मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३८ वा| श्लोक २६ ते २७ अध्याय ३८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ३८ वा - श्लोक २६ ते २७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते २७ Translation - भाषांतर तद्दर्शनाह्लादविवृद्धसंभ्रमः प्रेम्णोर्ध्वरोमाऽश्रुकलाकुलेक्षणः । रथादवस्कंद्य स तेष्वचेष्टत प्रभोरमून्यंघ्रिरजांस्यहो इति ॥२६॥अहो या पदाचें व्याख्यान । परमाश्चर्यें म्हणे धन्य । जे कां दुर्लभ भगवच्चरण । ते म्यां सचिह्न देखिले ॥७॥ज्यासि दुर्लभ वराटिका । त्यासि निधान जोडल्या देखा । गगन न पुरे त्याचिया हरिखा । त्याहूनि श्वाफल्का उत्साह ॥८॥भगतच्चरणदर्शनानंद । तेणें संभ्रम वाढला अगाध । तीं चिह्नें ऐका विशद । नृपा कोविद शुक सांगे ॥९॥सप्रेम भरतें भरलें आंगीं । रोमा थरकल्या सर्वांगीं । बाष्पांबुकळा लागवेगीं । स्तिमितापांगीं डळमळिती ॥३१०॥रोमांचमूळीं उमटले पुलक । शरीरीं पाझरे स्वेदोदक । सकंपश्वासा जालें अटक । सात्त्विकाष्टक प्रकटलें ॥११॥तयां संभ्रमा सरिसा पाहीं । रथावरूनि लोटला मही । कृष्णपाउलें दोहीं बाहीं । कवळी हृदयीं औत्सुक्यें ॥१२॥हे प्रभूचे अंघ्रिकण । म्हणूनि तनूचें उतरी लोण । कवळूनि घाली लोटांगण । परम धन्य भव मानी ॥१३॥मध्यपीठ श्रीकृष्णांघ्रि । श्रीविद्या ते राजेश्वरी । आवरणदेवता गोपगोखुरीं । नमस्कारी सप्रेमें ॥१४॥आजि कृष्णांघ्रिरजांच्या ठायीं । स्नान जालें मज पुण्यांहीं । यज्ञावभृथें जितुकीं कांहीं । घडलीं स्वदेहीं मानितसे ॥३१५॥कृष्णांघ्रिरेणूंमाजि लुंठन । किमर्थ केलें म्हणाल पूर्ण । तरी प्रेमसंभ्रमाचें अवतरण । फळाभिस्मरण करूं नेदी ॥१६॥देहंभृतामियानर्थो हित्वा दंभं शुचम् । संदेशाद्यो हरोर्लिंगदर्शनश्रवणादिभिः ॥२७॥प्राणी देहातें जे धरित । त्या देहवंतांचा मुख्य पुरुषार्थ । हाचि उत्कृष्ट ऐसें कथित । शुक समर्थ नृपातें ॥१७॥तो हा कोणता पुरुषार्थ । जो अक्रूरा साधला येथ । तो साकल्यें वाखाणिजेत । चतुरीं स्वस्थ परिसावा ॥१८॥सांडूनि दंभभयादि शोक । भगवत्प्रेमा अंतर्मुख । कंससंदेशपूर्वक । श्वफल्कतोक जो भोगी ॥१९॥तरी अक्रूरें कैसें टाकिलें भय । कैसा दंभ टाकिला होय । शोकत्यागाचा अभिप्राय । यथान्वयें परिसा हो ॥३२०॥नंदादि व्रजींचे प्रजानन । त्यांसि करूं जातों मी शासन । तें राजसत्ता ऐश्वर्यचिह्न । त्यागिलें संपूर्ण हरिप्रेमें ॥२१॥ऐसा कथिला दंभत्याग । आतां परिसा भयाचें लिंग । अक्रूरें त्यागिलें तो प्रसंग । यथासांग कथिजेल ॥२२॥मी अक्रूर कंसदूत । माझें कुटुंब मथुरेआंत । साधावया कंसकृत्य । व्रजा निश्चित धाडिलों ॥२३॥परमगुह्य आत्मिकपणें । कंसें कथिलें मजकारणें । तदर्थ व्रजा माझें जाणें । हें निर्भयपणें विसरला ॥२४॥मी कृष्णासि झालों शरण । हें कंसासि होतां श्रवण । तैं कुटुंबें सहित माझें मरण । हें भय संपूर्ण त्यागिलें ॥३२५॥व्यसनीं पडलें यादवकुळ । त्याचा कैपक्षी घननीळ । त्यातें वधील कंस खळ । तैं दुःख केवळ सर्वांसी ॥२६॥रामकृष्णां वधिल्या पाठीं । देवकीवासुदेवांतें निवटी । उग्रसेनाची छेदील घांटी । आणि यादवकोटी मारील ॥२७॥तेव्हां माझे जिवलग आप्त । कंस मारील ते समस्त । तैं मज जाकळी शोकावर्त । ऐसें हृदयांत न धरिलें ॥२८॥अथवा कृष्णासि जालों शरण । ऐसें कंसासि होतां श्रवण । माझिया कुटुंबालागिं दुर्जन । तीव्रशासन तैं करील ॥२९॥निरपराध स्त्रिया लेंकुरें । दुर्जनाच्या तीव्र प्रहारें । दुःख पावती या शोकांकुरें । नाहीं अंतरें शिवतला ॥३३०॥वृत्तान्तपूर्वक कंसाज्ञा । संदेश ऐसी तयेसि संज्ञा । तो संदेश ऐकतां अक्रूरमना । भगवद्भावना उपजली ॥३१॥सांडूनि भय शोक आणि दंभ । कवळिला केवळ पद्मनाभ । तदनुप्रेमें मानसक्षोभ । अनन्य वालभ जें कथिलें ॥३२॥संदेश पडतां श्रवनपुटीं । विसरला सदंभभयशोकगोठी । भगवत्प्रेमा उथलला पोटीं । शुकें वाक्पुटीं तो कथिला ॥३३॥माझें आजि जन्म धन्य । कंससंदेशें करून । मी देखेन भगच्चरण । उल्हास पूर्ण हा भरला ॥३४॥तेणें उल्हासभरित चित्तें । गृहीं क्रमूनि ते रात्रीतें । प्रभाते चालिला व्रजपुरातें । ध्यानभक्तीतें अनुभवित ॥३३५॥म्हणे काय म्यां सुकृत केलें । सर्वस्व सत्पात्रीं अर्पिलें । कीं तपश्चर्यें संपादिलें । जें हरिपाउलें देखेन मी ॥३६॥परम दुर्लभ जो संसारीं । तो मी कंसआज्ञेवरी । शूद्र श्रुतीतें अनधिकारी । तो ही श्रीहरि देखेन ॥३७॥पुनरपि म्हणे हेंही नव्हे । मज कां हरिदर्शन न व्हावें । जरी मी अधम तथापि व्हावें । अच्युतदर्शन मजलागीं ॥६८॥कालनदीच्या प्रवाहीं । तृणासमान जीव पाहीं । बळें वाहवितां न वचती काई । कोण्ही तर्हीही परपारा ॥३९॥भगवद्दर्शनासि अवरोध - । कारक अमंगल अघसंबंध । तो नाशोनि सजन्म शुद्ध । जालों प्रसिद्ध हरिनमना ॥३४०॥कंसें मजवरी अनुग्रह केला । कीं हा नियोग सांगीतला । तेणें देखोन हरिपाउलां । ज्या भजतां लंघिता भव संतीं ॥४१॥विधि हर सुर मा सात्वत मुनि । अर्चिती जया पदां लागुनी । गोचारणार्थ वृंदावनीं । गोपींच्या स्तनीं लांछित जे ॥४२॥त्या कृष्णाचें सस्मित ध्यान । आजि भाग्यें देखती नयन । कीं जे होती मज शुभ शकुन । प्रादक्षिण्यें मृग जाती ॥४३॥जाणोनि निजजनांची आर्ति । भूभारहरणा लावण्यमूर्ति । तो कृष्ण देखेन मनुष्याकृति । तैं सफळ संपत्ति नयनांची ॥४४॥जरी धरिला मनुष्यदेह । तरी ज्या नातळे अहंमोह । स्वप्रकाशज्ञानप्रवाह । लीलानुग्रहविग्रही ॥३४५॥प्राकृत मानिती त्या देहधारी । परी तो निर्गुण निर्विकारी । स्वधर्मसंस्थापनेवारी । लीलावतारी युगीं युगीं ॥४६॥तें जन्मकर्मगुणचरित्र । वाचा सुमंगल वर्णिती मिश्र । त्यां जीवविती शोभविती आणि पवित्र । करिती सर्वत्र त्रिजगातें ॥४७॥भगवज्जन्मकर्मगुणवर्जिता । येर शृंगारचातुर्यभरिता । जरी जाल्या कविसंमता । तर्ही त्या प्रेतासम वाणी ॥४८॥तो हा अवतरला यदुकुळीं । धर्मसंस्थापक भूमंडळीं । तेचि ज्याची यशनव्हाळी । अमरावळी गाताती ॥४९॥त्यातें आजि देखेन दृष्टीं । ज्याचें लावण्य त्रिजगां मुकुटीं । सुप्रभाते शकुनगांठी । म्यां हृत्पटीं बांधिली ॥३५०॥तथापि ऐसा देखिल्यावरी । उडी घालीन मी धरित्री । सधेनु सानुग नमस्कारीं । योगेश्वरीं जो पूज्य ॥५१॥दंडप्राण चरणांवरी । पतित देखोनि मातें हरि । अभयहस्त ठेवील शिरीं । जो भय हरी शरणांचें ॥५२॥जो हस्त बळीनें त्रिजगद्दानीं । कीं शक्रें पूजिला शतमखयजनीं । कीं गोपींहीं श्रमापहरणीं । रासनर्तनीं आळंगिला ॥५३॥ऐसा हस्त माझे शिरीं । ठेवूनि परमात्मा अंतरीं । कांहीं विषम भावा न धरी । न मनी वैरिदूत मज ॥५४॥दंडप्राय नमिल्या वरी । कृतांजलि मज देखोनि हरि । कृपादृष्टां अमृतधारीं । तैं अनघ शरीरीं सुख वाटे ॥३५५॥जरी मज मानूनि वृद्ध वडील । बाहु पसरूनि आळंगील । तरी तीर्थमयचि मज करील । बंध हरील कर्मांचा ॥५६॥लब्धप्रमाण अंगसंग । कृतांजलि समाहितांग । देखोनि पुसेल मज श्रीर्म्ग । बापा म्हणोनि गौरवें ॥५७॥तेव्हां धन्य माझें जन्म । कीं मज संतुष्ट पुरुषोत्तम । ज्यातें नादरी मेघश्याम । परम अधम तेंचि जिणें ॥५८॥भगवंताच्या आदरा हेतु । नोहे सोयरा स्वजन आप्तु । द्वेष्य उदास ना मध्यस्तु । कीं तो सर्वगत सर्वात्मा ॥५९॥तथापि भक्तप्रेमानुसार । फळे जैसे सुरतरुवर । तैसा कृष्ण निर्विकार । मित्रामित्र तद्भावें ॥३६०॥असो मातें कृष्णाग्रज । कृतांजलि धरूनि सहज । सत्कारील मानूनि पूज्य । तैं मी भोज नाचेन ॥६१॥कंससंदेशापासून । ऐसे संकल्प विवरी मन । विवशतनुभावें प्रयाण । सूर्यास्तमानपर्यंत ॥६२॥बाह्यतनुभाव विसरला । नेणे कैसा मार्ग क्रमिला । रथें करूनि व्रजा गेला । तंव बोधिला हरिबोधें ॥६३॥भूमीं उमटले कृष्णचरण । ध्वजवज्रांकुशादि सुचिह्न । देखोनि घातलें लोटांगण । भरला पूर्ण सत्त्वाष्टकें ॥६४॥भगवत्प्रेमें तनुमनभाव । विसरला दंभशोकभेव । परमपुरुषार्थ याचें नांव । हें श्रेष्ठगौरव देहवंता ॥३६५॥म्हणोनि देहातें जे धरिती । हाचि पुरुषार्थ तयांप्रति । जे अक्रूरा ऐशी भगवद्रति । देहविस्मृती माजी घडे ॥६६॥देहवंतां हे दुर्लभ प्राप्ति । जे भवविस्मरणें भगवद्रति । शुकें कथूनियां रायाप्रति । कथा पुढती आदरिली ॥६७॥भूमीवरी उमटले चरण । अक्रूरें ते अभिवंदून । पुढें झालें हरिदर्शन । तें निरूपण अवधारा ॥६८॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP