मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५८ वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ५८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ५८ वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर बध्वा तान्दामभिः शौरिर्भग्नदर्पान्हतौजसः । व्यकर्षल्लीलया बद्धान्वालो दारुमयान्यथा ॥४६॥शूरसेनाचा नातु हरि । यालागीं नामें बोलिजे शौरि । तेणें सातही वृषभ एके हारी । बांधोनि दोरीं आकर्षिले ॥८४॥दर्प भंगला त्या वृषभाचा । तेजोलोप जाला साचा । धर्म निथळे सर्वांगाचा । लोप शक्तीचा जाला पैं ॥३८५॥ऐसियांतें चक्रपाणि । वोढिता जाला धरूनि कानीं । सभानायकां दाविलें नयनीं । प्रतिज्ञा जाणोनि आश्चर्य ॥८६॥जेंवि काष्ठाचीं वृषभ घोडीं । दोर बांधूनि बाळक वोढी । सप्त वृषभां ते परवडी । केली रोकडी श्रीकृष्णें ॥८७॥हें देखोनि कोशलपति । आणि पुरजनींहि समस्तीं । जयजयकार केला प्रीति । नाग्रजिती हरिखेली ॥८८॥यादववीर थरारिले । तिहीं जयजयकार केले । कृष्णें नोवरीतें जिंकिलें । आतां वहिलें चला म्हणती ॥८९॥श्रृंगारूनियां नाग्नजिती । नेते जाले शिबिराप्रति । कोशलराजा करी विनति । सप्रेमभक्ति यदुवर्या ॥३९०॥म्हणे माझें पूर्वसंचित । होतें अनंतजन्मार्जित । तया पुण्यें आजि येथ । कृष्ण जामात जोडला ॥९१॥प्रतापें नोवरी जिंकिली पणी । त्यावरी माझी एक विनवणी । यथासूत्रें विधिविधानीं । पाणिग्रहणीं वरावी ॥९२॥दासांमाजि गणूनि मातें । सनाथ कीजे श्रीभगवतें । चार्ही दिवस राहोनि येथें । मत्पूजेतें स्वीकरिजे ॥९३॥ऐसें विनवितां कोसलपति । ऐकोनि तोषला कमलापति । शिबिरा नेऊनि नाग्नजिती । दिधली पुढती रायातें ॥९४॥ततः प्रीतः सुतां राजा ददौ कृष्णाय विस्मितः । तां प्रत्यगृण्हाद्भगवान्विधिवत्सदृशीं प्रभुः ॥४७॥त्यानंतरें प्रीतीकरून । कोसलपति कन्यादान । करिता जाला विस्मयें करून । कृष्णाकारणें सद्भावें ॥३९५॥दोहींकडील मूळपत्रिका । सुहृदां आप्तां धाडिल्या देखा । वसनीं गौरवूनियां वार्तिकां । म्हणती ठाका समयातें ॥९६॥अक्रूर गेला हस्तिनापुरा । पत्रिका अर्पिली युधिष्ठिरा । तेणें प्रेरिलें प्रार्थवीरा । माद्रीकुमरांसमवेत ॥९७॥उभयपक्षींचे सोयिरे आप्त । ऐकोनि पातले जी समस्त । वैदिक दैवज्ञ विपश्चित । आणिले त्वरित लग्नासी ॥९८॥देवकप्रतिष्ठा दोहींकडे । करिते जाले द्विज निवाडे । ब्राह्मण पूजिले वाडेंकोडें । अहेर ज्येष्ठा अर्पिती ॥९९॥सेवती रुखवत अर्पिलें हरि । कोशलें आदर केला भारी । अनेक वाद्यांचिया गजरीं । कोसलपुरी गर्जतसे ॥४००॥साळंकृत नारी नर । मिरवती जैसे स्वर्गीं अमर । गुढिया मखरीं साळंकार । लाजवी नगर अमरपुरा ॥१॥मार्तंडमंडलोदय लक्षूनी । घटिका प्रतिष्ठिली जीवनीं । वधूमंडपा फळ घेऊनी । गजरें यादव पातले ॥२॥मंडपा आणूनि नग्नजिती । अक्रूरें पूजिली यथानिगुती । वस्त्राभरणें अर्पूनि भक्ति । गेले पुढती स्वशिबिरा ॥३॥सवेंचि वरासि निघालें मूळ । नग्नजितराजा कोशलपाळ । सवें घेऊनि सोयरे सकळ । आला तत्काळ हरिशिबिरा ॥४॥वाजंत्रांची लागली घायी । नर्तकी नाचती ठायीं ठायीं । बिरुदावळी पढती पाहीं । भाट बंदिजन बहुसाल ॥४०५॥ रायें करूनि श्रीकृष्णपूजा । वस्त्राभरणें अर्पिलीं वोजा । वोहमायेनें सहजीं सहजा । तेलवणासी समर्पिलें ॥६॥अमूल्य तुरंग श्यामकर्ण । त्यावरी आरूढ जाला कृष्ण । भंवता सुवासिनींचा गण । अक्षता मौळीं समर्पिती ॥७॥सात्वत दाशार्ह यादव । वृष्णि अंधक भोज माधव । अर्जुनप्रमुख वर्हाडी सर्व । निघाले स्वमेव उत्साहें ॥८॥दणाणिलिया कुंजरभेरी । पताका डोलती दिव्यांबरीं । गगन झांकलें तुंगातपत्रीं । श्वेतचामरीं हरि वीजिती ॥९॥शशांकवलयासमान छत्रें । विकसित गमती सहस्रपत्रें । आश्चर्य मानिजे दशशतनेत्रें । ऐकोनि श्रोत्रें हरिगरिमा ॥४१०॥विवाहमंडपा आला वर । दासी पिहित करिती द्वार । त्यांसि देऊनि तदुपचार । वसनाभरणीं गौरविल्या ॥११॥वोंवाळूणि सांडिती मुद । नेत्रां स्पर्शिती तोय विशुद्ध । तळी उतरूनियां मुकुंद । मंडपीं प्रसिद्ध मग नेती ॥१२॥रत्नखचित चौकीवरी । मृद्वासन सह झल्लरी । त्यावरी बैसवूनियां श्रीहरि । राजा करी मधुपर्क ॥१३॥अर्घ्य पाद्य सर्वोपचार । अर्पूनि पूजिला जगदीश्वर । रत्नखचित अलंकार । पीताम्बर नेसविला ॥१४॥वैरणा घालूनि क्षीरोदक । उभा केला त्रैलोक्यजनक । मध्यें धरूनियां जवनिक । नोवरी सम्यक आणियली ॥४१५॥द्विजवर पढती मंगलपद्यें । हरियशमिश्रें कविकृत सद्यें । म्हणती सावधान उपाध्ये । दैवतें आद्यें चिंता हो ॥१६॥लक्ष्मीनारायणचिंतन । किजे म्हणती सावधान । नाहीं लग्नासी व्यवधान । घटिका पूर्ण जानोनी ॥१७॥ग्रहहोरा द्रेष्काण शुद्ध । नवांश द्वादशांश अमळ विशुद्ध । त्र्यंशांशांचा स्वामी बुध । अमोघफलद जाणा हो ॥१८॥ॐपुण्यकाळीं अंतःपट । सुटतां वधूवरें एकवट । द्विजवर करिती निगमपाठ । जाला बोभाट वाद्यांचा ॥१९॥मृक्ताफळीं लग्नाक्षता । कृष्णें घातल्या नोवरीमाथा । तेव्हां लाहूनि पूर्णता । जाली तत्त्वता हरियोग्य ॥४२०॥कृष्णकृपेची योग्यता जाली । मग नोवरी हरिवरी अक्षता घाली । वियोगाची काळिमा गेली । सबाह्य भरली हरिलाभें ॥२१॥ऐसें पाणिग्रहण जालें । कंकण उभयांसि बांधलें । बोहर बोहला बैसविलें । मग आदरिलें हवनातें ॥२२॥अग्निप्रतिष्ठा आसादनीं । विवाहहोमीं शांतिपठनीं । अक्षता वधूवरांच्या मूर्ध्नि । टाकिल्या ब्राह्मणीं ते काळीं ॥२३॥सप्तपदी करपीडनीं । वरदक्षिणा चक्रपाणि । देता जाला आनंदोनी । कल्याणखाणी वधूजनक ॥२४॥भूरि दक्षिणा वांटिलें कनक । मंडपीं गौरविले याचक । श्रवण पिळावया श्यालक । जाले सम्मुख ते काळीं ॥४२५॥त्यांसी तदुचित वसनाभरणें । देऊनि गौरविले मेहुणे । यावरी राजा सप्रेम वचनें । करी प्रार्थने यदुवर्या ॥२६॥वृद्धाचारें चक्रपाणि । चतुर्थ होम आमुचे सदनीं । सहपरिवारें साङ करूनी । मजलागूनि तोषविजे ॥२७॥प्रार्थनेसरिसा श्रीमुरारि । मंडपीं राहोनि दिवस चारी । विवाहोत्सव साङ्ग करी । नवनोवरीसमवेत ॥२८॥नवर्हाडियांसि तिलक माळा । परिमळद्रव्यें धूसर उधळा । विडे देऊनियां सकळां । नृपें केला जयगजर ॥२९॥नोवरी देऊनि कडियेवरी । गौरीहरांतें नेती हरि । तेथें पूजुनि शंकरगौरी । आम्र वधूवरीं शिंपियला ॥४३०॥चार्ही दिवस अन्नशान्ति । रायें करूनि यथानिगुती । मांडिली साडियांची आइती । शुभ मुहूर्तीं द्विजवचनें ॥३१॥वाणपालटण जालियावरी । साडे आरंभिले दिवसीं येरीं । मुहूर्त पाहोनियां द्विजवरीं । केली सामग्रीं साडियांची ॥३२॥प्राड्मुख बैसवूनियां वधूवरें । प्रत्यड्मुखें कोशलेश्वरें । उभयपक्षी निजसोयरे । बैसते जाले स्वपक्षीं ॥३३॥ऐरणीपूजन करिती द्विज । नाग्नजितीसह गरुडध्वज । पूजिता जाला कोशलराज । सहितभाज वधूजननी ॥३४॥वायनें अर्पूनियां द्विजवरां । अहेरीं गौरवी यादववीरां । नोवरी निरवी शार्ङ्गधरा । आनि अक्रूरादिकां सकळां ॥४३५॥वंशपात्र विस्तारून । शिरीं ठेवूनि देती मान । कृष्णप्रमुख यादवगण । करिती निरवण त्यांप्रति ॥३६॥कोशलपतीच्या समस्त वनिता । देखोनियां जामात दुहिता । हर्षनिर्भर जाल्या चित्ता । तेंचि श्रोतां परिसावें ॥३७॥राजपत्न्यश्च दुहितुः कृष्णं लब्ध्वा प्रियं पतिम् । लेभिरे परमानंदं जातश्च परमोत्सवः ॥४८॥राजपत्न्या प्रहृष्टचित्तीं । कृष्ण लाधली नाग्नजिती । परस्परें प्रियदंपती । भाग्य म्हणती कुमरीचें ॥३८॥नेत्रीं आणोनियां अश्रुपात । कन्या निरविती त्या समस्त । परमानंदें वोसंडत । म्हणती सुकृत हें फळलें ॥३९॥जन्मोनियां आमुचे जठरीं । दैवें वरिला त्वां श्रीहरि । कुळतारिणी नौका खरी । भवसागरीं तूं आम्हां ॥४४०॥ आमुचे कुळीं हे जन्मली । आम्हीं पुत्रवत् प्रतिपाळिली । आतां यदुनंदना अर्पिली । तुम्हीं पाळिली पाहिजे ॥४१॥जन्मोनियां आमुचे कुळीं । इणें वरिला श्रीवनमाळी । कृष्णअर्धांगीं शोभली । यास्तव जाली जगज्जननी ॥४२॥उचलूनियां दोहीं करीं । यादवांचें मांडियेवरी । बैसवूनियां विनति करी । जे स्नेहें नोवरी पाळावी ॥४३॥दिव्य वसनें रत्नाभरनें । अर्पिलीं यादवांकारणें । सुगंधद्रव्यें माळा सुमनें । ताम्बूल देती चहूंकडे ॥४४॥लागली वाजंरांची घाई । भाट बिरुदें पढती पाहीं । गृहप्रवेशाचिये समयीं । उत्साह करिती तो ऐका ॥४४५॥शंखभेर्यानका नेदुर्गीतवाद्यद्विजाशिषः । नरा नार्यश्च मुदिताः सुवासःस्रगलंकृताः ॥४९॥ढोल दमामे शंख भेरी । आनक गोमुख काहळा गजरीं । दुंदुभिघोषें कोशलनगरी । गर्जे अंबरीं मेघरवें ॥४६॥नाचणीचे नाचती थाट । ठायीं ठायीं लखलखाट । नागरनरनारी संतुष्ट । वसनीं समृष्ट उज्वलित ॥४७॥अमरपुरंध्री अमरावती । माजि उत्साहें मिरवती । तैसिया साळंकृता युवती । नरसुरपति सम तोषें ॥४८॥सुमनावतंस सुमनहार । वस्त्राभरणीं शोभती नर । यावरी आंदण राजेश्वर । देता जाला तें ऐका ॥४९॥दशधेनुसहस्राणि पारिबर्हमदाद्विभुः । युवतीनां त्रिसाहस्रं निष्कग्रीवं सुवाससाम् ॥५०॥कामधेनूच्या काल्हवडी । दुभती सुरसुरभीसुरवाडी । तनुजाजामात आवडी । पंक्तिसहस्र आंदणा दे ॥४५०॥कार्तस्वराचीं भूषणें । वरी जडियलीं अमूल्य रत्नें । पदकेंसहित कंथाभरणें । ग्रीवामंडित विराजती ॥५१॥अग्निधौतें कनवसनें । बहुधा रंगीं विराजमानें । वुंथी कंचुकिया परिधानें । माळा सुमनी सुशोभिता ॥५२॥चारु चपळा चातुर्यखाणी । अवयपूर्ण सुभगा तरणी । ऐसिया तीन सहस्र आंदणीं । दासी दिधल्या दुहितेतें ॥५३॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP