मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८६ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ८६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ८६ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर फलार्हणोशीरशिवामृतांबुभिर्मृदा सुरभ्या तुलसीकुशाम्बुजैः ।आराधयामास यथोपन्नया सपर्यया सत्वविवर्द्धनान्धसा ॥४१॥पूजासंभार सिद्ध केले । ते श्रीशुकें जैसे कथिले । तैसे अनुक्रमें वाखाणिले । जाती वहिले तें ऐका ॥२७०॥चूत कदळें बदरें पनसें । नारिकेळें कपित्थें सुरसें । जंबु जंबीरें अननसें । शेवें शेपें आमळक ॥७१॥इत्यादि अनेकफळसंभार । छात्रीं करितां वनसंचार । अनायासें ते समग्र । इक्षुदंडादि आणिले ॥७२॥शिवा म्हणिजे राजधात्री । तियेचीं फळें प्रिय सर्वत्रीं । सहज संपादिलीं जीं छात्रीं । वनस्म्चारीं परिभ्रमतां ॥७३॥यावरी सुगंधद्रव्यजाती । मृदाशब्दें वेधवती । प्रकट कस्तूरी जियेतें म्हणती । आणि संपत्ति वनोद्भवा ॥७४॥कमळें कुश तुळशी पवित्रा । उशीर मूळिका सुगंधतरा । पंचामृतादि सुस्वादु नीरा । पूजासंभारा आणूनी ॥२७५॥ऐसे संभार यथोपपन्न । परोपतापरहित जाण । संपादिले तिहीं करून । अर्ची भगवान सप्रेमें ॥७६॥पादावनेजन पूर्वीच कथिलें । त्यावरी पूजन आरंभिलें । तें ही जातसे निरूपिलें । श्रवण केलें पाहिजे ॥७७॥करूनि पादपूजा प्रथम । मग अर्चितसे पुरुषोत्तम । वसनाभरणें उत्तमोत्तम । स्मरूनि अक्षता वाहिलिया ॥७८॥ब्रह्मसूत्र वाहिलें कंठीं । चंदन रेखियला ललाटीं । पुष्पावतंस खोविले मुकुटीं । मलयजउटी चर्चियली ॥७९॥कंठीं घातले सुमनहार । वरी उधळिला परिमळ धूसर । धूप दीप सकर्पूर । बहुप्रकार आरतिया ॥२८०॥जेणें सत्वाची वृद्धि होय । आयुः सत्व बळ निरामय । सुखतम आणि रसाळ प्रिय । ते रससोय वोगरिली ॥८१॥दिव्यपक्कान्नें अमृतोपमें । तृणधान्याचीं उत्तमोत्तमें । सत्वशुद्धीचीं मुनिसत्तमें । अतिसप्रेमें रुचविलीं ॥८२॥ऐसा नैवेद्य अर्पूनि हरि । आंचवणार्थ सुतप्त वारी । केशरकस्तूरी चंदन करीं । करोद्वर्तना मर्द्दविला ॥८३॥सूक्ष्म सपूर श्वेत वसनें । परिमार्जूनि करतळवदनें । सभास्थानीं समाधानें । बैसते जाले मुनिवर्य ॥८४॥मध्यें बैसला घननीळ । भवंता मुनिवर्यांचा मेळ । फळें अर्पिलीं रुचिरें बहळ । दीधलें ताम्बूल सकळांतें ॥२८५॥काया वाचा मन धन सदन । दक्षिणे करूनि कृष्णार्पण । यथाशक्ति भूरि हिरण्य । अर्पूनि मुनिजन तोषविले ॥८६॥कर्पूर नीराजन उजळिले । मंत्रपुष्पा समर्पिलें । प्रदक्षिणा करूनि केलें । अभिवंदन पोष्येंसीं ॥८७॥अपराधाचें क्षमापन । करवी अंजलिपुट जोडून । अमृतवचनीं केलें स्तवन । आज मी धन्य म्हणे आपणा ॥८८॥ऐसा पूजूनि चक्रपाणी । ब्राह्मण आनंदभरित मनें । वितर्क करी अंतःकरणीं । तो सज्जनीं परिसावा ॥८९॥स तर्कयामास कुतो ममान्वभूद्गृहान्धकूपे पतितस्य सङ्गमः ।यः सर्वतीर्थास्पदपादरेणुभिः कृष्णेन चास्यात्मनिकेतभूसुरैः ॥४२॥मग तो श्रुतदेव ब्राह्मण । मानसीं वितर्क करी पूर्ण । कोण्या महत्सुकृतें करून । मज सन्निधान हें जाहलें ॥२९०॥माझा अधिकार निजमानसें । मी च विवरूनि पाहतसें । गृहान्धकूपीं पतित दिसें । त्या मज ऐसें सन्निधान ॥९१॥सच्चिदानंदा अनुपलब्धि । मनःसंकल्पें तरळली बुद्धि । धांवे करणांचे पाणधी । विषयासिद्धिप्रलोभें ॥९२॥यालागिं अंधधिषणानयन । न लाहती उपनिषद्बोधाञ्जन । नुदेजतं गुर्वर्क पूर्ण । अंध वयुन निजस्मृतीचें ॥९३॥घोर निशीथ अंधकूपीं । तो हा भवभ्रम संसाररूप । गृहासक्तिगृहिणीस्तनप । पोष्य धनधान्यपश्वादि ॥९४॥मी ऐसिये अंधकूपीं । पडिलों अहंताममताजल्पीं । आत्मविसरें मनःसंकल्पीं । बद्ध त्रितापीं जाचतसें ॥२९५॥ऐसिया अंधकूपीं पतिता । मज हा दुर्ल्लभ संगम आतां । प्रपत जाला पैं अवचिता । कोणा सुकृतास्तव न कळे ॥९६॥दुर्ल्लभ संगम तो कोणता । ऐसी शंका कीजेल श्रोतां । तरी जो वदला श्रीशुकवक्ता । तेंचि आतां अवधारा ॥९७॥सर्वतीर्थांचें माहेर । तो जयाचा पदपांसुनिकर । केवळ भूतळींचे निर्ज्जर । निवासमंदिर कृष्णाचें ॥९८॥तया भूसुरांसहित कृष्ण । अकस्मात माझें सदन । प्रवेशूनि कल्मषदहन । केलें सन्निधान देऊनी ॥९९॥शतक्रतूचे तुलने वारी । ऐसा संगम नर निर्ज्जरीं । न भोगिजे तो बैसल्या घरीं । कवणे परी मज घडला ॥३००॥ऐसे वितर्क वारंवार । करूनि विस्मय करी फार । दुर्लभ संग सुखाचा भर । सेवनीं सादर तें ऐका ॥१॥सूपविष्टान्कृतातिथ्यान्श्रुतदेव उपस्थितः । सभार्यस्वजनापत्य उवाचाङ्घ्र्याभिमर्शनः ॥४३॥सप्रेम आतिथ्य केलें ज्यांचें । सुष्ठु आसनीं उपविष्ट साचे । निकट बैसूनि चरण त्यांचे । मर्दी सभार्य स्वजनेंसीं ॥२॥श्रुतदेव ब्राह्मण सप्रेमभरित । सन्निध बैसला एकाग्रचित्त । भार्यापत्यां स्वजनांसहित । चरण मर्दी कृष्णाचे ॥३॥ऐसा चरणसंवाहनीं । सादर असतां मंजुळवाणी । बोलता जाला तें सज्जनीं । सावध श्रवणीं परिसावें ॥४॥श्रुतदेव उवाच - नाद्य नो दर्शनं प्राप्तः परं परमपूरुषः । यर्हीदं शक्तिभिः सृष्ट्वा प्रविष्टो ह्यात्मसत्तया ॥४४॥म्हणे भो भो भोगशयना । भवभजनीया भवभंजना । भगणपवंशा भासुरवदना । भद्रारमणा भगवंता ॥३०५॥तुझें दर्शन आजीच आम्हां । जाहलें म्हणों जरी पुरुषोत्तमा । तरी हें पूर्वींच आगमा निगमां । कथितां महिमा जाणतसों ॥६॥करणनिकरा अगोचर । जो तूं प्रकृतीहूनियां पर । त्या तव स्वरूपाचा पार । नेणती विधिहरमुनिवर ही ॥७॥तथापि नेणती हें न म्हणावें । निगम सुगमत्वें करिती ठावें । तेव्हां वास्तव तत्व आगह्वें । मादृशजीवें जाणिजतें ॥८॥प्रधानाचेनि अंगीकारें । शुद्धसत्वाच्या आविष्कारें । पूर्णचैतन्यपद उभारे । तैं त्वां ईश्वरें जागोनी ॥९॥न रमे एकाकी हे वाणी । बहुत्व व्हावें हे शिराणी । तैं स्वशक्ती सत्वादिगुणीं । विश्व सृजनि उभारिसी ॥३१०॥तया विश्वीं स्वसत्ताप्रविष्ट । तैम्चि गोचर गोगणां प्रकट । आजीच दर्शन जालें स्पष्ट । म्हणतां नीट न घडे कीं ॥११॥विश्वीं प्रविष्ट जाहलासि जेव्हां । तैंच फावला दर्शनठेवा । आजीच दुर्ल्लभ लाभ म्हणावा । कां पां केशवा तें ऐक ॥१२॥आजीच नव्हसी दर्शन प्राप्त । विश्वं विष्णुःहा नामसंकेत । महर्षिमुखें मादृशां विदित । तैं अप्रपतदर्शन कें ॥१३॥तस्मात दर्शन पूर्वींच आहे । पैं तें भ्रामक मायामयें । झांकिलें विषयांच्या प्रवाहें । आत्मप्रत्ययें कवळेना ॥१४॥तो तूं आजी परमपुरुष । मुनिजनेंसीं निजात्मतोष । मूर्त होऊन गोगणांस । फावसी विशेष हा येथ ॥३१५॥कृषीवळें क्षेत्रीं उत्पन्न जोंधळा । कोंभ करवाड ग्रंथि पाला । पोटरा कणिस फुलवरा आला । एवं सगळा यावनाळ ॥१६॥ऐसियाचें दर्शन जालें । तरी काय यावनाळा न देखिलें । परंतु मूळीं बीज विरूढलें । निर्धारिलें तें न वचे ॥१७॥यालागिं पाहतां हा अन्वय । तूंचि विश्वात्मा विश्वमय । परं म्हणिजे उत्कृष्ट सोय । दर्शनलाभ आजि या ॥१८॥कस्तूर्यादिसुरभिवस्तु । माज जडत्वें सौरभ्य स्वस्थु । तैसाचि पोतासही पदार्थु । घनीभूत अवघाची ॥१९॥वर्ण नयनांतें गोचर । सौरभ्य घ्राणातें रुचिकर । नाम श्रवणाचा व्यापार । जाणे रसभर रसना ही ॥३२०॥त्वगिन्द्रियासी शीतळ स्पर्श । एवं पंचधा करणां दृश्य । म्हणतां शनैः शनैः अदृश्य । होय निःशेष अगोचर ॥२१॥तेंवि चैतन्य घनीभूत । केवळ सच्चिदानंद मूर्त । यादववंशीं श्रीभगवंत । दर्शना प्राप्त दुर्ल्लभ पैं ॥२२॥मायिक सृष्टि मिथ्याभूत । तेथ आत्मा नित्य सत्य । प्रविष्ट जाला हा वृत्तान्त । ऐक दृष्टान्त देहींचा ॥२३॥यथा शयानः पुरुषो मनसैवात्ममायया । सृष्ट्वा लोकं परं स्वाप्नमनुविश्यावभासते ॥४५॥जैसा शयनीं निद्रित पुरुष । मनःसंकल्पें विश्वाभास । अविद्याभ्रमें सृजूनि अशेष । तदनुप्रविष्ट भासतसे ॥२४॥अथवा आत्मा तूं ईश्वर । तुझिये मायेकरूनि अपर । स्वप्नींची सृष्टि भासे पर । सत्य साचार जीवातें ॥३२५॥तये सृष्टीचा अभिमानी । स्वप्नींचा लोक विलोकूनी । तदनुप्रविष्ट आपणा मानी । हर्षग्लानी अनुभूत ॥२६॥परी ते मिथ्या स्वाप्नसृष्टी । स्वप्नामाजि यथार्थ दृष्टि । तूं ही तैसिये परिपाटीं । विश्वपटीं प्रविष्टवत् ॥२७॥यास्तव तुझें तें दर्शन । जालें असतां न जालें जाण । म्हणोनि आजि दुर्ल्लभ पूर्ण । मजलागून हा लाभ ॥२८॥दुर्ल्लभ लाभ मज हा जाला । तैसा नोहेचि आणिकाला । साधनसंपन्ना साधकाला । तो तूं गोपाळा अवधारीं ॥२९॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP