मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५८ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ५८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ५८ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर तथैव सात्यकिः पार्थैः पूजितश्चाभिवंदितः । निषसादाऽऽसनेऽन्ये च पूजिताः पर्युपासत ॥६॥जैसा श्रीकृष्ण सम्मानिला । तैसाचि युयुधानही पूजिला । पृथगासनीं बैसविला । संतोषविला उपचारीं ॥५०॥तयाचिपरी अन्य यादव । कृष्णपार्षद जे कां सर्व । सभास्थानीं कृतगौरव । पूजा तदर्ह त्यां केली ॥५१॥समस्तांचें औपासन । लक्षूनि तिष्ठती पांचै जण । तंव येरीकडे श्रीभगवान । काय करी तें ऐका ॥५२॥पृथां समागत्य कृताभिवादनस्तयातिहार्द्रार्द्रशाऽभिरंभितः ।आपृष्टवांस्तां कुशलं सहस्नुषां पितृष्वसारं परिपृष्टबांधवः ॥७॥पृथेप्रति जनार्दन । येऊनि करी अभिवादन । तिणें देखतां भ्रातृनंदन । आसनावरून ऊठिली ॥५३॥हार्द म्हणिजे स्नेहसुभरें । आर्द्र दृष्टी जळ पाझरे । पृथेनें तया सप्रेमभरें । श्रीकृष्ण आदरें आळंगिला ॥५४॥मग तयेनें क्षेमकुशल । पुशिलें स्वबंधुवर्ग सकळ । तैसाचि भावुजयांचा मेळ । कंकाकंसादि पुशिलिया ॥५५॥श्रीकृष्णाच्या सापत्नमाता । इरा मदिरा देवरक्षिता । रोहिणीप्रमुखा त्या समस्ता । संतानसहिता पुशिलिया ॥५६॥स्नुषासहित कुंतीप्रति । क्षेम पुसे स्वयें श्रीपति । हें ऐकोनि अश्रुपातीं । गंहिंवरें कुंती दाटली ॥५७॥तमाह प्रेमवैक्लव्यरुद्धकंठाश्रुलोचना । स्मरंती तान्वहून्क्लेशान्क्लेशापायात्मदर्शनम् ॥८॥सप्रेमस्नेहाचिये भरीं । कळवळूनियां अभ्यंतरीं । कंठ दाटोनि स्फुंदन करी । बाष्प नेत्रीं पाझरती ॥५८॥श्रीकृष्णातें बोले वचनीं । कौरवांची कापट्यकरणी । भस्म केलें लाक्षासदनीं । कीं गरदानीं भीमवध ॥५९॥गान्धारांचिया दुरुक्ति दुष्टा । कीं सौबळोदिकांचिया कुचेष्टा । नित्य नूतन देती कष्टा । नेणों अभीष्टा तद्योगें ॥६०॥पदोपदीं दुःखराशि । किती सांगाव्या तुजपाशीं । तूं नांदसी हृदयकोशीं । सर्व जाणसी हृदयस्थ ॥६१॥बहुतां क्लेशांतें स्मरोन । ग्लानि पावोनि करी कथन । करुणावत्सल श्रीभगवान । तत्कारुण्य वांच्छितसे ॥६२॥निजभक्तांचे जितुके क्लेश । निरसावया ते अशेष । आपणातें दर्शवी त्यांस । तेणें क्लेशांस भंग करी ॥६३॥दर्शनें क्लेश निवारी सर्व । ऐसा नैसर्गिक स्वभाव । तो तूं प्रत्यक्ष वासुदेव । आमुची कींव तुजपोटीं ॥६४॥तदैव कुशलं नो भूत्सनाथास्ते कृता वयम् । ज्ञातीन्नः स्मरता कृष्ण भ्राता मे प्रेषितस्त्वया ॥९॥तैंचि आमुचें कल्याण जालें । जैं तां कृपेनें सनाथ केलें । आम्हां बंधूतें हृदयीं स्मरिलें । सांभाळिलें कृपेनें ॥६५॥आमुचा कळवळा अंतरा । म्हणोनि मम भ्राता हस्तिनापुरा । अक्रूरनामा धाडिला खरा । तैं तेणें लेंकुरां आश्वासिलें ॥६६॥जैं तां पाठविला श्वाफल्कि । तेणें आम्हांसि केलें सुखी । अन्याय धृतराष्ट्रामस्तकीं । बोधिलीं निकीं धर्मवाक्यें ॥६७॥आपुल्या ज्ञातीसमान आम्हां । तुवां लेखिलें पुरुषोत्तमा । आप्त परकीय मोहभ्रमा । तूं परमात्मा नातळसी ॥६८॥आपपर हें तुझ्या ठायीं । कोण्हे कालीं स्पर्शलेंचि नाहीं । म्हणसी कंसादि वधिले तेही । ऐकें नवाई तुज कथितें ॥६९॥न तेऽस्ति स्वपरभ्रांतिर्विश्वस्य सुहृदात्मनः । तथापि स्मरतां शश्वत्क्लेशान्हंसि हृदि स्थितः ॥१०॥आत्मयाहूनि प्रियतम सुहृद । अपर कोण तो शाश्वत सुखद । विश्वसोयरा तूं आम्हां विशद । सच्चिदानंदा परमात्मा ॥७०॥स्वप ऐशी अविद्याभ्रांति । अविद्याग्रस्तां जीवांप्रति । तुझ्या ठायीं नसे श्रीपति । तथापि चरितीं भासतसे ॥७१॥ऐकें तयाचें कारण । तूं हृदयस्थ सर्वग पूर्ण । भजतां छेदिसी अविद्यावरण । विवेकसंपन्न करूनियां ॥७२॥विवेकसंपन्न कृपेनें करिसी । तैं अविवेकाची निरसे निशी । विस्मरणाचिये सुषुप्तीसी । शांति आपैसी मग होय ॥७३॥विस्मरणाचिये सुषुप्तीमाजि । भेदभ्रमाची स्वप्नराजि । साच मानूनि क्लेशपुंजीं । बुडूनि सहजीं तळमळिती ॥७४॥तें सस्मरण दिनोदयीं । विस्मरणाची सुप्ति नाहीं । तैं भेदभ्रमाच्या स्वप्नीं पाहीं । क्लेश कायी उतरतील ॥७५॥शश्वत्स्मरणाच्या जागरीं । क्लेशहंता तूं हृदयस्थ हरि । भेदभ्रमितां क्लेशकारीं । सुषुप्तीभरीं विसराचे ॥७६॥यालागीं तूंतें निरंतर स्मरती । तत्क्लेशहंता तूं श्रीपति । भेदभ्रमें तुज द्वेषिती । ते भाविती शत्रुत्वें ॥७७॥पितृष्वसेनें इत्यादिवचनीं । संसारसुखदुःखांची कहाणी । निवेदिली ते ऐकोनि श्रवणीं । आज्ञा घेऊनि निघाला ॥७८॥मग येऊनि सभागारा । सात्यकिप्रमुखां यादववीरां । सहित येऊनि युधिष्ठिरा । पाण्डुकुमरांसह बैसे ॥७९॥तिये काळीं बद्धपाणि । धर्म बोलिला सरळवाणी । ते तूं कौरवचूडामणि । ऐकें श्रवणीं सप्रेमें ॥८०॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP