मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३८ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ३८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ३८ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - अक्रूरोऽपि च तां रात्रिं मधुपुर्यां महामतिः । उषित्वा रथमास्ताय प्रययौ नंदगोकुलम् ॥१॥शुक म्हणे गा महाप्राज्ञा । अक्रूरें घेऊनि कंसाज्ञा । येऊनि आपुलिया सदना । व्रतें हरिदिना लोटिलें ॥२५॥ते रात्रीं क्रमूनि मथुरापुरी । महातेजस्वी अक्रूर क्षत्री । प्रभाते आरूढोनि रथावरी । जैसा तमोरि उदया ये ॥२६॥तैसा प्रतापी द्युतिमंत । अक्रूर परम भागवत । रथेंसहित क्रमी पंथ । जावया त्वरित नंदव्रजा ॥२७॥तंव येरीकडे जनार्दना । नारदें केली विज्ञापना । कीं उद्या करिसी कंसहनना । मल्लवारणासमवेत ॥२८॥भविष्यार्थ समीप मुनि । कथूनि गेलिया चक्रपाणि । मथुराप्रवेशीं कंसहननीं । आवेश मनीं उथलला ॥२९॥काम खवळे नवयौवनीं । क्रोध कुरपे रिपुवल्गनीं । कीं गजयूथा समीप अवलोकुनी । मृगेंद्र मनीं आवेशे ॥३०॥कीं समीप जाणोनि प्रळयकाळ । महामृत्यु ग्रसनशील । तेंवि उद्युक्त घननीळ । कंसादिखळदळनार्थ ॥३१॥जो कृष्णाचा मनोरथ । तो हा मूर्त अक्रूररथ । प्रेरिला होत्साता उद्युक्त । क्रमी पंथ तें ऐका ॥३२॥गच्छन्पथि महाभागो भगवत्यंबुजेक्षणे । भक्तिं परामुपगत एवमेतदचिंतयत् ॥२॥ऐकें राया कुरुभूषणा । नंदव्रजाप्रति करितां गमना । परमोत्साह अक्रूरमना । जाला कोणा प्रकारींचा ॥३३॥अभेदभजनभाग्यें सभाग्य । यास्तव अक्रूर महाभाग । भगवच्चरणीं भक्तियोग । त्यातें अभंग प्रकटला ॥३४॥हें निरूपण विवेकें खोले । मानसीं पाहिजे अवलोकिलें । चतुरांलागिं विनीत बोलें । अल्प सूचिलें जात असे ॥३५॥परा म्हणिजे उत्कृष्ट भक्ति । परब्रह्मात्मक जे रति । म्हणाल उदेली अक्रूराप्रति । तें हें श्रोतीं न म्हणावें ॥३६॥अथवा पूर्ण परमेश्वर । तत्पदभजनप्रेमादर । म्हणाल पावला तो अक्रूर । परी हा विचार न म्हणावा ॥३७॥केवळ श्रीकृष्ण परब्रह्म । पूर्ण चैतन्य आत्माराम । तत्पदभजनीं उत्कृष्ट प्रेम । उदेलें निःसीम तें त्यातें ॥३८॥व्याघ्रवत्स अविकपाळें । पाळिले मंडलकाच्या मेळें । स्वकुळज्ञानें यथा काळें । जेंवि तें मिळे स्वपक्षीं ॥३९॥तेंवि भूभारहरणकाम । अवतरला जैं पुरुषोत्तम । तेव्हां स्वपक्षपराक्रम । अंशरूपें हा प्रकटिला ॥४०॥ते हे अक्रूरादि यादव । आणि नंदादि पशुप सर्व । यांचा अभेदप्रादुर्भाव । प्रसंगें भाव प्रकटती ॥४१॥रिक्त तडागीं लवणदुर्ग । लाहोनि मातला दस्युवर्ग । तदर्थ प्रावृटीं कदनप्रसंग । नृपें सांग आदरिला ॥४२॥भंवते नृपदळाचे पाळे । दस्यु न गणितीच दुर्गबळें । वार्षिकी सरोवर भरतां जळें । दुरही मिळे तत्पक्षीं ॥४३॥तैं दस्यूचा खचला पाया । तो न्याय घडला कंसराया । रामकृष्णांच्या हननकार्या । अक्रूर उपाया प्रयोजिला ॥४४॥त्यासि चालतां गोकुळपथीं । हृदयीं आठवली कृष्णमूर्ति । प्रकट जाली अभेदभक्ति । मुनिगगनोक्ति विश्वासें ॥४५॥आठवा देवकीचे पोटीं । ऐसी संदिग्ध गगनगोठी । नारदें कथितां नंदवाटीं । भरवसा पोटीं दृढ झाला ॥४६॥तया कृष्णा अंबजेक्षणा । चिंतूनि तच्चरणीं दृढभावना । अभेदप्रेमें जडली जाणा । करी चिंतना तत्तोषें ॥४७॥उदया येतां प्रसूतिकाला । पान्हा प्रकटे स्तनमंडळा । तेंवि जैं कंसाची मरणवेळा । तैं प्रेमा उदेला अक्रूरा ॥४८॥मग तो तेणें प्रेमरसें । तिंबलेनि निजमानसें । चिंतिता जाला तें पर्येसें । मुनि म्हणतसे कुरुवर्या ॥४९॥किं मयाचरितं भद्रं किं तप्तं परमं तपः । किं वाऽथाप्यर्हते दत्तं यद्द्रक्ष्याम्यद्य केशवम् ॥३॥चालतां व्रजपुरपथें रथ । अक्रूरा पोटीं मनोरथ । म्हणे मी पूर्वीं कल्याणभरित । किमाचरित आचरलों ॥५०॥काय सुकृत माझिये गांठीं । जेणें आजि मी केशवा दृष्टीं । पाहेन म्हणोनि आनंद पोटीं । सुखसंतुष्टीं उथलला ॥५१॥तपश्चर्या अतिदारुण । निष्काम तपिन्नलों मी पूर्ण । तेणें अखिलमंगलायतन । तो श्रीकृष्ण देखेन मी ॥५२॥किंवा वाटतें मज बहुतेक । स्वधर्मार्जित गो भू कनक । सत्पात्रीं सम्मानपूर्वक । दानें अनेक मज घडलीं ॥५३॥यथायोग्य यथापात्रीं । यथोक्त देशकाळीं पवित्रीं । यथेष्ट द्रव्यें यथासूत्रीं । यथाधिकारें समर्पिलीं ॥५४॥तया सुकृताचिया राशि । सफळ आलिया उदयाशीं । तेणें भाग्यें केशवासी । नेत्रसारसीं देखेन ॥५५॥पुढतीं शंकित विवरी मनीं । अनधिकारिया मजलागुनी । परम दुर्लभ चक्रपाणि । काय म्हणोनि तें तर्की ॥५६॥ममैतद्दुर्लभं मन्य उत्तमश्लोकदर्शनम् । विषयात्मनो यथा ब्रह्मकीर्तनं शूद्रजन्मनः ॥४॥पांचभौतिक देहात्ममति । कंस तो हा खळ दुर्मति । मी तयाचा आज्ञावर्ती । पापमूर्ति सबाह्य ॥५७॥निर्दय कुटिल निरपत्रप । सदैव वर्ततां तयासमीप । तेणें घडला कल्पषलेप । नुमजे अल्प आत्महित ॥५८॥यास्तव उत्तमश्लोकदर्शन । परम दुर्लभ मजलागुन । जैसें वृषला श्रुतिव्याख्यान । मानी मम मन तद्वत हें ॥५९॥विरक्तां होय ब्रह्मप्रतिष्ठा । जेंवि ते दुर्लभ विषयनिष्ठा । तेंवि अघटित मज पापिष्ठा । भेटीं वरिष्ठा कृष्णाची ॥६०॥ऐसी दुर्लभ श्रीकृष्णभेटी । कोठूनि माझिये अदृष्टीं । ऐसी अप्राप्ति बैसतां पाठीं । तंव स्मरली गोठी प्राप्तीची ॥६१॥मैषं ममाधमस्यापि स्यादेवाच्युतदर्शनम् । ह्रियमाणः कालनद्या क्कचित्तरति कश्चन ॥५॥पूर्वोक्त असंभावने बाध । करी संभावना अनुवाद । तो मानसीं एवंविध । विवरी प्रबुद्ध अक्रूर ॥६२॥हरिदर्शनीं असंभावना । म्हणे वृथा हे स्फुरली मना । मजसारिख्याही अधमा दीना । हरिदर्शनावाप्ति घडे ॥६३॥कोण्या प्रकारें म्हणाल ऐसें । तरी तृणतुष नदीप्रवाहासरिसें । बळेंचि परपार पावें जैसें । अयोग्य अनायासें एकादें ॥६४॥सर्वत्र तृणें नदी लंघिती । ऐसें न बोलवेचि व्याप्ति । नाहीं न म्हणवेचि निश्चिति । एकें देखिजेनि उल्लंघितां ॥६५॥तेंवि काळाचा बळात्कार । तेथें कर्मानिल प्रेरणापर । सुरनरतिर्यकां भ्रमणकर । कोण्ही दुस्तर लंघिती ॥६६॥तयां क्कचित्जीवांमाजी । कृष्णदर्शन मजही आजि । घडेल ऐसें हृदयांभोजीं । भावूनि पूजी हरि ध्यानीं ॥६७॥ N/A References : N/A Last Updated : May 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP