मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट अभंग| १६ ते २० स्फुट अभंग बाळक्रीडा वैराग्यशतक ज्ञानशतक सगुणनिर्गुणसंवादशतक १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ स्फुट अभंग - १६ ते २० समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ स्फुट अभंग - १६ ते २० Translation - भाषांतर १६रामभक्तीविण आन नाहीं सार । साराचें हें सार राम एक ॥१॥कल्पनाविस्तारू होतसे सत्वरू । आम्हां कल्पतरू चाड नाहीं ॥२॥कामनेलागोन विटलेंसे मन । तेथें चाड कोण कामधेनू ॥३॥चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं । तेथें चिंतामणी कोण पुसे ॥४॥कदा नाहीं नाश स्वरूप सुंदर । तेथें आम्हां हिरे चाड नाहीं ॥५॥रामदास म्हणे रामभक्तीविने । जाणावें तें उणें सर्व कांहीं ॥६॥१७सीतापति राम पतितपावन । गाती भक्तजन आवडीनें ॥१॥राघवाच्या गुणा न दिसे तुळणा । कैलासींचा राणा लांचावला ॥२॥देवाचें मंडण भक्तांचें भूषण । धर्मसंरक्षण राम एक ॥३॥रामदास म्हणे धन्य त्याचें जिणें । कथानिरूपणें जन्म गेला ॥४॥१८आम्हीं देखिला विठोबा । आनंदें विटेवरी उभा ॥१॥तेथें दृश्याची जे दाटी । तेचि रूक्मिणी गोमटी ॥२॥रामीरामदास म्हणे । जो ओळखे तोचि धन्य ॥३॥१९लांचावोनी भक्तिलोभा । असे वाळवंटी उभा ॥१॥पदकीं इंद्रनीलशोभा । प्रभे उजळती शोभा ॥२॥भक्त पुंडलिकें गोंविला । जाऊं नेदी भांबाविला ॥३॥भाग्य पुंडलिकाचें । उभें दैवत त्रिलोकींचें ॥४॥कीजें तारूं भवसागरीं । विनटलें भीमातीरीं ॥५॥पुंडलिकें करूनी जोडी । आम्हां दिधली कल्पकोडी ॥६॥तुटली संसारसांकडीं । रामदास म्हणतसे ॥७॥२०जीवन्मुक्त प्राणी होउनीयां गेले । तेणें पतें चाले तोचि धन्य ॥१॥जाणावा तो ज्ञानी पूर्णसमाधानी । निःसंदे मनीं सर्वकाळ ॥२॥मिथ्यादेहभान प्रारब्धाआधीन । राखे समाधान पूर्णपणें ॥३॥आवडीनें करी कर्म उपासना । सर्वकाळ ध्यानारूढ मन ॥४॥पदार्थाची हाणीं हाता न ये कोणी । जयाची करणी बोला ऐसी ॥५॥धन्य धन्य ते पैंदास संसारीं उदास । तयां रामदास नमस्कारी ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP