मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६६ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ६६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय ६६ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर अक्षैः सभायां क्रीडंतं भगवंतं भयातुराः । त्राहि त्राहि त्रिलोकेश वह्नेः प्रदहतः पुरम् ॥३६॥सारीपाट मांडूनि पुढा । भगवन्तातें करितां क्रीडा । अग्निभर्यातीं हंमरडा । केला रोकडा ते ठायीं ॥६४॥त्राहि त्राहि भो जगदीशा । त्रिजगद्रक्षका त्रिलोकेशा । प्रकर्षें वह्नि क्षोभला कैसा । केली कोळसा द्वारावती ॥२६५॥जैसा जाळी शुष्केन्धना । तयाचि सारिखा दिव्यभुवना । रत्नखचिता हेमसदना । जाळितां कृशाना पळ न लगे ॥६६॥भगवंता तूं पाहसी कायी । आम्हा तुजवीण रक्षिता नाहीं । द्वारकापुराची केली लाही । धांव लवलाहीं जगज्जीवना ॥६७॥ऐसें प्रार्थिती लहान थोर । ऐकतां जनांचा सशोक गजर । क्रीडा टाकूनि जगदीश्वर । पाहे सत्वर तें ऐका ॥६८॥श्रुत्वा तज्जनवैक्लव्यं दृष्ट्वा स्वानां च साध्वसम् । शरण्यः सहसन्प्राह मा भैष्टेत्यवितास्म्यहम् ॥३७॥ऐकूनि जनाची वैक्लव्यग्लानि । संकट स्वकीयांचें देखूनी । शरणां शरण्य चक्रपाणि । बोले हांसोनि तयांप्रति ॥६९॥ना भी म्हणोनि अभयहस्तें । तयाचीं चित्तें केलीं स्वस्थें । भेऊं नका कृतान्तातें । रक्षितां तुम्हांतें मी आहें ॥२७०॥माझिये छायेसि असतां तुम्हां । कायसी अग्निभयाची गरिमा । मज न स्मरतां पावलां श्रमा । कीजे क्षमा तें अवघें ॥७१॥ऐसें अभय देऊनि सर्वां । ज्ञानीं पाहतां वासुदेवा । कपटकृत्या जाणोनि बरवा । प्रयोग योजिला तो ऐका ॥७२॥सर्वस्यांतर्बहिःसाक्षी कृत्यां माहेश्वरीं विभुः । विज्ञाय तद्विघातार्थं पार्श्वस्थं चक्रमादिशत् ॥३८॥सर्वांचिये अभ्यंतरीं । व्यापक गगनाही माझारी । तेणें कृत्या माहेश्वरी । प्रयोगाभिचारी जाणीतली ॥७३॥विभु समर्थ श्रीभगवान । कृत्याप्रतिकारार्थ पूर्ण । आज्ञापिलें सुदर्शन । देदीप्यमान धगधगित ॥७४॥कृष्णाज्ञेचा प्रताप । सुदर्शनाचें उग्र रूप । भंगावया कृत्याग्निदर्प । प्रेरिलें सकोप तें ऐक ॥२७५॥तत्सूर्यकोटिप्रतिमं सुदर्शनं जाज्वल्यमानं प्रलयानलप्रभम् ।स्वतेजसा खं ककुभोऽथ रोदसी चक्रं मुकुन्दास्त्रमथाग्निमार्दयत् ॥३९॥कृष्णाज्ञेसरिसें चक्र । गगनीं संचरलें अवक्र । कोटिभास्कर भा भासुर । विधि हर शक्र भयचकित ॥७६॥स्फुरद्रूप ज्वालानिचय । गगन झालें ज्वालामय । प्रळयपावक कैंचा काय । कान्ता आय न संवरे ॥७७॥अधोर्ध्व दिक्चक्र भरलें नभ । केंउता प्रलयरुद्राचा क्षोभ । मुकुन्दास्त्र तें काळाग्निप्रभ । कृत्या अशुभ आर्दितसे ॥७८॥अभिचारप्रयोगजनितकृत्या । माहेश्वरी परम व्रात्या । देखतां चक्राग्नीच्या नृत्या । प्रेरका मृत्या अर्पितसे ॥७९॥केवळ विष्णुस्मरणापुढें । अभिचारकाप्ट्य समूळ उडे । कृत्याकृत्य तें केवढें । चक्रपडिपाडें तुळावया ॥२८०॥लागतां सुदर्शनाच्या ज्वाळा । धरि न पुरे कृत्यानळा । प्राणधाकेंचि तये वेळा । क्षोभें परतला तें ऐका ॥८१॥कृत्यानलः प्रतिहतः स रथांगपाणेरस्त्रौजसा स नृप भग्नमुखो निवृत्तः ।वाराणसीं परिसमेत्य सुदक्षिणं तं सर्त्विग्जनं समदहत्स्वकृतोऽभिचारः ॥४०॥म्हणाल परतोनि केलें काय । तो ऐकावा अभिप्राय । निर्बळाच्या शस्त्रान्यायें । फिरोनि अपायकर झाला ॥८२॥रथाङ्गपाणि जो श्रीकृष्ण । त्याचें अस्त्र सुदर्शन । तयाच्या तेजें कपटकृशान । पोळतां क्षोभोन परतला ॥८३॥अब्रह्मण्यावरी प्रयोजिसी । तरी हा साधील संकल्पासी । ब्रह्मण्यावरी प्रेरितां त्यासीं । विपरीतार्थेंसी क्षोभला ॥८४॥चक्राग्नीनें करितां भग्न । अभिचाराग्नि क्षोभला पूर्ण । विमुख झाला द्वारकेहून । सम्मुख सुदक्षिण लक्षिला ॥२८५॥जैसा होय विद्युत्पात । तैसा पडिला वाराणसींत । ऋत्विग्ब्राह्मणजनपदासहित । केला घात नृपाचा ॥८६॥स्वकृत क्षोभला अभिचार । तेणें केला तत्संहार । ज्याचें त्यावरी फिरलें शस्त्र । सर्व परिवार जाळिला ॥८७॥अद्यापि जे प्रयोगपर । प्रेरिती साबरादि अभिचार । विपरीत होऊनि ते सत्वर । करिती संहार प्रेरकांचा ॥८८॥असो क्षोभला अभिचार । तेणें राजा सहपरिवार । जाळिला तयाचिसरिसें चक्र । पातलें क्रूर तें ऐका ॥८९॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP