मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ| रघुनाथस्वामींचा कटिबंध श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ आत्मबोध प्रकाशिनी निरंजन स्वामी कृत अभंग अनुभवामृत निरंजनकृत हिंदुस्थानीं पदें केशवचैतन्यकथातरु निरंजन स्वामीकृत मराठी पदें. निरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र साक्षात्कार स्वात्मप्रचीती टीका पतिव्रताआख्यान निरंजनपर ओव्या गोंधळी निरंजन स्वामीकृत स्फुट आर्या निरंजन स्वामीकृत प्रभाती रघुनाथस्वामींचा कटिबंध कटिबंध दत्ताचा १ दत्ताचा कटिबंध २ कटिबंध शिवाचा रघुनाथस्वामींचा कटिबंध वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी रघुनाथस्वामींचा कटिबंध Translation - भाषांतर महाराज रघुविरस्वामी सद्गुरु निजवदनीं गावे ॥धृ॥गंगातट अतिनिकट वसुनि । बहु प्रगट नसुनि । जगीं गुप्त आसुनि । एकांतीं बसुनि । बहुकाळ घातला । ठउक नसतां मात कुणाला । वसवुनिया वहुसाल वनाला । कंटाळुनि मनिं दारधनाला । शुकसनकादिक उपमा ज्याला । अवलंबुनि बहु उपवासाला । सहजरितीं मग आटा दिसाला । कालवुनी जळीं मुष्टिपिठाला । गोडी कांहीं नसतां त्याला । प्राशन करितां मिष्टमिष्ट बहु । इष्ट म्हणुनि संतुष्ट असावें । वृक्षाचे तळिं नित्य बसावें । सांगाती कोणींच नसावें । वैराग्यें शरिरासि कसावें ।ग्रामाभीतरि कदा न यावें । शीतउष्णपर्जन्य सहावें । वैर्यासम शरिरासि पहावें । विषयभोगसौख्यासि रुसावें । सुखदु:ख समसमान पहावें । संशय मनिचे समुळ खणावे । आत्मानात्म विचारित जावें । योगबळें निद्रेसि निजावें । याचिपरि वैराग्य करुनि । मनिं त्याग धरुनि । चाळिस वर्षें गेलीं सहज स्वभावें । महाराज ॥१॥मार्गीं जातां सहज रितीनें । आकाशगमनीं उर्ध्वगतीनें । आत्मस्वरूप निश्चित मतीनें । गंगेच्या परतीरास जावें । वसलें असतां असन उडावें । तेथिल तेथें गुप्तचि व्हावें । दुसर्यासी बहुतेज दिसावें । क्षणामधि काशीप्रति जावें । ऐसें तेथें सतत असावें । कचेश्वराचे संन्निध आपण । गेले असतां विप्र तयास्थळीं । अनुष्ठान करणारे होते । तयाचिया स्वप्नांतरि येऊनि । सांगतसे शिवरघुनाथ हा । ऐष असे मम त्याप्रती तुह्मी । शरण रिघुनिया अनिष्ट जाउनि । इष्ट असेल ते मागुनि घ्यावें । अग ते ब्राह्मण तशाच रितिनें ॥ शरण आलिया मनोगतासम । प्राप्त झालिया जाते झाले । त्याचिपरि दुसर्यानें द्विजवर । सप्तशृंगिचे देवीपासुनि । येउनिया निज सांगतसे मज । स्वप्नांतरि अंबनें येउनि ॥ सांगितलें जें रघुनाथाचें । दर्शन घेता रोग हारले ॥ तव ह्मणवुनिया चरणाचे सन्निधा येता झालों ऐसें ॥ त्या उपरांतिक शितज्वर ॥ शतिरासि पातले । दर्शनासि जन येतांना कंथेत घातलें ॥ वामभागी उचलून ठेविता । कथा मग तटतटा उडाली । असो याचिपरि चमत्कार झाले । ते आतां कोठवरी वर्णावे ॥२॥भरला पुण्याचा सागर । कीर्ति झाली पृथ्वीवर ॥ धावुनि येती नारीनर । पाया पडती वारंवार ॥ ह्मणती धन्य धन्य गुरुस्वामी । अनाथ दुर्बळ पापी आक्षी ॥ भुललों भवपाशाचे भ्रमी । होऊनि विषयामाजिल कृमी ॥ झालों संसारामधि श्रमी । आह्मासि तारक व्हावें स्वामी ॥ ऐसें ह्मणोनि वारंवार । सांडुनि प्रापंचिक वेव्हार ॥ त्यजिला बहुता नि:संसार । घालुनि चरणावरुते भार ॥ ह्मणती न्यावे जी भवपार । ऐकुनिया त्याचे वचनाला ॥ तत्वबोध बहुताला केला । त्याचा भवभ्रम विलया गेला ॥ देहभाव समुळ विराला। अनुभव ते वदती अपुलाला ॥ धन्य धन्य आह्मी नीराकार । संगातित अह्मि आकाशवत ॥ सर्वांतर व्यापक असंग आद्वय ॥ अनादिशप्ती असे परपार ॥ नसे आमुचे स्वरूपाचा । याचिपरी बहुतांनीं बोलुनी ॥ आत्मतत्व निजबोधें डोलुनि । स्वरुपीं तन्मय व्हावें ॥३॥कलियूगाचे ठायीं जाण । दिधलें आत्मतत्व बहु देणें ॥ चुकलें जन्ममरण हें जेणें । नाहीं केलें येणें जाणें ॥ निराकारीं वस्तिसि पेणे । देऊनिया निज वस्तू लेणें ॥ नांदविले आपुलाले ठाईं । ऐसें देणें दिधलें पाही ॥ अभिमानाचा लेश न कांहीं ॥ अंतर्यामीं ज्याचे नाहीं ॥ सद्गुरु मी ऐसेंहि कांहीं । ज्याचे अंतरीं सहसा नाहीं ॥ सर्वांलागुनि स्पष्ट वदावें । आपुलाले सदनाप्रति जावें ॥ माझे सन्निध कोणिं न रहावें ॥ पाठीमागें कोणि न यावें ॥ ऐसें बोलुनिया निजभावें । शनै:शनै विपिनांतरिं जावें ॥ एकांती जाऊनि बसावें । निजतत्वातें मनिं गिवसावें ॥ सदाशिवाचे सिन्निध जावें । पिंडिवर पाणि घालावें । उभय हस्त पिंडिचे सन्निध । नेउनिया हळु मान तुकावुनि । मंजुळ शब्दें हळुहळु बोलुनि ॥ शिव शिव शिव शिव । निजवंदनानें गावें ॥४॥कर्म अकर्मा विरहित असतां । कर्माचे स्थळीं बहूत आस्था ॥ भक्तीचें बहु कारण नसतां । देवाचें स्थळिं बहुत आस्था ॥ दाउनिया जगिं लोकसंग्रहा । साठीं आपण पूजित जावें ॥ पळभरि तेथें उगिच बसावें । गंगाजळ मग मरोनि घ्यावें ॥ शतै:शनै आपण चलावें । मार्गांतरिं जन बहु सद्भावें ॥ धावुनि येति चरणासन्निध । पाया पडती ॥ कितीक स्तुतिसंवादा करिती । तापत्रय वार्तेसि वदती ॥ धोत्रपात्रद्वय हस्तकिं असतां । ओले पडदनीं सहित त्यांचे ॥ मनोगतासम उभें असावें । झाल्यावरि मग मान तुकवुनि ॥ सहजगतीनें मठिके भीतरि । गेल्यावरि ते पाठीमागे ॥ थाट जगाचा कपाट उघडे । असतांना मग अफाट यावें ॥ तितुक्यासि बोलुनिया त्याचे । मनोगतासि निववुनिया ॥ मार्गस्थ करावें । लहानथोर समसमान सारे ॥ श्रीमंत आलिया त्याजप्रती जें । भाषण करणें तशापरीचें ॥ अनाथ दुर्बळ येइल त्यासि । ईष्ट असेल ते मिष्ट वदुनिया ॥ उभे असावें । तो बसलिया आपण बसावें ॥ ऐसी लीला कोठवरि वर्णावी बारे । दयाशांतिचे निजभांडारे ॥ फोडुनि जन निवविले सारे । इतुकें असतां कमळपत्रसम ॥ अलिप्त राहुनि । निरंजनातें नयनीं पाहुनि ॥ स्वरूपीं रमत असावें ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 25, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP