मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४१ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ४१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर याताशु बालिशा मैवं प्रार्थ्यं यदि जिजीविषा । बध्नन्ति घ्नन्ति लुम्पन्ति दृप्तं राजकुलानि वै ॥३६॥जरी वांचावयाची धराल इच्छा । तरी या गोष्टी न बोला कुत्सा । जीवें सोडिलें तुम्हां तुच्छां । पळा वसनेच्छा सांडूनी ॥९९॥मूर्ख हो नेणां नृपशासना । ऐसी करूं नका प्रार्थना । शीघ्र करा रे पलायना । जरी निज प्राणां वांचवणें ॥३००॥डोंगरीं वनीं पाहतां जैसे । येथ मोकळें नाहीं तैसें । तीव्र नृपाचें शासन असे । बोलतां कैसें उद्धत ॥१॥राजवर्गी येचि क्षणीं । दृढ बांधिती करकरोनी । तादन करिती निष्ठुरपणीं । घेती लुंठुनि सर्वस्व ॥२॥दस्यु म्हणोनि करिती वध । ऐसिया रजकोक्ति विरुद्ध । ऐकोनि कोपला मुकुंद । तत्कर्म विशद अवधारा ॥३॥एवं विकत्थमानस्य कुपितो देवकीसुतः । रजकस्य कराग्रेण शिरः कायादपातयत् ॥३७॥ऐसी आगळी वल्गना वाचे । करितां देवकीतनय त्याचे । नखाग्रें कृंतन मस्तकाचें । करितां झाला सकोप ॥४॥लीलाकमळ खंडी बाळ । तयाचि परी श्रीगोपाळ । सकोप रजकाचें सिसाळ । खंडी तत्काळ कराग्रें ॥३०५॥तस्यानुजीविनः सर्वे वासःकोशान्विसृज्य वै । दुद्रुवुः सर्वतो मार्गं वासांसि जगृहेऽच्युतः ॥३८॥कायेपासूनि रजकशिर । हरितां रजकाचे किंकर । सर्व पळाले सत्वर । वस्त्रसंभार टाकूनी ॥६॥राजसेव्यें धौतांबरें । रंगाथिलीं विचित्रें शुभ्रें । टाकोनि झडझडां पेटारे । रजककिंकरें पळालीं ॥७॥पळतां न सांवरिती आंगें । न वचती एकमेकां मागें । प्राणशाकें अतिलगबगें । दिग्विभागें विखुरलीं ॥८॥आम्ही अनाथें किंकरवृत्ति । वांचवी म्हणोनि वोसणती । एकें अडखळोनियां पडती । तोंडीं माती विमुखत्वें ॥९॥आराधनीं कां विरोधनीं । धैर्य नाहीं ज्यां लागोनी । ऐसी तयांची भंगाणी । जाली म्हणोनि सुचविली ॥३१०॥ज्याचें ऐश्वर्य अविच्युत । यालागीं नामें तो अच्युत । वसनसंभार अव्याहत । घेता झाला स्वइच्छा ॥११॥वसित्वात्मप्रिये वस्त्रे कृष्णः संकर्षणस्तथा । शेषाण्यादत्त गोपेभ्यो विसृज्य भुवि कानिचित् ॥३९॥आपुले कांतिप्रीत्यनुसार । दिव्यवस्त्रें उभय सोदर । देवकीतनय कृष्ण बलभद्र । लेते झाले यथेष्ट ॥१२॥शेष गोपाळां वांटिलीं । उरलीं भूमीवरी विखुरलीं । राजवस्त्रांची लुटी केली । पुरप्रवेशीं शकुनार्थ ॥१३॥पुरप्रवेशकाळीं प्रथम । बळिप्रदानीं रजकाधम । देऊनि कंसा पराक्रम । विदित केला परस्परें ॥१४॥गगनवाणीचा विश्वास । मानूनि पितरां दिधला त्रास । उग्रसेनादि यादवांस । द्वेषिलें विशेष ज्यासाठीं ॥३१५॥जयासाठीं बाळकहनना । प्रेरिली भूमंडळीं पूतना । अघबकादि तावक प्राणां । जयासाठीं मूकले ॥१६॥नारदवचनें व्रजीं कळलें । अक्रूर धाडूनि आणविले । रामकृष्ण ते मथुरे आले । हें जाणविलें रजकवधें ॥१७॥प्राचीन लोकवदंती ऐसी । रजकें दूषिलें श्रीरामासी । रामें निष्पापें जानकीसी । त्यजिलें वनासी अपवादें ॥१८॥ये अवतारीं तैंचें उसणें । रजक मारूनि घेतलें कृष्णें । ऐसें कित्येक ध्वनितवचनें । कर्णोपकर्णें भ्रमविती ॥१९॥मंथरा तेचि कुब्जा म्हणती । पूतना कैकेयी झाली होती । व्याधजन्मीं वाळीचें अन्तीं । उसिणें दिधलें श्रीकृष्णें ॥३२०॥राम जन्मोनि कृष्ण झाला । त्यासही कर्मभोग लागला । ऐसा लौकिक जो गलबला । बालिशांला भ्रामक ॥२१॥मुनीनें शापितां अंबरीष । आपण त्याचे गर्भवास । स्वयें सोसी श्रीपरेश । या वचनास ते आश्रयिती ॥२२॥तरी मत्स्य अद्यापि सिंधुजळीं । कूर्म अद्यापि पृथ्वीतळीं । सिंह दैत्यवधें तत्काळीं । अंतराळीं तिरोहित ॥२३॥वामन अद्यापि बळीचे द्वारीं । चिरंजीव परशुधारी । श्रीराम गेला सशरीरीं । अयोध्यानगरी घेऊनी ॥२४॥यामाजी कोण केव्हां मेला । कोण्या कर्में तो बांधला । कोठें उसिणें देऊं आला । कैसा घडला कोण भोग ॥३२५॥दैत्य स्वसुता शासन करी । निरपराध हरि त्या मारी । त्याचें उसिणें कैं नरहरि । कोणे अवतारीं फेडिलें ॥२६॥म्हणाल शरणागतासाठीं । नृसिंहें फोडिली दैत्यघांटी । तरी वाळिवधाची विरुद्ध गोठी । कां वाक्पुटीं बोलावी ॥२७॥अवताराचें जन्ममरण । न चुके ऐसें जरी प्रमाण । तरी दासाचें भवबंधन । काय म्हणोन परिहरे ॥२८॥कल्पतरुचि दुकळें मरे । तेथ कल्पित्याची कें क्षुधा हरे । यालागीं ऐसी विरुद्धोत्तरें । ऐकोनि चौत्रें न भ्रमिजे ॥२९॥वसुदेवदेवकीप्रति हरि । स्वमुखें म्हणे मी जन्मांतरीं । सुतपापृश्नीचिये उदरीं । प्रुश्निगर्भ जन्मलों ॥३३०॥कश्यपअदितिपोटीं द्वितीय । तुमचे पोटीं जन्म तृतीय । एवं वरदोत्तीर्णसोय । जन्मत्रयें सुचविली ॥३१॥परंतु कर्मफळ भोगावया । कीं मरूनि उसिणें फेडावया । जन्मणें नाहीं जगदात्मया । या निश्चया जाणावें ॥३२॥देवकीउदरीं ज्या नवमास । घडला नाहींच गर्भवास । योनिसंकट कैचें त्यास । केंवि कर्मास तो भोगी ॥३३॥म्हणाल प्राचीन कवींच्या उक्ति । ते रोचनार्था फळश्रुति । कर्म न सुटे देवांप्रति । मां जीवांप्रति केंवि सुटे ॥३४॥ऐशा मीमांसाप्रतिपादका । पूर्वपक्षींच्या श्रुति अनेका । तदनुसार याही वाक्या । देखोनि शंका न धरावी ॥३३५॥एवं करूनि रजकहनन । राजवस्त्रांचें लुंठन । पुढें कैसा चालिला कृष्ण । तें व्याख्यान अवधारा ॥३६॥तततु वायकः प्रीतस्तयोर्वेषमकल्पयत् । विचित्रवर्णैश्चैलेयैराकल्पैरनुरूपतः ॥४०॥शृंगाटकीं कैटभारि । हर्षें चालतां वयस्यभारीं । तंव कोणी एक वायक हरी । यथादरीं भजिन्नला ॥३७॥वायक म्हणिजे सिंपीयाति । तेणें स्वकौशल्यें आपुल्या हातीं । रामकृष्णांच्या उभयमूर्ति । यथा निगुती अलंकारिल्या ॥३८॥वस्त्रांचेचि अलंकार । करूनि शृंगारिले सुंदर । विविध रंगांचे प्रकार । मुकुटप्रवर आभरणें ॥३९॥श्वेतश्याम अंगकांति । तयांसि अनुरूप जे शोभती । तैसे वेश तयांप्रति । वस्त्रसंपत्ती शोभविले ॥२४०॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP