मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४५ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ४५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० अध्याय ४५ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर अथो गुरुकुले वासमिच्छंताबुजम्मतुः । काश्यं सांदीपनिं नाम ह्यवंतीपुरवासिनम् ॥३१॥एवं व्रतबंधानंतर । असतां सर्वविद्याआगर । तथापि मनुष्यदेहीं सार । दास्य साचार सद्गुरूचें ॥५६॥यालागीं गुरुकुळीं करूनि वास । काया वाचा आणि मानस । न वंचिता कीजे दास्य । इच्छा विशेह हे धरिली ॥५७॥श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ । सकळ विद्यांचें मूळपीठ । दयादाक्षिण्यें गरिष्ठ । परम श्रष्ठ कुटुंबी ॥५८॥ऐसियांचें शुश्रूषण । करितां होय इच्छा पूर्ण । त्यामाजी जी लक्षणें न्यून । तितुकी अपूर्ण फळसिद्धि ॥५९॥ऐसा लक्षूनियां महंत । बंधु बळराम श्रीभगवंत । जाते झाले स्वानंदभरित । कोठपर्यंत तें ऐका ॥२६०॥मथुरेहूनि अवंतिपुरी । पंचाशत योजनें दुरी । दक्षिणप्रांतीं तीमाझारीं । मुनिवर श्रोती सांदीपत्नि ॥६१॥काश्यपगोत्रोत्पन्न महंत । पूर्वोक्तलक्षणीं आचारवंत । त्याप्रति येऊनि बळभगवंत । शरण विनीत जाहले ॥६२॥सुस्नात होवोनिया सुभदिनीं । सफळोपचार समित्पाणि । दृष्टि एकाग्र ठेवूनि चरणीं । विनीतवाणी नियमस्य ॥६३॥जाणोनि परम शुद्धांतर । केवळ करुणाब्धि मुनिवर । केला शिष्यत्वें अंगीकार । दिधला अधिकार सेवेचा ॥६४॥दास्यचरणाचा अधिकार । झाला जाणोनि हर्षनिर्भर । झाले दास्यासि तत्पर । तो प्रकार अवधारा ॥२६५॥यथोपसाद्य तौ दांतौ गुरौ वृत्तिमनिंदिताम् । ग्राहयंतावुपेतौ स्म भक्त्या देवामिवाऽवृतौ ॥३२॥भक्ति करूनि सर्वेश्वर । जेंवि आराधिती उपासक नर । ऐसे प्रेमपुरस्पर । आदरें गुरुवर आराधिती ॥६६॥दान्त म्हणिजे दमनशील । शमदमादिसाधनीं कुशल । सद्गुरूचें चरणकमल । भजती केवळ सद्भावें ॥६७॥उषःकाळीं प्रातःस्नान । सद्गुरूपूर्वीं करिता आपण । तेथूनि सर्व आह्निकाचरण । करिती लक्षूनि गुरुदास्य ॥६८॥स्वामीचिया शौचाचारीं । जळमृत्तिका अर्पिती करीं । दंतशोधनाच्या अवधारीं । दंतकाष्ठ अर्पिती ॥६९॥आसन पादप्रक्षाळना । विध्युक्त काष्ठ दंद्तशोधना । गंडूषार्थ शुद्द जीवना । देती आचमना पृथक् जळ ॥२७०॥सद्गुरु करितां प्रातःस्नान । तदुर्चित द्रव्यें समर्पून । आसन वसन तिलक जीवन । करिती अर्पूण यथोचित्त ॥७१॥होमशाळासंमार्जन । होमार्थ करितां प्रादुषीकरण । अर्पिती विशुद्ध शुष्केधन । आज्ञालंघ न नकरिती ॥७२॥कुश पलाश समिधा पुष्पें । आणूनि भरिती शुद्ध आपें । गंधाक्षताधूपदीपें । परम साक्षेपें ओळगती ॥७३॥नैवेद्य फळ तांबूल दक्षिणा । यथाकाळीं अर्पिती जाणा । गुरुगृहींच्या परिवारगणा । गुरुतोषणा आराधिती ॥७४॥समस्तांचीं क्षाळिती वसनें । स्वर्चित वास्तु रंगाभरणें । पानवचनादिभाजनें । सर्वोपकरणें क्षाळिती ॥२७५॥तृणधान्यांचा परामर्ष । पशुरक्षणीं परम हर्ष । तंव तंव गुरुकृपा विशेष । दिवसें दिवस वाढतसे ॥७६॥काष्ठभारे वाहूनि शिरीं । इंधनसंग्रह गुरूचे घरीं । गोपयपिंड करिती करीं । तंद्रा शरीरीं अस्पृष्ट ॥७७॥संमार्जिती सदनभित्ति । जळनिर्गम शोधिती हातीं । गुरुतोषणीं परमप्रीति । उह्लासती बहुदास्यें ॥७८॥जाणोनि गुरूचें मनोगत । तैसे वर्तती अतंद्रित । सांडूनि व्रतें नेम समस्त । गुर्वाज्ञेंतें वर्तती ॥७९॥आगम अनुल्लंघ्य उपासकां । कीं विधि नुल्लंघवे याज्ञिकां । कीं काम्यव्रतें जेंवि काम्कां । तेंवि त्यां देखा गुर्वाज्ञा ॥२८०॥सद्गुरु बोलतां आणिकांसी । श्रवणीं सावध वृत्ति कैसी । चातक मेघोदकाते लक्षी । तेंवि मानईं सादरता ॥८१॥सर्व ऐश्वर्यभोग वैकुंठीं । परि गुरुदास्याची दुर्लभ गोठी । यालागीं नटोनि मनुष्यनटीं । अप्रेम पोटीं गुरुभजनीं ॥८२॥येर अवतारचरित्र । तेथ साह्दनें सुरकार्य मात्र । लक्षूनि गुरुदास्यलाभ स्वतंत्र । जालें पाव पेर्माचें ॥८३॥वेतन भक्षूनि सेवक । सेवेसि वर्ततां प्रवासोन्मुख । तेथ पंथीं जोडल्या गंगोदक । तो लाभ सम्यक स्वतंत्र की ॥८४॥कीं सहोदर जोडिती धन । विभागें करिती दायादन । त्यांमाजी गुरुदास्य विद्यापठन । स्वतंत्र जाण तो लाभ ॥२८५॥अतेंवि देवकार्याकारणें । मर्त्यलोकीं म्याम अवतार घेणें । तेथ सद्गुरूच्या दास्याचरणें । सनाथ होणें स्वतंत्र ॥८६॥ऐसिया भावें कमलापति । रामकृष्णत्वें धरूनि व्यक्ति । सप्रेम गुरुदास्याची रीति । संपादिती कुरुवर्या ॥८७॥चाहूरिया चित्रासनें । गाद्या मृदोळिया ओटंगणें । झाडूनि बैसकार करणें । अध्यापना बैसतां ॥८८॥आपण होऊनि चामरधर । तिष्ठती सेविसि सादर । मानस जाणोनि तदनुसार । सर्वोपचार अर्पिती ॥८९॥सद्गुरु करिती निरूपण । तेथ सादर करिती श्रवण । ते र्पसंगीं कार्य आन । पडतां उठोन सारिती ॥२९०॥सद्गुरूचें माध्याह्निक । दास्य वोळगती सम्यक । पूजन करूनि तीर्थादिक । आवश्यक स्वीकरिती ॥९१॥गंधाक्षता कुसुममाळा । घवघवीत घालिती गळां । परिमळद्रव्याचा वरी उधळा । त्यावरी अमळा श्रीसुळसी ॥९२॥धूपदीप एकारती । नैवेद्य षड्रसनिष्पत्ति । फळतांबूल अनन्यभक्ति । दक्षिणा देती तनुमनवाक् ॥९३॥जेव्हां केलें गेलें आत्मार्पण । तेव्हांचि त्यांचें अभेदभजन । त्यांसीच म्हणावें अनन्य । दक्षिणाधन त्यां न लगे ॥९४॥गुरुगृहींची जे संपत्ति । आत्मार्पकांची तेचि आइती । कारावाचामनोवृत्ति । अवंचक रीती तें भजन ॥२९५॥मनें न कल्पी दोषदर्शन । दास्यविषयीं हाव पूर्ण । पुढील कार्याचें चिंतन । मानसभजन अवंचक हें ॥९६॥वाचा न वदे दोषगुण । कोण्हापासी नुमसे न्यून । गुरुयशाचें संकीर्तन । वाचिक भजन या नांव ॥९७॥बहळ कार्यांच्या अवसरीं । प्रेमोत्साहें धैर्य शरीरीं । नीचकार्यासि तनु न चोरी । दास्य निर्धारीं कायिक हें ॥९८॥एवं कायावाचामन । तेंचि अप्रूनि दक्षिणाधन । करूनि सर्वस्व नीराजन । निष्काम पूर्ण पुष्पांजळि ॥९९॥प्रदक्षिणा नमस्कार । घालूनि वारंवार । विनीतभावें निरहंकार । न्यूनोपचार सांगता ॥३००॥भोजनपात्र विसर्जून । शेषप्रसादसेवन । गुरु मंचकीं पौढवून । पादसेवन आचरती ॥१॥सद्गुरूचा परिवार सर्व । जाणोनि गुरूचे अवयव । त्यांचे भजनीं प्रेमभाव । दंभभाव नातळतां ॥२॥जाणोनि गुरूचें प्रयाण । गज रथ शिबिका अश्वयान । सन्नद्ध करिती आज्ञेवरून । होती आपण अनुयायी ॥३॥यानारूढ असतां गुरु । चरणीं खोलती समोरु । पायी चालतां अनुचरु । सर्वोपचार घेऊनी ॥४॥सभास्थानीं बैसतां गुरु । सम्मुख तिष्ठती आज्ञाधरु । किंवा होती चामरधरु । पार्श्वभागीं स्वामीच्या ॥३०५॥ज्यांवरी कृपा सद्गुरूची । सप्रेम प्रीति धरिती त्यांची । उपेक्षा करिती उपेक्षितांची । वमनअन्नासारिखी ॥६॥दुग्धपाचित क्रमुक फोडी । खदिरवटिकाकृतकेवडी । मुक्तत्रिभागचर्चितविडी । भुजंगवल्लीपत्रांची ॥७॥तांबूल ऐसा त्रयोदशगुणी । अर्पिती संकेत जाणोनि । गंडूषपात्र धरूनि पाणी । ष्ठीवनग्रहणीं वोळगती ॥८॥सद्गुरूचे आज्ञेवरून । इतरां तांबूलसमर्पण । करिती यथोचित सम्मान । मनोगत जाणोनि स्वामीचें ॥९॥असो ऐसी सायंसंध्या । जाणोनि वर्त्तति सर्वदा । गोदोहनादि सर्व धंदा । करूनि मोदा पावती ॥३१०॥गुरुवत् गुरुभार्येची सेवा । करिती समान मानूनि देवा । सदार गुरु पहुडती जेव्हां । तैं श्रम अवघा परिहारिती ॥११॥ऐसी अनिंदित गुरुदास्यवृत्ति । अनन्यभावें चढली हातीं । गुरु बंधूंतें ते शिक्षिती । पुत्राप्रति जेंवि पिता ॥१२॥ऐसे स्वाध्यायीं समस्त । केले अनन्य सद्गुरुभक्त । अनन्यभावें सेवास्वार्थ । सर्वां यथोक्त उपजविला ॥१३॥अव्यभिचार गुरुवृत्तीतें । लाहोनि बोधिली गुरुभक्तांतें । हें देखोनि सद्गुरुनाथें । सदयचित्तें तुष्टला ॥१४॥तयोर्द्विजवरस्तुष्टः शुद्धभावानुचृत्तिभिः । प्रोवाच वेदान्निखिलान्सांगोपनिषदो गुरुः ॥३३॥भजनीं सादर निर्विकार । देखोनि तोषला ऋषीश्वर । पाचारूनि उभय छात्र । केला अधिकार अध्ययनीं ॥३१५॥विवरूनियां सुमुहूर्तवेळा । विद्यादैवभचंद्रबळा । गुरुगणपतिदैवतकुळा । अर्चूनि सकळां द्विजादिकां ॥१६॥आरंभिला निगमपाठ । ऋक्सामादि आम्नाय श्रेष्ठ । शिक्षा व्याकरण ज्योतिष स्पष्ट । छंद निरुक्त कल्पादि ॥१७॥घ्राण वदन नयन श्रवण । हस्तहृदयादि षडंगें जाण । उपनिषद्भाग मस्तक पूर्ण । वेदोनारायण सांग हा ॥१८॥ऐसेचि सांग अवधे वेद । गुरुवर पढविता झाला विशद । गुरु शिष्यांसि परमाह्लाद । प्रज्ञाप्रबोधपाठत्वें ॥१९॥प्रज्ञा देखोनि संतुष्ट गुरु । म्हणोनि अध्ययनीं तत्परु । प्रबोधशक्तिचमत्कारु । तेणें शिष्य सादर अध्ययनीं ॥३२०॥परस्परें आनंदभरित । अध्यापनीं गुरूसि आर्त । तंव तंव अध्ययनाचा स्वार्थ । शिष्य समर्थ आंगविती ॥२१॥न पुसतांचि सद्गुरु सांगे । प्रज्ञाबळें ते पढती वेगें । पुडती अनुवृत्ति करणें न लगे । हें सामर्थ्य अवघें गुरुभजनीं ॥२२॥सरहस्यं धनुर्वेदं धर्मान्न्यायपथांस्तथा । तथा चान्वीक्षिकिं विद्यां राजनीतिं च षड्विधाम् ॥३४॥सर्वं नरवरश्रेष्ठौ सर्वविद्याप्रवर्त्तकौ । सकृन्निगदमात्रेण तौ संजगृइहतुर्नृप ॥३५॥अथर्वणआंगीरसरहस्यें । मंत्रविद्यादेवतावश्यें । गूढ गोप्यें समरलास्यें । तियेंही अशेषें कथियेलीं ॥२३॥अस्त्रविद्या धनुर्वेद । शस्त्रसाधनांचे भेद । मंत्ररहस्यें सहित विशद । बोधी प्रवुद्ध गुरुवर्य ॥२४॥पौरंदरास्त्र पावकास्त्र । संयमनास्त्र कोणपास्त्र । वरुणपाशादि वारुणास्त्र । अकूपाराख प्रबोधी ॥३२५॥नाक्र माकर शिशुमारास्त्र । तिमिंगिळास्त्र राघवास्त्र । शाफर मौद्गर कंबुकास्त्र । पन्नकास्त्र ताक्षकी ॥२६॥यक्षराक्षसगुह्यकास्त्र । कौबेरास्त्र पिंगलास्त्र । शरभऋभवगारुडास्त्र । प्लवंगास्त्र सरहस्य ॥२८॥सिद्धसाध्यगंधर्वास्त्र । वीरभद्रास्त्र भैरवास्त्र । कृत्याकौष्मांडवेताळास्त्र । वैनायकास्त्र् भास्मिक ॥२९॥माहेश्वरास्त्र शांभवास्त्र । कालिकास्त्र दुर्गमास्त्र । चंडिकास्त्र चामुंडास्त्र । पाशुपतास्त्र विश्वभुक् ॥३३०॥महाघोर अघोरास्त्र । तत्पुरुषास्त्र ईशानास्त्र । वामदेवास्त्र सरौद्रास्त्र । सद्योजातास्त्र कर्कश ॥३१॥भास्करास्त्र भगणपास्त्र । भौमभानुजभार्गवास्त्र । जीवविधुजविधुंतुदास्त्र । कैतवास्त्र कैतवी ॥३२॥पर्जन्यास्त्र पावनास्त्र । पर्वतास्त्र सवज्रास्त्र । आप्ययास्त्र कृतांतास्त्र । मृत्युंजयास्त्र निवेदी ॥३३॥कफवातादिमहामायास्त्र । सुदर्शनास्त्र वैष्णवास्त्र । अनंतास्त्र आदित्यास्त्र । महाब्रह्मास्त्र निवेदि ॥३४॥अस्त्रविद्या रहस्येंसीं । प्रबोधिली विधानेंसीं । आणि शस्त्रविद्याही तैसी । कौशल्येंसीं साधविली ॥३३५॥खड्ग खेटक शूळ परशु । तोमर वज्र शक्ति पट्टिश । परिघ मुद्गर कुंत पाश । यमदंष्ट्रादि छूरिका ॥३६॥टंक कृपाण त्रिशूळ लहुडी । लांगल चक्र मुसल भृशुंडी । कुरंगश्रृंगज अंकुशदंडी । व्याघ्रनखादि वृश्चिक ॥३७॥गदा कुठार परश्वध । कंबुकंकणान्वितमणिबंध । कटिप्रदेशीं चक्रायुध । खट्वांगवंशकूर्परिका ॥३८॥भिंदिपाळादि छत्तिस । दंडायुधीं विद्याभ्यास । करविता झाला सावकाश । तुष्टमानस गुरुवर्य ॥३९॥मल्लविद्या द्वंद्वयुद्ध । प्रबोधूनि यथाविध । आयुर्वेद गांधर्ववेद । ज्योतिर्वेद निरोपी ॥३४०॥एवं उपवेदाध्यापन । सांगोपांग करूनि जाण । पुढें मांडिलें शास्त्राध्ययन । कृपाळु पूर्ण गुरुवर्य ॥४१॥मन्वादिकांचिया स्मृति । अनुकूळ पुराणसंमति । धर्मशास्त्र यथानिगुती । मन्वादि धर्म प्रबोधिले ॥४२॥न्यायशास्त्र गौतमकृत । पूर्वमीमांसा श्रुतिसंमत । आन्वीक्षिकीं इत्थंभूत । कथिली समस्त तर्कविद्या ॥४३॥राजनीति षड्विध म्हणिजे । तेही साङ्ग कथिली द्विजें । तेच साही प्रकार जे जे । चतुरीं वोजें परिसावे ॥४४॥शत्रु जाणोनि बळिष्ठ । स्नेहवादें तो कीजे इष्ट । यातें संधि म्हणती श्रेष्ठ । उपाय वरिष्ठ हा मुख्य ॥३४५॥बळिष्ठ शत्रूंशीं करूनि सख्य । तुल्य शत्रूचा कीजे द्वेष । याच्या बळें तो जाणिजे देख । विग्रह सम्यक या नांव ॥४६॥आपणाहूनि सामान्य भूप । मनीं धरिती दुष्ट संकल्प । इतरांवरी दावूनि कोप । स्वारी साटोप करावी ॥४७॥येणें मिषें अकस्मात् । जाता देखती ते भयभीत । द्रव्यें घेऊनि पादाक्रान्त । करूनि यथोक्त रक्षावे ॥४८॥तिसरा उपाय या नांव यान । चतुर्थ उपाय तें आसन । ऐका तयाचें लक्षण । सावधान होऊनी ॥४९॥बळिष्ठांसिं करूनि सख्य । तुल्य शत्रु जिंकिले देख । ते ते पोटीं धरूनि दुःख । साह्य आणिक मेळविती ॥३५०॥यालागीं तेथ दुर्गम दुर्गीं । ठाणें घालूनि प्रसंगीं । पुन्हा शत्र नुधवे जगीं । ऐसिया योगीं रक्षावा ॥५१॥वश्य करूनि मांडलिक । बलिष्ठ शत्रु होय एक । तेह द्वैधीभावविवेक । उपाय सम्यक पंचम हा ॥५२॥तयाचा गोत्रज अथवा बन्धु । फोडोनि कीजे स्नेहसंबंधु । त्यांमाजी परस्परें विरोधु । युक्तिप्रबोधें उपजविजे ॥५३॥मग ते मांडलिक सोयरे । उभयतांच्या स्नेहादरे । द्विधा होती परस्परें । द्वैध खरें त्या नांव ॥५४॥शत्रु भंगले पराच्या भयें । त्यांसि आपण देऊनि अभय । प्रतिपाळावें निजाश्रयें । षष्ठ उपाय हा श्रेष्ठ ॥३५५॥शत्रूंसी करावा उपकार । शस्त्रांहूनि हें मारणें सार । राजनीतीचे प्रकार । साही साचार हे कथिले ॥५६॥मंत्रदेवता सुप्रसन्न । अस्त्रप्रेरण उपसंहरण । सरहस्य धनुर्वेदग्रहण । सांग संपूर्ण उपवेद ॥५७॥धर्मन्यायप्रमुख शास्त्रें । राजनीतीशीं कथिली वक्त्रें । तें तें सकृत्न्निगदमात्रें । घेतलीं श्रोत्रें परिसतां ॥५८॥मनुष्यदेहधारी ते नर । कुशळ वर्णश्रेष्ठ ते नरवर । त्यांमाजी हे श्रेष्ठतर । केवळ ईश्वर बलकृष्ण ॥५९॥सकळविद्याप्रवर्तक । तिहीं धरूनि मनुष्यवेख । दास्य करूनियां सम्यक । केला संतोष स्वामीतें ॥३६०॥स्वामीचिया कृपावरदें । सर्व विद्या सकृन्निगदें । अभ्यासितां परमानंदें । गुरु आह्लादे हृत्कमळीं ॥६१॥वेदोपवेदशास्त्राध्ययन । कृपेनें सद्गुरु करितां कथन । श्रवणमात्रें करिती ग्रहण । प्रज्ञागहन अनुपम ॥६२॥चौसष्टी अहोरात्रांतरीं । चौसष्टी कळांची कुसरी । अभ्यासिली निगदमात्रीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥६३॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP