अन्नवहस्त्रोतस् - आध्मान

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


साटोपमत्युग्ररुजमाध्मातमुदरं भृशम् ।
आध्मानमिति तं विद्याद्धोरं वातनिरोधजम् ॥
विमुक्तपार्श्वहृदयं तदेवामाशयोत्थितम् ।
प्रत्याध्मानं विजानीयात्कफव्याकुलितानिलम् ॥
आध्मानमाह - साटोपमित्यादि । साटोपमिति आटोपश्चल
चलनमिति गयदास:, गुडगुडाशब्द इति कार्तिक: ।
आघ्मातं वात्पूर्णचर्मपुटकस्थानीयम् । उदरमिति पक्व ।
शय:, प्रत्याध्मानस्य आमाशयसंभवत्वात् ।
घोरमिति कष्टप्रदम् ।
आमाशयसमुत्थत्वेन प्रत्यासत्त्या पार्श्वहृदययोरपि
वेदनाशड्कानिरासार्थमाहविमुक्तेत्यादि । तदेवेत्यनेन
साटोपादित्वमतिदिशति । कफव्याकुलितानिलं
कफावृतवातम् ।
मा. नि. वातव्याधी ६८-६९ म. टीकेसह पान २१०

पोटांतील आंतड्यांची हालचाल रुग्णाला तीव्रतेनें जाणवणें, गुड्‍गुड्‍ असा आवाज पोटामध्यें येणें, शूल तीव्रतेनें होणें, उदर फार फुगणें, या व्याधीला आध्मान असें म्हणतात. वाताच्या रोधामुळें हा व्याधी उत्पन्न होतो. वात संचिति पक्वाशयांत असते. याच लक्षणांनीं युक्त असें आध्मान ज्यावेळीं केवळ आमाशयापुरतें मर्यादित असेल, इतर उदर प्रदेशावर फुगवटी नसल्यामुळें आमाशय तेवढा अधिक फुगलेला असा असेल त्यावेळीं त्यास `प्रत्याध्मान' असें म्हणावें. या प्रकारातील वेदना आमाशयापुरत्याच असतात इतर ठिकाणीं त्या जाणवत नाहींत असे टीकाकारानें सुचविले आहे. कफानें वायूचा मार्ग अवरुद्ध झाल्यामुळें (कफावृत्त वात) हा व्याधी उत्पन्न होतो. आध्मान व प्रत्याध्मान यामध्यें आमज शूलाप्रमाणें चिकित्सा करावी.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP