मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४५ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ४५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० अध्याय ४५ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर अहोरात्रैश्चतुःषष्ट्या संयत्तौ तावतीः कलाः । गुरुदक्षिणयाऽऽचार्यं छंदयामासतुर्नृप ॥३६॥शैवतंत्रीं ज्या कळा कथिल्या । त्या येथ जाती निरूपिल्या । श्रोतीं पाहिजे श्रवण केल्या । अभ्यासिल्या अवगमती ॥६४॥सप्तस्वरीं गायनकळा । सप्तताल वाद्यकळा । भावसाहित्य नृत्यकळा । नाट्यकळा तौर्यत्रिक ॥३६५॥विशेषकच्छेद्य कृंतनकळा । आलेख्यरंजनी लेखनकळा । तंडुलकुसुमविकारकळा । सपर्याविधिप्रकरणीं ॥६६॥करकौशल्यें पुष्पास्तरण । दशनवसनांगरंजन । मणिभूमिकाकर्म गहन । शयनरचन अकरावें ॥६७॥उदकवाद्य उदकघात । चित्रयोग अत्यद्भुत । माल्यग्रथनविकल्प येथ । शेखरापीडयोजना ॥६८॥षोडशी कळा नेपथ्ययोग । सत्रावी ते कर्णपत्रभंग । सुगंधयुक्तीचा प्रसंग । कळा सांग अठवावी ॥६९॥भूषणयोजना ऐश्वर्यजाळ । कौचुमारयोगकौशल्य । हस्तलाघव सुचापल्य । बाविसावी हे कळा ॥३७०॥चित्रशाकाव्यंजनादि या । अपूपभक्ष्यविकारक्रिया । तेविसावी कळा राया । तुज लागूनि हे कथिली ॥७१॥पानकरसरागासव - । योजना कळा हे अपूर्व । सूचिवायकर्म सर्व । कळा स्वमेव पंचविसावी ॥७२॥सव्विसावी सूत्रक्रीडा । डमरुवीणादि वाद्य सुघडा । प्रहेलिका कळा प्रौढा । अठ्ठाविसावी जाणिजे ॥७३॥एकोणतिसावी ते प्रतिमाळा । दुर्चंचकयोग तिसावी कळा । पुस्तकवाचन कुरुभूपाळा । जाणिजे कळा एकतिसावी ॥७४॥नाटकारव्यायिकादर्शन । काव्यसमस्यापूरण । पट्टिकाविकल्पवेत्रबाण । तर्ककर्मादि पंचतिस ॥३७५॥तक्षण आणि वास्तुविद्या । रूपरत्नपरीक्षा शुद्धा । आकरज्ञान धातुवादा । मणिरागादिज्ञानकळा ॥७६॥वृक्षआयुर्वेद सिद्ध । मेषकुक्कुटलावकयुद्ध । शुकसारिका पढवें शुद्ध । चव्वेताळिसावी ही कळा ॥७७॥उत्सादन केशमार्जन । आणि अक्षरमुष्टिकाकथन । म्लेच्छितकुतर्कविकल्प जाण । भाषाज्ञान देषभव ॥७८॥पन्नासावी पुष्पशकटिका । निर्मितिज्ञान कुरुनायका । यंत्रमातृकाधारणमातृका । संवाच्यकळा बावन्न ॥७९॥मानसीकाव्यक्रिया जाण । अभिधानकोश समयीं स्मरण । पिंगळादिछंदोज्ञान । क्रियाविकल्प कळा हे ॥३८०॥वस्त्रगोपनें छळितक योग । द्यूत दिविशेषप्रसंग । आणि आकर्षक्रीडा सांग । बालक्रीडनें बहुधा पैं ॥८१॥वैतालिकी वैजयिकी । तृतीय विद्या वैनायिकी । या विद्यांचीं ज्ञानें ठाउकीं । एवमादिकी चौसष्टी ॥८३॥चौषष्टी अहोरात्री नृपाळा । अभ्यासिल्या चौषष्टी कळा । मग गुरूच्या चरनकमळा । अभिवंदिती समस्तकें ॥८३॥सर्वसेवेसी सादर । चुकों नेदिती अवसर । अगाध प्रज्ञेचा विचार । अभ्यासपर देखिला ॥८४॥नुलंघवे मर्यादरेखा । येर्हवीं गुरूहूनि आगळिका । सर्व विद्यांच्या भूमिका । ज्याच्या विवेका अवगमती ॥३८५॥सदार गुरूच्या परिवारगणा । गुरुप्रेमेंचि भजती जाणा । स्नेहें सर्वांच्या अंतःकरणा । वशीवर्तना अनुसरती ॥८६॥समयीं देती मागितलें । करिती समयीं सांगितलें । मर्यादरेखेचीं पाउलें । कोण्या काळें नुल्लंघितीं ॥८७॥ऐसी देखोनि अद्भुत शक्ति । मुनि म्हणे या ईश्वरमूर्ति । धरूनि मनुष्यांच्या व्यक्ति । सादर तिष्ठती सेवेसी ॥८८॥कोण्या कार्यार्थ हें तो न कळे । परंतु माझें दैव आगळें । आतां याचीं चरणकमळें । स्वयें निजमौळें वंदावी ॥८९॥ऐसा विवरी अंतःकरणें । यांपासूनि जें सेवा घेणें । तें अनुचित बहुतां गुणें । मजकारणें घडलें कीं ॥३९०॥ऐसें गुरूचें मनोचेष्टित । जाणोनि रामकृष्ण समर्थ । म्हणती गुरुसेवा समाप्त । करूनि त्वरित निघावें ॥९१॥गुरु आदरिती आमुची सेवा । तेव्हां विचार नोहे बरवा । यालागीं आज्ञा घेऊनि गांवा । जावें लाघवा रक्षूनी ॥९२॥ऐसें विवरूनि बंधु दोघे । सद्गुरुचरण वंदूनि वेगें । गुरुदक्षिणाप्रसंगें । विनीत आंगें विनविती ॥९३॥गुरुदक्षिणेचें करूनि मिष । उपलोभिती गुरुमानस । म्हणती आम्ही लघुतर दास । विनति उदास न करावी ॥९४॥पक्षिणीपक्षी रक्षी आंडीं । चांचुवें चारा घाली तोंडीं । स्वामीनें त्याचि परवडी । आम्हां आवडी पाळिलें ॥३९५॥जनकाहूनि कोटि गुणें । विद्या बोधिल्या कृपाळुपणें । आतां घेऊनि गुरुदक्षिणे । सफळ करणें निजवरें ॥९६॥अल्प स्वल्प गुरुदक्षिणा । समर्पावी सद्गुरुचरणा । द्यावी स्वामींहीं अनुज्ञा । ऐसी करुणा भागिती ॥९७॥राया कुरुकुळकुवलयतरणी । रामकृष्णांची ऐकोनि वाणी । मुनीनें विवरूनि अंतःकरणीं । वदला वचनीं तें ऐका ॥९८॥द्विजस्तयोस्तं महिमानमद्भुतं संलक्ष्य राजन्नतिमानुषीं मतिम् ।संमंत्र्य पत्न्या स महार्णवे मृतं बालं प्रभासे वरयाबभूव ह ॥३७॥पत्नी पाचारूनि एकांतीं । गुह्य सांगे तियेप्रति । रामकृष्ण हे मनुष्याकृति । ईश्वरमूर्ति प्रत्यक्ष ॥९९॥गुरुदक्षिणा देऊं म्हणती । तरी काय मागावें ऐसियांप्रति । बरवें विचारूनियां चित्तीं । सांगें युक्ति बरांगने ॥४००॥एवं स्त्रीपुरुषीं दोघीं जणीं । विवरूनियां अंतःकरणीं । पुत्र निमाला समुद्रस्नानीं । प्रभासपाटणीं दुर्मरणें ॥१॥तो याचिला गुरुदक्षिणे । आज्ञा वंदूनि रामकृष्णें । तथास्तु म्हणोनि केलीं नमनें । गवेषणें चालिले ॥२॥तथेत्यथाऽऽरुह्य महारथौ रथं प्रभासमासाद्य दुरंतविक्रमौ । वेलामुपव्रज्य निषीदतुः क्षणं सिंधुर्विदित्वाऽऽर्हणमाहरत्तयोः ॥३८॥यानंतरें दोघे बंधु । महारथी प्रतापसिंधु । हृदयीं देदीप्य धनुर्वेदु । विद्याप्रबोध मुनीचा ॥३॥सज्ज होऊनि बैसले रथीं । घेऊनि शस्त्रास्त्रसंपत्ति । चालिले प्रभासपाटणाप्रति । मार्गीं होती शुभशकुन ॥४॥मेघगंभीरघोषें रथ । गर्जना करी घडघडीत । दोघे बंधु प्रतापवंत । गुरुकार्यार्थ चालिले ॥४०५॥अश्व जवीन जिंकिती अनिळा । गरुडचिह्नितकेतु निळा । मार्गीं देखत्यांचिया डोळां । अमृतपान फावतसे ॥६॥सवेग टाकिली सोरटी । पातले सोमेश्वरा निकटीं । रत्नाकराचे वाळुवंटीं । रथातळवटीं ऊतरले ॥७॥रामकृष्णांचें आगमन । जाणोनि सिंधु आला सह्रण । रत्नाभरणें समर्पून । करी पूजन सद्भावें ॥८॥दिव्य वसनें गंधाक्षता । दिव्यसुमनें वाहिलीं मथां । धूपदीपादि अमृता । नैवेद्यार्था अर्पिलें ॥९॥फलतांबूल दक्षिणा । पुष्पांजलि प्रदक्षिणा । सहस्रशः करूनि नमना । विज्ञाएना करीतसे ॥४१०॥कोणीकडे येणें झालें । मज दासातें सनाथ केलें । कोण कार्य मनीं धरिलें । तेंही कथिलें पाहिजे ॥११॥ऐकूनि सिंधूची विनीत वाणी । बलराम आणि चक्रपाणि । बोलतसे झाले आज्ञावचनीं । परिसिजे श्रवणीं तें राया ॥१२॥तमाह भगवानाशु गुरुपुत्रः प्रदीयताम् योऽसाविह त्वया ग्रस्तो बालको महतोर्मिणा ॥३९॥अचिंत्यैश्वर्यसंपन्न । जो कां अनंतगुणपरिपूर्ण । सिंधूप्रति प्रतापगहन । आज्ञावचन निरूपी ॥१३॥सांदीपनि अवंतीवासी । आमुचा स्वामी तपोराशि । येथें करितां स्नानविधीसी । तां तत्पुत्रासी ग्रासिलें ॥१४॥तुझिया ऊर्मी महा प्रबळ । तिहीं कवळूनि गुरूचा बाळ । तुवां ग्रासिला होऊनि काळ । तो तत्काळ दे आतां ॥४१५॥कांहीं विलंब करितां येथें दण्ड पावसी आमुच्या हातें । जाणोनि निष्ठुर आज्ञेतें । गुरुपुत्रातें दे वेगीं ॥१६॥निष्ठुर ऐकोनि भगवद्वाणी । सिंधु भयभीत अंतःकरणीं । माथा ठेवूनियां चरणीं । करुणावचनीं प्रार्थितसे ॥१७॥समुद्र उवाच - नैवाहार्षमहं देव दैत्यः पंचजनो महान् । अंतर्जलचरः कृष्ण शंखरूपधरोऽसुरः । आस्ते तेनाहृतो नूनं तच्छ्रुत्वा सत्वरं प्रभुः ॥४०॥सिंधु म्हणे मधुसूदना । ग्रासिलें नाहीं म्यां गुरुनंदना । यदर्थीं करितों विज्ञापना । ते सर्वज्ञा अवधारीं ॥१८॥देव म्हणोनि संबोधन । तुझें अमळ दिव्य ज्ञान । भूतभविष्यवर्तमान । तुजलागून अवगत हें ॥१९॥पंचजन या नामें दैत्य । शंखरूपी जलचर सत्य । माझे जठरीं राहे नित्य । त्याचें कृत्य हें गमतें ॥४२०॥शंखरूप तो धरूनि असुर । माझे जठरींचे जे जळचर । त्यांतें पीडी अहोरात्र । दुष्ट निशाचर निर्दय ॥२१॥बहुतेक हें त्याचें कृत्य । हें ऐकोनि त्वरान्वित । कृष्ण परमात्मा समर्थ । झाला उद्युक्त तद्वधा ॥२२॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP