मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४१ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ४१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर नानालक्षणवेषाभ्यां कृष्णरामौ विरेजतुः । स्वलंकृतौ बालगजौ पर्वणीव सितेतरौ ॥४१॥आधींच त्रिजगाचें लावण्य । वरी नानालक्षणी अलंकरण । वेषें करूनि रामकृष्ण विराजमान देदीप्य ॥४१॥ऐरावताचे सहोदर । शुक्ल कृष्ण बालकुंजर । पर्वोत्सवीं सालंकार । जेंवि श्रृंगार मिरवती ॥४२॥तंतुवायकाचा भाव । देखोनि प्रसन्न वासुदेव । त्यातें ओपी वर अपूर्व । तें तूं स्वमेव अवधारीं ॥४३॥तस्य प्रसन्नो भगवान्प्रादात्सारूप्यमात्मनः । श्रियं च परमां लोके बलैश्वर्यस्मृतींद्रियम् ॥४२॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । अचिंत्यलीला प्रकाशून । स्वस्वरूपमुक्ति पूर्ण । वायका लागोन वोपिली ॥४४॥आणि इहलोकाच्या ठायीं । परमलक्ष्मी जे अक्षयी । बलप्रताप पुरता पाहीं । सर्वेंद्रियीं पटुतरता ॥३४५॥आणि अजस्र निजात्मस्मरण । जेथ नुमटे विवर्तस्फुरण । इत्यादि वरें गौरवून । तेथून गमन आदरिलें ॥४६॥पुढें मालाकारसदना । जाता झाला त्रैलोक्यराणा । शुक निरूपी कुरुभूषणा । त्या व्याख्याना अवधारा ॥४७॥ततःस उदाम्नो भवनं मालाकारस्य जग्मतुः । तौ दृष्ट्वा स समुत्थाय ननाम शिरसा भुवि ॥४३॥तंतुवायका देऊनि वर । सुदामा नामक मालाकार । त्याच्या भवना जगदीश्वर । जाते झाले बलकृष्ण ॥४८॥तेणें अंतरें देखोनि हरि । उठोनि धाविन्नला सामोरीं । भावें साष्टांग नमस्कारी । श्रीपाद शिरीं स्पर्शोनी ॥४९॥तयोरासनमानीय पाद्यं चाथार्हणादिभिः । पूजां सानुगयोश्चक्रे स्रक्ताम्बूलानुलेपनैः ॥४४॥दिव्यासनें उभयांप्रति । अर्पूनियां पूर्णभक्ती । पाद्य अर्पी यथानिगुती । जेंवि सुरपति हरिहरां ॥३५०॥देऊनि सर्वांसि रम्यासनें । आसनीं बैसविले सम्मानें । करूनि पादप्रक्षाळणें । अनुलेपनें चर्चिलीं ॥५१॥केशरतिलक रेखिले भाळीं । अक्षता माणिक्य सुढाळ ढाळीं । मलयजचंदनउटी पातळी । त्यावरी उधळी सौरभ्य ॥५२॥सुमनमाळा घालूनि कंठीं । दशांगधूप हव्यवाटीं । दिव्य एकारती गोमटी । धरूनि बोटीं उजळली ॥५३॥पयाज्यशर्कराखाद्यखण्ड । आर्द्रनारिकेळोद्भव उदंड । पक्कखर्जूरी द्राक्षाघड । रसाळपाड कदळादि ॥५४॥उत्तमत्रयोदशद्रव्यमेळ । अर्पण केले दिव्य तांबूळ । उपायनें यथानुकूळ । कर्पूरसोज्वळ नीराजन ॥३५५॥पुष्पांजळि अर्पूनि शिरीं । सर्वां प्रदक्षिणा करी । वारंवार नमस्कारी । जोडले करीं प्रार्थितसे ॥५६॥प्राह नः सार्थकं जन्म पावितं च कुलं प्रभो । पितृदेवर्षयो मह्यं तुष्टा ह्यागमनेन वाम् ॥४५॥हर्षोत्कर्षें जयजय म्हणे । आजि सार्थक आमुचें जिणें । जन्म सफळ जाला जाणें । चरणागमनें स्वामीच्या ॥५७॥भो भो समर्था गोपाळा । पवित्र केलें आमुच्या कुळा । आजि पितृगणांचा मेळा । भोगी सोहळा ब्रह्मपदीं ॥५८॥देव पितर आणि ऋषि । तुमच्या आगमनें आम्हांसी । पूर्ण तुष्टले हृषीकेशी । प्रतीत ऐसी दृढ झाली ॥५९॥काय्म्हणोनि म्हणसी जरी । तरी तूं परब्रह्म श्रीमुरारि । लीलागोपविग्रहधारी । तें अवधारीं कारण तूं ॥३६०॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP