कटिबंध दत्ताचा १

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


दत्तात्रया श्रीगुरुमूर्ति । निजहृदयीं संतत ध्यावी ॥धृ॥
चतुरानन श्रीविष्णूतनय विख्यात जनीं । त्या उदरीं प्रगटित अत्रि सुनि । जो निर्मळ निश्चळ शुद्घपणी । निज स्वधर्म अपुला तप अचरणीं । गेल्यावरि एकांत वनीं । मग त्याची पत्नी । अनुसूया मृगनयन शुभाननि । पतिव्रतेचि आदि स्वामिनि एकांति असतांना ब्रह्मा विश्णू महेश्वर तिघेजने त्या पतिव्रतेचा चमत्कार पाहुनिया तींतें प्रसन्न जाले । त्रैमूर्त्यात्मक रूप प्रगटले । श्रीदत्तात्रय नाम ठेविलें । रूपसुलक्षण बहुत चांगलें ॥ श्यामवर्ण तनु कमल नयन कमलापति तो हरि कमला सन सपितामह मानुनि अत्रिमुनिचें हृद्गत जाणुनि हस्तकमल जोडुनिया निजमाते प्रति विनवूनि वनांतरिं गेले असताम पृष्ठभागि ऋषिपुत्र लागले ऐसें पाहूनि उदकांतरि सुरसहस्त्र वरुषे राहुनिया मग बाहेर येतां मुनिपत्रातें दाखवुनि भय अपुले मनि मग होउनि निर्भय बालोन्मत्त पिशाच्चवस्था अवलंबुनिया पृथ्वीवरुते फिरति सहज स्वभावी ॥१॥
तो हा श्रीधर करुणाकरु । होउनि दत्तात्रय श्रीगुरु । चिमणे लहानसे लेकरूं । माथा जटा उडति भुरुभुरु । मार्गीं चालतसे तुरुतुरु । केव्हां हासत रडत झुरूझुरू । विचरे एकट वनिं निर्भंरू । विपिनिं ययापरिचि बाळीलला दाउनिया ऐसि शिशु अचरति जैसी तैसी । नोळखतां अपुले शरिरासी । तन्मय होउनि चित्स्वरुपासि । चालतसे जैसा जडरासी । तापहारन वैकुंठविलासी । सेवुनिया उन्मत्तपनासी । वेड्यावाणी नग्न दिगंबर । भस्म धुलित वपु शोभत सुंदर । सेवुनिया निर्जन गिरिकंदर । मोठे मोठे पर्वत पाहुनि त्याजमधी चालुनिया जावें । अठा पंधरा दिवसांनी वृत्तिवीर यावें । फळमुळकंद मिळल तें खावें । पाणि फुटाणे पाणी प्यावें । निशिदिनिं उगेचि फिरावें । कोणे समयीं बसले असतां व्याघ्रांबर घालुनिया बरवें । त्याचे वरुते अंष्टअंग हटयोग करावे । स्वस्तिक गौमुख वीरासन कूर्मासन बरवे कुक्कुट उलटे कुर्मासन घालुनिया सत्वर त्याजवरि मच्छेर्द्रपीठ मग पश्चम असन सिद्धासन घालुनिया बरवें त्या उपरांतिक पद्मासन सिंहासन अणखी सुषुप्ति आसन ब्रह्मासन हे आदिकरुनिया नानापरिची आसनविधि सारावी ॥२॥
जो योगेश्वर मुनिसुखधाम । अचरे योगकळा निष्काम । पुरवित योगीजन मनकाम । अष्टहि कुंभक प्राणायाम । त्याचें ऐकुनि घ्यावें नाम । भेदन सूर्य आणि मुझ्याइसि तलिसितकारभ श्रीइभ्रमरि मूर्च्छाकुंभक पाहीं । वृत्ति ठेवुनि स्वरुपाठाई कर्णि नादध्वनि ऐकवि गडगडगडगड मेघनाद आणि दननन दनन भेरिनाद छनछनछनन मर्दल वाजति घननन घननन घंटारव आणि खननन खननन काहाळरव सनन सननन वेणुवाद आणि भररभरर भृंगनाद आणि भंभंभंभं शंखनाद आणि चिनिनीनि चिनिनि चींचिनिरव किनिकिनिनि किनिनिनि किंकीनिरव अदि बहुपरिचि नाद ध्वनि ऐकुनि ऐकुनिया श्रवणीं । निजस्वरुपीं मन उन्मन करुनि योगधारणा अचळसमाधि राज योगासह बहुत कल्प अचरूनिया एसिं स्वच्छंदें वृत्तिवरि येउनि अहितविहित मन रहित करूनि जगासहित ब्रह्मरूप पहातसे गासावी ॥३॥
भक्तकाज कल्पद्रुम आगर । स्वप्रकाश जो चिद्रत्नाकर । रमत अहे अखंड महीवर । निबिड वनांतरि हिंडत असतां यदुराजनृप मृगये साठीं फिरतांना त्या नृपतीतें अवधूत पाहिले । त्याचे मन थक्कित राहिलें । रूप चांगलें श्यामवर्ण पाहुनिया नयनिं शिबिकेतळिं उतरुनि तयानें पदद्वयातें भाळीं वंदिले जोडुनिया कर विनवितसे मज कळले नाहीं कोण तुह्मि हे सांगा स्वामी । पूर्णपणें दिसतां निष्कामी । नांदतसा कवण्हा सुखधामी । शरणागत हा समजुनिया मि कृपा करावी ऐसें ऐकुनि त्याजप्रती अवधूत बोलती । ऐक भूपति निश्चळता सेवुनिया चित्तीं आनंदमय जे माझी वृत्ति । तुज सांगतों ते निजख्याति । निराकार मी संगातीत नि:संग रमतसे विषयभोग मज तुच्छ गमतसे । ऐसें  बोलुनि नृपतीला निज नयनिं पाहुनि । कृपाकटाक्षें आत्मसुख निजप्राप्ती देउनि । पाठविला निजगांवीं ॥४॥
परब्रह्म अवतार परात्पर तो करुणाकर भूलोकीं अवतार प्रगठला धर्मसंस्थापना कराया पृथ्वीवरुते हिंडत असतां कोणे एके समयांतरिं मच्छंद्रनाथाजि त्याचा शिष्या गोरक्षक या नामें असतां त्यानें झोळि भिक्षेस्तव ग्रामांत धाडिली भिक्षा घेउनि येतांना दत्तात्रयस्वामी यांनीं सोटा हाटवुनि ते खालीं पाडिली अन्न सर्व घेउनी रिकामीं फिरुनि धाडिलि जायप्रकारें तिन दिन गेल्यावरि तीचे पाठिसी गोरक्ष पातले दत्तात्रय स्वामी तें पाहुनि यदते जाले कोण असा तूं झोळी अमुची उतरुनि घेता । काय तुझें सामर्थ्य अहे तें दाखवि आतां । ऐसें वदतां त्याजप्रती अवधूत बोलता जाला जे त्वां दाखविल्यावरि दाखवितों मी ऐसे ऐकुनि गोरक्षानी अपुली सिद्धी दाखविली ते ऐकुनि घ्यावी अकाशसम देह गुप्तपणें वायूचा गमने उदकांतरि जाउनिया बसले ऐसें पाहुनि ततक्षणीं दत्तात्रय यांनीं दर्भसिखा त्याचे मागे पाठविला तो जेथें जेथें जाइल तेथें पाठिसि ते दर्भसिखा हींडातसे ऐसे पाहुनिया बहु श्रमदायक शरिरासि होउनि श्रीगुरुसंनिध येता जाला । त्याजप्रती प्रत्यूत्तर वदला । माझा उपाय निर्फळ झाला । आतां अपुले सामर्थ्याला । त्वरा करुनिया दाखवि वहिला । ऐसें म्हणतां दत्तात्रय मग बोलति त्याला । जाणें येंणें बहुत कशाला । जयापरी मी वदतों तुजला । तयापरी तूं अचरे वहिला । हस्तकीं घेउनिया शस्त्राला । छेदी आत्तां माझे शरीराला । ऐसें ऐकुनि गोरक्षानें शस्त्र धरुनि श्रीगुरूतें ह्मणतां इकडिल तिकडे पारचि व्हावें । शरिरासी कांहीं न लागावें । ऐसे पाहुनि शस्त्र त्यजुनि मग श्रीगुरुचरणीं मस्तका जाउनि ठेवी ॥५॥
भक्तकाज - कल्पद्रुम श्रीहरि । लीला दावितसे नानापरि । प्रतिदीनि होती जे फेरी । ऐकुनि घ्यावी भक्तचकोरीं । प्रात:समयीं उठोनिया काशीप्रति जावें । भागीरथीचें स्नान करावें । माध्यान्हीस कोल्हापुरिं यावें । भिक्षाटन ग्रामांत करावें । पांचाळेश्वरि जाउनि खावे । शेषाचळिं मग सहज स्वभावें । जाउनिया आसन सारावें । माहुरगडि निद्रे अचरावें । दत्तात्रय दत्तात्रय नांवें । घेइल त्याचे निकट फिरावें । ध्यान करिल त्या दर्शन द्यावें । श्याम वर्णतनु निर्मळ सिरपुकमळ दळासम नेत्र विराजित । शुक नासिकसे घ्राण शुशोभित भाळविशाळ माळ गळ्यामधि गरुडपाच आणि निळ करित बहुकिळ फार सारल खचित शिरिं मुकुट विराजे । दीव्य प्रभाकर पाहुनि लाजे । ऐसी कांति जयाप्रति साजे । मकरकुंडलें तळपति कर्णीं । रत्नखचित पादुका चरणीं । पीतांबर शोभतसे जघनिं । उंचि दुपेटा लफ्फेदारी । झग्यावरुनि वेष्टित जरतारी । सहाभूषणें शोभति षट्करीं । मृगमद चर्चित हास्यवदन रघुनाथ प्रसादें रेवतपर्वतीं श्रीगुरु पाहुनि त्या पदकमळी भाळ निरंजन ठेवीं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP