मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८६ वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ८६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ८६ वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर श्रृण्वतां गदतां शश्वदर्चतां त्वाऽभिर्वन्दताम् । नृणां संवदतामन्तहृदि भास्यमलात्मनाम् ॥४६॥श्रवणनिष्ठ जे तव भक्त । तव पदप्रेमें भवविरक्त । त्यां तव दर्शन ध्यानीं प्राप्त । अमळचित्त म्हणोनियां ॥३३०॥एवं तव गुणगणव्याख्याते । साधनधनसंपन्न विशुद्धचित्तें । तव दर्शन ध्यानीं त्यांतें । ध्यानीं एकान्तें फावतसे ॥३१॥एक तव पदसपर्यानिरत । विषयप्रवाहीं निःशेष विरत । चित्तशुद्धिद्वारा प्राप्त । त्यां तव एकान्त हृत्कमळीं ॥३२॥एक अन्वयबोधशाळी । सर्वभूतीं तव निहाळी । वंदनासक्त करूनि मौळी । प्रेमकल्लोळीं विराजती ॥३३॥एक सम्यक् बरव्या परी । उपनिषद्वाक्यांचिया विवरीं । आत्मप्रत्ययें परस्परीं । अमळान्तरीं संवादती ॥३४॥ऐसिया अमळान्तरा नरां । साधनसंपन्ना भक्तनिकरां । ध्यानींच दर्शनलाभ पुरा । प्रत्यक्ष न घडे मज ऐसा ॥३३५॥मजला प्रकट तव दर्शन । अकस्मात रिघोनि सदन । दुर्लभ हाचि पूर्ण । जे प्रत्यक्ष गोगण सेवितसे ॥३६॥सुखसंवादें सनाथ केलें । वियोगभेदातें निरसिलें । आत्मबोधें आनंदविलें । तें मी बोलें काय वदूं ॥३७॥जरी तूं म्हणसी भो यदुवीरा । विश्वहृदयस्थ ईश्वरा । ध्यानीं दर्शन अमळान्तरा । सूर्यजलधरा समसाम्यें ॥३८॥मेघें पिहित ज्याचे नयन । सूर्य न त्या प्रकाशमान । ज्यांची दृष्टि न रोधी घन । साङ्ग विकर्त्तन ते पाहती ॥३९॥तैसीच येथ जीवोपाधि । अविद्यात्मक विपरीतबुद्धि । चिदाभासाचें वयुन रोधी । दर्शनसिद्धि तैं कैंची ॥३४०॥अविद्यावरणाचा निरास । विपरीतभ्रमा तैं होय नाश । तरी हें न घडे सर्वगतास । एकदेशित्व आरोपिलें ॥४१॥अविद्याभ्रमा माजिही काये । आत्मयावीण प्रकाशक आहे । तरी दर्शनावाप्ति होये । एका न होय कां म्हणसी ॥४२॥यदर्थीं ऐकें भो श्रीधरा । देहात्मवंता श्रुतिज्ञा चतुरां । हृदयस्थ असोनि दूरतरा । कर्मठां नरां तूं अससी ॥४३॥हृदिस्थोऽप्यतिदूरस्थः कर्मविक्षिप्तचेतसाम् । आत्मशक्तिभिरग्राह्योऽप्यन्त्युपेतगुणात्मनाम् ॥४७॥वेद त्रैगुण्यविषयात्मक । पूर्वपक्षींच्या श्रुति सम्यक । विवरूनि विश्वस्त फळकामुक । करिती मख बहुविध पैं ॥४४॥अपरोक्ष आत्मा हृदयस्थ असतां । उपनिषद्बोध न बाणे चित्ता । फलाभिलाषें ऋतुसुकृता । संपादितां न शिणती ॥३४५॥इंद्र अग्नि सूर्य सोम । वरुणप्रमुख यथाकाम । यजिती पृथग्देवतानाम । मंत्रपठनें नममान्त ॥४६॥तयां फळदाता तूं श्रीहरि । भाससी लोकलोकान्तरीं । श्रुतिविश्वासें अंतरीं । प्रतीति पुरी अवगमिती ॥४७॥हृदयस्थ आसोनि दूरतर । तयां जाहलासि तूं ईश्वर । स्वपदप्रनतां निकटतर । असतां दूर अवगमसी ॥४८॥हृदयस्थ आणि दूर कैसा । म्हणसी तरी ऐकें परेशा । आत्मशक्ति करूनि सहसा । अप्रपय म्हणूनि दूरतर ॥४९॥आत्मा म्हणिजे अंतःकरण । तच्छक्ति त्या करणगण । तिहीं ग्राह्य विषयभान । त्या कोठून तव प्राप्ती ॥३५०॥ऐसियाही अप्राप्तिवंतां । सप्रेम श्रीपदप्रणतां । श्रवणादि नवविधभजनासक्ताम । निकट तत्वता तूं होसी ॥५१॥हेंचि प्रमेय विस्तारून । पुढती श्लोकें वक्ष्यमाण । चतुर्थ्यत करूनि नमन । वदला ब्राह्मण तें ऐका ॥५२॥नमोऽस्तु तेऽध्यात्मविदां परात्मने अनात्मनें स्वात्मविभक्तमृत्यवे । सकारणाकारनलिङ्गमीयुषे स्वमाययाऽसंवॄतरुद्धदृष्टये ॥४८॥तुजकारणें प्रणाम माझा । असो भो श्रीगरुडध्वजा । द्विविध भावी तयांतें सहजा । निकट दूरी द्विधात्मका ॥५३॥अध्यात्मवेत्ते अपरोक्षज्ञ । निरसूनि देहात्मविद्यावरण । परमात्मा तूं प्रतीयमान । केला आपण होत्साते ॥५४॥तयां कारणें परमत्मत्वें । प्रतीयमान तूं आत्मतत्वें । अविद्यावरणनाशासवें । कीं मोक्षद म्हणावें लागतसे ॥३५५॥तया परमात्मया तुजकारणें । माझें नमन अनन्यपणें । अभेदबोधें निकट म्हणणें । लागे काय यावरीही ॥५६॥अनात्मत्वेत्ते दूरतर । भेदभ्रमें ज्या आत्मविसर । तयांतें प्रतीतिगोचर । मृत्युसंसारभयभेदें ॥५७॥भेदभ्रमें भांबावले । दृश्य सत्यत्वें भाविलें । तेथ जीवत्वें परिणमलें । त्या जीवचैतन्या तुज नमो ॥५८॥माया कार्य अविद्यावरण । यालागिं अविद्या सकारण । स्वरूप स्वसंवेद्य परिपूर्ण । माया अकारण यास्त्व पैं ॥५९॥भेदभ्रमासि अवसर नाहीं । यालागिं अकारण माया पाहीं । देहीं लिंगीं दोहीं ठायीं । द्विधा उपाधी माजिवडा ॥३६०॥सकारणा अकारणा । उभयलिंगोपलब्धा पूर्णा । तुज नमो श्रीजनार्द्दना । उभयपणा नियमितया ॥६१॥आपणा पासूनि उभयोपाधी । त्या उभयां वश्य जो बोधाबोधीं । तया जीवात्मया मी वंदीं । विभक्तप्रबोधीं मृत्युमया ॥६२॥स्वमायेसि तूं अनावृत । यालागिं तूं नियंता श्रीभगवंत । स्वमायेकरूनि असंवृत । ऐसें संबोधी श्रुतिनिकर ॥६३॥स्वमायेचें अनावरण । ज्यातें तो तूं श्रीभगवान । यालागीं अलुप्तैश्वर्यपूर्ण । नियंता म्हणोन मायेचा ॥६४॥मायानियंतया तूतें । माझें नमन भो पूर्णातें । मायासंवृतां जीवांतें । दृष्टिरोधका तुज नमन ॥३६५॥देहात्मजीवात्मपत्ययवंत । तो नियम्य ही तूंचि येथ । ईश्वर नियंता समर्थ । त्या तुज प्रणत नियंतया ॥६६॥ऐसिया परीच्या परमेश्वरा । नमन माझें भो ईश्वरा । शिक्षीं आम्हां भृत्यनिकरा । आज्ञा करा सेवेची ॥६७॥काय मी करूं तव सेवन । ऐसें कीजे आज्ञापन । इतुकें श्रुतदेवें प्रार्थून । बोलिला वचन तें ऐका ॥६८॥स त्वं शाधि स्वभृत्यान्नः कि देव करवामहे । एतदन्तो नृणां क्लेशो यद्भवानक्षगोचरः ॥४९॥पूर्वोक्तपरीचा तूं ईश्वर । नाट्यें नव्हसी मानवी नर । यास्तव माझा नमस्कार । प्रार्थना सादर अवधारीं ॥६९॥आम्हां भृत्यां शिक्षित करीं । नियोजूनि यथाधिकारीं । करणीय कथावें तें शिरीं । धरूं श्रीहरि निर्धारें ॥३७०॥मर्त्यांलागिं तोवरी क्लेश । जवंवरी तुझा हा सगुणवेश । गोचर नोहे इंद्रियांस । तंववरी अशेष भवदुःख ॥७१॥तूं जरी अक्षगोचर भगवंत । तेव्हांचि भवक्लेशासि अंत । भाग्यें केलें मज सनाथ । कृपावंत होऊनियां ॥७२॥इतुकी श्रुतदेवें प्रार्थना । सप्रेम केली जनार्दना । तें शुकें नृपासि कथूनि जाणा । वक्ष्यमाणा निरूपी ॥७३॥श्रीशुक उवाच - तदुक्तमित्युपाकर्ण्य भगवान्प्रणतार्तिहा । गृहीत्वा पाणिना पाणिं प्रहसंस्तमुवाच ह ॥५०॥शुक म्हणे गा कौरवाग्रणी । ऐकूनि द्विजाची विनवणी । बोलता जाला चक्रपाणी । तें तूं श्रवणीं अवधारीं ॥७४॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । यालागिं नामें श्रीभगवान । प्रणतजनांचा आर्तिहरण । हास्यवदनें बोलतसे ॥३७५॥स्वहस्तें ब्राह्मणाचा हस्त । धरूनि तोषवी त्या प्रशस्त । वाक्यें वदला तीं समस्त । ऐकें समोक्त नृपनाथा ॥७६॥महर्षि ब्रह्मनिष्ठ भले । आपणा सवें सदना आले । तुल्यभावें सम्मानिले । परि स्तवनें तोषविले आपणया ॥७७॥प्रश्नादिकें सम्मुखीकरण । आपणा केलें हें जाणोन । दीर्घदर्शी श्रीभगवान । प्रश्नविवरण करूनि वदे ॥७८॥स्वभृत्यातें शिक्षा करीं । ऐसें वदली द्विजवैखरी । तदनुसार शिक्षी हरी । तें रहस्य चतुरीं जाणावें ॥७९॥आपुल्या ठायीं अधिकतर । देखूनि द्विजाचा परमादर । आपणाहूनि श्रेष्ठ भूसुर । शिक्षापर हें बोधी ॥३८०॥लोकसंग्रहार्थ पूर्ण । आपुलें भूचक्रीं अवतरण । आपणाहूनि पूज्य बाह्मण । हें अनुशासन शिक्षितसे ॥८१॥माझे भजनीं आदर मंद । मजहूनि वरिष्ठ वेदविद । जाणोनि भजे जो साधकवृंद । त्या मी मुकुंद प्रिय मानीं ॥८२॥साद्यंत लक्षूनि हें रहस्य । मुखीं दावूनि मंदहास्य । शिक्षारूप ब्राह्मणास । बोधी परेश तें ऐका ॥८३॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP