मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६६ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ६६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय ६६ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर इत्यादिष्टस्तथा चक्रे कृष्णायाभिचरन्व्रती । ततोऽग्निरुत्थितः कुण्डान्मूर्तिमानतिभीषणः । तत्पताम्रशिखाश्मश्रुरंगारोद्गारिलोचनः ॥३१॥शिवें आज्ञापिला होत्साता । तैसाचि झाला तो आचरता । कृष्णाकारणें अभिचार घाता । इच्छूनि तत्वता व्रतस्थ ॥३९॥अभिचारयज्ञीं जे जे नियम । ते ते आचरला सकाम । तेणें अभिचार देवता विकराळ परम । संपतां होम प्रकटली ॥२४०॥कुण्डापासूनि भयानक । प्रकतला मूर्तिमंत पावक । पिङ्गट शिखा श्मश्रु तिख । तप्त ताम्र प्रतिभाती ॥४१॥खदिराङ्गारसदृश डोळे । बाहेर पडों पाहती बुबुळें । प्रळयरुद्राचे नेत्रखोळे । पासोनि ईशाळ क्षोभला ॥४२॥तयाचे साङ्ग अवयव राया । सावध होईं परिसावया । ऐसें प्रार्थितां कौरववर्या । शुक आचार्या कौतुकें ॥४३॥दंष्ट्रोग्रभ्रुकुटीदंडकठोरास्यः स्वजिह्वया । आलिहन्सृक्किणी नग्नो विधुन्वंस्त्रिशिखं ज्वलत् ॥३२॥पद्भ्यां तालप्रमाणाभ्यां कंपयन्नवनीतलम् । सोऽभ्यधावद्बृतो भूतैद्वारिकां प्रदहन्दिशः ॥३३॥दंष्ट्रा दण्ड अतिकठोर । भृकुटी कुटिल भयंकर । तिहीं करूनि क्रूर वक्त्र । जिह्वा उग्र लाळीतसे ॥४४॥जिह्वा लळलळी ताम्रतिख । तेणें विशाळ विक्राळ मुख । चाटित सृक्किणी सम्यक । श्रवणपर्यंत चपलत्वें ॥२४५॥सूर्यबिम्बाच्या उदयकाळीं । ज्वाळा भासती उदयाचळीं । तैसा त्रिशिख त्रिशूळ करतळीं । विद्युन्माळी झेलीतसे ॥४६॥उच्चताल वृक्षप्रमाण । दीर्घ भयंकर दोन्ही चरण । मूर्धा भेदूनि गेला गगन । भासती ग्रहगणसम नेत्र ॥४७॥जयाच्या विक्रमतळवटीं । भूतळ कांपे थरथराटी । वेष्टित भूतगणाची घरटी । नग्न कटितटीं पिङ्गरोम ॥४८॥डोंगरीं प्रज्वळला वडवाग्नि । तैसा सर्वाङ्गीं प्रदीप्त वह्नि । असंख्यात प्रमथगणीं । द्वारकादहनीं प्रवर्तला ॥४९॥पश्चिम दिशा जाळावया । धाविन्नला कौरवराया । पर्वतपृष्ठीं क्षोभोनियां । वज्रकल्लोळ जेंवि पडे ॥२५०॥द्वारकाभुवनीं अकस्मात । जैसा पडे विद्युत्पात । तैसा क्षोभला भूतां सहित । पुरी जाळीत चालिला ॥५१॥उच्चतरें प्रासादशिखरें । माद्या मंदिरें दामोदरें । त्वष्ट्टनिर्मितें पुरगोपुरें । प्रळयाङ्गारें धडकलीं ॥५२॥अट्टाळिया सभास्थानें । पण्यवीथि दीर्घ दुकानें । अमूल्य वैदूर्यमणिरत्नें । कपटकृषानें जळताती ॥५३॥हाहाकार द्वारकापुरीं । आक्रंदती नरनारी । म्हणती पडलों प्रळयाङ्गारीं । स्मरती हरि आकान्तीं ॥५४॥तमाभिचारदहनमायांतं द्वारकौकसः । विलोक्य तत्रसुः सर्वे वनदाहे यथा मृगाः ॥३५॥अभिचार प्रयोगजनिताग्नि । क्षोभें आला प्रज्वळोनी । द्वारका धडकली देखोनी । आकान्त पुरजनीं मांडिला ॥२५५॥अग्नि देखोनि भयंकर । द्वारकावासी नारीनर । प्राणिमात्र लहान थोर । त्रासले समग्र प्रानभयें ॥५६॥पळूनि जावया नाहीं ठाव । आतां कैसे वांचती जीव । म्हणती क्षोभला वासुदेव । कांहीं उपाव या न करी ॥५७॥मृग श्वापदें वणवयामाजी । पडलिया कोंडूनि जळती सहजीं । तैसी अवस्था आम्हांसी आजी । धूम्रध्वजीं वरपडिलों ॥५८॥गगनीं झळंबती प्रचंड आह्या । पाषाण फुटोनि होती लाह्या । कोठें ठाव न दिसे राह्या । द्वारकराया मग स्मरती ॥५९॥प्रयोजनिताभिचारवह्नि । क्षोभें पेटला द्वारकाभुवनीं । रत्नखचितां हेमसदनीं । धडके तृणीं जियापरी ॥२६०॥ऐसिया जोहरीं जनसंघाट । जयासि जिकडे सांपडे वाट । पळत आले दाटोदाट । करिती बोभाट राजसभे ॥६१॥जिये राजसभेच्या ठायीं । यादव वृष्णि भोज सर्वही । उग्रसेनप्रमुख पाहीं । शेषशायी उपविष्ट ॥६२॥तंव जनाचा हाहाकार । एकसराचि ऐकिला गजर । कोण्या प्रकारें तो विचार । ऐक साचार परीक्षिति ॥६३॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP