मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट अभंग| ११ ते १५ स्फुट अभंग बाळक्रीडा वैराग्यशतक ज्ञानशतक सगुणनिर्गुणसंवादशतक १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ स्फुट अभंग - ११ ते १५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ स्फुट अभंग - ११ ते १५ Translation - भाषांतर ११जाणावा तो नर देवचि साचार । वाचे निरंतर राम नाम ॥१॥सगुणीं सद्भाव नाहीं ज्ञानगर्व । तयालागीं सर्व सारखेचि ॥२॥निंदकांवंदकां सगट सांभाळीं । मन सर्वकाळीं पालटेना ॥३॥पालटेना मन परस्त्रीकांचनीं । निववी वचनीं पुढिल्यांसी ॥४॥पुढिल्यांसि तोचि सुख देत आहे । उपकारीं देव लावीतसे ॥५॥लावीतसे देह राजभजनास । रामीरामदास हरिभक्त ॥६॥१२भक्तपनें रामानाचा अव्हेर । करी तो गव्हार मुक्त नव्हे ॥१॥मुक्त नव्हे काय स्वयें शूलपाणी । रामनाम वाणी उच्चारितो ॥२॥राम म्हणे शिव तेथें किती देव । बापुडें मानव देहधारी ॥३॥नर देहधारी धन्य ते संसारीं । वाचे निरंतरीं रामनाम ॥४॥रामनाम वाचे स्वरूप अभ्यंतरीं । धन्य तो संसारीं दास म्हणे ॥५॥१३मी खरा पतित तूं खरा पावन । आतां अनमान करूं नको ॥१॥आतां कांहीं मज चिंता तीहि नसे । तुझें नाक कैसें वाचे येई ॥२॥समर्थें घेतला नामासाठीं भार । मज उपकार कासयाचा ॥३॥रामदास म्हणे तुझें तुज उणें । सोयरीं पिशुनें हांसतील ॥४॥१४पतितपावना जानकीजीवना । वेगीं माझ्या मना पालटावें ॥१॥मिथ्या शब्दज्ञानें तुज अंतरलों । संदेहीं पडलों मीपणाच्या ॥२॥सदा खळबळ निर्गुणाची घडे । सगुण नातुडे ज्ञानगवें ॥३॥रामदास म्हणे ऐसा मी पतित । मीपणे अनंत आतुडेना ॥४॥१५टाळ धरूं कथा करूं । रामालागीं हाका मारूं ॥१॥ये रे रामा ये रे रामा । तुझी आवडी लागो आम्हां ॥२॥तुजविण गाईल कोण । ऊठ सांडिलें मीतूंपण ॥३॥रामदास पाहे वास । भेटी द्यावी सावकाश ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP