मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५८ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ५८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ५८ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर वरं विलोक्याभिमतं समागतं नरेंद्रकन्या चकमे रमापतिम् ।भूयादयं मे पतिराशिषोऽमलाः करोतु सत्या यदि मे धृतो व्रतैः ॥३६॥जैसा इच्छित होती मनीं । त्याहूनि वरिष्ठ कोटिगुणीं । भर्ता देखूनि नृपनंदिनी । मन्मथबाणीं भेदियली ॥१॥आवडिऐसा प्रिय संमत । आपण होऊनि जाला प्राप्त । त्यातें नृपदुहितेचें चित्त । जालें आसक्त सर्वस्वें ॥२॥जो कां रमेचा रमणीय भर्ता । तो वर विलोकूनि नरेंद्रदुहिता । मानसें वश जाली तत्सुरता । चिंती चित्तामाजिवडी ॥३॥दैवें मज हा हो कां पति । माझ्या अनेक व्रतसंपत्ति । अमळआशीर्वादांची प्राप्ति । तेणें श्रीपति वर लाभो ॥४॥दृढव्रतें म्यां वरिला मनीं । तो परमात्मा मज ये क्षणीं । फलद हो हा वर योजुनी । नृपनंदिनी हें वांच्छी ॥३०५॥नाग्नजितीचे मनोरथ । सबाह्य जाले कृष्णासक्त । ऐसी निरोपूनियां मात । नृप प्रार्थित तें ऐका ॥६॥अर्चितं पुनरित्याह नारायण जगत्पते । आत्मानंदेन पूर्णस्य करवाणि किमल्पकः ॥३७॥सभास्थानीं कोशलपति । स्वर्चित सुप्रसन्न श्रीपति । देखोनि त्यातें पुढतोपुढती । करी विनंति सप्रेमें ॥७॥भो भो निर्गुणा नीरायतना । जगत्पते श्रीनारायणा । किंकराची विज्ञापना । ऐकोनि आज्ञा मज दीजे ॥८॥देहधारियां जीवांप्रति । विषयसंयोगें आनंदप्राप्ति । आत्मानंदें ज्यासि तृप्ति । तया पूर्णासि विनंति काय करूं ॥९॥मी तो अल्प हीन दीन । तूं परमात्मा आनंदघन । काय करूं मी दास्याचरण । हें आज्ञापन मज कीजे ॥३१०॥त्रिजगीं विस्तृत तुझा महिमा । विदित विदुषा आगमनिगमां । भाग्यें तो तूं आजि आम्हां । सुलभ परमात्मा झालासी ॥११॥यत्पादपंकजरजः शिरसा बिभर्ति श्रीरब्जजः सगिरिशः सहलोकपालैः ।लीलातनुः स्वगतसेतुपरीप्सयेशः काले दधत्स भगवान्मम केन तुष्येत् ॥३८॥ज्याचे पादपंकजरज । शिरीं धरिती शिवअब्जज । लोकपाळांहीं सहित सहज । सुकृतपूज्य नरसुरही ॥१२॥कमला पदकमळाची धुळी । दुर्लभ लाभें धरूनि मौळीं । कमलवासिनी निजकरकमळीं । चरणकमला संवाहनीं ॥१३॥स्वकृतस्वधर्मसेतुपालना । इच्छूनि स्वजनाचिया कल्याणा । अवतार धरूनि लीला नाना । जगदुद्धरणा करी ईश ॥१४॥जिये काळीं स्वधर्मभंग । होतां देखोनि इंदिरारंग । पुढती स्वधर्म स्थापी साङ्ग । षड्गुण अभंग प्रकटूनी ॥३१५॥ऐसा मजवरी परमेश्वर । तोषोनि होय कृपाकर । कोण्ह्या उपचारें हें सधर । मम अंतर तर्कीना ॥१६॥अनेक जन्मांचें सुकृत । कीं पूर्वजांचें पूर्वार्जित । तेणें कृपेनें द्रवोनि येथ । मज सनाथ केलें पैं ॥१७॥आतां कृपेनें आज्ञा कीजे । जेणें जन्मसार्थक माझें । हें ऐकोनि गरुडध्वजें । तोषोनि सहजें वदिजेल ॥१८॥श्रीशुक उवाच - तमाह भगवान्कृष्णः कृतासनपरिग्रहः । मेघगंभीरया वाचा सस्मितं कुरुनंदन ॥३९॥शुक म्हणे गा परीक्षिति । नृपाची देखोनि अमळभक्ति । कृपेनें तोषोनि कमलापति । बोले त्याप्रति सप्रेमें ॥१९॥आसनीं बैसोनि सुपूजित । मेघगंभीरवाचा वदत । परमानंदें हास्ययुक्त । षड्गुणवंत हरि बोले ॥३२०॥श्रीभगवानुवाच - नरेंद्र याञ्चा कविभिर्विगर्हिता राजन्यबंधोर्निजधर्मवर्तिनः ।तथापि याचे तव सौहृदेच्छया कन्यां त्वदीयां न हि शुक्लदा वयम् ॥४०॥कृष्ण म्हणे गा राजेश्वरा । आम्हां क्षत्रियांचिया आचारा । याञ्चा परम निंद्यतरा । महर्षिंप्रवरीं निषेधिली ॥२१॥जन्मोनियां क्षत्रियकुळीं । जे सर्वदा स्वधर्मशाळी । तयां याञ्चा नाहीं बोलिली । शास्त्रकुशलीं सर्वज्ञीं ॥२२॥तथापि याचितों मी आपण । तुझिये सुहृदइच्छेकरून । तुझे जठरींचें कन्यारत्न । मजलागून समर्पी ॥२३॥शुक्ल म्हणिजे द्रव्यमात्र । तदर्थ आम्ही न हों पात्र । तुवां प्रार्थिलें त्याचें उत्तर । इतुकेंचि सार जाणावें ॥२४॥द्रव्यदानाचें पात्र नाहों । कन्यायाचक आलों आहों । तुवां पुशिलें काय देवों । तरी हा निर्वाह जाणावा ॥३२५॥ऐसी ऐकोनि भगवद्वाणी । राजा तोषोनि अंतःकरणीं । बोलता जाला तें तूं श्रवणीं । ऐकें करणी तत्कृत जे ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP