मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ| गोंधळी श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ आत्मबोध प्रकाशिनी निरंजन स्वामी कृत अभंग अनुभवामृत निरंजनकृत हिंदुस्थानीं पदें केशवचैतन्यकथातरु निरंजन स्वामीकृत मराठी पदें. निरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र साक्षात्कार स्वात्मप्रचीती टीका पतिव्रताआख्यान निरंजनपर ओव्या गोंधळी निरंजन स्वामीकृत स्फुट आर्या निरंजन स्वामीकृत प्रभाती रघुनाथस्वामींचा कटिबंध कटिबंध दत्ताचा १ दत्ताचा कटिबंध २ कटिबंध शिवाचा गोंधळी वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी गोंधळी Translation - भाषांतर शुक सांगे परिक्षिती । ऐक कथा भागवती ॥ ध्रुवपद. ॥ देहनगर अष्टपुरी जी । पुरंजन राज्य करी जी । बुद्धि तयाची अंतुरी जी । गुणवती सुंदरी जी । त्याचा अहंकार परधान जी । दृष्टराशी काय दुर्जन जी । राजा त्याच्या स्वाधीन झाला जी । त्यानें खेळ काय मांडिला जी । राणीराजाचे माझारि जी । विपट पाडियलें भारी जी । पुढें होणाराची गती. ॥शुक०॥१॥ याव याव काय परधाना जी । माझ्या जीवींच्या जीवना जी । जाऊं विषयाच्या वना जे । भोगूं परावी अंगना जी । मनपवन वारूवरी जी । संकल्पाचा साज करी जी । इंद्रियदळभार हाकारी जी । राज शिकारी निघाला जी । मनवारूवर बैसला जी । पुढें होणाराची गती. ॥शुक०॥२॥मग त्या पुरजन रायानें जी । आत्मराज्य काय सोडिलें जी । नसतें जिवपण जोडिलें जी । पांच वनें ओलांडिलीं जी । गेला विषयाच्या वना जी । गेला वासनेच्या दरीं जी । सहा चोरांचीं गांठिलें जी । घे घे घे घे काय बोलती जी । आशा राक्षसिणी गर्जती जी । व्देषभेदादि वनचरें जी । खाती फोडोनि उदर जी । राजा मनीं दचकला जी । काय रे ! अहंकार परधाना ! जी । वन रे ! मोठे भयंकर जी । त्याचा अंत काय लागेना जी । मला रे ! दिशाभुली झाली जी । राणी कुठें रे ! राहिली जी । ऐशा होणाराची गती ॥शुक०॥३॥ इकडे बुद्धि पट्टराणी जी । पतिव्रता सत्वगुणी जी । तिनें रोदना मांडिलें जी । हरि बा हरि नारायणा ! जी । काय रे ! करूं या प्राक्तना जी । राजा कोणीकडे गेला जी । इनें बा ! तप काय मांडिलें जी । उपभोगासि सांडिलें जी । घालुनी वैराग्याची धुनी जी । विवेकाच्या काय अंगणीं जी । संग्रामाच्या वज्रासनीं जी । मोक्षहेतु धरुनी मनीं जी । सद्गुरु देव आराधिला जी । त्यांनीं बोधपुत्र दीधला जी । पुढें होणाराची गती. ॥शुक०॥४॥ बोध बुद्धीतें बोलत, जी । ‘ राजा कोठें सांग मला जी । त्याचा शोध मी लावीन जी । तुजलागीं भेटवीन जी ’ । बुद्धि ह्मणे, ‘ ऐक सुता रे ! जीव विषयवनीं तुझा पिता रे ! जी । अहंकार घेउनी गेला रे ! जी । तेथें गुंतोनि राहिला रे ! जी ’ । ऐकुनि मातेच्या वचना जी । बोध प्रतिज्ञा बोलत जी, । ‘ राजा घेउनि येइन जी । तुला सुखी काय करिन जी ’ । पुढें होणाराची गती. ॥शुक०॥५॥ विवेकाचा वारु भला जी । त्यावरी बोध स्वार झाला जी । शांति क्षमा दोहीं करीं जी । चौर्या ढाळिती सुंदरी जी । शमदम संगें दळ जी । तोफा वैराग्य तुंबळ जी । मग त्या विषयवनाला जी । त्यागरूप अग्नी दिला जी । सहा चोर काय पळती जी । भेद वनचर जळती रे ! जी । मग अत्या बोधराजियानें जी । अद्वैताच्या काय शस्त्रानें जी । अहंकार तो मारिला जी । इंद्रियबंध तो बांधिला जी । वनमारू फिरविला जी । ऐशा होणाराची गती ॥शुक०॥६॥ पुरंजन राजियाला जी । रामा बोध घेउनियां आला जी । बुद्धीलागीं भेटविलें जी । बुद्धि आत्मयाची भेटी जी । निरालंबीं मिठी पडली जी । गेला दु:खाचा दुकाळ जी । झाला सुखाचा सुकाळ जी । ब्रह्मपदसिंहासनीं जी । आत्मा शोभे अद्व्यपणीं जी । वसता झाला निरंजन जी । ऐशा होणाराची गती. ॥शुक०॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP