मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट अभंग| २४ स्फुट अभंग बाळक्रीडा वैराग्यशतक ज्ञानशतक सगुणनिर्गुणसंवादशतक १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ स्फुट अभंग - २४ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ स्फुट अभंग - २४ Translation - भाषांतर २४काया माया छ्याया हे कांहिं तगेना । वैभव जगेना जन्मवरी ॥१॥जन्मवरी लोक देखत आहेती । किती येक जाती सांडुनीयां ॥२॥सांडुनीयां जाती कन्या पुत्र धन । सर्व साभिमान लोकिकांचा ॥३॥लोकिकांचा भाव लोकिकीं राहिला । प्राणीमात्र गेला येकलाची ॥४॥येकलाची येता येकलाची जातो । मध्येंची भुलतो मायाजाळें ॥५॥मायजाळ माया हें कांहीं सुटेना । नाचतीं वासना अनावर ॥६॥अनावर मन कदा आवरेना । धरितां धरेना अनुमानें ॥७॥अनुमानें कांहिं नव्हे समाधान । जंव आत्मज्ञान पाविजेना ॥८॥पाविजेना मोक्षा तुटेना बंधन । श्रवण मनन जेथें नाहिं ॥९॥जेथें नाहिं सारासार विचारणा । या जन्म मरणा ठाव तेथें ॥१०॥तेथें ठाव जाला देहे संदेहासी । होती पापराशी अनुमानें ॥११॥अनुमानें पाप अनुमानें पुण्य । अनुमाने धन्य होईजेना ॥१२॥होईजेना धन्य विचारणेवीण । लोकिकाचा शीण वेर्थ जातो ॥१३॥वेर्थ जातो शीण देखता देखतां । लोकिक तत्त्वता राखवेना ॥१४॥राखवेना परी राखीला पाहिजे । मनामधें कीजे विचारणा ॥१५॥वीचारणा कीजे या देवांभक्तांची । कर्ता कोण तोची वोळखावा ॥१६॥वोळखावा कर्ता सर्वत्र सृष्टीचा । मी तो कोण कैचा धुंडाळावें ॥१७॥धुंडाळावें महावाक्यपंचीकरण । तत्वांचें विवरण यथासांग ॥१८॥यथासांग व्यंग पडोंची नेंदावें । अत्यंतची व्हावें सावधान ॥१९॥सावधानपणें देवासी पाहाणें । नासीवंत जाणें सांडूनीयां ॥२०॥सांडुनीया सव अष्टधा प्रकृती । विवेकाची गती वोळखावी ॥२१॥वोळखावी मुख्य सज्जनाची कृपा । तेणें पुण्यपापा नातळावें ॥२२॥नातळावें कदा दृश्य पदार्थासी । असोनी देहासी लिंपों नये ॥२३॥लिंपों नये जैसें पद्मिणीचें पत्र । देहे डिंबमात्र चालतसे ॥२४॥चालतसे सर्व तत्वांचें गांठोडें । तेतें काय वेडें गुंडाळतें ॥२५॥गुंडाळतें वेडे देहसंबंधासी । भ्रमें विवेकासी सांडुनीयां ॥२६॥सांडुनीयां सार घेईल असार । ऐसा अनावर भ्रम आहे ॥२७॥भ्रम आहे जय अंतरीं माजला । तोचि तो गांजला संवसारीं ॥२८॥संवसारी येक सुटोनीयां गेले । येक ते बांधलें संकल्पानें ॥२९॥संकल्पानें सुटे ऐसा कोण आहे । ईश्वरासी पाहे शोधुनीया ॥३०॥शोधुनीयां पाहे तोची देव लाहे । येर तो न राहे देवापासीं ॥३१॥देवापासीं राहे बहुतां सुकृतें । लोकिकांसेसे भूतें झडपीती ॥३२॥झडपीती भूतें सत्यची मानीतां । देव पाहों जातां भूतें मिथ्या ॥३३॥भूतें मिथ्या ऐसें हृदई बिंबलें । तेव्हांची जाहलें समाधान ॥३४॥समाधान आहे मायातीत होतां । नाथिली अहंता घेऊं नये ॥३५॥घेऊं नये पक्ष कदा असत्याचा । वेगीं या सत्याचा पंथ धरा ॥३६॥पंथ धरा जेणें परत्र पाविजें । देवासीं लाविजे संनिधान ॥३७॥संनिधानेमात्रें तरे बहुजन । पावनें पावन होईजेतें ॥३८॥होईजे पावन तेंची तें स्वहीत । सोडीतां पतीत होईजेतें ॥३९॥होईजेतें कष्टी तेंचि कां धरावें । वेगीं उद्धारावें आपणासी ॥४०॥आपणासीं वैर कदा धरूं नये । अंतीं सर्व जाये निघोनीयां ॥४१॥निघोनियां जाये त्याचें घेसी काये । वेगीं धरीं सोये शाश्वताची ॥४२॥शाश्वताची सोये सांडुनी करंटा । वेर्थ बारा वाटा धांवतसे ॥४३॥धांवतसे चहूंकडे अनुमानें । तया समाधानें मोकलीलें ॥४४॥मोकलीलें मन ऐसें हीं कळेना । मातला वळेना मनासंगें ॥४५॥मनासंगें कदा निःसंगता नये । अपाये उपाये मानीतसे ॥४६॥मानीतसे मनें जें जें वोळखीलें । स्वरूप राहिलें मनातीत ॥४७॥मनातीत होतां होये सार्थकता । मनासवें जातां अधोगती ॥४८॥अधोगती चुके तें कांहि करावें । मनासवें व्हावें कासावीस ॥४९॥कासावीस पंचभौतिकीं राहातां । भूतांसी पाहतां भूतलोक ॥५०॥भूतलोक वेगीं सांडुनीयां जावें । विचारें पाहावें परब्रह्म ॥५१॥परब्रह्म तेंचि आपणची आहे । दास म्हणे पाहें अनुभवें ॥५२॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP