मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६६ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ६६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय ६६ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर यानि त्वमस्मच्चिह्नानि मौढ्याद्बभिर्षी सात्वत । त्वक्त्वैहि मां त्वं शरणं नो चेद्देहि ममाहवम् ॥६॥मूढत्वास्तव माझीं चिह्नें । शङ्खचक्राब्ज कौस्तुभाभरणें । जितुकीं न कळूनि तुवां धरणें । जीवां वांचवणें त्यजूनी ॥४२॥चिह्नें टाकूनियां मातें शरण । येऊनि चुकवीं आपुलें मरण । गर्व धरिसी तरी तूं रण । देईं निर्घृण मम समरीं ॥४३॥स्त्रिया मेळविलिया बहुसाळा । त्यांचें सौभाग्य रक्षीं कुशळा । शरण होऊनि मज चिरकाळ । विचरें प्राञ्जळ भूलोकीं ॥४४॥अथवा मरणाचे डोहळे । झाले असती प्रेरिल्या काळें । तरी तूं मजसीं गर्वबळें । येऊनि मिसळें समरंगी ॥४५॥ऐसी द्विविध आज्ञा माझी । वंदूनि भजे आवडत्या काजीं । ऐसी दूतें यदुसमाजीं । कारुषवाणी निवेदिली ॥४६॥दूतमुखें हेम कारुषवाणी । यादवी ऐकूनि सभास्थानीं । पुढें केली जैसी करणी । तेहि श्रवणीं अवधारा ॥४७॥श्रीशुक उवाच - कत्थनं तदुपाकर्ण्य पौंड्रकस्याल्पमेघसः । उग्रसेनादयः सभ्या उच्चकैर्जहसुस्तदा ॥७॥शुक म्हणे गा कुरुपुङ्गवा । उग्रसेनादिकां यादवां । ऐकतां पौण्ड्रकोक्ति सर्वा । कथिल्या अपूर्वा ज्या दूतें ॥४८॥मंदमति जो अल्पमेधस । तया पौण्ड्रकाचे संदेश । ऐकोनि दूतमुखें अशेष । यादवां विशेष स्मय गमला ॥४९॥सभ्यांसहित उग्रसेन । पौण्ड्रकाचें विकत्थन । हांसते झाले होतां श्रवण । उच्च दशन प्रकाशुनी ॥५०॥म्हणती अभिनव ऐकिली मात । मृगेन्द्र समरा आमंत्री बस्त । मत्कुण मानूनि रावण अल्प । युद्धा काकुत्स्थ पाचारी ॥५१॥मशक मेरूतें आंगवणे । थडकूनि गगनीं उडवीन म्हणे । कीं कालकूटाचे आरोगणे । भणगें बैसणें पारणिया ॥५२॥किंवा मुंगीस निघाले पांख । कीं पक्क झालें कदलीपीक । कीं संतानवृद्धीचा मानूनि हरिख । वृश्चिकी तोक धरी जठरीं ॥५३॥तेंवि पौण्ड्रकाची आयुष्यगणना । पुरली म्हणोनि हे विकत्थना । दूतद्वारा प्रेरूनि कृष्णा । समरांगणा आमंत्रिलें ॥५४॥ऐसे समस्त सभास्थानीं । यादव श्मश्रु स्पर्शूनि पाणि । वदते झाले तें ऐकुनी । दूतांलागोनि हरि बोले ॥५५॥उवाच दूतं भगवान्परिहासकथामनुय । उत्स्रक्ष्ये मूढ चिह्नानि यैस्त्वमेवं विकत्थसे ॥८॥ऐकोनि दूतोक्तिप्रसंग । देखोनि यदुचक्राचा रंग । बोलता झाला कमलारंग । दूता अमोघ प्रतिवचनें ॥५६॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो दूतातें बोले वचन । पौण्ड्रकोक्ति उपहासून । श्रीभगवान जगज्जेता ॥५७॥दूताप्रति म्हणे हरि । माझें प्रत्युत्तर अवधारीं । तैसेंचि पौण्ड्रका निवेदन करीं । तो मग तुजवरी न क्षोभे ॥५८॥अरे पौण्ड्रका मूढमति । ज्या चिह्नांची तुजला खंती । तुझ्या ठायीं तियें निगुती । मी निश्चिती प्रेरीन ॥५९॥जया चिह्नांसीं विकत्थना । करूं पाहसी आंगवणा । त्यांच्या ठायीं समरांगणा । माजी ग्रहणा प्रवर्ते ॥६०॥अथवा अब्जदरारिकौमोदकी । कृत्रिम चिह्नीं कौस्तुभादिकीं । वासुदेव म्हणविसी लोकीं । तीं मी निकीं सांडवीन ॥६१॥शरण येऊनि वांचवीं प्राण । ऐसें सांगूनि धाडिलें वचन । त्याचें प्रत्युत्तर हें जाण । करीं श्रवण दूतमुखें ॥६२॥मुखं तदपिधायाज्ञ कंकगृध्रवटैर्वृतः । शयिष्यसे हतस्तत्र भविता शरणं शुनाम् ॥९॥शरण होऊनि वांचवीं प्राणा । केली ज्या मुखें हे वल्गना । आच्छादूनियां तया वदना । करिसी शयना जे समयीं ॥६३॥पक्षी वटादि गृध्र कंक । श्येन वायस मांसभक्षक । तुण्डें तोडिती श्रवण नाक । अवयव सम्यक विदारिती ॥६४॥तये समयीं शृगाल श्वान । त्यातें होऊनि ठासी शरण । तुझिये पिशाताश्रयें जाण । प्राणतर्पण ते करिती ॥६५॥कृष्णें ऐसिया प्रत्युत्तरें । दूत फिरूनि धाडिला त्वरें । पुढें वर्तलें तें कुरुवरें । अत्यादरें परिसावें ॥६६॥इति दूतस्तदाक्षेपं स्वामिने सर्वमाहरत । कृष्णोऽपि रथमास्थाय काशीमुपजगाम ह ॥१०॥कृष्णापासूनि परतला दूत । कारुषा येऊनि भेटला त्वरित । प्रत्युत्तर जें भगवद्दत्त । तें समस्त निवेदिलें ॥६७॥दूत म्हणे करुषपति । कृष्णसभेसि तुमच्या उक्ति । निवेदिल्या त्या ऐकुन चित्तीं । बालिशमतीसम गमिल्या ॥६८॥मम मुखें तुमचीं आज्ञावचनें । यादवीं ऐकिलीं जेव्हां श्रवणें । उपेक्षिलीं तीं हास्यवदनें । सागर तृणें जेंवि त्यजी ॥६९॥कृष्णें दिधलें प्रत्युत्तर । ममायुधांचा मानिसी भार । तरी तियें टाकीन तुजसमोर । घेईं सादर होत्साता ॥७०॥शरण येईं मातें म्हणसी । तो तूं श्वानश्रृगाला शरण होसी । कंक गृध्र वट बैसोनि शिशीं । मांसकवळासी जै घेती ॥७१॥इत्यादि निष्ठुरीं प्रत्युत्तरीं । मातें विसर्जूनियां हरि । रथ सज्जूनि अंतकापरी । येतो समरीं जिणावया ॥७२॥दूतें ऐसी पौण्ड्रकाप्रति । कथिली कृष्णाची प्रत्युक्ति । तंव येरीकडे कमलापति । करी प्रवृत्ति समराची ॥७३॥दारुका पाचारूनियां हरि । म्हणे रहंवर सज्ज करीं । जाणें आहे पौण्ड्रकावरी । आयुधें समरीं टाकावया ॥७४॥आज्ञा देतां कृष्णनाथ । दारुकें सज्ज केला रथ । वरी बैसोनि कमलाकान्त । काशीप्रान्त आक्रमिला ॥७५॥कारुषसमरा केली स्वारी । तरी कां ठाकिली काशीपुरी । ऐसी शङ्का कीजेल चतुरीं । तेंही निर्धारीं परिसावें ॥७६॥कारुष काशीपतीचा मित्र । दोघीं मिळोनि रचिला मंत्र । यालागीं पौण्ड्रकें काशीपुर । होतें निरंतर अधिष्ठिलें ॥७७॥हें जाणोनि पंकजपाणि । आला काशीपुरा ठाकूनी । पौण्ड्रकें वार्ता ऐकूनि कानीं । केली करणी तें ऐका ॥७८॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP