मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३८ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ३८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ३८ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर अप्यंध्रिमूले पतितस्य मे विभुः शिरस्यधास्यन्निजहस्तपंकजम् ।दत्ताभयं कालभुजंगरंहसा प्रोद्वेजितानां शरणैषिणां नृणाम् ॥१६॥चरणीं ठेवितांचि मस्तक । विभु समर्थ उत्तमश्लोक । माझे शिरीं हस्ताब्जक । कृपापूर्वक ठेवील ॥२१॥तें हस्ताब्ज म्हणाल कैसें । दिढा श्लोकें विस्तारवशें । निरूपिजेल तें मानसें । श्रोतीं संतोषें परिसावें ॥२२॥कालभुजंगाचिया वेगें । प्राणी तळमळिती आवघे । त्यांमाजि शरण भयप्रसंगें । जाले निजांगें श्रीचरणीं ॥२३॥तयां मानवां अभयदान । जया हस्ताब्जें करून । आणिक सभाग्य कोण कोण । तें हस्ताब्जनिधान लाधलें ॥२४॥समर्हणं यत्र विधाय कौशिकस्तथा बलिश्चाप जगत्त्रयेन्द्रताम् ।यद्वा विहारे व्रजयोषितां श्रमं स्पर्शेन सौगन्धिकगंध्यपानुदत् ॥१७॥सम्यक म्हणिजे वरव्यापरी । शतक्रतूच्या पुण्यावसरीं । सप्रेम सपर्या षोडशोपचारीं । पुरन्दर करी ज्या हस्तीं ॥२२५॥कौशिकनामें पुरन्दर । जो लाहोनि वरद कर । जंभनमुचिवृत्रासुर । जाला पटुतर मर्दावया ॥२६॥आणि रावण मर्दूनि अयोध्यापुरीं । श्रीराम प्रवेशला सुरवरभारीं । भद्रीं अमरेन्द्र नमस्कारी । तैं लाहे शिरीं वरद हस्त ॥२७॥कीं इंद्राच्या कैपक्षें । बळीतें छळीलें वामनवेषें । तेव्हां तेणें प्रेमोल्हासें । दानविशेषें कर पूजिला ॥२८॥त्रिपादपरिमितभूमिदान । करीं अर्पिलें संकल्पजीवन । यास्तव अद्यापि द्वाररक्षण । करी आपण तयाचें ॥२९॥आणि त्रिजगाची अमरेंद्रता । बळी लाधला प्रसाद उचिता । तोचि हस्त मी आजि माथां । हरिपद नमितां लाहेन ॥२३०॥दैत्यभयाची निवृत्ति । निर्भय इंद्रपदाची प्राप्ति । ऐसी इंद्राची सकामभक्ति । ते अभीष्टावाप्ति त्यां जाली ॥३१॥निष्काम बळीनें त्रिपाददान । छळितां केलें आत्मार्पण । इंद्रत्वेंसीं कैवल्यसदन । द्यावया भगवान द्वार रक्षी ॥३२॥ऐसें सकामादि मुमुक्षुनिकर । त्यांसि अभीष्टप्रद जो कर । आणि अनुरक्तांसही सुखकर । तो प्रकार अवधारा ॥३३॥गोपी अनन्य सप्रेमळा । नेणती कर्मादि कर्मफळा । अवंचकभावें श्रीगोपाळा । हृदयकमळामाजि धरिती ॥३४॥तद्विरहादि त्रितापशमनीं । रासक्रीडा रसनर्तनीं । कोमलहस्तपद्म संस्पर्शोनी । पंकजपाणि निववी त्यां ॥२३५॥चंदनीं सौरभ्य नैसर्गिक । कीं वेधवती सौगंधिक । इत्यादि गंधा जो द्योतक । भोगिती हस्तक तो गोपी ॥३६॥ऐसा परमानुग्रहकर । श्रीकृष्णाचा पद्मकर । तेणें स्पर्शेल माझें शिर । आजि नमस्कारप्रसंगीं ॥३७॥आणि शत्रुदूत मी म्हणोनि कांहीं । कृष्ण शत्रुत्वें पाहणार नाहीं । ऐसें वाटतें माझ्या ठायीं । तें श्लोकान्वयीं प्रकाशी ॥३८॥न मय्युपैप्यत्यरिबुद्धिमच्युतः कंसस्य दूतः प्रहितोऽपि विश्वदृक् ।योंऽतर्बहिश्चेतस एतदीहितं क्षेत्रज्ञ ईक्षत्यमलेन चक्षुषा ॥१८॥कंसें प्रेरिलों सांगूनि काज । तेणें कंसदूतत्वही यथार्थ मज । तथापि सर्वज्ञ अधोक्षज । जाणे गुज हृदयींचें ॥३९॥सबाह्य श्रीकृष्ण विश्वद्रष्टा । जाणे कायवाड्मानसचेष्टा । यास्तव माझिया अंतर्निष्ठा । दिसती स्पष्टा क्षेत्रज्ञा ॥२४०॥मी सबाह्य कृष्णीं निरत । बाह्यविडम्बीं कंसदूत । हें नित्यावबोधें समस्त । जाणे सर्वगत सर्वात्मा ॥४१॥सबाह्य जाणोनियां निष्कपट । मजवरी होईल पूर्ण संतुष्ट । तेव्हां अवघे हरती कष्ट । तेंचि स्पष्ट बोलतसे ॥४२॥अप्यंघ्रिमूलेऽवहितं कृतांजलिं मामीक्षिता सस्मितनार्दया दृशा ।सपद्यपध्वस्तसमास्तकिल्बिषो वोढा मुदं वीतविशंक ऊर्जिताम् ॥१९॥सम्यक् श्रीकृष्णाचे चरणीं । दंडप्राय तनु लोटुनी । अष्टभावें उचंबळोनी । उभा राहीन नम्रत्वें ॥४३॥आवरूनियां सर्व करणां । एकाग्र करूनि नयना मना । उभा राहीन सन्निध चरणां । देखोनि करुणा हरि करील ॥४४॥नम्रमूर्ध्नीं बद्धांजलि । मातें देखोनियां वनमाळी । अमृतदृष्टी जैं निहाळी । तैं किल्बिष समूळीं क्षाळेल ॥२४५॥हास्यवदनें सुधापांगें । अवलोकितां कमलारंगें । परमानंदें निवती आंगें । ऊर्जित सवेगें लाहेन ॥४६॥आणि आत्मीय यादवगणीं । मातें गणील चक्रपाणि । ऐसें भावूनि अंतःकरणीं । बोले वाणी तें ऐका ॥४७॥सुहृत्तमं ज्ञातिमनन्यदैवतं दोर्भ्यां बृहद्भ्यां परिरप्स्यतेऽथ माम् ।आत्मा हि तीर्थीक्रियते तदैव मे बन्धश्च कर्मात्मक उच्छ्वसित्यतः ॥२०॥जाणोनि परमात्मा श्रीकृष्ण । अनन्यभावें होईन शरण । ऐसें अक्रूरें निरूपण । केलें संपूर्ण येथवरी ॥४८॥आतां कृष्ण कैसा आपणा । सम्मानील ते संभावना । अक्रूर करी अंतःकरणा । माजि त्या कथना अवधारा ॥४९॥कृष्ण देखोनि ऐसिया मातें । परमसुहृत्तम मानील चित्तें । अनन्य दैवत मज वृद्धातें । स्नेहभरितें भावील ॥२५०॥आपुले ज्ञातीमाजि आप्त । मम कल्याणीं परम निरत । पूज्य अनन्य दैवत । भावील भगवन्त मजलागीं ॥५१॥सस्निग्ध विशाळ उदार बाहीं । आदरें आळंगील हृदयीं । त्यानंतरें माझें कांहीं । ऊर्जित कल्याण कीं काय ॥५२॥केवळ श्रीकृष्ण परमात्मा । तो जैं पूज्यत्वें भजेल आम्हां । तैं आमुच्या कल्याणकामा । विपर्यास तो न घडेल कीं ॥५३॥ऐसें विवरूनि पुढती म्हणे । श्रीकृष्णाच्या आलिंगनें । माझा देह पवित्रपणें । तीर्था तीर्थ होईल ॥५४॥स्पर्शमणीच्या सन्निधानें । लोह पालटे सुवर्णपणें । कीं गंगोदकाच्या संस्पर्शनें । निष्पाप होणें त्रैलोक्यें ॥२५५॥ते गंगा ज्याचे चरणकमळीं । तो जैं आलिंगी वनमाळी । तेव्हां तीर्थाची मंडळी । करील सगळी तनु माझी ॥५६॥आणि अग्नीच्या आलिंगनें । बीजतापासूनि मुकती धान्यें । तैसीं कर्माचीं बंधनें । मुक्त होती तत्काळ ॥५७॥पुनः पुनः उपजणें मरणें । पुनः पुनः देह धरणें । कर्मबन्धें ज्या ऐसें करणें । कृष्णालिंगनें तो निरसे ॥५८॥देह अळंगितां श्रीकृष्ण । कर्मबन्ध देहापासून । मुक्त होतां न घडे जाण । पुन्हा धारण देहाचें ॥५९॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP