मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें| इष्टकाप्रार्थना स्फुट काव्यें गजाननस्तव श्रीमयूरेश्वरप्रार्थनार्या रामस्तव भगवत्प्रसादमहिमा गदाधरस्तुति बिंदुमाधवस्तुति पांडुरंगदंडक १ पांडुरंगदंडक २ पांडुरंगदंडक ३ विठ्ठलप्रणिधि विठ्ठलस्तुति विठ्ठलविज्ञापना १ विठ्ठलविज्ञापना २ विठ्ठलपद्मस्तुति वेंकटेशप्रार्थना १ वेंकटेशप्रार्थना २ दत्तदयोदय १ दत्तदयोदय २ दत्तदयोदय ३ दत्तदयोदय ४ विश्वेशस्तुति १ विश्वेशस्तुति २ विश्वेशस्तुति ३ विश्वेशस्तुति ४ द्विचत्वारिंशल्लिंगयात्रा काळभैरवस्तुति खंडोबास्तव सिद्धेश्वरस्तव महालक्ष्मीस्तव अन्नपूर्णास्तुति तुळजास्तव गजाननमाहात्म्य अध्याय पहिला गजाननमाहात्म्य अध्याय दुसरा गजाननमाहात्म्य अध्याय तिसरा गजाननमाहात्म्य अध्याय चवथा श्रीहनुमन्नुति तुलसीस्तव अनंतव्रतकथा १ अनंतव्रतकथा २ अनंतव्रतकथा ३ अनंतव्रतकथा ४ श्रीभगवद्गीतास्तुति नारदाभ्युदय रेणुकास्तव इष्टकाप्रार्थना मुरलीपंचक इष्टकाप्रार्थना मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते. Tags : moropantpoemकविताकवीमराठीमोरोपंत इष्टकाप्रार्थना Translation - भाषांतर ( गीतिवृत्त )माते ! कीर्ति सुधेहुनि बहु गोड तुझी सदिष्टके ! लागे.तुज जड म्हणेल, तो जड, कीं त्वां स्वात्मा सदिष्ट केला गे ! ॥१॥श्रीविठ्ठलचरणातें रात्रिदिवस तूं उरीं वहातीस.श्रीचा विपक्ष राधा म्हणवि ‘ बहु ’, परंतु ती न ‘ हा ’ तीस. ॥२॥श्रीमत्तीर्थपदाच्या अनवरत श्रीपदासि वाहून,झालिस तूं सन्मान्या तीर्थधरश्रीसदाशिवाहून. ॥३॥विटला रमाकुचांच्या स्पर्शासि प्रभु, तुझ्या विटेनाच.सौभाग्य तुझें निरुपम; अद्भुतभाग्योत्सवें विटे ! नाच. ॥४॥विश्वंभरा वहासी; धरिल्या न त्यजसि आइ ! टेकेला.धन्या तूं; गरुडेंही एकभुजभरेंहि ‘ आ ’ इटे ! केला. ॥५॥कां त्वां धरिजेल, वसुनि साधुगृहीं, दुरभिमान वाईट ?वाटसि अज्ञाना, तूं ज्ञात्यांची सुरभि, मानवा ईट. ॥६॥त्वत्प्राप्ति ज्यास, न रुचति कनकाच्या कोटि त्या इटा, कविला.हें काय ? तुवां निपटुनि मेरुशिखरिलोभ बाइ ! टाकविला. ॥७॥प्रभु मोहिला तव सुखस्पर्शें, गीतें जसाचि काळविट.कीं हा उभाचि भुलला; कैसा न नयेचि सुचिरकाळ विट ? ॥८॥अद्भुत औदार्य तुझें कीर्तिति कविकोटि इष्टके ! कीं तेंदेसी जेंवि घनघटा देती जें काय इष्ट केकींतें. ॥९॥प्रभुनें मस्तकधृतपद दैत्यकुळीं धन्य शिष्ट केला जो,तो पाताळस्थित बळि, परिसुनि तव कीर्ति, इष्टके ! लाजो. ॥१०॥धरिला शिरीं दयाघन तव वच लंघिल न इष्टके ! कांहीं,हा कवि मयूर पावो सत्वर या सर्व इष्ट केकांहीं. ॥११॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP