मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार| राक्षसविवाह विवाहाचे आठ प्रकार विवाहाचे आठ प्रकार ब्राह्मणविवाह दैवविवाह आर्ष विवाह प्राजापत्य विवाह आसुरविवाह गांधर्वविवाह राक्षसविवाह पैशाचविवाह पुत्रिकाविधिविवाह पृथग्विवाह आणि मिश्रविवाह आपत्प्रसंगी विवाहांची वर्णश: व्यवस्था असवर्ण विवाह शूद्रवर्णाच्या स्त्रीस वरण्यचा त्रैवर्णिकांस आग्रहपूर्वक निषेध प्राचीन उदाहरणे स्त्री - संबंध व्यभिचारवृद्धी ही स्थिती व्यवहाराशी जुळतीच आहे गांधर्वविवाह प्रचारातून गेला असावा मनुकालापूर्वी स्वयंवरपद्धती बंद होती ब्राह्मादी चार विवाहांचा संकोच आसुर व राक्षस विवाहांचे भेदस्वरूप समाजाची उत्क्रान्ती; राजसत्ता व कुटुंबस्वामी कुटुंबस्वामीची भयंकर सत्ता, गुलामगिरी, विक्रय कन्याविक्रय व आसुरविवाह राक्षसविवाहाबद्दलचा विचार राक्षसविवाहाची खोटी बतावणी राक्षसविवाह प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर राक्षसविवाह Translation - भाषांतर सातवा प्रकार ‘ राक्षसविवाह ’ हा होय. व तो एकट्या क्षत्रिय वर्गासच करिता येतो. क्षत्रियाचे मन एखाद्या स्त्रीवर बसले, म्हणजे तिच्या प्राप्त्यर्थ तो पाहिजे ती गोष्ट करील. एखाद्या भिक्षुक वृत्तीच्या मनुष्याप्रमाणे ‘ ही मला द्या ’ अशी याचना तो कदापि करणार नाही; तर तो तिला स्वपराक्रमानेच मिळवू पाहील. ती स्त्री एखाद्या मोठ्या अवघड बंदोबस्ताच्या ठिकाणी असली, तर तेथे प्रवेश होण्याकरिता तो घरांना भोके पाडील, प्रसंगी उच्छेदही करील. त्याला हरकत करण्यास कोणी आले, तर त्याच्या अंगाचे तिळातिळाएवढे तुकडे करण्यासही तो कमी करणार नाही. एखादे वेळी त्याच्या हातून खूनही होतील. एखाद्या भुरट्या चोराप्रमाणे तो कोणाच्या घरात न शिरता राजरोसपणे सर्वत्र संचार करील. त्या स्त्रीच्या अंत:पुरात जाऊन तिचा हात धरून तो तिला घेऊन जाऊ लागेल. तिने नेत्रांतून अश्रू गाळले किंव मोठ्या - मोठ्याने आक्रोश केला, तरी त्याची पर्वा न करिता साहसाने तो आपला हेतू तडीस नेऊन त्या स्त्रीस आपली करील.प्राचीन काळी राजेलोकांत स्त्रीप्राप्तीकरिता आता लिहिल्या तर्येचे प्रकार होत असत, याची उदाहरणे महाभारतादी ग्रंथांत अनेक जागी दृष्टीस पडतात. कौरवपांडवांचा आजा विचित्रवीर्य याचा अंबिका नामक राजकन्येशी याच प्रकारे विवाह झाला होता. ही अंबिका काशिराजाची कन्या असून विचित्रवीर्याचे ज्येष्ठ बंधू प्रसिद्ध भीष्माचार्य यांनी तिचे युद्धात हरण केले होते, व तिचा विवाह आपल्या बंधूशी लागून दिला होता. मनुस्मृतीवर नंदनाची टीका आहे, तीत या विवाहाचे हेच उदाहरण लिहिले आहे. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP