मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४५ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ४५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० अध्याय ४५ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर जलमाविश्य तं हृत्वा नापश्यददुरेऽर्भकम् । तदंगप्रभवं शंखमादाय रथमागतम् ॥४१॥आज्ञा देऊनि सागराप्रति । जळीं प्रवेशला श्रीपति । मारूनि पंचजन दुर्मति । पाहे निगुती तज्जठरीं ॥२३॥गुरुसुत तेथें न देखतां । ज्ञानीं पाहोनि मन्मथजनिता । पंचजनांग वागविता । जाला तत्त्वता आयुधार्थ ॥२४॥तो पांचजन्य शंख करीं । घेऊनि बाहेर आला हरि । वेगीं बैसोनि रहंवरीं । त्वरें यमपुरीं ठाकिली ॥४२५॥ततः संयमनीं नाम यमस्य दयितां पुरीम् । गत्वा जनार्दनः शंखं प्रदध्मौ सहलायुधः ॥४२॥त्यानंतरें ते संयमनी । यमाची प्रियतम राजधानी । तेथ जाऊनि चक्रपाणि । स्फुरिला वदनीं पांचजन्म ॥२६॥हलायुधेंसीं जनार्दन । संयमनी अधिष्ठून । मुखें स्फुरिला पांचजन्य । यम ऐकोनि साशंक ॥२७॥शंखनिह्रादमाकर्ण्य प्रजासंयमनो यमः । तयोः सपर्यां महतीं चक्रे भक्त्युपबृंहिताम् ॥४३॥भूतमात्रां तें संयमिता । तेणें पांचजन्य ऐकतां । हृदयीं झाला दचक धरिता । आला तत्त्वता भेटीसी ॥२८॥रामेंसहित चक्रपाणि । वंदिता झाला लोटांगणीं । बैसवूनियां दिव्यासनीं । प्रेमें अर्चनीं प्रवर्तला ॥२९॥बळपूर्वक जनार्दन । उभयतांचे क्षाळूनि चरण । तीर्थ मस्तकीं अभिवंदून । केलें प्राशन सद्भावें ॥४३०॥नीलकौशेयपीतांबरें । नेसवूनियां अत्यादरें । क्षीराब्धि अरुणरंगाकारें । उत्तरीयार्थ अर्पिलीं ॥३१॥मुकुट कुण्डलें मेखळा । केयूराम्गदें बाहुयुगला । जडित मुद्रिका दशांगुळां । कटकें तेजाळ अर्पिलीं ॥३२॥वैजयंती कौस्तुभमणि । प्रभे लोपवी दिनमणि । वांक्या नूपुरें अंदु चरणीं । त्वाष्ट्रघडणी सुघटित ॥३३॥अर्पूनियां गंधाक्षता । माला सुमनें वाहिलीं माथां । सधूप एकारती होतां । पात्रीं अमृता ओगरिलें ॥३४॥अर्पूनि नैवेद्य फलतांबूल । हेमरत्नें दक्षिणा बहळ । पुष्पांजळि अर्पूनि अमळ । जोडोनि करतळ अभिवंदी ॥४३५॥भक्तियुक्त महापूजा । यमें करूनि ऐसिया वोजा । प्रार्थिता झाला गरुडध्वजा । तें कुरुराजा अवधारीं ॥३६॥उवाचावनतः कृष्णं सर्वभूताशयालयम् । लीलामनुष्य हे विष्णो युवयोः करवाम किम् ॥४४॥नम्रकंधरें बद्धांजळि । म्हणे श्रीकृष्ण वनमाळी । आजि आपुल्या चरणकमळीं । सनाथ केली संयमनी ॥३७॥ब्रह्मादि अमरांचिये मुकुटीं । व्यापक विष्णु तूंचि जगजेठी । लीलेकरूनि मनुष्यनटीं । सुरसंकटीं नटलासी ॥३८॥जे कां सर्वभूताशय । तूं तयांचा वसता ठाय । विश्वप्रभव तूं अव्यय । जगन्मय जगदात्मा ॥३९॥तुमचें काय मी करूं दास्य । आज्ञापिजे किंकरास । सेवाहीन तरी पोष्य । लागे अवश्य पोसावें ॥४४०॥तुमच्या सेवेच्या अधिकारा । आज्ञापिजे मज किंकरा । सेवेविषीं जरी अपुरा । तरी दातारा अनुपेक्ष ॥४१॥ऐसी विनीत यमाची वाणी । परिसोनियां पंकजपाणि । काय्बोलिला तें कुरुमणि । सावध श्रवणीं परिसावें ॥४२॥श्रीकृष्ण उवाच - गुरुपुत्रमिहानीतं निजकर्मनिबंधनम् । आनयस्व महाराज मच्छासनपुरस्कृतः ॥४५॥यमासि म्हणे गरुडध्वज । भूतशास्ता तूं महाराज । आमुचें इतुकें सांगणें तुज । तें त्वां काज करावें ॥४३॥गुरुपुत्र येथें त्वां आणिला । जो कां निजकर्में बांधला । यदर्थीं अपराध नाहीं तुजला । विदित मजला हें सर्व ॥४४॥आतां ममाज्ञा वंदूनि शिरीं । गुरुसुत आणूनि दे झडकरी । कर्मनिर्मुक्त करिता हरि । हें अंतरीं जाणोनी ॥४४५॥ऐसें बोलतां कृष्णनाथा । यमें आज्ञा वंदिली माथा । गुरुपुत्रातें आणूनि देता । झाला तत्वता उह्लासें ॥४६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP