मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५८ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ५८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ५८ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - एकदा पाण्डवान्द्रष्टुं प्रतीतान्पुरुषोत्तमः । इंद्रप्रस्थं गतः श्रीमान्युयुधानादिभिर्वृतः ॥१॥राया अठ्ठावन्नीं कथा । पंच पाणिग्रहणें कर्ता । जाला श्रीकृष्ण तत्वता । ते तूं वार्ता अवधारीं ॥७॥कालिंदीच्या पाणिग्रहणा । हृदयीं चिंतूनि द्वारकाराणा । गेला पाण्डवांचिया दर्शना । सवें युयुधाना घेऊनि ॥८॥कालिंदीचा उद्वाहकाम । किमर्थ चिंती मेघश्याम । तरी तो स्वजनकल्पद्रुम । जाणोनि प्रेम तयेचें ॥९॥असो हें प्रसंगें येईल पुढें । प्रस्तुत पाण्डवदर्शनचाडे । गेले इंद्रप्रस्थाकडे । तेंचि निवाडें अवधारा ॥१०॥रुक्मिणी आणि जाम्बवती । तृतेय सत्यभामा युवती । तद्विलासप्रेमासक्ति । लालस श्रीपतिरतिरसिका ॥११॥आहुकभूपासन्निधानें । सुखोपविष्ट सभास्थानीं । स्वधर्मचर्चापुण्यश्रवणीं । चक्रपाणि वर्ततसे ॥१२॥उखामंडळीं मृगयामिषें । भोजान्धकवृष्णिसरिसे । भ्रमण करितां सुखसंतोषें । मुनिमानसें प्रोत्साही ॥१३॥ऐसा आनंदभरित काळ । क्रमित असतां श्रीगोपाळ । तंव आठवला पुण्यशीळ । हृदयकमळीं युधिष्ठिर ॥१४॥मग कोण्हे एके सुदैव दिवसीं । पाण्डवप्रेमें हृषीकेशी। जाकळूनि त्यां देखावयासी । इंद्रप्रस्थासी चालिला ॥१५॥प्रेमें जाकळावया कारण । जे लाक्षागारीं पाण्डवां मरण । तेचि प्रकटले पुन्हां वांचोन । पाञ्चाळभुवनीं अकस्मात ॥१६॥द्रौपदीचिये स्वयंवरीं । प्रकट जाले पाञ्चाळपुरीं । यंत्र भेदूनि राजे समरीं । जिणोनि नोवरी परणिले ॥१७॥कौरवांचा भंगिला दर्प । दाविला भूचक्रीं प्रताप । इंद्रप्रस्थीं युधिष्ठिर नृप । गृहस्थ होऊनि नांदतसे ॥१८॥ऐसिया पाण्डवांतें श्रीपति । पहावयाकारणें सप्रेमप्रीति । सात्यकिप्रमुख वाहिनेपति । दारुक सारथि रथ सज्जी ॥१९॥शुभमुहूर्तीं द्वारकापुर । सोडूनि निघाला जगदीश्वर । वामभागीं चास मयूर । जातां सूचिती शुभ शकुन ॥२०॥दक्षिणभागीं सवत्स धेनु । स्वर्चित ब्राह्मण प्रसन्नवदन । भेटले तिहीं आशीर्वचन । देऊनि कल्याण इच्छिलें ॥२१॥कुंजरपृष्ठीं प्रस्थानभेरी । भ्रूसंकेतें ठोकिल्या गजरीं । जननीजनकां भूपा हरि । नमूनि रहंवरीं आरूढले ॥२२॥लंघूनि साब्रमतीचें जळ । पुष्करतीर्थीं श्रीगोपाळ । तीर्थविधानें क्रमूनि काळ । मथुरामंडळ ठाकिलें ॥२३॥तेथूनि पातले पुरंदरप्रस्था । गजभेरीचा ध्वनि ऐकतां । युधिष्टिरराया किंकरीं वार्ता । निवेदन करितां जाणवला ॥२४॥भीमार्जुनयुधिष्ठिर । सहित माद्रीचेही कुमर । वार्ताश्रवणं अतिसत्वर । कैसे उठिले तें ऐका ॥२५॥दृष्ट्वा तमागतं पार्था मुकुंदमखिलेश्वरम् । उत्तस्थुर्युगपद्वीराः प्राणा मुख्यमिवाऽऽगतम् ॥२॥एकेचि समयीं पांचही वीर । वळघोनि उत्तुंग गोपुर । समीप देखोनियां श्रीधर । धांविले सत्वर सामोरे ॥२६॥अवयव इंद्रियें पंचप्राण । उपरम पावतां विश्वाभिमान । असतांही सचेतन । वृत्तिशून्य तीं आघवीं ॥२७॥कीं मुख्यविश्वाभिमानागमनें । होतीं सर्वही सचेतनें । स्वव्यापारीं प्राणकरणें । तच्चैतन्यें प्रवर्तती ॥२८॥तेंवि अखिलात्मा अखिलेश्वर । मुकुंद सुखकंद श्रीधर । तदागमनें अतिसत्वर । उठिले कुमर पाण्डूचे ॥२९॥चंद्रें अधिष्ठितां उदयाद्रि । सिंधुजळ धांवे सामोरी । तेंवि पाण्डव पादचारी । सेविती हरि अभिगमनें ॥३०॥पांचही बंधु एकेचि समयीं । देखोनियां शेषशायी । कैसे भेटते जाले तेंही । श्रवणालयीं निवेदितों ॥३१॥परिष्वज्याच्युतं वीरा अंगसंगहतैनसः । सानुरागस्मितं वक्त्रं वीक्ष्य तस्य मुदं ययुः ॥३॥रथीं असतां जनार्दन । सर्वीं करूनि अभिवंदन । सप्रेम प्रीती हास्यवदन । अवलोकून निवाले ॥३२॥युधिष्ठिराचिया आगमनीं । रथावरूनि चक्रपाणि । भेटता जाला उतरूनि धरणी । पाहूनि नयनीं संतुष्ट ॥३३॥अच्युतातें आलिंगून । पाण्डव निवाले संपूर्ण । जालें पापांचें क्षालन । असंगांगसंस्पर्शें ॥३४॥तिये भेटीचा विचार । यथाशास्त्र वृद्धाचार । तो तूं ऐकें सविस्तर । श्रवणीं सादर होऊनी ॥३५॥युधिष्ठिरस्य भीमस्य कृत्वा पादाभिवंदनम् । अर्जुन परिरभ्याथ यमाभ्यां चाभिवंदितः ॥४॥युधिष्ठिरासह भीमाचे । कृष्णें चरण वंदिले साचे । समनवयस्का अर्जुनाचें । हृदय हृदयीं आळंगिलें ॥३६॥माद्रीतनय चरणांवरी । मस्तक ठेवूनि नमिती हरि । कृष्णें स्पर्शोनि शंतमकरीं । अतिसत्वरी ऊठविले ॥३७॥कृष्णदर्शनें मोदावाप्ति । संस्पर्शनें अघनिवृत्ति । मग भेटले सप्रेम भक्ति । युयुधानादि अनुगांतें ॥३८॥बैसूनियां एके रथीं । नगरीं चालतां राजपथीं । पुढें नगरजनांच्या पंक्ति । हरि अर्चिती सप्रेमें ॥३९॥कुर्वंडूनि सांडिती बळी । साष्टांग नमिती भूमंडळीं । गीतनृत्यांची धुमाळी । वाहूनि टाळी हरि स्मरती ॥४०॥बहुविध वाद्यें दोहींकडे । सप्रेमदर्शनाचिये चाडे । लोक दाटतां पुढें पुढें । वेत्रपाणि निवारिती ॥४१॥ऐसिया परी परमोत्साहीं । सदना नेऊनि शेषशायी । पाण्डव करिते जाले कायी । तें तूं नवायी अवधारीं ॥४२॥परमासनमासीनं कृष्णा कृष्णमनिन्दिता । नवोढा व्रीडिता किंचिच्छन्नैरेत्याभ्यवन्दत ॥५॥परमषेष्ठ दिव्यासन । तेथें बैसविला भगवान । येर यादव सह युयुधान । सभास्थानीं बैसविले ॥४३॥लावूनि अंतर्धानपट । पांचही बंधु कृष्णानिकट । याज्ञसेनी अंतर्निष्ठ । येती जाली हरिनमना ॥४४॥कृष्णा म्हणिजे याज्ञसेनी । अनिंदिता या विशेषणीं । विशेषिली काय म्हणोनी । तें सज्जनीं परिसावें ॥४५॥पांचा बंधूंसि भार्या एकी । निर्दोष सुस्नात अग्निमुखीं । यास्तव निंदेच्या कलंकीं । कोण्ही न नोकी जगत्त्रयीं ॥४६॥ऐसी द्रौपदी नव नोवरी । पाण्डवें सहित देखोनि हरि । किंचित् व्रीडिता स्वशरीरीं । आली बाहेरी मंदगती ॥४७॥आच्छादूनियां अंगयष्टि । श्रीकृष्णाचे चरण दृष्टी । नमिती जाली ते गोरटी । उत्साह पोटीं मानूनी ॥४८॥द्रौपदी कृष्णासि बोलावया । कांहीं संकोच करील राया । म्हणोनि यादवां पूजावया । पाण्डवीं सपर्या आणिली ॥४९॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP