मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६६ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ६६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय ६६ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर शूलैर्गदाभिः परिघैः शक्त्यृष्टिप्रासतोमरैः । असिभिः पट्टिशैर्बाणैः प्राहरन्नरयो हरिम् ॥१६॥एके रथीं पंकजपाणि । काशीपति पौण्ड्रक दोन्ही । सेना पंच अक्षौहिणी । हरीतें वेष्टूनि अरि भिडती ॥३॥एक हृदयीं खोंचिती शूळ । गदाघातें भेदिती मौळ । परिघप्रहारें वक्षःस्थळ । परिघकुशळ हाणूं पाहती ॥४॥एक शक्ति हाणिती निकरें । एक ऋष्टिनामकें शस्त्र । एक भेदिती प्रासप्रहारें । एक तोमरें मेळविती ॥१०५॥एक ते खड्गखेटकपाणी । कृष्णा पाचारिती रणीं । एक धनुर्धर विंधिती बाणीं । समराङ्गणीं अरिवर्ग ॥६॥एक ते पठ्ठे बिरुदाइत । पादचारी प्रतापवंत । अश्वसारथियांचा घात । अकस्मात करूं पाहती ॥७॥जे काम महारथी अतिरथी । बिरुदें बडिवारें मिरविती । अस्त्रें शस्त्रें ते प्रेरिती । मंत्रशक्ति प्रकटूनी ॥८॥मेघ वर्षती प्रबळधारीं । तेणें झांकोळे जेंवि गिरि । तेंवि वीरांच्या शस्त्रमारीं । न दिसे हरिरथकेतु ॥९॥चहूंकडूनि शस्त्रास्त्रमार । होतां देखोनि शार्ङ्गधर । शिञ्जिनी वाहूनि सत्वर । टणत्कारिलें कोदण्ड ॥११०॥बाणीं भंगूनि शस्त्रास्त्रघना । पौण्ड्रककाशीराजाच्या सेना । मर्दिता झाला तें कुरुरत्ना । सदस्यगणासह परिसें ॥११॥कृष्णस्तु तत्प्रौंड्रककाशिराजयोर्बलं गजस्यंदनवाजिपत्तिमत् ।गदासिचक्रेषुभिरार्द्रयद्भृशं यथा युगांते हुतभुक्पृथक्प्रजाः ॥१७॥दिव्यायुधें प्ररूनि हरि । उभय सेना मारिल्या समरीं । जैसा प्रजांतें पृथगाकारीं । पावक संहरी प्रळयान्तीं ॥१२॥धनुर्विद्याप्रवीण योद्धे । मार्गणीं संहारिले क्षणार्धें । भंवते प्रेरितीं शस्त्रें विविधें । चक्रायुधें ते वधिलें ॥१३॥गज भंगिलें गदाप्रहारीं । अश्वसादी नंदकधारीं । रथी मारिले तीक्ष्णशरीं । केलें चक्रचुरीं पदाति ॥१४॥शार्ङ्गनिर्मुक्तबाणवृष्टि । होतां सकंप हर परमेष्ठी । म्हणती प्रळय पावली सृष्टि । कूर्में पृष्ठी कांपविली ॥१५॥थरारिला ब्रह्माण्डगोळ । अमर मानिती प्रळयकाळ । संहाररुद्राचा नेत्रानळ । गमे प्रज्वळला जनदहना ॥१६॥ऐसिये शरवृष्टीतळवटीं । उभय कटकां केली आटी । तया रणरंगाची गोठी । शुक वाक्पुटीं वाखाणी ॥१७॥आयोधनं तद्रथवाजिकुंजरद्विपत्खरोष्ट्रैररिणाऽवखंडितैः ।बभौ चितं मोदवहं मनस्विनामाक्रीडनं भूतपतेरिवोल्बणम् ॥१८॥वीरश्रीरंग बाणला आंगीं । तेणें रणरंगीं शार्ङ्गी । चतुरंगिणी भंगूनि वेगीं । केले भूभागीं प्रतनिचय ॥१८॥संग्रामभूमीचें मंडळ । आयोधन नामें बोलती कुशळ । तें तें काळीं प्रेतबहळ । जालें गोपाळकरचक्रें ॥१९॥चक्रप्रहारें चतुरंगिणी । गजरथखरोष्ट्र विखंडूनी । पदिले तत्प्रेतीं ते धरणी । व्याप्त होऊनि विराजली ॥१२०॥क्रमेळ पदाति अश्वसादी । चक्रें खंडित अवयवसंधी । पडिले त्यांचीं मांसें गीधीं । खंडिजेताती उत्साहें ॥२१॥मनस्वी जे वीरश्रीवंत । ते ते स्थानीं आनन्दभरित । शस्त्रास्त्र यानें हय रथ गज । परमपुरुषार्थ वरिताती ॥२२॥सायुज्यमुक्तीसहित चारी । जेहीं नोवर्या वरिल्या समरीं । ते ते कृष्णचक्राच्या प्रहारीं । उत्साहगजरीं विराजती ॥२३॥येर पामरें पडिलीं क्षिती । आईबाधनकामिनींतें स्मरती । प्रपंचयोगें आक्रंदती । तोंडीं माती पडिल्याही ॥२४॥अवयव जाले खंडविखंड । तथापि वांचवावया पिण्ड । करिती केवीलवाणें तोण्ड । ग्लानि उदण्ड भाकूनि ॥१२५॥म्हणती नेणती बाईल घरीं । टाकूनि कोठें पातलों समरीं । येथें पडलिया चक्रप्रहारीं । प्रियतम अंतुरी अन्तरली ॥२६॥एक म्हणती लेंकुरें तान्हीं । भोळी बापुडी कामिनी । अक्षम त्यांचे संगोपनीं । जाली विघडणी मज त्यांची ॥२७॥एक म्हणती ठेविलें धन । त्याचें कोणा न केलें कथन । माझे समरीं गेलिया प्राण । सांगेल कोण स्त्रीपुत्रां ॥२८॥एक स्मरती रिणायितां । पाशीं गुंतूनि राहिल्या अर्था । आठवूनि हृदयांमाजी खतां । प्राण तत्त्वता विसर्जिती ॥२९॥एक म्हणती वृत्तीसाठीं । व्यवहारीं शत्रूंचीं मुखवटीं । स्तंभिलीं ते मज मेलिया पाठीं । जेवितीं ताटीं दूधभात ॥१३०॥पुरुषार्थसाधक रणप्रवीण । वीरश्रीवल्लभ मनस्विमान्य । उभयलोकीं धन्य धन्य । जितां मरतां म्हणविती जे ॥३१॥नरदेह केवळ हे रणमही । चक्रायुधाच्या चिन्तनघाईं । पडिल्या कैवल्य जोडिलें तिहीं । प्रपंचप्रवाहीं भवभणगें ॥३२॥असो ऐसें तें आयोधन । जें कां समरमहीचें स्थान । भूतपतीचें क्रीडासदन । तेंवि उल्बण विराजलें ॥३३॥कोण म्हणाल भूतपति । भूतग्रासक जो कल्पान्तीं । प्रलयरुद्र ज्यातें म्हणती । श्मशानक्षितीमाजि वसता ॥३४॥भूतग्रासें आनन्दपूर्ण । त्याचें जैसें क्रीडाभुवन । तयासारिखें समरस्थान । शोभायमान विराजलें ॥१३५॥असो उभय सेनेची कथा । पुढें पौण्ड्रका कृष्णनाथा । समरीं भाषण झालें मिथा । तें कुरुनाथा अवधारीं ॥३६॥अथाऽऽह पौण्ड्रकं शौरिर्भो भो पौंड्रक यद्भवान् । दूतवाक्येन मामाह तान्यस्त्राण्युत्सृजामि ते ॥१९॥सैन्य मारूनियां समस्त । सम्मुख पौण्ड्रकाचा रथ । एक्या रथेंसी कृष्णनाथ । देखूनि वदत तयाप्रति ॥३७॥उभय सेना भंगलियावरी । भो भो पौण्ड्रका म्हणे हरि । दूत धाडूनि द्वारकापुरीं । मज ज्या उत्तरीं वदलासी ॥३८॥तियें हीं ममायुधें तुजप्रति । मी निक्षेपितों समरक्षिती । त्यांच्या लाभें निजविश्रान्ती । भोगीं पुरती भवनाशें ॥३९॥त्याजयिष्येऽभिधानं मे यत्त्वयाज्ञ मृषा धृतम् । व्रजामि शरणं तेऽद्य यदि नेच्छामि संयुगम् ॥२०॥आणि माझें नाम त्वां वृथा धरिलें । तें मी टाकवीन ऐसें कथिलें । तेंचि येथूनि सत्य झालें । जें दुसरें खंडलें अभिधान ॥१४०॥जरी तुज न देववे मजसीं रण । तरी मज सत्वर येईं शरण । ऐसें ऐकोनि तुझें वचन । आलों तीक्ष्ण वेगेंसी ॥४१॥तुजसीं समर न करवे मातें । तरी आजि शरण येईन तूतें । ऐसें बोलोनि रुक्मिणीकान्तें । शर शार्ङ्गातें सज्जिला ॥४२॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP