मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ| पतिव्रताआख्यान श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ आत्मबोध प्रकाशिनी निरंजन स्वामी कृत अभंग अनुभवामृत निरंजनकृत हिंदुस्थानीं पदें केशवचैतन्यकथातरु निरंजन स्वामीकृत मराठी पदें. निरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र साक्षात्कार स्वात्मप्रचीती टीका पतिव्रताआख्यान निरंजनपर ओव्या गोंधळी निरंजन स्वामीकृत स्फुट आर्या निरंजन स्वामीकृत प्रभाती रघुनाथस्वामींचा कटिबंध कटिबंध दत्ताचा १ दत्ताचा कटिबंध २ कटिबंध शिवाचा पतिव्रताआख्यान वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी पतिव्रताआख्यान Translation - भाषांतर ( ओव्या. )वेद सर्वांसी आधार । वेद सर्वांचें माहेर । वेदाचेनि पैलपार । पावले सर्व ॥१॥ तेथें बुद्धि पतिव्रता । दुबळी होवोनि दुश्चिता । गेली सांगावया हिता । आपुलें गुज. ॥२॥ वंदोनि श्रुतिमायेसी । सांगे दु:खाचिया राशी, । ‘ ऐकमाते ! स्त्री देहासी । निर्मिलें कोणें ? ॥३॥ स्त्रियेच देह अमंगळ, । स्त्रीदेह पापासी मूळ, । स्त्रीदेहाचा विटाळ । मानिती ज्ञानी. ॥४॥ स्त्रीदेह हें कोडें धन । स्त्रीचा देह पराधीन । स्त्रीदेह उघडें वान । झांकितां नये. ’ ॥५॥ मग ह्मणे श्रुती आई, । ‘ ऐकलें कीं बुद्धिबाई ! । स्त्रीदेहाची नवाई । सांगतें तुज. ॥६॥ स्त्रीदेह रामाची सीता । रुक्मिणी श्रीकृष्णकांता । स्त्री द्रुपदाची दुहिता । अहिल्या तारा ॥७॥ वसिष्ठाची अरुंधती । अत्रीची अनुसूयासती । ऐशा स्त्रिया धन्य किती । जाल्या त्या सांगूं. ’ ॥८॥ बुद्धि ह्मणे, ‘ ऐक माते ! । धन्य होते त्यांचे भर्ते । जोडा माझिया दैवतें । मिळाला कैसा ? ॥९॥ होतें पायें लंगडा लुळा । नाहीं नाक कान डोळा । रूपाचा सोहळा । काय वो सांगूं ? ॥१०॥ असो जैसा तैसा तरी । ऐक स्वभावाची परी । अविद्या दुराचारी । ठेविली तेणें. ॥११॥ करितां तयेसी संसार । शतावधि जालीं पोरें । मन आणि अहंकार । थोरले पुत्र. ॥१२॥ त्यांनीं पापाचे पर्वत । उभारिले असंख्यात । विषयभोगें उन्मत्त । होवुनी ठेले. ॥१३॥ आशा तृष्णा कल्पना । लेकी जाल्या या तुफाना । न ह्मणती थोरसाना । भोगिती सर्व. ॥१४॥कामक्रोधादि लेंकुरें । खोडकर अनिवार । त्यांनीं हागोनिया घर नासिलें सर्व ॥१५॥ हृदयाच्या माजघरीं । पति निजतो विळभरी । बरळतो नानापरी । अविद्यायोगें. ॥१६॥ ह्मणे जन्मतो मरतो । पापपुण्यादि भोगितो । स्वर्गनरकासि जातो । वारंवार. ॥१७॥ माझें घर, माझें दार, । माझी संपत्ति, हें पोर । माझा अवघा संसार । असावा सदा. ॥१८॥ असो. आतां मायाबाई ! । करूं उपवासी काई ? । व्रत आचरोनि पाही । जाळीन देह. ’ ॥१९॥ श्रुति ह्मणे, ‘ पतिव्रते ! । ऐक लेकी गुणवंते । माझें वचन निरुतें । सांगतें तुज. ॥२०॥ पतिवांचोनि वृथा ( व्रता ? ) स्त्रियेनें करूं नये सर्वथा । पतियोगें पतिव्रता । धन्य पैं जाल्या. ॥२१॥ स्त्रियांचा तो पति देव । व्रतदान पुण्यें सर्व । पति स्त्रियेचा तीर्थराव । वंदावा सदा. ॥२२॥ पति जाणावा निर्दोष । पाहूं नये त्याचा दोष । सदा सर्वदा संतोषें । सेवावा पति. ॥२३॥ पति मानावा गनगोत । पति स्त्रीचा परम आप्त । पति स्त्रियेचा परमार्थ । जाणावा सर्व. ॥२४॥ करिता नित्य पतिसेवा । संतोष वाटतो देवा । लक्ष्मी पार्वती हेवा । करिती तिचा. ॥२५॥ बुद्धि लेकी ! धरी धीर । माघारी घरासी फीर । भर्ताराची निरंतर । करावी सेवा. ॥२६॥ वडिल बंधु तुझा सखा । विवेक नेई पाठिराखा । करिल अविद्येचा वाखा । देईल घालवूनि. ॥२७॥ मन आणि अहंकार । अविद्येचा जो विस्तार । करिल तयाचा संहार । विवेक हा. ॥२८॥ घेउनि विवेकाचा फाटा । झाडुनि काढीं चारी वाटा । शमदमादि चोखटा । घाली गे ! सडा. ॥२९॥ मुमुक्षता घेउनी फणी । घाली त्रिगुणाची वेणी । शुद्धसत्वजीवनीं । सुस्नात होई. ॥३०॥ गुरुभक्ति पातळ चोळी । नेसुनि होईं सोवळी । निश्चयाचें कुंकूं भाळीं । अक्षयीं लावीं. ॥३१॥ अमानित्वादि भांडार । उघडुनि घाली अलंकार । रत्नजडित परिकर । प्रकाशमय. ॥३२॥ सर्व शृंगारा करोनि । जाई पतिसन्निधानीं । स्तुतिस्तवना करूनी । उठवी पति. ’ ॥३३॥ श्रुतिमायेनें कथिलें । सब्दुद्धीनें तैसें केलें । स्तवनासि आरंभिलें । वेदांतें करूनि. ॥३४॥ उठा उठा पतिराया ! । कैसे भ्रमलाति वायां ? । जाणा ईश्वराची माया । मिथ्या ही सारी ॥३५॥ तुम्हां नाहीं देह गेह । कैंचा पापपुण्या ठाय ? । स्वर्गनरकाची त्राय । फिटली सहजीं. ॥३६॥ तुह्मी निर्गुण निराकार । निर्मळ निश्चळ निरादार । अनंत पारावार - । रहित तुह्मी. ॥३७॥तुह्मी ज्ञानघनानंद । परिपूर्ण असिपद । कैंचा वायां करितां खेद । जागे व्हा स्वामी ! ’ ॥३८॥ ऐसें करितां स्तवन । सांडोनिया जीवपण । प्रत्यगात्मा सावधान । होता पैं झाला. ॥३९॥ सब्दुद्धीसी आलिंगुन । पावला तो समाधान । जालें पूर्वील स्मरण । त्यालागीं सर्व. ॥४०॥ बुद्धीसहवर्तमान । गेला सद्गुरूसि शरण । त्याच्यायोगें पूर्णपण । पावता झाला. ॥४१॥ तेथें बुद्धि पतिघ्रता । विरूनि गेली सर्वथा । करूनि आपुल्या स्वहिता । पावली कीर्ति ॥४२॥ पतिव्रताआख्यान । जे कां करिती स्मरण । तेहि होती निरंजन । रघुवीरकृपें. ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP