मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४१ वा| आरंभ अध्याय ४१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मने नमः । श्रीगोविंदा दाविंगोश्री । अनुलोमें तव नामगजरीं । सप्रेम गातां गोव्यापारीं । प्रकटे निर्धारी तव धाम ॥१॥येथ मंत्रार्थ मंत्र फळ । तिन्ही मिळोनि अभेद अमळ । सच्चित्सुखधन विलासबहळ । नुधवे हळहळ द्वैताची ॥२॥श्रीचे रुचिरपणें रुचि । केवळ आवडी इंद्रियांची । विषयभ्रमें भ्रमे प्रपंचीं । एर्हवीं साची चित्प्रभा ॥३॥मागील गोडी नेणोनि पुढें । विषयार्थ जीवचैतन्य वेडें । तें तव नामाच्या जीयडे । होय उघडें चिन्मात्र ॥४॥एवं चिन्मात्रैकप्रभा । प्रपंचीं निष्प्रपंचशोभा । गोविंदनामाच्या वालभा । माजी गोगर्भा प्रकाशी ॥५॥मग ते विलोमें परतोनि मूळा । सेवी सन्मात्र स्वसोहळा । जैसी सबाह्य गोडी गुळा । तेंवि शोभला तो संच ॥६॥आंत बाहीर अभेद गगन । गगना ज्यामाजी सांठवण । मोडूनि गेलिया त्रिपुटीभान । सच्चिद्धन गोविंद ॥७॥ अनुलोम विलोम ओतप्रोत । अन्वय व्यतिरेक प्रवृत्त निवृत्त । इत्यादिवाक्यांचा मथितार्थ । भ्रमोपशांत सन्मयता ॥८॥ह्या सद्गुरु निजात्मरमणा । अखंड अभेद प्रणाम चरणा । भेदें भजतां सगुणें सगुणां । अखंडपणा अविसंच ॥९॥भजनामाजी त्रिपुटी सार । कायिक वाचिक मानसपर । तो हा माझा वाग्व्यापार । ग्रंथाकार परिचर्या ॥१०॥सद्गुर्वाज्ञासूत्रावरून । दशमस्कंधाचें व्याख्यान । चाळिसाव्यांत अक्रूरस्तवन । केलें विवरण यथामति ॥११॥आतां एकोत्तरचाळिसा । माजी वृत्तांत आहे ऐसा । मथुरा प्रवेशतां जगदीशा । रजक नाशा पावेल ॥१२॥पुढें वायका माल्यकारा । संतोषोनि देईल वरा । विभवें विलोकील निज नगरा । नगरनागरा हरि पाहती ॥१३॥ये अध्यायीं इतुकी कथा । सप्रेमभावें परिसिजे श्रोतां । श्रवणें निरसी भवभयव्यथा । परमपुरुषार्था प्रकाशी ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP