अन्नवहस्त्रोतस् - छर्दी

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या
छादयान्नाननं वेगैरर्दयन्नड्गञ्जनै: ।
निरुच्यते छर्दिरिति दोषो वक्राद्विनिश्चरन् ॥

छर्दिनिरुक्तिमाह-छादयन्नाननमित्यादि । छादयन् पूरयन्, आननं
वक्त्रं प्रवृत्तेराभिमुख्येनावस्त्थितत्वं वेग: अर्दयन्, दु:खयन, अड्ग-
भञ्जनै: अड्गव्यथामि: वक्त्राद्विनिश्चरन् वक्त्राद्विन्निर्गच्छन् दोष-
च्छर्दिरिति निरुच्यते इति सम्बन्ध: ।
केचित् `वक्त्राद्विनिश्चरन्' इत्यत्र `वक्त्रं प्रधावित:' इति पठित्वा
मुखं गत इति व्याख्यानयन्ति ।
सटिक सु.उ. ४९-६ पान ७५५

उचंबळून आलेल्या दोषांनीं मुख भरलें जातें आणि दोषांच्या वेगामुळें सर्व शरीर वेदनांनीं व्याप्त होतें म्हणून या व्याधीला छर्दी असें म्हणतात. यांत दोष मुखावाटें बाहेर पडतात.

स्वभाव
दारुण.

मार्ग
अभ्यंतर

प्रकार
छर्दिदोषै: पृथक्सर्वैर्द्विष्टैरथैंश्च पञ्चमी ।

पृथक् प्रत्येकं, दोषै:-वातपित्तकफै:, छर्दिर्भवेत् ।
सन्निपति तैस्त्रिभिरपि छर्दि: स्यात् ।
तथा । द्विष्टै:-अनभिप्रेतै: शब्दादिभिश्चपञ्चमी छर्दिभवेत् ।
पूर्ववत् पञ्चमीत्येतन्नियमार्थम् ।
द्विष्टानां ह्यर्थानां बहुत्वात् बह्वयच्छर्दयो भवन्तीत्याशड्कयते
तथा शड्कानिवृत्तये द्विष्टार्थयोगजा एकैव छर्दिरित्युक्तम् ।
सटिक वा.नि. ५-३० पान ४८१

वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक, द्विष्टार्थजा (नको तें प्राप्त झाल्यामुळें झालेली) असे छर्दीचे पांच प्रकार आहेत.

निदान
अतिद्रवैरतिस्निग्धैरहृद्यैर्लवणैरति ।
अकाले चातिमात्रैश्च तथाऽसात्म्यैश्च भोजनै: ॥
श्रमात् भयात्तथोद्वेगादजीर्णात् कृमिदोषत: ।
नार्याश्चापन्नसत्त्वायास्तथवाऽतिद्रुतमश्नत: ॥
अत्यन्तामपरीतस्य छर्देवैं संभवो ध्रुवम् ।
(बीभत्सैर्हेतुभिश्चान्यैर्द्रुतमुत्क्लेशितो बलात् ॥)

छर्देर्हेतुमाह-अतिद्रवैरित्यादि । एवंभूतस्य पुरुषस्य अति-
द्रवादिभि: कारणैश्छर्दे: संभव उत्पत्तिर्भवेदिति संम्बध: ।
अहृद्यै: अप्रियै: । उद्वेग उद्वेजनम् । आपन्नसत्त्वाया गर्भिण्या: ।
अतिद्रुतम् अतिशीघ्रम् । अश्नतो भोजनं कुर्वत: ।
अत्यन्तामपरीतस्य अत्यर्थमामवेष्टितस्य । केचित् `अत्यन्तामपरी-
तस्य' इत्यत्र बीभत्सैर्हेतुभिश्चात्ये:' इति पठन्ति; पूया-
मेध्यादिदर्शनगन्धास्वौदर्घृणाकरैरिति च व्याख्यानयन्ति ।
सटीक सु. उ. ४९-३ ते ५ पान ७५४, ५५

अतिशय पातळ, अति स्निग्ध, न आवडणारे, फार खारट, असे पदार्थ सेवन करणें, अयोग्य वेळीं, पुष्कळ प्रमाणांत अति त्वरेनें (गपागप) व नेहमीं संवयीचे नसलेले न सोसणारे पदार्थ खाणें, श्रम, भय, उद्वेग (शारीरिक, मानसिक क्षोभ) अजीर्ण, कृमी, गर्भ दोष, आमाधिक्य आणि बीभत्स दर्शन या कारणांनीम छर्दी हा व्याधी उत्पन्न होतो.

संप्राप्ति
दोषानुदीरयन् वृद्धानुदानो व्यानसड्गत: ।
ऊर्ध्वमागच्छति भृशं विरुद्धाहारसेवनात् ॥
छर्दिसंप्राप्तिमाह-दोषानुदीरयन्नित्यादि ।
व्यानसड्गत: व्यानेन सह एकीभूत: उदान:, विरुद्धाहार-
सेवनात् विरुद्धानामाहाराणां सेवनात्, वृद्धान् प्रकुपितान्
दोषानुदीरयन् भृशमूर्ध्वमागच्छतीति संबन्ध: ।
केचित् `ईरियन् श्लेष्मपित्ते तु उदानो व्यानसंगत: ।
ऊर्ध्वमागच्छति रसो विरुद्धाहारसेविनाम् इति पठन्ति,
तं च कार्तिककुण्डो नेच्छतिक, यतो `दोषो वक्रं प्रधावित,
इत्यनेन गतार्थ, तथा रससहितस्य च दोषस्योर्ध्वगमनं
रसदोषजत्वेन छर्द्या: पठितत्वेन सिद्धम् ।
सटीक सु. उ. ४९-७ पान ७५५

आमाशयोत्क्लेश भवा हि सर्वा श्च्छदर्यो मता
च.चि. २०-२०

व्यान आणि उदान हे विरुद्ध आहारादींनीं प्रकुपित झालेल्या कफ पित्त दोषांना मुखावाटें बाहेर टाकतात. वात पित्त प्रकुपित झाल्यानंतर कफाच्या - व पित्ताच्या तिक्ष्णोष्ण सर्व गुणांनीं आमाशयाचा क्षोभ होतो. त्यामुळें वायूच्या गतीमध्यें विलोमता उत्पन्न होऊन आमाशयस्थ दोष, व्यानोदानांच्या प्रेरणेंने ऊर्ध्व गती होऊन छर्दी हा व्याधी उत्पन्न करतात. आमाशयाचा क्षोभ जसजसा वाढत जाईल, तसतसें कफ पित्ताचें उदीरण अधिकाधिक होत जातें. कफ पित्त हे द्रव धातु असल्यानें त्यांच्या बहिर्मार्ग गमनानें आप्‍, धातूहि क्षीण होतो. रस कफांच्या दुष्टीमुळें प्रसेक, हृल्हास, उत्क्लेश हीं लक्षणें जरी होत असलीं तरी पित्तामुळें त्यांच्या संचयाचें प्रमाण अधिक वाढतें आणि वाताच्या विगुणतेनें छर्दि उत्पन्न होते.

पूर्वरुपें
हृल्लासोद्गाररोधौ च प्रसेको लवणस्तनु: ।
द्वेषोऽन्नपाने च भृशं वमीनां पूर्वलक्षणम् ॥

पूर्वरुपमाह-हृल्लासेत्यादि । उद्गाररोध: उद्गाराप्रवृत्ति: ।
प्रसेको मुखप्रसेक:; तस्य लवणत्वं प्रभावात्, आमाशयो-
त्क्लेशभवत्वेन कफाविदाहाद्वा:, तनुरघनोऽल्पो वा ।
मा.नि. छर्दी-५ पान १५३, म. टीकेसह

ताल्वोष्ठकण्ठास्यविशोषदाहसंतापमोहभ्रमविप्रलापा: ।
पूर्वाणि रुपाणि भवन्ति तासामुत्पत्तिकाले तु विशेषतो हि ॥
मा.नि. तळटीप पान १५६

माधव निदान ग्रंथावरील टीपेंत --

तालु, ओठ, कंठ, मुख कोरडे पडणें, दाह, संताप मोह, भ्रम, प्रलाप हीं लक्षणें छर्दी उत्पन्न होण्याचे वेळीं पूर्वरुपें म्हणून होतात असें म्हटलें आहे. हृल्हास, ढेकर साफ न येणें, तोंडाला पाणी सुटणें, त्याची चव खारट असणें, खाणें पिणें नकोसें वाटणें हीं लक्षणें छर्दीच्या पूर्वरुपांत होतात.

रुपें
वरील पूर्वरुपांतील लक्षणें अधिक व्यक्त झालीं म्हणजे त्यांना रुपें मानावीत.

वातज छर्दी
व्यायामतीक्ष्णौषधशोकरोगभयोपवासद्यतिकर्शितस्य ।
वायुर्महास्त्रोतसि संप्रवृद्ध उत्क्लेश्य दोषांस्तत उर्ध्वमस्यन् ॥
आमाशयोत्क्लेशकृतां च मर्म प्रपीडयंश्छर्दिमुदीरयेत्तु ।
हृत्पार्श्वपीडामुखशोषमूर्धनाभ्यर्तिकासस्वरभेदतोदै: ॥
उद्गारशब्दप्रबलं सफेनं विच्छिन्नकृष्णं तनुकं कषायम् ।
कृच्छ्रेण चाल्पं महता च वेगेनार्तोऽनिलाच्छर्दयतीह दु:खम् ॥
च.चि. २०-९ पान १२८४-८५

प्रच्छर्दयेत् फेनिलमल्पमल्पं शूलार्दितोऽभ्यर्दितपार्श्वपृष्ठ: ।
श्रान्त: सघोषं बहुश: कषायं जीर्णेऽधिकं साऽनिलजा वमिस्तु ॥
सु. उ. ४९-९ पान ७५५

व्यायाम, तीक्ष्ण अशीं औषधें, शोक, निरनिराळे रोग, भय, उपवास अशा कारणांनीं क्षीण झालेल्या व्यक्तीमध्यें वायू संचित होतो, महास्त्रोतसामध्यें त्याचा प्रकोप होऊन तो तेथें उत्क्लेश निर्माण करतो आणि दोषांना (आम, कफ, पित्त) मुखावाटें बाहेर फेंकतो. आमाशयाचा उत्क्लेश होतो. त्यामुळें दोष अधिकाधिक स्त्रवतात. हृदयाला पीडा होते व छर्दीचे वेग वाढत जातात. हृद्‍शूल, पार्श्वशूल, मुखशोष, शिर:शूल, नाभीं भागीं शूल, कास, स्वरभेद, शरीरामध्यें टोंचल्यासारख्या वेदना, ओकारीचे वेळीं ओकण्याचा मोठा आवाज येणें. होणार्‍या ओकारीचें स्वरुप फेस्कट, चोथापाणी, तुरट चवींचे, पातळ काळसर असें असतें. ओकारी होतांना मोठा येतो असें वाटते. वेग वरचेवर येतो पण प्रत्यक्ष ओकारी मात्र अल्पशीच होते. रोगी थकून जातो. ओकारीचे वेग अन्न पचल्यानंतरच्या काळांत अधिक येतात.

पित्तज छर्दि
अजीर्णकट्‍वम्ल विदाह्यशीतैरामाशये पित्तमुदीर्णवेगम् ।
रसायनीभिर्विसृतं प्रपीडय मर्मोर्ध्वमाषस्य वर्मि करोति ॥
मूर्च्छापिपासामुखशोषमूर्ध्वताल्वक्षिसंतापतमोभ्रमार्त: ।
पीतं भृशोष्णं हरितं सतिक्तं धूम्रं च पित्तेन वमेत् सदाहम् ॥
च.चि. २-१०-११ पान १२८५

सोऽम्लं भृशं वा कटुतिक्तपितं सरक्तं हरितं वमेद्वा ।
सदाहचोषज्वरवक्रशोषो मूर्च्छान्वित: पित्तनिमित्तजा सा ॥
सु. उ. ४९-१० पान ७५५

कटु (तिखट) आंबट, विदाही उष्ण अशा द्रव्यांचें अजीर्ण झालें असतां पित्त प्रकुपित होऊन आमाषयांत वेगानें उदीरित होतें प्रकुपित झालेल्या पित्तामुळें केवळ आमाशयाचाच नव्हे तर रसवहस्त्रोतसाचासुद्धां क्षोभ होतो, हृदय पीडिलें जातें, दोषांचा उत्क्लेश होतो आणि ओकारी होते. मूर्च्छा, तृष्णा, मुखशोष, शिरोदाह, टाळूची व डोळयांची आग होणें, अंधारी येणें, चक्कर येणें, घशांत छातींत जळजळणें, तोंड कडू होणें, ज्वर येणें अशीं लक्षणें होतात. उलटीचे स्वरुप पिवळें, हिरवट पिवळें, धुरकट रक्तयुक्त, आंबट, कडु, तिखट, दाह करणारे व क्षार मिसळलेल्या पाण्याप्रमाणें असतें. उलटीचें प्रमाण खूप असतें, त्यांतील द्रव पातळ असतो.

कफज छर्दी
स्निग्धातिगुर्वामविदाहिभोज्यै: स्वप्नादिभिश्चैव कफोऽतिवृद्ध: ।
उर:शिरो मर्म रसायनीश्च सर्वा: समावृत्य वर्मि करोति ॥
तन्द्रास्यमाधुर्यकफप्रसेकसंतोषनिद्रारुचिगौरवार्त: ।
स्निग्धं घनं स्वादु कफाद्धिशुद्धं सलोमहर्षोऽल्परुजं वमेत्तु ॥
च. चि. २०-१२, १३ पान १२८५

यो हृष्टरोमा मधुरं प्रभूतं शुक्लं हिमं सान्द्रकफानुविद्धम् ।
अभक्तरुग्गौरव सादयुक्तो वमेद्वमी सा कफकोपजा स्यात् ॥
सु. उ. ४९-११ पान ७५५

कफात् स्निग्धं घनं शीतं श्लेष्मतन्तुगवाक्षितम् ।
मधुरं लवणं भूरि प्रसक्तं लोमहर्षणम् ॥
मुखश्वयथुमाधुर्यतन्द्राहृल्लासकासवान् ।
वा.नि. ५-३४, ३५ पान ४८१

अति स्निग्ध, अति गुरु, अति मधुर असे पदार्थ व कच्चे (आम) अन्न सेवन करणें, फार झोप घेणें (दिवसा) यांनीं कफाचा प्रकोप होतो, प्रकुपित कफामुळें उर, शिर, हृदय व रसवहस्त्रोतसें हीं पीडित होऊन दोषांचें आमाशयामध्यें उदीरण होतें आणि छर्दी होते. तोंड गोड होणें, डोळ्यावर झांपड असणें, तोंडाला पाणी सुटणें, भूक मुळींच नसणें, तोंडाला चव नसणें, अंग जड होणें, झोंप फार येणें, मुख शोथ, हृल्लास, कास अशीं लक्षणें असतात. ओकारीचें स्वरुप स्वच्छ, पांढरें, घन, चिकट, तंतुयुक्त, खारट, मधुर असें असतें. ओकारीचे वेळीं वेदना होत नाहींत. (सहज होते) ओकारीचे प्रमाण पुष्कळ असते.

सान्निपातिक छर्दी
समश्रत: सर्वरसान् प्रसक्तमामप्रदोषर्तुविपर्ययैश्च ।
सर्वे प्रकोपं युगपत् प्रपन्नाच्छर्दि त्रिदोषां जनयन्ति दोषा: ॥
शूलाविपाकारुचिदाहतृष्णाश्वासप्रमोहप्रबला प्रसक्तम् ।
छर्दिस्त्रिदोषाल्लवणाम्लनीलसान्द्रोष्णरक्तं वमतां नृणां स्यात् ॥
समश्नत इत्यादिना त्रिदोषजामाह । समश्नत: सर्वरसानिति
पथ्यापथ्यमेलकरुपतया भजत:, उक्तं हि `पथ्यापथ्यमिहै-
कत्र भुक्तं समशनं मतम् (चि. अ. १५) इत्यत्र; न तु
सर्वरसान् भुञ्जानस्येत्यर्थ: सर्वरस भोजनं हि पथ्यमेव,
तेनेह तस्य त्रिदोषकर्तृत्वं न स्यात् ।
प्रसक्तमिति निरन्तम् । आमस्य प्रदोष: आमप्रदोष: ।
सटिक च.चि. २०-१४, १५ पान १२८५

पथ्यकर व पथ्यकर असे सर्व प्रकारचे व सर्व दोषांना प्रकुपित करणारें अन्न मिसळून सतत खाण्यांत आल्यामुळें, अजीर्ण झाल्यामुळें, ऋतुविपर्यामुळें तीनहि दोष एकदम प्रकुपित होऊन त्रिदोषज छर्दी उत्पन्न करतात. अरुचि, अन्न न पचणें, शूल, दाह, तृष्णा, श्वास, मोह, हीं लक्षणें बलवान् असतात. छर्दीचें स्वरुप निळसर, घन, खारट, आंबट, रक्तयुक्त, व उष्ण असें असतें.

द्विष्टार्थजा छर्दि
द्विष्टप्रईपाशुचिपूत्यमेध्यबीभत्सगन्धाशनदर्शनैश्च ।
यच्छर्दयेत्तप्तमना मनोघ्नैर्द्विष्टार्थसंयोगभवा मता सा ॥
द्विष्टेत्यादिना द्विष्टार्थजामाह । द्विष्टादयो गन्धेनाशनेन
दर्शनेन च यथायोग्यता संबध्यते । अशनं भक्षणम् ।
द्विष्टं प्रतिपुरुषाप्रीतिजनकं, प्रतीपवचादि, केचित्प्रतीपं
वातमाहु: अशुचि उच्छिष्टादि, अमेध्यं मलिनं, बीभत्सं
जुगुप्सितम् ।
मनोघ्नैरित्यनेन द्विष्टादीनां मध्ये यत्किंचित् अशुच्यादि यं
पुरुषं प्राप्य मनोघ्नं न भवति, तं प्रति तच्छर्दिकारकं न
भवति, मनोऽनुपघातकत्वादिति सूचयति ।
सटिक च. ची. २०-१८ पान १२८६

तिटकारा असणारे, विरुद्ध, न सोसणारे, अपवित्र, नासलेले, घाणेरडें, किळसवाणें असें पदार्थ वा, असा वास, सेवन करावे लागले किंवा असे पदार्थ नुसते पुढें आले तरी मनाला उबग येतो. आणि त्याचा परिणाम म्हणून छर्दी उत्पन्न होते. पदार्थ पुढें आले वा कांहीं तरी मनानें एकदा घेतलेल्या किळशीनें ओकारी होत रहाते. या छर्दीमध्यें अन्नद्वेश, अरुचि हीं लक्षणें विशेष असतात.

आगंतुजा छर्दि
बीभत्सजा दौहृदजाऽमजा च असात्म्यजा च क्रिमिजा च या हि ।
सा पञ्चमी तां च विभावयेच्च दोषोच्छयेणैव यथोक्तमादौ ॥

म० आगन्तुजामाह-बीभत्सजेत्यादि । दौर्हृदजा दौर्हृदाला-
भजा, आमजा अजीर्णजा, असात्म्यजा असात्म्यभक्षणादि-
संभूता क्रिमिजा कोष्ठक्रिमिसंभवा; बीभत्सजेत्यादिना
क्रिमिजान्तेनैकत्वेनैव गणनीया, आगन्तुजत्वसामान्यात् ।
सा पञ्चमीति त्रिदोषजापेक्षया सामान्येनागन्तुजैव, आगन्तु-
ज्वरवत्; यदि तु बीभत्सजापेक्षया क्रिमिजा पञ्चमीति
गण्यते, तदा तां च विभावयेत् । दोषोच्छ्रयेणैवेत्यनेन
क्रिमिजाया एव दोषसंबन्ध: स्यात् , ततश्च बीभत्सजादीनां
चिकित्सोपयोगी दोषसंबन्धो न लभ्यते । अन्ये तु तद्दोष-
परिहारार्थ `सा पञ्चमी ताश्च' इति बहुवचनान्तं पठन्ति,
एवं सति अन्तर्गणनया न प्रयोजनमिति अन्तर्गणनां नाद्रियन्ते ।
कथमत्र दोषोच्छ्रयो विभावनीय इत्याह यथोक्तमादाविति ।
आदौ वातादिलक्षणे इत्यर्थ: । आ० आगन्तुजामाह बीभत्सजा
पूयामेध्यादिदर्शनगन्धस्वादजा, आपन्नसत्त्वाया स्त्रिया दौर्हृदालाभजा,
आमजा अजीर्णजा, असात्म्यजा असात्म्यभोजनजा, क्रिमिजा
कोष्ठक्रिमिसंभवा, बीभत्सजेत्यादिना क्रिमिजान्ता एकैव गणनीया ।
एवं सर्वाभिरेकैवागन्तुजत्वसामान्यात् , आगन्तुज्वरवत् ।
पञ्चमीति त्रिदोषजापेक्षया । आगन्तुजां दोषोच्छ्रयेणैव जानीयात् ।
यथोक्तमादाविति यथा वातादिलक्षणेन आदाविति पूर्वोक्तेन ।
मा.नि. छर्दी १२ पान १५५ आ. टीकेसह

वातादीनेव विमृशेत्कृमितृष्णामदौहृदै ।
शूलवेपथुहृल्लासैर्विशेषात् कृमिजां वदेत् ॥
कृमिहृद्रोगलिड्गैश्च ।
कारणे कार्योपचारात् कृम्यादिशब्दैरेव छर्दयौच्यन्ते ।
कृमितृष्णामामगर्भिणीदौहृदजे छर्दिषि वातादीनेव यथायथं
स्वलक्षणैर्विमृशेत्-विचारयेल्लक्षयेत् । न हि वातादीनन्तरेणैता:
छर्दय: कथञ्चिदपि सम्भवन्ति । अत एवैवकारोऽवधारणा-
र्थोऽत्र व्यधायि । एवं कृमिजां कदाचिद्वायुच्छर्दिलक्षणोपेता-
मथवा पित्तच्छर्दिलक्षणोपेतां कफच्छर्दिलक्षणोपेतां वा यथा-
यथं लक्षयेत् । एवं तृष्णामदौहृदच्छर्दिषि वातादीन विमृशेत् ।
विशेषेण शूलवेपथुहृल्लासै: कृमिजां वदेत् ।
कृमि हृद्रोगलक्षणैश्च - अनन्तरमेव वक्ष्यमाणै: कृमिजां वदेत् ।
सटिक वा.नि. ५-३७, ३८ पान ४८२.

कारणानुरुप छर्दीचे कांहीं वेगळे प्रकार उल्लेखिलेलें आहेत. कृमिज; तृष्णाज, आमज, दौहृदज, यामध्यें वातादि दोषांचीच लक्षणें दिसतात. त्यामुळें वातादि प्रकारामध्येंच या प्रकाराचा समावेश वस्तुत: होतो. कांहीं टीकाकारांनीं आगंतु असा पांचवा वर्ग करुन त्यामध्यें द्विष्टार्थज व कृमिजादि प्रकारांचा समावेश केला आहे. कृमी, आमोत्पत्ती, सर्गभावस्था, सात्म्यत्याग या कारणांनीं दोषांचा प्रकोप आरंभीं होतो व मग छर्दी उत्पन्न होते असें स्पष्ट असतांना या प्रकारांचा समावेश आगंतुमध्यें करणें योग्य नाहीं असें आम्हास वाटते द्विष्टार्थजा छर्दिस तेवढे आंगतुजा म्हणतां येईल. कृमिज छर्दीमध्यें शूल, कंप, हृल्लास, या लक्षणांसवेंच कृमिज हृद्‍रोगांत सांगितलेलीं अरुचि, शोथ, तोद, निष्ठीवन, उत्क्लेश, श्यावनेत्रत्व हीं लक्षणेंहि होतात. वर जीं छर्दीची कृमि इत्यादि कारणें सांगीतलीं आहेत त्यामध्यें दोष प्रकोप अमुक एक स्वरुपाचच असेल असें नाहीं. तीनहि दोषापैकीं एक वा अधिक दोष प्रकुपित होणें शक्य आहे.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें

ज्वर, अतिसार, मूर्छा, तृष्णा. (वा.चि. ६-१५-)

अम्लपित्त, रक्तपित्त गुल्म, अरोचक, आमवात हृद्‍रोग.
(यो.र.छर्दी पान ३९२)

वृद्धि स्थान क्षय
छर्दीचें प्रमाण व वेग वाढतात. उर, उदर या ठिकाणीं शूल अधिक होतो. अम, मोह, मूर्च्छा हीं लक्षणें उत्पन्न होतात. रसक्षयाचीं लक्षणें दिसतात. डोळे खोल जाणें, मुद्रा निस्तेज होणें, त्वचा रुक्ष, शुष्क होणें, कृशता येणें या लक्षणांनीं रोग वाढत जातो आहे असें समजावें. छर्दी अजिबात थांबत नाहीं. मधून मधून सारखी छर्दी होत रहाते. अन्न वा औषध जसेंच्या तसेंच उलटतें. वेग कमी कमी होत जातात. छर्दीतून पडणार्‍या द्रव्याचें प्रमाण कमी होतें. हृल्लास व उत्क्लेश हीं लक्षणें नाहींशी होतात. अन्न वा औषध उलटत नाहीं. हीं लक्षणें व्याधीचें बल कमी होत असल्याचीं आहेत.

उपद्रव
कासश्वासो ज्वरतृष्णा हिक्का वैचित्यमेव च ।
हृद्रोगस्तमकश्चैव ज्ञेयाश्छर्देरुपद्रवा: ॥
वंगसेन छर्दी - ७२ पान २९०

कास, श्वास, ज्वर, हिक्का, तृष्णा, मन अस्वस्थ होणें, हृद्‍रोग व अंधारी येणें हे विकार छर्दीचे उपद्रव म्हणून होतात.

उदर्क
शूल, कृशता, अग्निमांद्य.

व्याधीमुक्तीचीं लक्षणें
उर व आमाशयांत लाघव उत्पन्न होणें, रुचि येणें, भूक लागणें, ढेंकर साफ येणें, उत्क्लेश, हृल्हास नाहींसें होणें, नेहमीचें अन्न घेतलें असतां तें न उलटणें, या लक्षणांनीं व्याधी रोगमुक्त झाला असें समजावें.

साध्यासाध्यविवेक
विट्‍स्वेदमूत्राम्बुवहानि वायु: स्त्रोतांसि संरुध्य यदोर्ध्वमेति ।
उत्सन्नदोषस्य समाचितं तं दोषं समुद्धूय नरस्य कोष्ठात् ॥
विण्मूत्रयोस्तत्समगन्धवर्णं तृट्‍श्वासहिक्कार्तियुतं प्रसक्तम् ।
प्रच्छर्दयेद्‍दुष्टमिहातिवेगात्तयाऽर्दितश्चाशु विनाशमेति ॥
असाध्यामाह विडित्यादि । उत्सन्नदोषस्य उद्गतदोषस्य ।
दोषमिति पित्तं कफं वा, स्वेदादिकान् वा तद्‍दुष्टान् धातुमलान् ।
तदिति यस्माद्विडादिवाहिस्त्रोतोदुष्टिस्ततो हेतोर्विण्मूत्रयो:
समगन्धवर्णं छर्दयतीति योज्यम् । इयं तु छर्दिर्विकृति
विषमसमवायारब्धा त्रिदोषजेति केचित्, अन्ये त्वाहु:
सर्वा एव, छर्दय: प्रबला एवंविधा: सत्योऽसाध्या: स्युरिति ।
मा.नि. छर्दि १०,११ म. टीकेसह पान १५४-५५

क्षीणस्य या छर्दिरतिप्रसक्ता सोपद्रवा शोणितपूययुक्ता ।
सचन्द्रिकां तां प्रवदेदसाध्यां साध्यां चिकित्सेन्निरुपद्रवां च ॥
म. असाध्यलक्षणमाह क्षीणस्येत्यादि । सचन्द्रिकामिति
मेद: प्रभूतिधातूनां स्नेह: प्रवर्तमानो मयूरपिच्छचन्द्रिकावत्
प्रतिभाति । निरुपद्रवामिति कासाद्युपद्रवरहिताम् ।
तदुक्तं ``कास: श्वासो ज्वरो हिक्का तृष्णा वैचित्त्यमेव च ।
हृद्रोगस्तमकश्चैव ज्ञेयाच्छर्देरुपद्रवा: इति । आ. असाध्यां चाह-
अतिप्रसक्ता अतिशयेन निरन्तरा, सोपद्रवा वक्ष्यमाणो पदवयुक्ता ।
सचन्द्रिकमिति मेद:प्रभृति धातूनां स्नेह: प्रवर्तमानो
मयूरपिच्छचन्द्रिकावत्प्रतिभाति ।
इत्थं पच्चविधामपि छर्दिमसाध्यां प्रवदेत् वर्जयेदित्यर्थ: ।
निरुपद्रवां कासाद्युपद्रव रहितां साध्यां चिकित्सेत् भिषक् इति शेष: ।
मा.नि. छर्दी १४ पान १५६ आ. टीकेसह

छर्दीच्या संप्राप्तींतील वाताचा प्रकोप होऊन अन्नवह व रसवह स्त्रोतसांसवेंच पुरीषवह, स्वेदवह व मूत्रवह स्त्रोतसें दुष्ट होऊन मार्गाचा रोध होतो. मल संचय वाढूं लागतो आणि कोष्ठांतून या दोषाचे छर्दीच्या रुपानें उद्गीरण होतें. छर्दीला मलमूत्रासारखी घाण येते. तृष्णा, श्वास, हिक्का असे अत्यंत त्रासदायक उपद्रव होतात. छर्दीचा वेग व प्रमाण अतिशय वाढतें. अशा स्थितींत व्याधी असाध्य होतो. रोगी क्षीण होणें, छर्दी फार वाढणें, छर्दीबरोबर रक्तपूय पडणें, छर्दीतून मेदादि दुष्टीमुळें एक प्रकारचा स्निग्ध पदार्थ पडणें व त्यावर पाण्यावर पडलेल्या तेलाच्या तवंगाप्रमाणें निरनिराळ्या रंगाच्या छटा दिसणें हीं लक्षणें छर्दीच्या असाध्यतेचीं द्योतक आहेत. अति वेग, श्रम, दौर्बल्य, मूर्च्छा, हीं लक्षणें नसलीं वा कासादि उपद्रव झाले नाहींत तर छर्दी हा व्याधी साध्य असतो.

रिष्ट लक्षणें
छर्दिर्वेगवती मूत्रशकृद्गन्धि: सचन्द्रिका ।
सास्त्रविट्‍पूयरुक्कासश्वासवत्यनुषड्गिणी ॥
छर्दिहन्ति । कीदृक् ? वेगवती, महता वेगेण प्रवर्तमाना ।
तथा, मूत्रशकृतोरिव गन्धो यस्या: सा, ``उपमानाच्च''
इति गन्धस्येदादेश: । तथा, सचन्द्रिका-जलतैलबिन्दु-
संस्थाना चन्द्रिकोच्यते । तथा, सहास्त्रेण वर्तते विट्‍ सास्त्रविट्‍ ।
सास्त्रविट्‍ च पूयश्च रुक् च कासश्च श्वासश्च,
ते विद्यन्ते यस्यां सैवम् । तथा अनुषड्गिणी-दीर्घकालानुवर्तिनी ।
सटीक वा. शा. ५-७७ पान ४२५-२६

छर्दी मोठया वेगानें येणें, मूत्र - पुरिषाप्रमाणें घाण येणें, चकाकणारे तवंग दिसणें, रक्त, पुरीष, पूय, यानी युक्त अशी छर्दी असणें, अत्यंत वेदना होणें, श्वास कास असणें या लक्षणांनीं युक्त व दीर्घ काल टिकलेली छर्दी मारक होते.

चिकित्सा सूत्रें
आमाशयोत्क्लेशभवा हि सर्वाश्छदर्यो मता लड्घनमेव तस्मात् ।
प्राक्कारयेन्मारुतजां विमुच्य संशोधनं वा कफपित्तहारि ॥
चूर्णानि लिह्यान्मधुनाऽभयानां हृद्यानि वा यानि विरेचनानि ।
मद्यै: पयोभिश्च युतानि युक्त्या नयन्त्यधो दोषमुदीर्णमूर्ध्वम् ॥
वल्लीफलाद्यैर्वमनं पिबेद्धा यो दुर्बलस्तं शमनैश्चिकित्सेत् ।
रसैर्मनोज्ञैर्लघुभिर्विशुष्कैर्भक्क्ष्यै: सभोज्यैर्विविधैश्च पानै: ॥
आमाशयेत्यादिना साध्यनां चिकित्सामाह । यस्मादामाशयो-
त्क्लेशात् सर्वार्च्छर्दयो भवन्ति आमाशयोत्थे च रोगे
लड्घनादि कफहरं भेषजं युक्तं, तस्माल्लड्घनमेव कर्तव्य-
मिति भाव: । लड्घनमल्पदोषविषयं । शोधनं च बहुदोष-
विषयमिति व्यवस्था । संशोधनशब्देन चेह विरेचनवमने
अपि गृह्येते । अन्ये त्वत्र संशोधनशब्देन प्रतिमार्गहरणतया
अत्यर्थहितं विरेचनमेव वर्णयन्ति । संशोधनयोगानाह चूर्णानीत्यादि ।
फलाद्यैरिति फलानि जीमूतेक्ष्वाकुप्रभृतीनि फलमात्रासिद्धिपठितानि तै: ।
शमनैरिति दोषनिबर्हणं विना दोषसाम्यकरै: ।
उक्तं हि पुष्कलावते ``न शोधयति यद्दोषान् समान्नोदीरयत्यपि ।
समीकरोति विषमान् तत् संशमनमुच्यते'' इति ।
सटिक च.चि. २० ते २२ पान १२८६-८७

आमाशयाचा उत्क्लेश होऊन छर्दी उत्पन्न होते. आमाशय दुष्टी हा छर्दीच्या संप्राप्तींतील एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळें एकांत वातज छर्दीं वगळून बाकी सर्व प्रकारच्या छर्दीरोगांत प्रथम लंघन द्यावें आणि नंतर कफपित्ताचें शोधन करणार्‍या उपचारांचा अवलंब करावा. त्यासाठीं हारीतकीचें चूर्ण व मध किंवा द्राक्षा, आरग्वध, त्रिवृत यांनीं युक्त असें हृद्य विरेचन द्यावें. अनुलोमन गुणांचीं मद्यें वापरावीं किंवा अनुलोमनासाठीं सिद्ध दूध द्यावें. उत्क्लेश व कफ प्राधान्य असल्यास कडू दोडका व पडवळ यानें वमन द्यावें. रोगी शोधन न करण्यासारखा दुर्बल असल्यास किंवा रोग निराम असल्यास मनाला आवडतील असे निरनिराळे रस, फळांचे रस, लघु व कोरडें अन्न व सिद्ध जल असे पदार्थ शामनासाठीं वापरावें. काळ्या मातीचें खापर चांगलें लाल तापवून तें पाण्यामध्यें विझवावें असें व पाणी गार करुन प्यावें.

वमिप्रसड्गात् पवनोऽप्यवश्यं धातुक्षयाद्‍ वृद्धिमुपैति तस्मात् ।
चिरप्रवृत्तास्वनिलापहानि कार्याण्युपस्तम्भनबृंहणानि ॥
सर्पिर्गुडा: क्षीरविधिर्घृतानि कल्याणकत्र्यूषणजीवनानि ।
वृष्यास्तथा मांसरसा: सलेहाश्चिरप्रसक्तां च वमिं जयन्ति ॥
वमिप्रसड्गात् छर्द्यनुबन्धात् पवनस्य वृद्धिर्भवति; तत्रो-
पस्तम्भनं छर्दीनां पवनस्य वा, बृहणं धातूनाम् ।
लेहाश्च्यवनप्राशादय: ।
सटिक च.चि. २०-४६, ४७ पान १२९०

अतिशय झालेल्या ओकारीमुळें धातुक्षय होऊन वातवृद्धी होते. अशा वेळीं स्तंभन आणि बृंहण अशी चिकित्साकरणें आवश्यक असतें. यासाठीं सिद्ध केलेलें दूध, मांस, रस, शमन, जीवनीय घृतें, च्यवनप्राशावलेहासारखें वृष्य लेह यांचा उपयोग करावा.

कल्प
द्राक्षा, मधु, आमलकी, शुंठी, आर्द्रक, शंखभस्म, शौक्तिक भस्म, मौक्तिक भस्म, --- , मयुरपिच्छा मशी, त्रिफळा, प्रवाळपंचामृत, सूतशेखर, हृद्यविरेचन क्वाथ, मृद्‍भृष्ट जल.

आहार
निंबू,- ताक, मुद्ग कुलथ यूष, द्राक्षा, दाडिम व मोसंबी यांचा रस, --, कोरडी भाकरी, लाह्या, फुटाणें.

अपथ्य
स्निग्ध, गुरु विदाही वर्ज्य.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP