मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३८ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ३८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ३८ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर उदाररुचिरक्रीडौ स्रग्विणौ वनमालिनौ । पुण्यगंधानुलिप्तांगौ स्नातौ विरजवाससौ ॥३१॥विरज म्हणिजे विशुद्ध वसनें । धरिलीं करूनि मंगळ स्नानें । त्यांवरी सुमनें विलेपनें । दिव्याभरणें शोभती ॥७७॥वैडूर्यमणींचे हार कंठीं । त्यांवरी वनमाळांची दाटी । मलयागर श्रीखंडउटी । सुमनें मुकुटीं तुरंबिलीं ॥७८॥जवादीकस्तुरीसुगंधरोळा । सुगंध पुण्यात्मक आगळा । तरीच प्रियतम बळघननीळा । सौरभ्यउधळा सर्वांगीं ॥७९॥प्रधानपुरुषावाद्यौ जगद्धेतू जगत्पती । अवतीर्णौ जगत्यर्थे स्वांशेन बलकेशवौ ॥३२॥प्रधान म्हणिजे मूळप्रकृय्ति । तदवलंबें पौरुषावाप्ति । प्रधानपुरुष या संकेतीं । वाखाणिजती श्रेष्ठत्वें ॥३८०॥तस्मात्प्रकृतिपुरुषात्मक । स्वांशें मूर्ति धरूनि पृथक् । जगद्योनि अद्वय एक । द्विधा देख अवगले ॥८१॥आदिपुरुष जगत्कारण । म्हणोनि जगत्पति हें अभिधान । जगतीभारहरणा पूर्ण । मूर्त होऊन अवतरले ॥८२॥स्वांशें म्हणिजे स्वमूर्तींसीं । स्व्हेतनीलतनुभावेंशीं । बल केशव या अभिधानांसी । धरिती मानुषी क्रीडेंत ॥८३॥दिशो वितिमिरा राजन्कुर्वाणौ प्रभया स्वया । यथा मारकतः शैलो रौप्यश्च कनकाचितौ ॥३३॥दशदिग्भाग स्वप्रभे करून । वितिमिर करिती दोघे जण । कृष्ण मरकतगिरिसमान । संकर्षण तो ताराद्रि ॥८४॥कनकाभरणीं सालंकृत । विशेष अनर्घ रत्नजडित । जेंवि चंद्रार्क प्रभावंत । दशदिग्ध्वांत परिहरिती ॥३८५॥ऐशा देखोनि उभय मूर्ति । सप्रेम विह्वळ अक्रूरस्मृति । रथौनि उडी घातली क्षितीं । करी प्रणति तें ऐका ॥८६॥रथात्तूर्णमवप्लुत्य सोऽक्रूरः स्नेहविह्वलः । पपात चरणोपांते दंडवद्रामकृष्णयोः ॥३४॥रामकृष्णांच्या चरणांनिकटीं । स्नेहपूर्वक । अंगयष्टि । लोटूनि पडता जाला सृष्टीं । दंडप्राय अक्रूर ॥८७॥भगवद्दर्शनाह्लादबाष्पपर्याकुलेक्षणः । पुलकाचितांग औत्कंठ्यास्त्वाख्याने नाशकन्न्रुप ॥३५॥कंससंदेशापासुनी । जैसे मनोरथ केले मनीं । त्या या प्रत्यक्ष मूर्ति दोन्ही । देखिल्या म्हणोनि आल्हाद ॥८८॥सत्ताविसाव्या श्लोकांत । दर्शनश्रवणादिकें जो प्राप्त । तो भाव जाणावा साद्यन्त । परमपुरुषार्थ देहवंतां ॥८९॥तस्मात् या परमाल्हादें । बाष्पामृतें नेत्रकुमुदें । उचंबळलीं आणि सद्गदें । श्वासरोधें स्फुंदतसे ॥३९०॥तनु पाझरे स्वेदजळीं । हर्षें थरकली रोमावळी । पुलक सर्वत्र रोममूळीं । कांपे चळाळी विवशत्वें ॥९१॥ऐसे भाव सात्त्विक अष्ट । अक्रूराआंगीं जाले प्रकट । सतनुस्मृतीची वळली मोट । न शके प्रकट वक्त्र वदों ॥९२॥मी अक्रूर नमितों चरण । ऐसें करूं न शके कथन । तेथ साकल्य वर्त्तमान । समर्थ कोठून कथावया ॥९३॥सात्त्विकाष्टकें थकली स्मृति । स्तिमित सर्वही करणवृत्ति । अन्तर्वेत्ता जाणोनि चित्तीं । काय श्रीपति करितसे ॥९४॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP