्निसमीपस्थ: । सामान्योक्तावपि प्राधान्या-
त्पाचकोऽग्निर्गृह्यते । अत एवाह कोष्ठे चरति सर्वत इत्यादि ।
सर्वस्मिन् कोष्ठे चरति । स चान्नं गृह्णाति-अपक्वमामा-
शये धारयतीत्यर्थ: । पचति-अग्निसन्धुक्षणाद्भक्तकार इव ।
विवेचयति-संहतमन्नं पाकाय विभजते । मुञ्चतिशकृन्मूत्रादिरुपमध: ।
सटीक सटीका वा. सु. १२-८ पान १९३

स्वेददोषाम्बुवाहीनि स्त्रोतांसि समधिष्ठित: ।
अन्तरग्नेश्च पार्श्वस्य: समानोऽग्निबलप्रद: ॥
च.चि. २८-८ पान १४४५

आयुरारोग्यवीर्यौजोभूतधात्वग्निपुष्टये ।
स्थिता पक्वाशयद्वारि भुक्तमार्गार्गलेव सा ॥
वा. शा. ३-५१ पान ३९४

अग्नि हा ग्रहणीच्या आश्रयानें रहातो आणि दोघांचीहि कार्यक्षमता परस्परांच्या बलावर अवलंबून असते. पित्त, अग्नि यांचा समवायसंबंध असल्यामुळें अग्निचें अधिष्ठान असलेल्या ग्रहणीलाच पित्तधराकला असें म्हटलें आहे. या ठिकाणीं चतुर्विध षडरसात्मक पाचभौतिक शरीर पुष्टीकारक अशा घेतलेल्या आहाराचें प्रकृत स्थितीमध्यें उत्तम प्रकारें पचन होतें. अन्नातील शरीराच्या धातूंना पोषक असा भाग वेगळा वेगळा होतो. शरीराला हव्या असलेल्या भागाचे रसवाहिन्यांच्या द्वारा शोषण होतें आणि नको असलेला अन्नाचा पुरीषरुप भाग पुढें पक्वाशयामध्यें संचित होतो. स्वेद, दोष व अंबू या स्त्रोतसांना व्यापून असणारा समान वायू, याच पित्तधरा कला, ग्रहणी वा पच्यमानाशय या लघ्वंत्र याच्या आश्रयास राहून अग्निच्या संधूक्षणाचें कार्य करतो. आणि अग्निसवें राहून अन्न पचविणें सारभागाचें विभजन करणें, सार भाग शोषून घेणें मलभाग टाकणें या क्रियेमध्यें सहाय्य करतो. सर्व क्रियांना वायू हा प्रेरक असल्यामुळें पचनांतील आलोडन, शोषण, मुंचन या क्रिया समानावरच प्रामुख्यानें अवलंबून असतात. समानाचे हें कार्य कमी अधिक प्रमाणांत सर्व लघ्वंत्रभर व त्याचे थोडे आधींहि पचनाचे वेळीं चालू असतें. पित्तधराकला सर्व ग्रहणीस व्यापून असतें आणि त्यामुळें अन्न पचनाचें कार्य सर्व प्रकारांनीं लघ्वंत्रभर होत असते. अन्नाचे पचन होऊन आहाररस एका विशिष्ट स्वरुपांत तयार झाल्यांवांचून लघ्वंत्रांतून बाहेर रसवहस्त्रोतसांत जाऊं शकत नाहीं. ग्रहणी हा अवयव अन्नाच्या मार्गामध्यें अर्गळेप्रमाणें कार्य करणारा असतो. महास्त्रोतसांत प्रविष्ट झालेल्या अन्नाला अडवून धरुन त्याचेकडून अग्निसंस्कार पूर्ण झाल्यानंतर होणारी आयुष्य, आरोग्य, बल, दोष, धातू, अग्नि यांचें पोषण करण्याचीं कामें झाल्यावाचून अन्न पुढें जाऊं शकत नाहीं. हें ग्रहणीचें विशेष लक्षांत घेऊनच तिला अन्नाच्या मार्गातील अडसर असें म्हटलें आहे यापेक्षां पहारेकर्‍याची उपमा अधिक चांगली. ओळखपत्र वा अधिकारपत्र पाहिल्यावांचून द्वाररक्षक त्या मार्गानें कोणालाहि पुढें जाऊं देत नाहीं त्याप्रमाणें ग्रहणी ही अन्नाला पुढें जाऊं नाहीं. अर्थात् हें विवेचनाचें कार्य व योग्यांची निवड ज्यावेळीं शरीर व्यापार प्रकृत स्थितींत असतांत त्यावेळीच आदर्श स्वरुपांत चालूं रहातात. अर्गळेच्या उपमेनें योग्य ती स्थिति प्राप्त झाल्याशिवाय म्हणजे अन्न पूर्ण पचल्यावाचून ग्रहणी त्याला पुढें पक्वाशयांत जाऊं देत नाहीं, शोधण आणि मुंचन या दोन्ही कार्याचे वेळीं ग्रहणीचा हा प्रतिबंधक गुण दक्षतेनें कार्यकारी होतो. भूताधिक्य भेदानें व लघु गुरु भेदानें स्थूल, सूक्ष्म अन्न जसजसें पचत जाईल तसतसें त्याचें शोषणहि होते व पचलेला भाग पुढें पुढें सरकत जातो. त्यावर अग्नीचे अधिक अधिक संस्कार होतात पूर्ण संस्कारानंतरहि न पचलेल्या भागास मलरुपता प्राप्त होते. ग्रहणी या अवयवाच्या दुष्टीमध्यें ग्रहणीच्या आश्रयानें असलेल्या समानाचे व अग्नीचें कार्यहि विकृत होतें. त्यामुळें अन्न पचावें तसें तें पचत नाहीं.

व्याख्या
ग्रहण्या: रोग: ग्रहणीरोग: । मा.नि. ग्रहणी ३ टीका

ग्रहणी या अवयवाचीच विकृति होत असल्यामुळें व्याधीलाच ग्रहणी रोग, ग्रहणी दोष असें नांव प्राप्त झालें आणि पुढें व्यवहार सौकर्यामध्यें ग्रहणी शब्द रोगवाचक म्हणून समजला जाऊं लागला.

स्वभाव
चिरकृत् ग्रहणी दोश: ।
वा.नि. ८-१८

ग्रहणी हा व्याधी दारुण असा आहे. वाग्भटानें सुदुस्तर अशा महारोगांच्या यादींत ग्रहणी या व्याधीचा समावेश केला आहे (वा.नि.८-३)

मार्ग
अभ्यंतर.

प्रकार
स चतुर्धा पृथग्दोषै: सन्निपाताच्च जायते ।
स ग्रहणीदोष:, पृथग्दोषै:-वातपित्तकफै:,
सन्निपातेन चेति चतुष्प्रकारो जायते ।
सटिक वा.नि. ८-१९ पान ४९७

वातज, पित्तज, कफज आणि सान्निपातिक असे ग्रहणी व्याधीचे ४ प्रकार आहेत.

हेतू
अतीसारेषु यो नातियत्नवान् ग्रहणीगद: ।
तस्य स्यादग्निविध्वंसकरैरन्यैश्च सेवितै: ॥
वा.नि. ८-१५ पान ४९६

अतीसारे निवृत्तेऽपि मन्दाग्नेरहिताशिन: ।
भूय; संदूषितो वह्निर्ग्रहणीमभिदूषयेत् ॥
द्रवसरणसाधर्म्यात्परस्परानुबन्धित्वाच्चातीसारानन्तरं ग्रहणी,
तस्या: संप्राप्तिमाह-अतीसार इत्यादि । अपिशब्दादनिवृत्तेऽ-
प्यतीसार इति व्याचक्षते ।
मन्दाग्नेरित्यनेन दीप्तग्नेरहिताशनमपि ।
न विकारकारीति बोधयति । उक्तं हि - ``दीप्ताग्नेर्विरुद्धं विरर्थ
भवेत् ( सु.सू.स्था. अ. २०)'' इति ।
भूय इति पुनरत्यर्थ वा संदूषित: पूर्वमतीसारेऽपि दूषित-
त्वात्, अभिदूषयेत् समन्ताद्दूषयेत् एतेन निवृत्तातीसारेना-
हिताहारपरिहार: करणीय: आवह्निबललाभादित्युक्तं भवति ।
अत एवाह सुश्रुत:, - ``तस्मात्कार्य: परीहारस्त्वतीसारे विरिक्तवत् ।
यावन्न प्रकृतिस्थ: स्याद्दोषत: प्राणतस्तथा''
(सू.उ.तं.अ. ४०) इति ।
मा.नि. ग्रहणी १ पान ८१ म. टीकेसह

अतिसार व्याधी बरा झाल्यानंतर, अतिसार व्याधींत असलेले अग्निमांद्य पूर्णपणें नाहीसें झाल्यावांचून जर अहितकर आहार घडला तर अग्नि अधिकच मंद होऊन ग्रहणी हा व्याधी उत्पन्न होतो. ग्रहणी उत्पन्न होण्यासाठीं प्रथम अतिसार हा व्याधी झालेला असलाच पाहिजे असें नाहीं. अग्निमांद्य उत्पन्न करणार्‍या कारणांचें सेवन जर होत असेल तर अतिसारावांचूनहि ग्रहणी व्याधी उत्पन्न होतो. व्याधी स्वभावाप्रमाणें ग्रहणीला उत्पन्न करणारीं कारणें हीं थोडी थोडी दीर्घकालपर्यंत घडत असतात.

संप्राप्ति
दुर्बलाग्निबला दुष्टा त्वाममेव विमुंचति ।
च. चि. १५-५७

मिथ्याहारविहारादीनीं अग्नि मंद होतो व अग्नि मंद झाल्यानंतर, विवेचन, धारण, मुंचन या ज्या अन्नावर होणार्‍या ग्रहणी या अवयवाच्या क्रिया त्यावर ताण पडतो. दक्षता न बालगल्यामुळें असा हा ताण जर वरचेवर पडत राहील तर त्यामुळें अवयव दुर्बल होतो. अवयवाच्या दौर्बल्यामुळें त्याच्या आश्रयांनीं रहाणार्‍या पाचकाग्नीच्या आणि समान वायूच्या कार्याचेंहि स्वरुप विकृत होतें आणि त्यामुळें अन्नाचें विवेचन सार किट्ट विभजन या क्रियेंत व्यत्यय येऊन न पचलेलें, न विभागलेलें असें अन्नच आमस्वरुपांत मल मार्गानें बाहेर पडतें. ग्रहणी व्याधीचा उद्‍भव अग्निमाद्यांत अधिष्ठान कोष्ठांत आणि संचार समान व अपान यांच्या क्षेत्रांत होतो त्यामुळें पक्वाशयाची व स्वेद, अंबुवह स्त्रोतसांची दुष्टी होते.

पूर्वरुपें
प्राग्रूपं तस्य सदनं चिरात्पचनमम्लक: ।
प्रसेको वक्रवैरस्यमरुचिस्तृट्‍ क्लमो भ्रम: ॥
आनद्धोदरता छर्दि: कर्णक्ष्वेडोऽन्त्रकूजनम् ।
वा.नि. ८-१९,२० पान ४९७

ग्रहणीच्या पूर्वरुपामध्यें आळस येणें, अशक्तपणा वाटणें, अन्न पचण्यास वेळ लागणें, अन्नाचा विदाह होऊन तें आंबट होणें, लाळ सुटणे, चव नसणें, तहान लागणें, जिभेची चव पालटणें, थकवा येणें, चक्कर येणें, पोट फुगणें, आंतडयामध्यें गुरगुर आवाज येणें, कानांत निरनिराळ्या प्रकारचे आवाज होणें, ओकारी होणें अशी लक्षणें होतात.

रुपें
उच्यते सर्वमेवान्नं प्रायो ह्यस्य विदह्यते ।
अतिसृष्टं विबद्धं वा द्रवं तदुपविश्यते ॥
तृष्णारोचकवैरस्यप्रसेकतमकान्वित: ।
शूनपादकर: सास्थिपर्वरुक् छर्दनं ज्वर: ॥
लोहामगन्धिस्तिक्ताम्ल उद्गारश्चास्य जायते ।
च.चि. १५-५२ ते ५४ पान १९९४

अथ जाते भवेज्जन्तु: शूनपादकर: कृश: ।
पर्वरुग्लौल्यतृट्‍छर्दिज्वरारोचकदाहवान् ॥
उद्गिरेच्छुक्ततिक्ताम्ललोहधूमामगन्धिकम् ।
प्रसेकमुखवैरस्यतमकारुचिपीडित: ॥
 
पूर्वरुपानन्तरं रुपमाह - अथेत्यादि । पर्वरुक् सन्धिपीडा,
लौल्यं सर्वरसेषु लोलुपत्वम् । उद्गिरेत वमेत् । शुक्तं चुक्रम् ।
गन्धशब्दो लोहादिभि: प्रत्येक संबध्यते । प्रसेको लालास्त्राव: ।
तमक: श्वासविशेष:, अन्ये तु तमकं मोहमाचक्षते ।
पीडितशब्द: प्रसेकादिभि: प्रत्येकं संबध्यते ।
अन्न पाठे `निर्मासो वा कृश:' इत्यन्ये पठन्ति; तत्र निर्मास:
अत्यन्तक्षीणमांस: कृश: अल्पमांस: । अत्रारोचकशब्दो-
पादानादेवारुचि: प्राप्ता, पुनरुच्यभिधानमस्मिन् रोगेऽ
रुचेरवश्यम्भावसूचनार्थम् ।
सटिक सु.उ. ४०-१७४, १७५ पान ७१०

सा दुष्टा बहुशो भुक्तमाममेव विमुञ्चति ।
पक्वं वा सरुजं पूति मुहुर्बद्धं मुहुर्द्रवम् ॥
ग्रहणीरोगमाहुस्तमायुर्वेदविदो जना: ।
मा.नि. ग्रहणी २-३ पान ८२

दोषवर्णैर्नखैस्तद्वद्विण्मूत्रनयनाननै: ।
हृत्पाण्डूदरगुल्मार्श: प्लीहाशड्की च मानव: ॥

किमेतैरेव लक्षणैर्ग्रहणीरोगो ज्ञेयोऽथवाऽन्यैरपीत्याह-दोषवर्णै
रित्यादि । दोषवर्णैरिति कृष्णारुणनीलपीतरक्तासितपाण्डु-
भिर्नखै:, तद्वदिति कृष्णादिवर्णैविडादिभिश्च `ग्रहणीरोगो
ज्ञेय' इति शेष: । हृत्पाण्डूदरादिरोगाशड्की च मानवो
भवति `प्रवर्धमाने ग्रहणीरोगे' इति वाक्यशेष: ।
सटिक सु. उ. ४०-१७७ पान ७१०

ग्रहणीरोगामध्यें अन्न अग्निसंस्कार न होता आमस्थितींत किंवा थोडासा संस्कार झालेलें असे गुदमार्गानें जसेंच्या तसें बाहेर पडतें, पुरीषाचें स्वरुप प्रमाणानें अधिक, फार पातळ व क्वचित् विबद्ध (आळलेलें) असें असतें. ज्यावेळीं पित्ताचें बल वाढतें त्यावेळीं मलाला द्रवता येते, कफाधिक्यानेहि मलाला द्रवताच असते आणि वाताचे बल वाढेल त्यावेळीं मलावष्टंभ हे लक्षण दिसतें किंवा पुरीष घन वा ग्रंथिल बनतो. मुहुर्बद्धं मुहुर्द्रवं या शब्दानें कधीं घट्ट व कधीं पातळ एवढाच अर्थ अभिप्रेत असावा असें आम्हांस वाटतें. द्रव आणि घन यांच्यांत एखाद्या दुसर्‍या वेगापासून पक्ष वा मास येथपर्यंतहि काल जाण्याची शक्यता असते. अवयवाची दुर्बलता जों जों अधिक तों तों द्रव आणि बद्ध या स्थितींतील अंतर कालदृष्ट्या थोडें असतें. पुढें पुढें केवळ द्रवताच असते. दौर्बल्य कमी असतांना हेंच अंतर अधिक असतें. मल प्रवृत्तीच्या वेळीं मल साम असतो आणि मलाला दुर्गंधीहि पुष्कळ असतें रुग्ण कृश होत जातो. त्याचीं हाडें व पेरी दुखतात, अन्न पचत नाहीं. तोंडाला चव नसते तरी खावेसें वाटतें. अंधारी येते, तोंडाला पाणी सुटतें. तहान लागते. उलटी होते. आमगंधी, लोहगंधी, कडू व आंबट अशा ढेकरा येतात. उलटी होते, ज्वर येतो, हातापायावर सूज येते. दोष भेदानें नखें, डोळे, मूत्र, पुरीष, मुख यांवर श्याव, कृष्ण, अरुण वा नील रक्त पीत किंवा पांडु, वर्ण दिसतात उदर गुल्म, अर्श, पांडु, प्लीहा या व्याधींनीं पीडित आहोंत असें वाटतें. चरक, वाग्भट यांनीं हृद्‍रोगादींच्या विकारांची शंका वातज ग्रहणीमध्यें येतें असें वर्णन केलें आहे मात्र हे विकारहि वातजच असतात असें वर्णन केलें आहे. शंकेची शक्यता वातज ग्रहणीमध्यें अधिक असली तरी दोष विशेषानें त्या त्या रोगांची शंका इतरहि व्याधी प्रकारांत येऊं शकेल. त्यामुळें सुश्रुताच्या मताप्रमाणें या निरनिराळ्या रोगांची शंका येणें हें लक्षण सामान्यरुप म्हणूनच मानावें असे आम्हांस वाटतें.

न पाक पित्तादृते (मा.नि.क्षुद्ररोग ३२ म. टीका पान ३६९)

या सुश्रुताच्या वचनाप्रमाणें ग्रहणी पंडुरोग या व्याधींत मुखपाक हें लक्षण बहुधा आढळतें ग्रहणी हें पित्तस्थानच आहे. व (पांडुरोगांतील दोष पित्तप्रधान असतात म्हणजे दोन्ही ठिकाणीं पित्तविकृतिसमान असते) त्यामुळें रसरक्तांची दुष्टी होतांच मुखामध्यें व्रण उत्पन्न होतात.

वातज ग्रहणी
कटुतिक्तकषायातिरुक्षशीतलभोजनै: ।
प्रमितानशनात्यध्ववेगनिग्रहमैथुनै: ॥
करोति कुपितो मन्दमग्निं संछाद्य मारुत: ।
तस्यान्नं पच्यते दु:खं शुक्तपाकं खराड्गता ॥
कण्ठास्यशोष: क्षुत्तृष्णा तिमिरं कर्णयो:ळ स्वन: ।
पार्श्वोरुवंक्षणग्रीवारुजोऽभीक्ष्णं विसूचिका ॥
हृत्पीडा कार्श्यदौर्बल्यं वैरस्यं परिकर्तिका ।
गृद्धि: सर्वरसानां च मनस: सदनं तथा ॥
जीर्णे जीर्यति चाध्मानं भुक्तेस्वास्थ्यमुपैति च ।
स वातगुल्महृद्रोगप्लीहाशड्की च मानव: ॥
चिराद्‍दु:खं द्रवं शुष्क तन्वामं शब्दफेनवत् ।
पुन: पुन: सृजेद्वर्च: कासश्वासार्दितोऽनिलात् ॥
च.चि.१५-५६ ते ६४ पान १९९५ ते १९९६

वातिकग्रहणीनिदानमाह कटिवत्यादि । अतिशब्द: कटु-
तिक्तकषायै: सह संबध्यते । संदुष्टभोजनं संयोगादिविरुद्धम् ।
अन्ये शीतादिभोजनैरिति पठन्ति । प्रमितमल्पभोजनम् ।
अनशनमुपवास: । अत्यध्वा अतिमार्गगमनम् । वेगनिग्रह: ।
मूत्रपुरीषादीनाम् । एतै: कारणै: मारुतो वायु: कुपितो
ग्रहणीस्थं वह्निं संछाद्य संदूष्य गदान् रोगान् कुरुत इत्यर्थ: ।
वातग्रहणीपूर्वरुपत्वे यान् रोगान् कुरुते तानाह-तस्येत्यादि ।
शुक्तपाकं अम्लपाकम् । एतच्चाग्निमान्द्यजनितान्नविदाहाद्भवति ।
खराड्गता कर्कशाड्गत्वं, वातेन त्वग्गतस्नेहशोषणात् ।
कण्ठास्ययो: शोष: । अक्षुत् क्षुधाया अभाव:, तिमिरं मन्ददृष्टिता ।
वंक्षण: सक्थ्यूर्वो: संधि: । रुक् पीडा, सा च पार्श्वादिभि: संबध्यते ।
विसूचिका ऊर्ध्वमधश्चाममलप्रवृत्ति: । वैरस्यं विरसास्यता ।
परिकर्तिका गुदे परिकर्तनमिव पीडा । गृद्धि: काड्क्षा सर्वरसानां
मधुरादीनां व्याधिस्वभावात्, वातदूषितान्त:करणेन वा ।
मनस: सदनं मनोग्लानि: ।
आध्मानं जीर्णे जीर्यति चि सति भवति, `अन्ने' इति शेष: ।
आहारे भुक्ते भोजने कृते सति क्षणं स्वास्थ्यं सुखं समश्नुते प्राप्नोति ।
स वातगुल्महृद्रोगप्लीहाशड्कीति वातगुल्मादिपीडायुक्तस्तच्छड्की ।
चिरात्कदाचिद्‍ द्रवं, कदाचिच्छुष्कं, तनु अल्पं, शब्दफेनसहितं; वातात्
ईदृशं वर्च: पुरीषं पुन: पुन: वारंवारं श्वासकासोपद्रवपीडित: सृजेत्
मुञ्चेत्, पुरुष इति शेष: ।
मा. नि. ग्रहणी आ. टीका पान ८३.

तिखट, कडू, तुरट, अतिरुक्ष, अतिशीत, अशा द्रव्यांनीं युक्त भोजन केल्यामुळें, उपवास केल्यामुळें, अगदीं थोडें खाल्ल्यामुळें, फार चालल्यामुळें, वेग विधारणामुळें, अतिमैथुनामुळें वायू प्रकुपित होतो, त्यामुळें अग्नि मंद होऊन ग्रहणीरोग उत्पन्न होतो. वातज ग्रहणीरोगांत, अन्न कष्टानें पचतें, अन्नाला आंबटपणा येतो, अंग (त्वचा) खरखरीत होते, तोंडाला व घशाला कोरड पडते,  भूक लागल्यासारखी वाटते. [आतंकदर्पण टीकाकारानें `अक्षुत' असा पाठ घेतला आहे तो योग्य नाहीं कारण पुढें `गृद्धीचें' वर्णन आहे. वायूच्या वैषम्यामुळें कधीं भूक लागत नाहीं कारण पुढें `गृद्धीचें' वर्णन आहे. वायूच्या वैषम्यामुळें कधीं भूक लागत नाहीं, कधीं खा खा सुटते, असें त्याचें समर्थन करतां येईल. तरीपण चरकाचा पाठच अधिक योग्य वाटतो.] तहान लागते, डोळ्यापुढें अंधारी येते, कानांत आवाज होतात, पार्श्व, मांडया, वंक्षण, मान, डोकें, पोट याठिकाणीं वरचेवर वेदना होतात, शूल होतो, विसूचिकेसारखी उलटी अतिसार हीं लक्षणें दिसतात. छातींत कळा येतात, रोगी दुर्बल होतो, कृशता येते, तोंडाची चव जाते, गुदामध्यें कात्रे पडतात. निरनिराळे रस पुन्हां पुन्हां खावेत असें वाटतें. मनाची उभारी जाते. अन्न पचत असतांना वा पचन झाल्यावर पोटांत गुबारा धरतो. थोडेसें कांहीं खाल्लें म्हणजे बरें वाटतें. मलप्रवृत्तीच्या वेळीं कुंथावें लागतें त्यावेळीं कळ येते. गुदामध्यें शूल हें लक्षण उत्पन्न होतें. मलप्रवृत्तीचें स्वरुप कधीं अगदीं द्रव, पातळ अल्प्म फेनिल असें असतें तर कधीं मल शुष्क होतो, त्याचे खडे बनतात, तसेंच मलप्रवृत्तीच्या वेळीं आवाज येतो. रुग्ण, श्वास, कास या लक्षणांनीहि पीडित होतो. या सर्व लक्षणांमुळें रोग्याला आपणांस वातप्रधान असा गुल्म रोग, हृद्‍ रोग वा प्लीहा रोग झाला आहे असें वाटतें. वायूच्या खर गुणामुळें उदराचा नेहमींचा मृदु स्पर्श जाऊन ते स्पर्शाला कठीण होते. उदराचें पुढील स्नायू तर चांगलेच कठीण लागतात. त्यामुळें व इतर लक्षणांनीं गुल्म प्लीहेची शंका येते. इतर लक्षणें अनुषंगानीं असतातच.

पित्तज ग्रहणी
कट्‍वजीर्णविदाह्यम्लक्षाराद्यै: पित्तमुल्बणम् ।
अग्निमाप्लावयद्धन्ति जलं तप्तामिवानलम् ॥
सोऽजीर्ण नीलपीताभं पीताभ: सार्यते द्रवम् ।
पूत्यम्लोद्गारहृत्कण्ठदाहारुचितृडर्दित: ॥
च.चि. १५-६५,६६ पान १९९६

तिखट, विदाही, अम्ल, क्षार या द्रव्यांच्या अतियोगानें तसेंच अजीर्णामुळें पित्तप्रकोप होऊन, त्याच्या द्रव गुणानें, (कढत पाण्यानेंहि निखारा विझावाल्याप्रमाणें) अग्नि मंद होऊन ग्रहणी रोग उत्पन्न होतो. या पित्तज ग्रहणीमध्यें मलप्रवृत्ती आम स्वरुपाची, निळसर पिवळसर अशी व पुष्कळ द्रवयुक्त अशी असते. मल चोथा पाणी अशा स्वरुपाचा असतो. कित्येक वेळां अतिसाराप्रमानें मलप्रवृत्ती होते. मुहुर्बद्ध ही स्थिति (वातज ग्रहणीप्रमाणें) विशेष उत्कट नसते. दुर्गंधी, अम्ल अशी ढेकर येणें, छातीमध्यें कंठामध्यें आग होणें, अरुचि व तृष्णा हीं लक्षणें असतात. सामान्यरुपांत उल्लेखिलेले ज्वर हे लक्षण या प्रकारामध्यें विशेषेकरुन आढळतें.

कफज ग्रहणी
गुर्वतिस्निग्धशीतादिभोजनादतिभोजनात् ।
भुक्तमात्रस्य च स्वप्नाद्धन्त्यग्निं कुपित: कफ: ॥
तस्यान्नं पच्यते दु:खं हृल्लासच्छर्द्यरोचका: ।
आस्योपदेहमाधुर्यकासष्ठीवनपीनसा: ॥
हृदयं मन्यते स्त्यानमुदरं स्तिमितं गुरु ।
दुष्टो मधुर उद्गार: सदनं स्त्रीष्वहर्षणम् ॥
भिन्नामश्लेष्मसंसृष्टगुरुवर्च: प्रवर्तनम् ।
अकृशस्यापि दौर्बल्यमालस्यं च कफात्मके ॥
च.चि. १५-६७ ते ७० पान १९९६

श्लैष्मिकग्रहण्या-निदानादिपूर्वकं रुपमाह-गुर्वित्यादि ।
आदिशब्दात् पिच्छिलमधुरादीनां ग्रहणम् ।
अतिभोजनादतिमात्रभोजनात् । ननु, भुक्तमात्रस्य च
स्वप्नाद्धन्त्यग्निमिति विरुद्धं । स्वप्नोऽत्र दिवास्वप्नो
ग्राह्य: रात्रिस्वापस्य स्वास्थ्यहेतुत्वात्, दिवास्वापश्च
स्त्रोत:संमीलनेन जठरानलं सन्धुक्षयति, अत एवाह,
``अतीसारिणामजीर्णिनां च दिवास्वापो विहित:'' इति ।
उच्यते, भुक्तवतां दिवास्वापोऽत्यन्तकफवृध्द्याऽग्निं हन्ति,
अभुक्तवतां तु संधुक्षयति ।
यदुक्तं, ``नरान्निरशनान् कामं दिवा स्वापयेत्'' इति ।
आस्योपदेहमाधुर्यमिति मुखस्य लिप्तत्वं मधुरत्वं च
श्लेष्मणैव । स्त्यानं घनद्रवापूरितमिषम् । स्तिमितं
विबद्धं, निश्चलमित्यर्थ: । गुरु जडम् । दुष्टो विकृत; ।
मधुर: मधुरत्वेनोपलक्षित: उद्गार: । सदनमग्निसाद: ।
स्त्रीष्वहर्षणं स्त्रीरिरंसाया अभाव: ।
भिन्नं च तदामश्लेष्मभ्यां संसृष्टं चेति समासार्थ: ।
दौर्बल्यमसामर्थ्यामिति ।
मा.नि. ग्रहणी १६ म. टीका पान ८४,८५

अति गुरु, अति स्निग्ध, अति शीत असे पदार्थ सेवन केल्यामुळें अधिक प्रमाणांत जेवल्यामुळें, जेवण झाल्याबरोबर दिवसा झोपणें, यामुळें कफ वाढून तो अग्निमांद्य उत्पन्न करतो व त्यामुळें ग्रहणी रोग उत्पन्न होतो. अन्न कष्टानें पचतें, ओकारी होते, रुचि नसते, तोंडाला चिकटा येतो, तोंड गोड होतें, कास, पीनस, निष्ठीवन हीं लक्षणें असतात. हृदय जखडल्यासारखेम वाटते. पोट जड व गच्च बसल्यासारखें वाटतें. दुर्गंधयुक्त ढेकर येते. घशाशीं गोड येते, अंग गळून जाते, मैथुनाची इच्छा होत नाहीं, मलप्रवृत्ती फुटिर, आमयुक्त कफ मिसळलेली (पिच्छिल) व गुरु (पाण्यांत बुडणारी) अशी असते ग्रहणीच्या इतर प्रकाराप्रमाणें कृशता येत नाहीं पण दौर्बल्य मात्र असतें; आळस वाटतो.

सान्निपातिक ग्रहणी
पृथग्वातादिनिर्दिष्टहेतुलिड्गसमागमे ।
त्रिदोषं निर्दिशेदेवं ॥
मा.नि. ग्रहणी १७ पान ८५

तीनहि दोषांचीं म्हणून जीं लक्षणें सांगितलीं आहेत तींच संकलितपणें सान्निपातज ग्रहणींत दिसतात. अतिसाराप्रमाणें पुष्कळ पण दुर्गंधीयुक्त अशी द्रवमलप्रवृत्ती, मलप्रवृत्तीचा वेग आवरता येत नाहीं, रुक्षता, तृष्णा, ज्वर, कृशता पांडुता हीं लक्षणें उत्कटतेनें असतात. थोडेसेंहि खाल्ले तरी आध्मान गौरव असें पीडाकर लक्षण असतें. श्रम, हृल्लास, शूल, दाह, मुखपाक आध्मान हीं असतात.

संग्रहणी
अन्त्रकूजनमालस्यं दौर्बल्यं सदनं तथा ।
द्रवं शीतं घनं स्निग्धं सकटीवेदनं शकृत् ॥
आमं बहु सपैच्छिल्यं सशब्दं मन्दवेदनम् ।
पक्षान्मासाद्दशाहाद्वा नित्यं वाऽप्यथ मुञ्चति ॥
दिवा प्रकोपो भवति रात्रौ शान्तिं व्रजेच्च सा ।
दुर्विज्ञेया दुश्चिकिस्त्या चिरकालानुबन्धिनी ॥
सा भवेदामवातेन संग्रहग्रहणी मता ।
मा.नि. ग्रहणी पान ८५

पोटामध्यें गुरगुरणें, दौर्बल्य, अंग गळून जाणें, कटि शूल, द्रव, शीत, घन, स्निग्ध, आम पिच्छिल, सशब्द अशी प्रवृत्ती, अल्प वेदना, दिवसा व प्रकोप होणें, रात्रीं मलप्रवृत्तीचे वेग न होणें, हीं सर्व लक्षणें दहा दिवस पंधरा दिवस वा महिन्याच्या अंतरानें वा प्रत्येक दिवशींहि उत्पन्न होणें (मलप्रवृत्तीची लक्षणेंच अशी कालांतरानें प्रकट होतात.) आम आणि वायू यांच्यामुळें ही ग्रहणी उत्पन्न होते हिला `संग्रह ग्रहणी' असें म्हणतात. ही दुश्चिकित्सा व चिरकारी असते. हिचें निदान करणेंहि अवघड जातें. आंत्र कूजनादि हे श्लोक माधवनिदान या ग्रंथामध्यें प्रक्षिप्त असावेत. कारण आतंकदर्पण व मधुकोश टीकेमध्यें या श्लोकांचा उल्लेख नाहीं. चरक, सुश्रुत, वाग्भट या ग्रंथामध्यें त्यांचा उल्लेख नाहीं. योगरत्नाकर, भावप्रकाश, वंगसेन या तीन ग्रंथकारांनीं हे श्लोक उल्लेखिलेले आहेत. नांवासंबंधीं संग्रहान्त ग्रहणी, ग्रहणान्त ग्रहणी व संग्रहग्रहणी असे पाठभेद आहेत. संग्रहणी या नांवाचा मुळांत कोणीच उल्लेख करीत नाहीं. दुर्ज्ञेया, दुष्चिकित्सा, चिरकालानुबंधिनी, हीं विशेषणें ग्रहणीच्या सर्वच प्रकारांना लागू पडणारी आहेत. त्यामुळें हा स्वतंत्र प्रकार मानावा कां नाहीं याची शंका वाटते. लक्षणसमुच्चयालाहि वैशिष्टय नाहीं. त्यामुळें ग्रहणीची विशेषत: वातजग्रहणीची ही आमावस्था असावी असें वाटतें. चरकानें या आमावस्थेचें वर्णन केलें आहे.

आमवस्था
ग्रहणीमाश्रितं दोषं विदग्धाहारमूर्च्छितम् ।
सविष्टम्भप्रसेकार्तिविदाहारुचिगौरवै: ॥
आमालिड्गान्वितं ।
च.चि. १५-७३ पान १९९६-९७

कोणत्याही प्रकारच्या ग्रहणींत दोष आमावस्थेंत असतांना अन्नाला विदग्धता आलेली असते. त्यामुळें अन्न पोटामध्यें गच्च बसल्यासारखें वाटणें, तोंडाला पाणी सुटणें, पोटामध्यें निरनिराळ्या प्रकारच्या वेदना जाणवणें. तोंडाला चव नसणें, जडपणा वाटणें (गौरव) अशीं लक्षणें असतात. या व्यतिरिक्त पुरिषाचें स्वरुप आमलक्षणयुक्त म्हणजे द्रव, पिच्छिल, दुर्गंधी, सशूल, असें असतें. आमावस्थेंतील विष्टंभ लक्षणानें एक विशिष्ट अवस्था बोधित होते. मलाची ऊर्ध्व प्रवृत्ती वा अध:प्रवृत्ती होईल वा व्हावी असें वाटत असतें. उत्क्लेश होत असतो. पण प्रवृत्ती मात्र नीट होत नाहीं. त्यासाठीं कुंथावें लागतें. आमाच्या स्त्यानत्वामुळें उत्पन्न होणारें हें लक्षण आहे. संग्रहग्रहणी या प्रकारांत उल्लेखिलेले आंत्रकूजन, आलस्य, कटिवेदना, पौच्छिल्य हे सर्व लक्षणविशेष आमाचेच द्योतक आहेत. पक्षान् मासात् दशाहाद्वा नित्यं वा; हें मुहु:चेंच एक प्रकारचें स्पष्टीकरण आहे. मागें तें आम्हीं विवेचन करुन सांगितलें आहे.

घटीयंत्र ग्रहणी
स्वपत: पार्श्वयो: शूलं गलज्जलघटीध्वनि: ।
तं वदन्ति घटीयन्त्रमसाध्यं ग्रहणीगदम् ॥
मा.नि. ग्रहणी पान ८५

हाहि श्लोक संग्रहग्रहणीप्रमाणेंच माधव निदातांत प्रक्षिप्त असून योगरत्नाकर, भावप्रकाश, यांनीं या प्रकाराचा उल्लेख केला आहे. भावप्रकाशकारानें `स्वपत:' च्या ऐवजी `प्रसुप्ति:' असा पाठभेद वापरला आहे. रोगी नेहमीं सुन्न पडलेला असतो. निजले असतां बरगडयामध्यें वेदना उत्पन्न होत असतात. आंतडयामध्यें पाण्याचीं भांडी ओतलीं गेल्याप्रमाणें आवाज होतों. (विशेषत: रहाट गाडग्याप्रमाणें) सान्निपातिक ग्रहणींतीलच ही एक स्तिती आहे. ग्रहणी या अवयवाचें दौर्बल्य, मलसंचय व वायूचा विष्टंभ या घटनांच्या उत्कटतेंतून हा अवस्था विशेष उत्पन्न होतो.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें
शूल, गुल्म, उदर, श्वास, कास (च.चि. १५-९१)
शोथ, अर्श, कृमी, मेह (च.चि. १५-१२२)
कामला, ज्वर, पांडु, अतिसार (च.चि. १५-१३३)
हृद्‍रोग, उदावर्त (च.चि. १५-१७८)

कुष्ठ, अर्श, भगंदर, विसूचिका, वातरक्त, विसर्प, राजयक्ष्मा, नपुंसकत्व (वंगसेन ग्रहणी २४३ पान १३४)

वृद्धि स्थान क्षय
ग्रहणी रोग वाढूं लागला म्हणले मलाची द्रवता व वेग यांची संख्या वाढते. कृशता येते, थोडेसें अन्न खाल्लें तरी पोटाला तडस लागते; मलवेग आवरतां येत नाहींत. दौर्बल्य वाढतें. मुखपाक हें लक्षण येतें. उदराच्या ठिकाणीं शूल व स्पर्शासहत्व हीं लक्षणें असतात. मंद ज्वर व पांडुता हीं लक्षणें दिसूं लागतात. व्याधी कमी होऊं लागला म्हणजे अन्न पचूं लागतें. वेगांची संख्या कमी होते. मल बांधून होऊं लागतो. बल वाढतें. शूलादि लक्षणें कमी होतात.

उपद्रव
प्लीहा यकृज्जठरकण्डुमलस्य बन्धोऽष्टीला क्रिमिर्जठररोग-
भवोऽथ षष्ठ: ।
एते भवति ग्रहणीपरिवर्तमाना घोरास्तथा दु:खदाश्च मनुजस्य चित्ते ।
हारित ३-८५ पान २२५

यकृत्, प्लीहा वृद्धी, कंडू, अवष्टंभ, कृमी, उदर असे उपद्रव ग्रहणीमुळें होतात. पांडु, ज्वर, अतिसार, अर्श, शोथ, हे उपद्रवहि ग्रहणीमध्यें असतात.

उदर्क
कृशता, अविपाक.

व्याधिमुक्तीचीं लक्षणें
अन्न घेतल्यानंतर जड न वाटणें, अन्न सुखानें पचणें, बल व पुष्टी वाढणें, मल प्रवृत्ती नियमित व बांधून होणें, हीं लक्षणें व्याधिमुक्तीचीं समजावीं.

साध्यासाध्यविवेक
लिड्गैरसाध्यो ग्रहणीविकारो यैस्तैरतीसारगदो न सिध्येत् ।
वृद्धस्य नूनं ग्रहणीविकारो हत्वा तनूं नैव निवर्तते च ॥
बालके ग्रहणी साध्या यूनि कृच्छ्रा समीरिता ।
वृद्धे त्वसाध्या विज्ञेया मतं धन्वन्तरेरिदम् ॥
ग्रहणी मा.नि. १९ पान ८६

ग्रहणीचीं साध्यासाध्य लक्षणें अतिसाराप्रमाणेंच आहेत. व्याधी एकूण कष्टसाध्य असाच आहे. बालकामध्यें व्याधी बरा होण्याची शक्यता अधिक. वृद्धामध्यें व्याधी असाध्य होतो. अवयवाला आलेली दुर्बलता वाढत्या वयामुळें बालकामध्यें नाहीशीं होऊं शकते. वृद्धाचें शरीर जीर्ण झाले असल्यामुळें अवयव दौर्बल्य नाहींसें होऊं शकत नाहीं म्हणून या वयांत व्याधी असाध्य होतो.

रिष्ट लक्षणें
संसृष्टा व्याधयो यस्य प्रतिलोमानुलोमगा: ।
आपन्नग्रहणीरोगा: सोऽर्धमासं न जीवति ॥
यो.र. ग्रहणी पान २४२

ग्रहणीमध्यें छर्दी आणि अतिसार हीं लक्षणें उत्पन्न होऊन रसक्षयाची लक्षणें दिसूं लागलीं. डोळे निस्तेज होऊन खोल गेले म्हणजे व्याधी मारक होतो. (पंधरा दिवसांत रोगी मरतो).

चिकित्सा सूत्रें
ग्रहणीमाश्रितं दोषमजीर्णवदुपाचरेत् ।
अतीसारोक्तविधिना तस्यामं च विपाचयेत् ॥
वा.चि.१०-१ पान ६६५

मज्जत्यामा गुरुत्वाद्विट्‍ पक्वा तूत्प्लवते जले ।
विनाऽतिद्रवसड्घातशैत्यश्लेष्मप्रदूषणात् ॥
परीक्ष्यैवं पुरा सामं निरामं चामदोर्षिणम् ।
विधिनोपाचरेत्सम्यक् पाचनेनेतरेण वा ॥

सामनिरामग्रहणीगदज्ञानार्थं सामनिरामविड्गलक्षणमाह-
मज्जतीत्यादि । आमेत्यामाश्रिता । गुरुत्वादिति ।
आमाहितगुरुत्वात् । पक्वेति निरामा;ल उपसंहरिष्यतामपक्व
लक्षणान्ते `परीक्ष्यैवं पुरा सामं निरामं वा इति ।
द्वयोरपि आमपक्वलक्षणयोरपवादमाह विनाऽतिद्रवेत्यादि ।
अतिद्रवत्वादामाऽपि प्लवते, अतिसंहता तु पक्वाऽपि अतिसंघातादेव
मज्जति, शैत्यश्लेष्मप्रदूषणाच्च कफयोगाहितगौरवा पक्वाऽपि
मज्जति गुरुत्वादेव न प्लवते ।
ननु सविष्टम्भप्रसेकार्तीत्यादिनैव सामस्योक्तवात्, किमनेन
सामतालक्षणेन पुनरुक्तेन? उच्यते वातकफाधिकारात्तदुक्तं,
इदं तु विडामताज्ञार्थमुक्तमिति विशेष: ।
परीक्ष्येत्यादौ निरामं चादोषिणमिति कथं, यावता न
निरामतायामदोषत्वमस्ति ? न, आमदोषशब्देन
ग्रहणीदोषिणोऽभिप्रेतत्वात् । इतरेणेति ग्रहणीदोषशमनेन ।
सटिक च.चि. १५-९४, ९५ पान १९९९

ग्रहणी रोगामध्यें दीपन - पाचन या क्रियेसाठीं अजीर्णाप्रमाणें उपचार करावे. त्यामध्यें शोधन, लंघन, अम्ल, तिक्त, कटु रसाचीं औषधें व क्षार समाविष्ट होतात. ग्रहणीच्या आमावस्थेंत अतिसाराप्रमाणें चिकित्सा करुन त्यांचें पचन करावें. अतिसाराच्या आमावस्थेंत अतिसाराप्रमाणें चिकित्सा करुन त्यांचें पचन करावें. अतिसाराच्या आमावस्थेंत ज्या क्रमानें अनुलोमन द्रव्य देऊन दोषाचें शोथन केलें जातें किंवा स्वयंप्रवृत्त दोषांची उपेक्षा केली जाते त्याप्रमाणें ग्रहणींतील मलाची परीक्षा करुन, दुर्गंधी, पिच्छिल, सशूल, गुरु अशा स्थितींत मल असल्यास हारितकी निशोत्तर, द्राक्षा, आरग्वध, एरंडस्नेह या सारखीं द्रव्यें अनुलोमन वा शोधन होईल अशा प्रमाणांत वापरावींत. त्यानंतर लंघन व कटु तिक्त रसात्मक पाचनद्रव्यें यांचा उपयोग करावा. जल परीक्षेनें मल निराम आहे असें ठरलें म्हणजे पाचन, दीपन करुन ग्रहणी या अवयवाला बल देणारी अशी चिकित्सा द्यावी.

वातज ग्रहणी चिकित्सा
ज्ञात्वा तु परिपक्वामं मारुतग्रहणीगदम् ।
दीपनीययुतं सर्पि: पायतेताल्पशो भिषक् ॥
किंचित्सन्धुक्षिते त्वग्नौ सक्तविण्मूत्रमारुतम् ।
व्द्यहं त्र्यहं वा संस्नेह्य स्विन्नाभ्यक्तं निरुहयेत् ॥
तत एरण्डतैलेन सर्पिषा तैल्वकेन वा ।
सक्षारेणानिले शान्ते स्त्रस्तदोषं विरेचयेत् ॥
शुद्धं रुक्षाशयं बद्धवर्चसं चानुवासयेत् ।
दीपनीयाम्लवातघ्नसिद्धतैलेन मात्रया ॥
निरुढं च विरिक्तं च सम्यक् चैवानुवासितम् ।
लघ्वन्नं प्रतिसंभुक्तं सर्पिरभ्यासयेत् पुन: ॥
च.चि. १५-७७ ते ८१ पान १९९७

आम दोषाचें पचन झाल्यानंतर वातजग्रहणीमध्यें दीपनीयद्रव्यांनीं सिद्ध केलेले तूप अल्पप्रमाणांत वापरावें. अग्नीचें दीपन झाल्यानंतर वात, मल, मूत्र यांची प्रवृत्ती अवरुद्ध असेल तर तीन तीन दिवसांनीं स्नेहन, स्वेदन, या अभ्यंग करुन निरुह बस्ती द्यावा. अशा रीतीनें वाताचें शमन झाल्यावर तिल्वकसिद्ध घृतानें किंवा एरंडेलानें विरेचन द्यावें. त्यानंतर ग्रहणीचा मार्ग शुद्ध झालेला पाहून विरेचनानें आलेली रुक्षता व त्यामुळें असलेली मलबद्धता घालविणासाठीं अनुवासन बस्ती द्यावा. त्यासाठीं अम्ल रसांनीं सिद्ध केलेलें दीपनीय व वातघ्न तेल वापरावें. निरुह बस्ती विरेचन व अनुवासन बस्ती यांचा उपचार चांगल्या प्रकारें केल्यानंतर लघु असें अन्न, दीपन, वातघ्न द्रव्यांनीं सिद्ध केलेलें तूप पुनरपि शमन चिकित्सा म्हणून वापरावें.

पित्तज ग्रहणी चिकित्सा
स्वस्थानगतमुत्क्लिष्टमग्निनिर्वापकं भिषक् ।
पित्तं ज्ञात्वा विरेकेण निर्हरेद्वमनेन वा ॥
अविदाहिभिरन्यैश्च लघुभिस्तिक्तसंयुतै: ।
च.चि. १५-१२२ पान १९०३

पित्त उत्क्लिष्ट होऊन उर्ध्वग, अधोग झालें असेल त्याप्रमाणें वमन व विरेचन हा उपचार करावा. व नंतर लघु अविदाही असा आहार द्यावा व तिक्त रसात्मक द्रव्यें शमनासाठीं वापरावीं.

कफज ग्रहणी
ग्रहण्यां श्लेष्मदुष्टायां वमितस्य यथाविधि ।
कट्‍वम्ललवणक्षारैस्तिक्तैश्चाग्निं विवर्धयेत् ॥
च.चि. १५-१४१ पान १२०४

कफज ग्रहणीमध्यें प्रथम वमन प्रयोगानें कोष्ठ शुद्ध करावा आणि नंतर कटु, अम्ल, लवण, क्षार, तिक्त अशा द्रव्यांनीं अग्नीचे दीपन करावे.

कल्प
सुंठ, पिंपळी, पिंपळमुळ, मिरे, हारितकी, दाडिम, लिंबू, महाळुंग, कुडा काडेचिराईत, नागरमोथे, हिंग, आलें, लसूण, प्रवाळपंचामृत, लोहभस्म, रसपर्पटी, सुवर्णपर्पटी, पंचामृतपर्पटी, संजीवनी, सूतशेखर, कनकसुंदर, ग्रहणीकपाट लोकनाथ (सुवर्ण) कनकासव, पंचकोलासव, भल्लतकासव, कुटजारिष्ट.

आहार
ग्रहणीदोषिणां तक्रं दीपनग्राहिलाघवात् ।
पथ्यं, मधुरपाकित्वान्न च पित्तप्रदूषणम् ॥
कषायोष्णविकाशित्वाद्रूक्षत्वाच्च कफे हितम् ।
वाते स्वाद्वम्लसान्द्रत्वात्सद्यस्कमंविदाहि तत् ॥

ग्रहणीदोषिणां तक्रं पथ्यम् । कस्मात् ? दीपनग्राहिलाघवात्
दीपनग्राहिशब्दयोरत्र भावप्रधानयोर्निर्देश:, यथा ``व्द्येकयो
र्द्विवचनैकवचने'' इत्यत्र । अत एवेतौ भावप्रत्ययान्तेन
लाघवशब्देन सह निर्दिष्टौ । भाष्यकारस्त्वाह ``द्वन्द्वात्परो
य: श्रूयते स सर्वै: सम्बध्यते'' । इति ।
तेन दीपनग्राहिशब्दयोरपि भाव-प्रत्ययार्थसम्बन्धो भवतीति ।
मधुरपाकित्वात् पित्तप्रदूषणं च न भवति । नचपदेन प्रकर्षदूषणं
पित्तस्य तक्रं निषिध्यते । तेनार्थात् किञ्चित् पित्तकरमित्युक्तं
भवति । कषायोष्णविकाशित्वाद्रूक्षत्वाच्च कफे हितम् ।
तक्रं रुक्षत्वाच्चेति पृथड्निर्देषाद्रूक्षत्वाच्च तक्रगतस्य यथा कफे
हितत्वं द्रव्यस्वभावान्न तथा कषायादीनामेतद्‍ द्योतयेति ।
वाते स्वाद्वम्लसान्द्रत्वात्तक्रं पथ्यम् । किम्भूतम् ?
सद्यस्कं - सद्योविलोडितम्, अत एव न विदाहि । ननु,
ग्रहणीदोषिणां तक्रं पथ्यमित्येतावदस्तु । किं हेतुनिर्देशेन ?
अत्रोच्यते । लघ्वादिगुणेभ्य: प्राड्निरुपितेभ्योऽधिकान्
विकाशित्वमधुरपाकादीनभिधातुं दीपनादयोऽपि तत्प्रसड्गा-
न्निर्दिष्टा: । अपि च, ग्रहणीदोषिणां तक्रं पथ्यं यथा दीपना-
दिगुणयोगात्तथाऽन्यदपि यद्‍द्रव्यमेवंगुणं ग्रहणीदोषचिकित्सिते
नोक्तं तदपि ग्रहणीदोषिणां पथ्यमिति हेतुनिर्देशेन द्योत्यते ।
द्रव्यस्वभावात्तु विशेषेण ग्रहणीदोषिणां तक्रं पथ्य मिति ।
एष च न्यायोऽन्यत्रापि सहेतुकद्रव्यकथने योज्य: ।
किञ्च यत्तदोर्नित्याभिसम्बन्धादेवंनिर्देशाच्चायमर्थोऽवतिष्ठते,
यदेवंविधं तक्रं तद्‍ ग्रहणीदोषिणां पथ्यम्, नान्यादृशं
यदनुध्दृतस्नेहमथवाऽर्धोध्दृतस्नेहं तथाऽतिजातत्वादम्लं
तथाऽसद्यस्कं विदाहि च, तत्सर्व ग्रहणीदोषिणामपथ्यमेव ।
तक्रे च रुक्षस्वाद्वम्लादयो गुणा: परस्परविरुद्धा अपि द्रव्य
प्रभावात् कफविजयित्वं वातविजयित्वं च यथायोगं
कुर्वन्त्येव स्वं स्वं कर्म, यथा सत्वरजस्तम: संज्ञा गुणा: ।
सटिक वा. चि. १०-४, ५ पान ६६६

ताक हें ग्रहणीरोगांवरील, सर्वोत्कृष्ट अन्न व औषध या दोन्ही दृष्टीनें अत्यंत उपयुक्त आहे. ताक हें दीपनग्राही व लघु असल्यामुळें ग्रहणीच्या संप्राप्तींतील सर्व प्रकाराच्या विकृतीचा ताकामुळें उपशम होऊं शकतो. ताम मधुर विपाकी असल्यामुळें पित्ताचा प्रकोप करीत नाहीं, कषायानुरस उष्ण वीर्य व लोणी काढून घेतल्यामुळें रुक्ष होऊन कफाचा नाश करते. मधुर, अम्ल स्निग्ध, (लोणी काढून न घेतल्यामुळें) या गुणामुळें वातशामक होतें. आहार व औषधाकरितां वापरावयाचें हें ताक ताजें, नुकतेंच घुसळलेलें व फार आंबट न झालेलें पण पूर्ण विरजलेलें असावें. असें हें नुसतें ताक ग्रहणीच्या रोग्यानें सेवन करावें. ताकाच्या ह्या गुणाची द्रव्यें, जुन्या तांदळाचा भात, ज्वारीची वा बाजरीची भाकरी कडधान्यांचे यूष आहारासाठीं वापरावें.

पथ्यापथ्य
मुद्ग: षष्टिकशाली च आढकी माक्षिकं तथा ।
छाग्या: पयो दधि घृतं नवनीतं कपित्थकम् ॥
नि:सारं दधि गोर्बिल्वं रम्भाया: कुसुमं फलम् ।
दाडिमं लाजकृण्मण्ड: शृड्गाटं क्षुद्रमस्त्यक: ॥
एणतित्तिरलावानां शशानां क्रव्यमेव च ।
ग्रहण्यामातुरे पथ्यं कथितं मुनिभिर्हितम् ॥
यो.र. पान २५२

अपथ्य
पिच्छिलानि कठोराणि गुरुण्यन्नानि यानि च ।
आमकृन्ति न सेव्यानि ग्रहणीरोगिभि: क्वचित् ॥
यो.र. पान २५२

मूग, तूर, साठेसाळ, मध, शेळीचे दूध दही लोणी, कवठ, विनसायीचे गाईचे दही, केळी, केळफुल, डाळिंब, साळीच्या लाह्या, हे पदार्थ हितकर आहेत. कठीण जड, बुळबुळीत अभिष्यंदि पदार्थ खाऊं नयेत.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP