मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३८ वा| श्लोक २८ ते ३० अध्याय ३८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ३८ वा - श्लोक २८ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २८ ते ३० Translation - भाषांतर ददर्श कृष्णं रामं च व्रजे गोदोहनं गतौ । पीतनीलांबरधरौ शरदंबुरुहेक्षणौ ॥२८॥रथौनि होता जो उतरला । तैसाचि पुढतीं रथीं बैसला । हरिपदचिह्नें पाहत गेला । दोहनस्थळा धेनूंच्या ॥६९॥जेथ धेनूंचें दोहन । करिती त्या नांव दोहनस्थान । तेथें होते विद्यमान । रामकृष्ण एकत्र ॥३७०॥कृष्ण सांवळा पीतवसन । नीलांबरधर संकर्षण । शरत्सरोजफुल्लारनयन । सुप्रसन्न देखिले ॥७१॥किशोरौ श्यामलश्वेतौ श्रीनिकेतौ बृहद्भुजौ । सुमुखौ सुंदरवरौ बालद्विरदविक्रमौ ॥२९॥दोघां किशोरवय समान । श्यामश्वेत तनुभा भिन्न । श्रीवत्स श्रीनिकेतन । बाहु आजानु शुभ वक्र ॥७२॥त्रैलोक्यींच्या सौंदर्यवंतां । मुकुटीं ज्यांची वर सुंदरता । बालद्विरदापरी तुळितां । विक्रमसमता दोघांची ॥७३॥ध्वजवज्रांकुशांभोजैश्चिह्नितैरिघ्रिभिर्व्रजम् । शोभयंतौ महात्मानावनुक्रोशस्मितेक्षणौ ॥३०॥ध्वजवज्रांकुशाब्जचिह्नें । मंडित पाउलें सुलक्षणें । भूमीं उमटती शोभायमानें । शोभित तेणें व्रज करिती ॥७४॥देहधारी जे वरिष्ठ । त्यांहूनि ज्यांचे देह श्रेष्ठ । महात्मानौ पदें स्पष्ट । हा अर्थ उत्कट शुक वदला ॥३७५॥अनुकंपान्वित हास्यवदनीं । तद्युक्त अपांग विलसती वदनीं । उदारक्रीडा मिरवती दोन्ही । अमूल्यमणिस्रग्वंत ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP